Tuesday, 2 January 2018

वेड आम्हाला महाराजांच्या राज्याभिषेकाचे

                  जगाच्या पाठीवर इतिहासात एकमेवाद्वितीय असा महान महाराजा चक्रवर्ती सम्राट होऊन गेला ज्यानं अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज फौजेची (ब्रिटिशांची) इभ्रत (इज्जत) जगाच्या वेशीवर टांगली. त्या महान योद्ध्यावरती एका विख्यात शाहीरांनं पोवाडा रचला आणि ते म्हणतात....
       फक्त एक राजा असा झाला...
       शिवराया मागं यशवंतराव एकला.
    “ ज्याचं शाहिरानं नांव गावं 
      डोक्यावर घेवून नाचावं
      इतिहासाला लेण व्हावं
      लहानथोरांच्या ओठि राहावं
      यशवंतराव ! फक्त एक नांव ! “
                    - शाहीर अमर शेख
              राष्ट्रासाठी असंख्य ठोकरा खात वेळप्रसंगी स्वकिय पेशव्यांशी आणि शिंद्यांशी दोन हात करत मल्हारतंत्राचा अवलंब करून फिरंग्यांच्या तोंडाला फेस येईपर्यंत रणांगणात ब्रिटीशांना ताणून ताणून मारणारा, इंग्रजांना गुडघ्यांवर टेकायला भाग पाडून इंग्रज सेना रणांगणातच कापून काढणारा, शून्यातून पुन्हा स्वताच्या हिंमतीवर आणि मनगटाच्या जोरावर शिंद्याच्या स्वार्थामुळे कोलमडलेली होळकरशाही पुन्हा उभा करणारा सम्राटांचा सम्राट अर्थातच चक्रवर्ती महायोद्धा इतिहासात एकच होऊन तो म्हणजे छत्रपती शिवरायानंतर स्वताचा राज्याभिषेक करून घेणारा धुरंदर लढवय्या चक्रवर्ती महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर होय. जातीयवादी इतिहासकारांनी काही इंग्रज लेखकांचीच री ओढत महाराजा यशवंतराव होळकरांना बंडखोर आणि लूटारू ठरवलं आणि त्यांचा खरा इतिहास दडपला. पण कोंबड्याला खुराड्याखाली कोंढून ठेवला सुर्य उगवायचा राहत नसतो. असो इतिहास दडपणारे, लपवून ठेवणारे आणि विकृत लिहणारे जातीयवादी इतिहासकारच मुळात चुकीचे जन्माला आले असल्याने मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या विकृतीचे दर्शन दिलेच आहे असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. परंतू आज वेळ आली आमचा सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास सुधरवण्याची आणि नव्याने इतिहास लिहण्याची जो इतिहास तमाम भारतीयांना महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या शौर्याचे, राष्ट्रभक्तीचे, दूरदृष्टीचे आणि कर्तृत्वाचे दर्शन घडवेल. द्वितीय मल्हारराव होळकर यांचे सुपूत्र खंडेराव होळकर यांना सुभेदारीची वस्त्रे द्यावीत त्यांच्या नावाने आपण राज्यकारभार करू याची विनंती करण्यासाठी शिंद्यांच्या कैदेत असलेल्या मातोश्री यमुनाबाई, पत्नी लाडाबाई कन्या भिमाई होळकर यांच्या सुटका व्हावी या इच्छेपोटी पुण्याला आल्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांना सवाई पेशवे आणि शिंद्यांच्या फौजेला सामोरे जावे लागले होते हे मराठी इतिहासातील लाजिरवाणे उदाहरण आहे जे शिंद्यांच्या षड्यंत्रामुळे शिजले आणि त्याच युद्धात यशवंतराव होळकरांना स्वकियांच्या विरोधात तलवारी उपसाव्या लागल्या त्यातच पुणे जळाले (जे जातीयवादी इतिहासकार जाळले म्हणतात त्यांनी इतिहासाचं पुनःश्च आत्मपरीक्षण करावे). हडपसर पासून वानवडी पर्यंत स्वता महाराजा यशवंतराव होळकर दोन्ही हातात भाले घेऊन शिंदे आणि पेशव्यांच्या सेनेचा धुव्वा उडवत होते. पेशवे आणि शिंद्याच्या सेनेला पर्वती पर्यंत मागे रेटत नेईपर्यंत पेशवे खंडेरावाला घेऊन कोकणात पळून गेले ते पुन्हा माघारी आलेच नाहीत कारण तशी त्यांची नोंद सापडल्याचे वाचनात आलेच नाही. परंतू कोकणातून पुन्हा वसईला जाऊन पेशव्यांनी इंग्रजांशी तह करून राष्ट्रद्रोह पत्करला परंतू इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारणाऱ्या छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांना कसलीही मदत त्यांनी केली नाही याची दखल मराठी वाचकांनी घेतलीच नाही. एकापाठोपाठ एक अशा एकून १८ लढायांमध्ये इंग्रज फौजेची दाणादाण उडवणारा भारताचा आद्यस्वातंत्र्यसेनानी म्हणजेच चक्रवर्ती सम्राट महाराजा छत्रपती यशवंतराव होळकरच होते. जानेवारी १७९९ रोजी याच महायोद्ध्याने छत्रपती शिवरायांनंतर स्वताचा राज्याभिषेक करून घेतला होता याचा अभिमान तमाम महाराष्ट्र वासीयांना असायला हवा पण खैर जातीयवादाचे उमाळे एवढे दाटलेत की आता धनगर समाजातीलच सळसळत्या रक्ताच्या नवयुवकांना क्रांतीची मशाल हातात घेऊन इतिहासाचे लेखन करत करतच पुन्हा नव्याने इतिहास घडवण्याची देखिल संधी आली आहे ती संधी कोणीही वाया घालवू नये.
          जानेवारी या दिवसाला अंक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले असून या दिवशी प्रत्येक गावागावत, खेड्यापाड्यात जिथे शक्य असेल तिथे महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांचा २१९ वा राज्याभिषेक दिन साजरा करावा. नुसत्या प्रतिमेचे पुजन करून भागणार नाही तर समाजप्रबोधनपर व्याख्याने, प्रशिक्षण शिबीर, तसेच समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा असे उपक्रम राबवावेत हीच एक प्रामाणिक अपेक्षा...
जय मल्हार!! जय अहिल्या!! जय यशवंत!!
         -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
Email:- nitsanuse123@gmail.com

2 comments:

  1. एक सूचना.... पर्वती पर्यंत बाजीरावास रेटले असे असावे... ते चुकून खंडेराव झाल आहे तो बदल करून घ्या. आणि राज्याभिषेकासंदर्भात आणखी माहिती असेल तर त्या माहिती चा उल्लेख करा..

    ReplyDelete
  2. ज्यावेळी युद्ध चालू होते त्याचवेळी बाजीराव आणि बाळाजी विश्र्वनाथ हे युद्धात नव्हते तर ते पर्वतीवर होते. छत्रपती यशवंतराव होळकर यांनी शिंदे व पेशव्यांच्या फौजेला रेटत नेले (रेटले) परंतू तत्पूर्वीच बाजीराव खंडेरावाला घेऊन कोकणात पळून गेला. मी उल्लेख करताना “....रेटत नेईपर्यंत (पर्वतीपर्यंत पोहचण्यापूर्वीच) पेशवा खंडेरावाला सोबत घेऊन कोकणात पळून गेला” असा केला आहे.
    आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद सर🙏

    ReplyDelete