Where the words for justice runs like swords ... जिथे शब्द देखिल अन्यायाविरोधात तलवारीप्रमाणे चालू लागतात...
Featured post
आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे
आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...
Wednesday, 13 September 2017
Monday, 11 September 2017
वाढदिवस आमच्या रामभाऊंचा
समाजाविषयी तळमळीने संशोधन आणि लेखन करणारे धनगर समाजाच्या प्रश्नांचे गाढे अभ्यासक, समाज प्रबोधक, थोर विचारवंत, धडाकेबाज व्याख्याते, थोर समाजसेवक तसेच आमचे मार्गदर्शक बंधूतुल्य परममित्र यशवंत सेनेचे सरचिटणीस मा.रामभाऊ लांडे साहेब यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा!!
💐💐💐💐💐💐💐
मा.रामभाऊ लांडे साहेब यांच्या कार्यावरती आणि जिवनावरती लिहावं तेवढं कमीच आहे हे सर्वांना ज्ञातच आहे तरीही त्यांच्या हातून असेच अभूतपूर्व आणि अतुलनीय समाजकार्य घडो हीच त्यांच्या वाढदिवसानिमीत्त मल्हारी मार्तंड चरणी छोटीशी प्रार्थना🙏🙏🙏
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
शुभेच्छूक,
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+917666994123
nitinrajeanuse123.blogspaot.com
Email :- nitsanuse123@gmail.com
Tuesday, 29 August 2017
सोलापूर विद्यापीठ लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग
सोमवार दि.२८ आॅगस्ट २०१७ ला झालेला सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा खरोखर यशस्वी झाला. २१ जुलै २०१४ च्या मोर्चा नंतर सरकारला धनगर समाजाची ताकद पुन्हा एकदा कळाली. २५-५० लांखाच्या संख्येने धनगर समाजाचा मोर्चा सोलापूरात घोषणा देत सरकारचा निषेध करत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तिथे अनेक मान्यवरांची भाषणे झाली. सोलापूर विद्यापीठाला लवकरात लवकर राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यावे असे शासनाला आठ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखंड धनगर समाजाने दिला आहे. आणि सरकारला काहीही करून सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावेच लागेल यात काही वादच नाही. या लढ्यात धनगर समाज सर्व ताकदीने रस्त्यावर उतरला आणि सोलापूर शहर पिवळ्या भंडाऱ्यात न्हाऊन निघाले. सर्व माता-भगिनी, समाजबांधव भर पावसात भिजत आंदोलनात उभे होते.
जेव्हा काल रात्री मी स्वता "ही तर येणाऱ्या वादळाची पूर्वसुचना आहे" या आशयाचा पहिला ब्लाॅग लिहला त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव व पद वापरले नव्हते. केवळ धनगर समाजाच्या नेतृत्वामुळेच अहिल्या कन्यांमुळे आणि तुम्हा आम्हांमुळे मोर्चा यशस्वी झाला असे लिहले व यापुढेही असेच एकत्रित येऊन सरकारला गुडघ्यावर आणू शकतो असेदेखिल सांगितले. परंतू काहीजनांनी बोहल्यावर चढल्यासारखे आपापल्या नेत्यांची नावे पुढे करून मोर्चाचा श्रेयवाद उकळायचा प्रकार चालवला, तर काही जाणकारांनी जाणूनबुजून काहीजनांची नावे डावलली म्हणून त्यासंदर्भात केलेला हा लेखप्रपंच....
सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढ्यासाठी सर्वप्रथमता पहिली उडी घेतली ती यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेनेच... सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यावे यासाठी मोटारसायकल रैली व मोर्चा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने आयोजित करणार आहोत असे शुक्रवार दि.२६ मे २०१७ रोजी नेपतगाव ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे सर्वप्रथमता कोकरे साहेबांनी त्यांच्या भाषणातून जाहिर केले होते. त्या कार्यक्रमास मी स्वता उपस्थित होतो, पंढरपूर चे विठ्ठल नाना, मोहोळचे संजय(आण्णा) क्षीरसागर, सामाजिक विचारवंत मा.निवांत कोळेकर सर, यशवंत सेनेचे सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब, अभिनेता टिंग्या अर्थात यशवंत युवा सेनेचे युवकप्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर तसेच धनगर समाजातील अन्य नेते देखिल उपस्थित होते. त्यानंतर अनेक ठिकाणी पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, बीड, कोल्हापूर येथे ज्या ज्या ठिकाणी अहिल्याई जयंती निमित्त कोकरे साहेब व्याख्यानासाठी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी जेष्ठ नेते आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये समाजबांधवांना, युवकांना सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढ्यात, मोटारसायकल रैली व मोर्चात सहभागी होण्यास आवाहन केले होते. धनगर समाजातीलच काही मोर्चांमुळे यशवंत युवा सेनेने दोन वेळा विद्यापीठ नामांतरण लढ्याचे नियोजन लांबवले होते. पण जेव्हा दि. ०९ आॅगस्ट रोजी विद्यापीठ प्रशासन व्यवस्थेचा कारभार चव्हाट्यावर आला त्याचदिवशी स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब (सरचिटणीस यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य) तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिळून सोलापूर जिल्हा मुख्याधिकारी निवेदन देऊन १५ सप्टेंबर २०१७ रोजी पंढरपूर-सोलापूर भव्य मोटारसायकल रैली व मोर्चा असे नियोजन आखले होते. त्याचदिवशी सर्वत्र सोशल मिडीयावरती पोस्ट फिरू लागल्या, मोटारसायकल रैली १५ सप्टेंबर ला आयोजित केली असल्याचे समजताच तमाम महाराष्ट्र राज्यातील युवकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत होता. तर दुसरीकडे जय मल्हार युवा मंच महाराष्ट्र राज्य चे मा.सिद्धेश्वर आवारे यांनी देखिल यशवंत युवा सेनेचे मोटारसायकल रैलीचे नियोजन पाहून त्याचदिवशी दुपारी ३:३० विराट मोर्चाचे आयोजन केले होते. परंतू समाजातील काहीजणांनी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्याऐवजी धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढावा असे सुचवले व दि.११ आॅगस्ट रोजी सोलापूर विश्रामगृहात बैठक झाली त्यावेळेस मोर्चा २३ आॅगस्ट ला घ्यायचे ठरले त्या बैठकीसाठी यशवंत युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि यशवंत युवा सेना २३ च्या मोर्चात सर्वताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर जर सरकारने या मागणीची दखल घेतली नाही तर १५ सप्टेंबर ला यशवंत युवा सेनेच्या वतीने पूर्वनियोजित मोटारसायकल रैली व मोर्चा काढणार असल्याचे व सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हायचे असे ठरले आणि जर का सरकारने दखल घेतली तर त्यांच्या या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन म्हणून रैली काढणार असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले. त्यानंतर लगेचच ३-४ दिवसांत मोर्चा २३ च्या ऐवजी २८ आॅगस्ट ला घ्यायचा निर्णय झाला. परंतू २८ नंतर लगेचच १५ सप्टेंबर ला काही दिवसांतच धनगर समाजाला मोर्चात सहभागी होण्यासआवाहन करणे योग्य दिसत नव्हते शिवाय समाजबांधव हे प्रत्येकवेळी नोकरी कामधंदा व्यवसाय सोडून कसे काय मोर्चात सहभागी होणार ? म्हणून १५ सप्टेंबर २०१७ ची मोटारसायकल रैली व मोर्चा रद्द करून दि.१९ आॅगस्ट रोजी मंगळवेढा येथील धनगर समाजाच्या बैठकीत यशवंत युवा सेनेने निर्णय घेतला की यशवंत युवा सेना सर्व ताकदीने २८ मोर्चात सहभागी होणार. त्यावेळी मंगळवेढा येथील बैठकीस प्रा.शिवाजीराव बंडगर सर, परमेश्वर कोळेकर, यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.सचिन होनमाने सर, सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा.उमेशराजे अनुसे, मा.अवधूत वाघमोडे साहेब तसेच धनगर समाजबांधव मोठ्या उपस्थित होते.
