Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Monday, 19 February 2018

उद्या मुंबईत महाराष्ट्राचा ढाण्या वाघ स्व.बापू बिरु वाटेगावकर यांची शोकसभा

              ज्या माणसानं जात पात मानता मांगाच्या पोरीची आब्रू वाचवण्यासाठी हातातील मेंढ्यांची काठी बाजूला फेकली आणि अन्याय करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी धनगरांचे हत्यार असलेली कुऱ्हाड हातात घेऊन आया-बहिणींवर अत्याचार करणारे गावगुंड कापून काढले, अनेक सासुरवाशीण पोरींचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचवले, वाळवा तालुक्यांतील अनेक गावं गावगुंड मुक्त केली त्याच क्रांतीपुरूषाने वाळवा तालुक्यांतील तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांवरचे भितीचे सावट बाजूला केले. स्त्रीयांच्या इज्जतीवर हात घालणाऱ्या इतरांनाच काय स्वताच्या मुलाला देखिल गोळी घालून मारणारा स्त्री रक्षणकर्ता म्हणून आप्पांची ओळख आहे. आप्पांचे कार्य आप्पांचा त्याग हा स्वतासाठी नव्हता तर तो समाजासाठी होता म्हणून आप्पा समाजासाठी देव ठरले त्या देवमाणसाला काही नालायक पत्रकार गुंड म्हणत होते त्या पत्रकारांनी विचार करावा की गुंडांना मारणारा गुंड असतो की देव ते तुम्ही अनेक मराठी-हिंदी चित्रपट पाहून जसे तर्क वितर्क काढत असता मग आप्पांच्या बाबतीतच तुमची बुद्धी कुठे शेण खात होती का?
आप्पांना हयातीतच खरंतर समाजभूषण पुरस्कार द्यायला हवा होता पण झाले नाही परंतू आता मरणोत्तर पुरस्कार तरी द्यायला हवा यासाठी मुंबई नगरीत क्रांतीपुरूष महाराष्ट्राचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर उर्फ आमचे लाडके स्व. आप्पा यांची शोकसभा आयोजित करण्यात आली असून सर्व महाराष्ट्र वासीयांनी जात पात मानता कृपया माणसातल्या या देवासाठी शोकसभेस हजेरी लावून आप्पांना आदरांजली वाहवी ही विनंती
👏👏👏👏👏👏👏👏👏👏

*वार.-मंगळवार.*
*दिनांक.-२०/०२/२०१८ वेळ-सायंकाळी .०० ते .५०*

*स्थळ.-*
*दामोदर हॉल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड,परळ, मुंबई.*

🙏महाराष्ट्र राज्य धनगर समाज🙏

Thursday, 15 February 2018

अहिल्याईंच्या लेकी भडकल्या... महिला दिनादिवशी धनगर समाजाचा मुंबईत आरक्षण मेळावा...