त्यानंतर यशवंत युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वजण बैठका आयोजित करून, सोशल मिडीयावरती विराट मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करत होते. जय मल्हार युवा मंचचे संस्थापक सिद्धेश्वर आवारे साहेब यांनी देखिल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले, यशंवत सेना सोलापूर (रजि.) चे मा.स्वप्निल हुक्के तसेच कार्यकर्त्यांनी सोलापूर विद्यापीठावर प्रतिकात्मक बॅनर लावून विद्यापीठाचे नामांतरण केले. यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी अहमदनगर, सोलापूर तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातही मोर्चाच्या संदर्भात बैठका घेऊन जास्तीत जास्त समाजबांधवांना मोर्चात सहभागी होण्यास आवाहन केले. त्यानंतर शनिवार दि.२६ आॅगस्ट रोजी मा.सिद्धेश्वर आवारे यांनी मुंडण करून जातीयवादी सरकारचा निषेध केला. त्याचा परिणाम असा झाला की राज्यातील सामाजिक वातावरण तापले गेले. व्हाटसॲप, फेसबुक, ट्वीटर, इंन्स्टाग्राम तसेच ब्लाॅगस्पाॅटच्या माध्यमातून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त समाजबांधवांपर्यंत मोर्चा संबंधी माहिती पोहचवण्यात आली. मग त्यामध्ये साप्ताहिक घोंगडी चे संपादक मा.बंडू खांडेकर साहेब, साप्ताहिक महालिंगरायाचे संपादक प्रा.नागेश मासाळ सर, माणदेश नगरी, दामाजी इ.वृत्तपत्रासह सोशल मिडीया अगदी हादरवून सोडणारे समाजातील जेष्ठ विचारवंत मा.बापूसाहेब हटकर, यशंवत सेनेचे सरचिटणीस मा.रामभाऊ लांडे साहेब, व्याख्याते अविनाश धायगुडे, निवांत कोळेकर, अवधूत लालगे, श्रावण मोटे, संदिप (दादा) बादड, यशवंत युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा.उमेशराजे अनुसे यांनी सोशल मिडीयावर जोरदार प्रचार व प्रसार त्याचप्रमाणे आटपाडी तालुक्यात सकल धनगर समाज बैठकीचे आयोजन केले होते. ज्ञानेश्वर काळे, मा.संतोष वाघमोडे साहेब, मा.रोहित पांढरे, मधूकर हाके, अक्की बर्वे, अशोक खरात, राजू वीर, शेखर बंगाळे, स्वप्निल हुक्के, राहूल सलगर, सुरेश भावले, निवांत कोळेकर सर, प्रशांत खटके, किरण सोनवलकर, विक्रम ढोणे, राम जवान राहूल वावरे, प्रशांत खटके, आबासाहेब भानवसे, संतोष खाताळ, अविनाश कोळेकर, अविनाश मेटकरी तसेच ज्ञात अज्ञात सर्व समाजबांधवांनी आपापल्या परीने सर्वोतोपरी मदत करून मोर्चा यशस्वी केला होता. मोर्चाच्या काही दिवस अगोदर तमाम युवकांनी तीव्र इच्छा व्यक्त केली होती की युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर यांनी देखिल या मोर्चात सहभागी व्हावे जेव्हा पडळकर साहेब यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे अशी मागणी केली तेव्हा काहीजनांनी त्यांच्यावर समाजातीलच विरोधकांनी टिकाचिप्पनी करत मोर्चात त्यांनी हे उद्योग बंद करून मोर्चात सहभागी व्हावे असेही लिहायला मागेपुढे पाहिले नाही. पण भाजपचे स्टारप्रचारक असताना देखिल सर्वप्रथमता समाज आणि नंतर पक्ष या विचारप्रमाणे सोलापूर येथिल भव्य विराट मोर्चात सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन देखिल केले व ते म्हणाले की इतर विद्यापीठांना महापुरूषांची नावे देताना जातीय तेढ निर्माण झाली नाही मग या विद्यापीठाला नाव देतानाच जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणाऱ्यांना/कुलगुरूंना वेड लागले आहे की काय? शिवाय गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे बंधू सांगली जिल्हा समाजकल्याण सभापती मा.ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी मोर्चासाठी येणाऱ्या अहिल्या भक्तांसाठी वीस हजार लिटर बिस्लेरींची व्यवस्था देखिल केली होती. मोर्चामध्ये धनगर समाजाचे पितामह जेष्ठ नेते आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब, लोकनेते आण्णासाहेब डांगे, माजी आमदार प्रकाश (आण्णा) शेंडगे, आमदार राम वडकुते साहेब, आमदार रामहरी रूपनर साहेब, आमदार नारायण(आबा) पाटील, मा.संजय(आण्णा) क्षीरसागर, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष मा.विश्वासराव देवकाते (नाना पाटील), मा.शशिकांत तरंगे साहेब, मा.उत्तमराव जानकर, मा.अर्जून दादा सलगर, मा.सुरेश(भाऊ) कांबळे तसेच मा.रामभाऊ लांडे, मा.सिद्धेश्वर आवारे, स्वता मोर्चाप्रसंगी स्टेजवरून सुत्रसंचालन करणारे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब हे देखिल तमाम यशवंत युवा सैनिकांच्या फौजफाट्यासह मोर्चात सहभागी झाले होते. यशवंत युवा सेनेचे पदाधिकारी हे स्वताहून स्वयंसेवकासारखे या मोर्चात काम करत होते त्यामध्ये बिरूदेव शिंगाडे, ॲड.रविकिरण कोळेकर, उमेशराजे अनुसे, अवधूत वाघमोडे, बालाजी सलगर तसेच अन्य ज्ञात अज्ञात कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाला आठ दिवसाचे अल्टिमेटम दिले असून जर आठ दिवसांत यावरती निर्णय झाला नाही तर यशवंत युवा सेनेच्या वतीने उग्र आंदोलन करून सोलापूर विद्यापीठाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे यांनी दिला आहे.
मोर्चात सहभागी होऊन मोर्चा यशस्वीरित्या पार पाडला आणि सरकारच्या पायाखालची वाळूच सरकली त्यामुळे या मोर्चात सहभागी झालेल्या सर्व मोर्चेकऱ्यांचे, अहिल्याईंच्या लेकींचे व सर्व यशवंत मावळ्यांचे, माता-भगिनींचे हर्दिक अभिनंदन व आभार.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
आपलाच,
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Monday, 28 August 2017
ही तर येणाऱ्या वादळाची सुरवात आहे...
आज सोमवार दि.२८ आॅगस्ट २०१७ रोजी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढ्यात महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधव एकवटला होता. जिकडे पहावे तिकडे सोलापूर शहर अगदी पिवळे पिवळे झाल्याचे दिसून येत होते. सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असे विधान शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी केल्याने धनगर समाज बांधवांच्या भावना भडकल्या आणि स्वता लोकप्रतिनिधींनी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा अपमान केल्याने धनगर समाजाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा आयोजित केला होता. लाखोंच्या संख्येने धनगर समाजबांधव, माता-भगिनी, समाजातील सर्व संघटना तसेच सर्व पक्षातील धनगर समाजातील तसेच धनगरेत्तर नेते या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य सरकार हे नेहमीच धनगर समाजाच्या मांगण्याचा कधीच विचार करत नाही परंतू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत अधिकार दिल्याने आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी लाखोंच्या संख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरला व एकप्रकारे सरकारला दाखवून दिले की आम्ही अजूनही संघटित आहोत. एखाद्याला सत्तेत कसं आणायचं अथवा सत्तेतून खाली कसं खेचायचं हे आम्हाला चांगलं जमतं. जर या गोष्टींची तात्काळ अंमलबजावणी होत नसेल तर आज जसा शांततेने मोर्चा काढला होता तसा भविष्यात शांत राहणार नाही. मोर्चाला उग्र स्वरूप कसे आणायचे हे आम्हाला चांगलेच कळते. त्यामुळे राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव देऊन विद्यापीठाचा सन्मान करावा अन्यथा धनगर समाजातील युवा वर्ग शांत बसणार नाही मग होणाऱ्या परिणामास राज्य सरकार व प्रशासन व्यवस्था जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
स्त्री शक्ती ही महान शक्ती आहे त्यामुळे अहिल्याईंच्या लेकी अशाच मोर्चात सहभागी होत राहिल्या तर सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू. त्यामुळे समाजबांधवांनी जास्तीत जास्त माता-भगिनी मोर्चात कशा सहभागी होतील त्यासाठी प्रयत्नशील राहावे व अशीच धनगर समाजाची एकजूट दाखवावी ही नम्र विनंती. आजच्या या विराट मोर्चात प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या सर्व अहिल्या कन्यांचे, माता-भगिनींचे, समाजबांधवांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
आपलाच,
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com
Saturday, 22 July 2017
यशवंत युवा सेनेच्या शिलेदाराचा वाढदिवस
यशवंत युवा सेनेच्या शिलेदाराचा वाढदिवस विशेष...