              अन्यायाच्या विरोधात किती दिवस मूग गिळून गप्प बसायचं असतं...? अन्याय करणाऱ्यांची सीमा नसते परंतू अन्याय सहन करणाऱ्यांच्या सहनशक्तीचा जर अंत झाला तर अन्याय करणाऱ्यांची काही खैर नसते. म्हणूनच ज्या राष्ट्रमातेनं या भारताच्या विशाल भूमीवर २८ वर्ष राज्यकारभार केला त्या राष्ट्रमाता अहिल्याईंच्या लेकी आता अन्यायाविरोधात पेटून उठल्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली पण धनगर समाजाला अजूनही खरे स्वातंत्र्य मिळाले नाही. गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मागचे आघाडी सरकार नालायक आणि नपूंसक ठरले परंतू माकडाच्या हातात कोलिते द्यावे आणि त्याने अख्ख्या जंगलाला आग लावावी असाच प्रकार भाजप सरकारने देखिल केला. धनगर समाजाला घटनादत्त आरक्षण असताना देखिल TISS सारख्या संस्थांची नेमणूक करून धनगर समाजाल आरक्षणापासून, सत्तेपासून, शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे घाणेरडे राजकारण हे मराठावादी ब्राह्मणवादी पक्ष करत असल्याने धनगर समाजाचे फार वाटोळे झाले आहे. एवढे सगळे होऊन देखिल त्या त्या पक्षातले धनगर समाजाचे नेते मात्र आळी मिळी गुप चिळी ची भूमिका घेऊन षंढ होऊन बसले आहेत.
          परंतू आता धनगर समाजातील अहिल्या मात्र पेटून उठल्या आहेत. मार्च हा दिवस जागतिक महिला दिन असून यादिवशी महिलांचा विशेष सन्मान केला जातो त्यादिवशी अहिल्याईंच्या रक्ताच्या या रणरागिणी समस्त महिला वर्गाच्या मागण्यांसी समाजावरील होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी मुंबई येथे येऊन धडकणार आहेत. अहिल्या क्रांती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा मा.कल्याणीताई वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजातील तमाम महिला भगिनी दि. मार्च २०१८ रोजी महिला दिनादिवशी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसणार आहेत. महिला दिनादिवशी महिलांच्या मागण्या जर मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या नाहीत तर मुखमंत्र्याच्या घरापुढे जागरण गोंधळ करण्याचा इशारा देखिल अहिल्याक्रांती प्रतिष्ठान अहिल्या क्रांती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा, साप्ताहिक अहिल्याकिरण च्या संपादिका मा.सौ.कल्याणीताई वाघमोडे यांनी दिला आहे. धनगर समाजातील महिला प्रथमच क्रांतीची मशाल घेऊन रणांगणांत उतरणार आहेत, समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणार आहेत, झटणार आहेत आणि झगडणार आहेत. आपण सर्वांनी मल्हारराव होळकर बनून महिला दिनादिवशी दि. मार्च २०१८ रोजी मुंबई येथिल मोर्चात सहभागी होऊन अहिल्याईंच्या लेकींना पाठबळ द्यावे, प्रेरणा द्यावी ही अखंड धनगर समाजातील माझ्या तमाम समाजबांधवांना बंधूभगिनींना नम्र विनंती आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
आलाच
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३

Friday, 9 February 2018

...तर मला तुमच्या जातीयवादी विचारांची किव येतेय.