समाजासाठी झटणारे झगडणारे, समाजाच्या प्रश्नांसाठी वाचा फोडणारे, रात्री-अपरात्री समाजबांधवांच्या हाकेला धाऊन जाणारे आमचे परममित्र, कायदेपंडित तथा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस कायदा सल्लागार मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
समाजसेवा हीच ईश्वरसेवा असे मानून अविरत समाजकार्य करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यांतील रड्डे गावचे सुपूत्र कायदेतज्ञ ॲड.रविकिरण रविकिरण कोळेकर साहेब यांच्या बद्दल बोलावे, लिहावे तेवढे कमीच... गेल्या ३० आॅक्टोबर २०१६ रोजी हुलजंती येथे महालिंगराया यात्रेनिमीत्त यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य आयोजित भव्य धनगर महासभेत जलसंधारण तथा राजशिष्टाचार मंत्री ना.राम शिंदे साहेब यांनी महालिंगराया देवस्थानचा विकास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याचे काम यशवंत युवा सेनेचे सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब व यशवंत युवा प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले. त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील समाजबांधवांना एकत्रित करून समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी ॲड.कोळेकर साहेब झटतात झगडतात, जर समाजबांधवांवरती अन्याय होत असेल तर त्यांच्या हाकेला धाऊन जाण्याचे काम हे यशवंत युवा सेनेचे शिलेदार करतात त्यामुळे अशा शिलेदारांस वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याचबरोबर त्यांच्या यशाचा आलेख दिवसागणिक वाढत राहो व त्यांच्या हातून असेच समाजकार्य घडो या छोट्याशा शुभेच्छा.
शुभेच्छूक,
सर्व यशवंत युवा सेना पदाधिकारी,
सर्व यशवंत युवा सैनिक
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य

Monday, 17 July 2017
अबब! चक्क हत्तीवरून मिरवणूक...
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
Friday, 14 July 2017
यशवंत युवा सेनेचा अनोखा उपक्रम
परंतु यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे यांच्या आवाहनाला साथ देत आपल्या थोर महापुरूषांचा इतिहास जपण्यासोबतच त्याचे संवर्धन करण्याचे देखिल प्रमाणिकपणे कार्य करत आहे त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात यशवंत युवा सेनेला आणि यशवंत युवा सैनिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यशवंत युवा सेना नेपथगाव शाखेच्या वतीने नेपथगाव परिसरांत वृक्षारोपन करून त्याचे संवर्धन देखिल करण्याची शपथ यशवंत युवा सैनिकांनी व गावकऱ्यांनी घेतली. त्यावेळी वृक्षापोपन करताना यशवंत युवा सेना शाखा नेपथगावचे प्रमुख मा.काशिनाथ सरगर, उपशाखाप्रमुख मा.तुराराम हेगडकर, मा.अभिजित पालवे, मा.लक्ष्मण पडवळकर उर्फ LP,मा.मायापा हेगडकर, मा.विकास वगरे, मा.अंकुश घोडके,मा.सचिन घोडके, मा.आपा शिदे, नेपतगाचे सरपंच मा.अशोक कदम, माजी सरपंच मा.बाळासाहेब बुधनेर, मा.हर्षवरधन शिदे, मा.संतोष शिदे, मा.सोनाजी कदम, मा.बिरुदेव सलगर, मा.दिलीप कोळेकर, मा.श्रीकांत घोडके,मा.संदीप नरूटे व अन्य मान्यवर व यशवंत युवा सैनिक उपस्थित होते... खरंतर त्या सर्वांना एक अहिल्याईचा मर्द मावळा या नात्यानं पिवळा जय मल्हार.
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना यशवंत युवा सैनिकांना सोबत घेऊन अखंड महाराष्ट्र राज्यभर हा उपक्रम राबवणार असून मल्हारबांच्या वारसदारांनी, अहिल्या भक्तांनी, यशवंतराव होळकरांच्या मावळ्यांनी यशवंत युवा सेनेच्या शिलेदारांना साथ द्यावी असे आवाहन यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले आहे.जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com
Wednesday, 12 July 2017
भव्य मोटारसायकल रैलीचे नियोजन लांबवले
बारामती येथील २१ जुलै रोजी होणाऱ्या व मुंबई येथे १ आॅगस्ट रोजी होणाऱ्या धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्या आंदोलनात कोणताही व्यत्यय येऊ नये व समाजाचे अधिकार व हक्क समाजाला लवकरात लवकर मिळावेत म्हणून २६ जुलै २०१७ रोजी यशवंत युवा सेना आयोजित करण्यात आलेली सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे यासाठी भव्य मोटारसायकल रैली यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्यच्या वतीने आयोजित करण्यात आली होती परंतु समाजाच्या न्याय व हक्कासाठी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ती भव्य मोटारसायकल रैली २६ जुलै ऐवजी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी दिली. समाजाचे प्रश्न सुटावेत व समाजाला न्याय मिळावा ही या क्रांतीकारी संघटनेची विचारधारा आहे स्व.बी.के.कोकरे साहेबांची ही विचारधारा जपणे आणि जोपासणे हे यशवंत युवा सेनेचे आद्य कर्तव्य आहे. धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षण लढ्यासोबतच समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मात्र राजकीय नेत्यांकडून मंत्र्यांकडून त्याकडे जाणूनबूजून दुर्लक्ष केले जात असून त्याकारणास्तव धनगर समाजाला प्रचंड अन्याय सहन करावा लागत आहे. मेंढपाळांच्या समस्या सोडवण्यासाठी यशवंत युवा सेना आणि यशवंत युवा सेनेचे शिलेदार नेहमीच हाकेला धाऊन जात असतात आणि समाजबांधवांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे समाजापेक्षा यशवंत युवा सेना ही संघटना काही फार मोठी नाही पण समाजाच्या प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडण्याची धमक ही यशवंत युवा सेनेच्या शिलेदारांत आहे त्यामुळे मेंढपाळ बांधवांच्या मनामनात, समाजातील माता-भगिनींच्या, समाजबांधवांच्या ह्रदयात यशवंत युवा सेना या संघटनेने घर निर्माण केले आहे.