...तर मला तुमच्या जातीयवादी विचारांची किव येतेय.
काल परवा एकजण मला सहजच म्हणाला की तुम्ही खूप जातीयवाद करता. मी देखिल त्याला त्याच भाषेत सांगितले की जर तुला तसेच वाटत असेल तर मग मी जातीयवाद करतोय त्याबद्दल काही शंका नाही पण धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे चालू आहे? आणि कोण करते? ते मला एकदा दाखवून दे मग तुझ्या सडलेल्या विचाराची किव करून मी जातीयवाद करायचे सोडून देतो. त्यांवर त्या बहाद्दराची बोलतीच बंद झाली
  खरंतर जातीयवादाची सुरवात कोणी केली? कधी केली? का केली? याचा विचार विनिमय करायच्या अगोदरच शहाणपण शिकवायला येणाऱ्यांची काही कमी नाही हे मी गेल्या तीन ते चार वर्षापासून अनुभवतोय... ज्या सनातन्यांनी जातीयवाद पेरला, बहुजन समाज म्हणजे काय त्यांच्या बापाचीच प्राॅपर्टी आहे असे समजून बहुजनांना गुलाम समजणारे, कनिष्ठ समजणारे ब्राह्मण स्वताला उच्च समजून घेतात तेव्हा त्यांना कोणीच जातीयवादी म्हणत नाही तर उलट त्याच .% लोकांना ज्ञानी म्हणून तुमच्या-आमच्या खिशातील पैसा उकळण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर डोळे बांधून चालणारे अज्ञानी लोक आज आम्हाला जातीयवाद शिकवायला येतात हे नवलच म्हणावे लागेल. अंधश्रद्धेचा पगडा ज्यांनी पाडला त्या सनातन्यांची पोरं कधी नवस पुर्ण करताना आम्ही पाहिली नाहीत मात्र आमच्या बहुजन वर्गातील शेतकरी असो अथवा शेतकऱ्यांची पोरं असोत त्यांना यश येण्यासाठी अथवा पास होण्यासाठी, नोकरी लागण्यासाठी, लग्नासाठी नवस करावे लागते आणि फेडावे लागते तसे केले नाही तर देव कोपेल, देवी कोपेल अशी भिती त्यांना सनातनी व्यवस्थेने घातलेली असते. परंतू त्याच . % मधील कोणी नवस करताना आणि फेडताना आम्हाला कधीच दिसत नाहीत त्याचे कारण असे की जेव्हा आमच्या बहुजन वर्गातील शेतकरी आणि पोरं नवस करण्यात आणि फेडण्यात व्यस्त असतात, त्यानंतर नवस फेडण्यासाठी उचललेल्या कर्जाची परतफेड करत करत जेव्हा त्यांचे अर्धे आयुष्य संपून गेलेले असते तेव्हा त्या .% असलेल्या ब्राह्मणांची पोरं प्रशासकीय स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून आय एस, आय पी एस, आय एफ एस सारख्या परिक्षा देऊन स्थायिक होतात तर कोणी विदेशी अभ्यास दौऱ्यासाठी भारत सरकारच्या तिजोरीतून लाखो रूपयांच्या शिष्यवृत्या घेऊन विदेशात शिकतात तर काहीजण विदेशातच स्थायिक होतात. कोणी डाॅक्टर, वकील, इंजिनीअर या क्षेत्रात वरिष्ठ हुद्द्यावरती पोहचलेली असतात मात्र आमच्या शेतकऱ्यांची पोरं बापाच्या खात्यावर वाढलेल्या कर्जाचा बोजा उतरवण्यासाठी मुंबई-पुणे सारख्या ठिकाणी माथाडी कामगार म्हणून कुठेतरी पाच-दहा लाख रूपये भरून हमाली करत असतात. हे माझ्या समाजातील लोकांना पटवून दिले म्हणजे मी जातीयवाद करतोय असे वाटत असेल तर मग माझ्या भोळ्या-भाबड्या समाजबांधवांना देवाधिकाच्या नादी लावून स्वताचा स्वार्थ साधणारे सनातनी व्यवस्थेचे पुरस्कर्ते जातीयवादी का वाटत नाहीत?
     आज धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय हा मेंढपाळ असताना देखिल दुष्काळाच्या झळया सोसत कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असताना मेंढपाळ बांधव देखिल शेळ्या-मेंढ्या विकून पाच-दहा लाख रूपये गुंतवून मुलाला माथाडी मध्ये जागा मिळवून देतात आणि अभिमानाने छाती फुगवून फिरतात. पण तेच पाच-दहा लाख रूपये व्यवसायासाठी वापरून पुरक असा व्यवसाय करण्याचे आमच्या डोक्यात कोणी घालत नाही. शेळीपालन मेंढीपालन करण्यासाठी निधी मिळावा म्हणून पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवल्यानंतर आमच्या शेळ्या-मेंढ्या राखणाऱ्या धनगर समाजातील मुलांना कळते की शेळीपालन-मेंढीपालन व्यवसायासाठी एस सी अथवा एस टी कॅटेगरी मध्ये असायला हवं त्याशिवाय फाइल पुढे जातच नाही. आणि तिकडे आजपर्यंतचे नालायक मुख्यमंत्री धनगर समाजाला हक्काच्या असलेल्या अनुसुचित जमातीच्या सवलती द्यायला ना नू करत आहे.... आणि तुम्ही उठले की सुटले आम्हालाच म्हणे की तुम्ही खूप जातीयवाद करता....