अारक्षणाच्या लढाईबरोबरच समाजातील अन्य प्रश्नांची दखल राज्य सरकारला आणि प्रशासनाला घ्यायला लावल्याशिवाय यशवंत युवा सेना शांत बसणार नाही. जातीयवादी प्रस्तापित नेत्यांच्या धोरणामुळे सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले गेले नाही. परंतु यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने पंढरपूर-सोलापूर या मार्गाने हजारो मोटारसायकलची भव्य रैली काढून आंदोलन छेडणार असल्याची माहिती यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी दिली असून या भव्य मोटारसायकल रैली आणि भव्य आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रपती पुरस्कार विजेता, युवा दिग्दर्शक तथा यशवंत युवा सेनेचे युवक प्रदेशाद्यक्ष मा.शरद गोयेकर यांनी केले आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
*उमेशराजे अनुसे*
पश्चिम महाराष्ट्र प्रमुख
🙏यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य🙏
+919766878717
AAnuse01@gmail.com

Sunday, 9 July 2017
मेंढपाळांच्या मदतीसाठी धावले यशवंत युवा सेनेचे शिलेदार
यशवंत युवा सेनेचे शिलेदार हे वेळेवर मेंढपाळ बांधवांच्या हाकेला धाऊन आले व त्या गावगुंडाकडून मेंढपाळांना बकऱ्या परत केल्याने महाराष्ट्र राज्यभर त्यांचे कौतुक केले जात आहे. यशवंत युवा सेना ही एक क्रांतीकारी संघटना असून ती ग्राउंड लेवलला समाजबांधवांच्या मनामनात ठासून भरलेली आहे. ही संघटना आर्थिक प्राबल्य नसल्याने कदाचित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडीया पासून कोसों दूर असली तर मेंढपाळ बांधवांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत असल्याने व त्यांच्या हाकेला धाऊन जात असल्याने समस्त मेंढपाळ बांधवांच्या मना मनात यशवंत युवा सेनेच्या शिलेदारांनी घर निर्माण केले आहे. यशवंत युवा सेना संघटनेला मुळात प्रसिद्धीची गरज नसून स्व.बी.के.कोकरे साहेबांचा वारसा जपत धनगर समाजाला, समाजबांधवांना, मेंढपाळ बांधवांना न्याय, हक्क व अधिकार मिळवून देण्याती जबाबदारी यशवंत युवा सेनेच्या शिलेदारांवरती आहे. त्यामुळे धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांवर, माता-भगिनींवर जर अन्याय अत्याचार होत असेल रात्री अपरात्री कधीही संपर्क करावा यशवंत युवा सेना आणि यशवंत युवा सेनेचे शिलेदार समाजावर अन्याय करणाऱ्यांचे हातपाय कलम करण्यास कधीही सज्ज आहे.
मेंढपाळांच्या मदतीसाठी धावून आलेल्या यशवंत युवा सेनेचे शिलेदार मा.अवधूत वाघमोडे साहेब (महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख), मा.बिरूदेव शिंगाडे (यशवंत युवा सेना सांगोला) तसेच अन्य सर्व शिलेदारांचे व कार्यकर्त्यांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
Friday, 7 July 2017
आमच्या पोरास्नी शाळा कसली ठाऊकच नाय...
हे बोल ऐकल्यावर चटकण डोळ्यात पाणी उभा राहिले आणि थोडा वेळ स्थिर झालो. हे बोल आहेत पायाच्या नडग्या वाळेपर्यंत शेळ्या-मेंढ्यांसाठी चाऱ्याच्या शोधात आणि कुटूंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरून भटकंती करणाऱ्या सुळेवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील माझ्या मेंढपाळ बांधवांचे. यशवंत युवा सेनेचे मुंबई विभाग प्रमुख मा.तानाजीराजे गोयेकर यांनी चारणीवरून परत निघालेल्या मेंढपाळ बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मेंढपाळ बांधवांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते यांची विचारपूस करून यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना तुमच्या सोबत असल्याचा विश्वास आणि दिलासा दिला.
एकीकडे शासनाने ६-१४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था केली असताना देखिल माझ्या धनगर समाजातील मुला-मुलींना मात्र अणवानी पायानं शेळ्या-मेंढ्यांच्या मागे फिरावे लागते ही फार मोठी शोकांतिका आहे. अलिशान एअरकंडीशन गाड्यांतून, स्कूल बसेसमधून शाळेला जाणारी मुले पाहिली की आमच्या धनगर समाजातील मुला-मुलींना देखिल शाळेला जाण्याची ओढ लागते पण ते आमच्या मुलांच्या नशिबात नसतं त्याचे कारण असे की जी मुले एअरकंडीशनर गाड्यांतून आणि स्कूल बसेसमधून शाळेला जातात त्यांच्याच बापजाद्यांनी चराऊ कुरणे सरकारच्या घशात घातली आणि माझ्या मेंढपाळ बांधवांवरती भटकंतीची वेळ आली. कुठेही रानावनात दऱ्याखोऱ्यांत उन वारा पाऊस यांचा विचार न करता आज इथे तर उद्या तिथे असा प्रवास करत, कोणा शेतकऱ्यांच्या शिव्या/मार खात, गावगुंडांचा आणि गावच्या पाटलांचा त्रास सहन करत काळ्या रानात तीन दगडाच्या चुलींवर स्वयंपाक करून दगडाचे उसे आणि आभाळाचे पांघरूण करून धरती मातेच्या खुशीत निश्चित झोपायला देखिल मिळत नाही कारण जंगलातील हिंस्र पशूपासून शेळ्या-मेंढ्यांचे रक्षण करायला देखिल पहारा करावा लागतो हेच आमच्या मेंढपाळ बांधवांचं जगणं. मग लहानपणापासून आई बापाच्या मागं मागं आयुष्याचा अर्धा संसार आणि करडाकोकरांचं लटांबणं पाठीवर लादलेल्या घोड्याचा लगाम धरून अणवाणी पायानं चालणं हे आमच्या धनगर समाजातील मेंढपाळांच्या मुलांच्या नशिबी असेल तर कधी जाणार आमची पोरं शाळेत? कुठे जाणार ती मुलं दोन-चार शब्द शिकायला? ज्यांच्या राहण्याचा ठाऊठिकाणाच त्यांना माहित नाही तर कोणत्या शाळेत त्यांनी प्रवेश घ्यायचा? इतर समाजातील मुला मुलींना ज्या सुखसोई, शैक्षणिक सुविधा, सवलती मिळतात पण त्या सवलती मात्र माझ्या धनगर समाजातील मेंढपाळांच्या मुलामुलींना उपभोगता येत नाहीत त्याचे कारण म्हणजे भटकंती आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे.
परवा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे मुंबई विभाग प्रमुख मा.तानाजीराजे गोयेकर यांनी सुळेवाडी गावच्या त्या मेंढपाळ बांधवांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांनी विचारपूस केली असता आमच्या पोरास्नी शाळा कसली ठाऊकच नाय असे त्यांनी स्पष्ट सांगितले. चारणीसाठी बाहेरगावी असताना पाऊस पडला नाही पण गावाकडे थोडाफार पाऊस झाल्याने सर्व कुटूंबकबिला घेऊन घराकडच्या दिशेने निघाल्याचे मेंढपाळ बांधवांनी सांगितले. राष्ट्रपती पुरस्कार विजेता तथा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे युवक प्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर दिग्दर्शीत धनगर समाजाच्या ज्वलंत परिस्थीतीवर आधारित बब्या चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्या चित्रपटात अभिनय करणारा आपल्याच समाजातील युवक एक सिनेअभिनेता आपल्याशी चर्चा करतोय हे समजल्यावर माझ्या मेंढपाळ बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता त्यांना फार समाधान देखिल वाटले. मा.तानाजीराजे गोयेकर यांनी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी संघटनेबद्दल मेंढपाळ बांधवांना सांगितले की ही संघटना स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या विचारधारेवर मार्गक्रमण करत असून मेंढपाळांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पुढे येतोय कधीही गरज लागली, कुठे अन्याय/अत्याचार होत असेल तर हाक द्या यशवंत युवा सेनेचा मावळा या नात्यानं आम्ही तुमच्याजवळ पोहचू असे सांगून मा.तानाजीराजे गोयेकर यांनी आपला संपर्क क्रमांक त्या मेंढपाळ बांधवांना दिला.
यशवंत युवा सेना ही संघटना यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि स्व.बी.के कोकरे साहेबांच्या विचारधारेवर चालत असून आज महाराष्ट्र राज्यात यशवंत युवा सेनेची यशस्वी वाटचाल होत आहे. तरी तळागळापर्यंत वाड्यावस्तीवर ही संघटना लवकरात लवकर पोहोचवून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एका झेंड्याखाली एकत्रित यावे असे आवाहन यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे मुंबई विभाग प्रमुख तथा सिनेअभिनेते मा.तानाजीराजे गोयेकर यांनी केले आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
Subscribe to:
Posts (Atom)