       असो पण पुढे जाऊन पाहिले तर जो धनगरांचा शेळी-मेंढीपालन व्यवसाय आहे तो व्यवसाय आज बंदिस्त शेळी-मेंढीपालन या नावाने लाखो नव्हे तर करोडों रूपयांचे निधी घेऊन त्याच . % मधील ब्राह्मण लोक हा व्यवसाय करताहेत मग जातीने मेंढपाळ असलेल्या धनगरांनी करायचे काय? मग धनगरांनी काय करायला हवं ? काय नको ? म्हणून आम्ही समाजप्रबोधन करायला सुरवात केली तर म्हणे की तुम्ही खूप जातीयवाद करता... एखादा धनगर समाजातील मुलगा हा व्यवसाय करायचा म्हंटलं तर त्याला अनेक पात्रता/अटी लावल्या जातात मग आधुनिक पद्धतीने लाखो-करोडो रूपये घेऊन शेळी-मेंढी पालन करणारे ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर लोक काय आईच्या पोटातूनच शेळ्या-मेंढ्यांचा व्यवसाय करायचे शिकून आले होते का? यावरती जरा प्रखरतेने आसूड भिरकवला आणि समाजप्रबोधन केले तर म्हणे की तुम्ही खूप जातीयवाद करता... अरे मग करायचे तरी काय??
जो तो उठतोय माझ्याच समाजाच्या टाळूवरचं लोणी खातोय. ज्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाल राज्यघटनेत अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले आहे त्याच्या सवलती धनगर समाजाला आजपर्यंत देणारे भाडखाव नेते, आजपर्यंतचे मुख्यमंत्री जर जातीयवादी नसते तर धनगर आणि धनगड चा घोळ घालून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून कोसो दूर ठेवलेत नसते. धनगर समाज झोपला आहे त्यांच्यावर एक नव्हे तर दोन दोन घोंगडी टाकून तसेच झोपी जाऊद्या अन्यथा धनगर समाज जागा झाला तर प्रस्थापित मराठा समाजातील नेत्यांना राजकारण करता येणार नाही असे म्हणणारे यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे चेले शरद पवार हे तुम्हाला जातीयवादी दिसत नाहीत. आमचं सरकार आल्यावर धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेट मध्ये, पंधरा दिवसाच्या आत, महिन्याभरात आरक्षण देतो म्हणणारे आणि फक्त केंद्राला धनगर आणि धनगड वेगवेगळे नसून एकच आहेत आणि त्यांना अनुसुचित जमातीच्या सवलती त्वरित लागू कराव्यात असे एक शिफारस पत्र पाठवण्याचे कष्ट घेण्याऐवजी गरज नसताना देखिल TISS ला अहवाल सादर करायला लावणारे आणि धनगर समाजाला जाणूनबुजून अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून दूर ठेवणारे मुख्यमंत्री कोणालाच जातीयवादी दिसत नाहीत मात्र आम्ही धनगर समाजाला समाज प्रबोधनाच्या माध्यमातून जागे केले, जे जागे आहेत त्यांना चालते केले, जे चालते झाले होते त्यांना बोलते केले म्हणून तुमच्या पोटात माथेसुळ उठतोय आणि तुम्ही उठले की सुटले नितीनराजे अनुसे जातीयवाद करतोय म्हणून डंका पिटताय.
       अरे घरातील एखाद्या सदस्य बाहेरच्या दुनियेशी मिळताजुळता नसेल म्हणून त्याला जागं करू शकत नाही का? त्याला नोकरीसाठी, व्यवसायासाठी, त्याच्या हक्कासाठी प्रवृत्त करू शकत नाही का? किंवा असं केलं अथवा त्याला सांगितलं म्हणून शेजाऱ्यांच्या पोटात मळमळत असेल तर तो शेजारी काय लायकीचा आहे सांगायची गरजच नको... त्याचप्रमाणे प्रस्तापित आणि सनातनी व्यवस्थेकडून अज्ञानाच्या खाईत ढकलला गेलेला आणि अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला अखंड धनगर समाज हा देखिल माझा एक परिवार आहे त्यातील प्रत्येक सदस्य जागृत झाला पाहिजे, चालता झाला पाहिजे आणि अन्यायाच्या विरोधात लिहायला आणि  बोलायला लागला पाहिजे मग तिथे शिक्षण असो नोकरी असो अथवा व्यवसाय असे कोणतेही क्षेत्र असो त्या त्या क्षेत्रात माझा समाजबांधव इतरांसोबत दिसला पाहिजे म्हणून मी जो खटाटोप करतोय त्याला जर तुम्ही जातीयवाद म्हणत असाल तर खरोखरच मला तुमच्या जातीयवादी विचारांची फार किव येतेय...
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३

https://nitinrajeanuse123.blogspot.com