Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 26 September 2017

आरेवाडीत उद्या दसरा मेळावा

गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षी देखिल उद्या बुधवार दि.२७ आॅक्टोबर २०१७ रोजी श्री क्षेत्र बिरोबा बन आरेवाडी येथे भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. विखूरलेला समाज एकत्रित यावा आणि समाजाचे वैचारिक प्रबोधन व्हावे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तसेच युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी केले आहे. त्यासाठी विवीध जिल्ह्यात बैठका पार पडल्या असून लाखोंच्या संख्येने समाजबांधव या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी देखिल ७ आॅक्टोबर २०१७ रोजी दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने समाजबांधव व धनगर समाजातील सर्वच नेते एकत्रित आले होते. परंतू यावर्षी सर्वपक्षिय बहुजन समाजाचा दसरा मेळावा भरवण्याचे धाडस मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी केले आहे. गेल्या वर्षी धनगर मेळावा आणि यावर्षी बहुजन मेळावा का? गेल्यावर्षी आयोजक धनगर समाज आणि यावेळी स्वता संयोजक गोपीचंद पडळकर साहेब असे का?  अशा चर्चांना सर्वत्र उधाण आले आहे. आणि त्यालाच तेल-चटणी-मीठ लावून अर्थाचे अनर्थ काढून राजकीय सूड घ्यायची प्रवृत्ती जरा जास्तच वाढत चाललेली पाहून थोडंसं लिहावसं वाटलं म्हणून केलेला हा लेखप्रपंच....
या दसरा मेळाव्याच्या आडून त्यांना आमदारकी किंवा खासदारकी मिळवायची नाही आणि मिळवायचीच असेल तर ते स्वताच्या हिंमतीवर मिळवतील ते त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येत आहेच. राजकारण आणि समाजकारण हे कितीही वेगळं म्हणत बसलो तरी भारतासारख्या जातीयवादी विचारांच्या देशात त्यांची नाळ एकमेकांशीच जोडलेली आहे. धर्मनिरपेक्ष राज्यकारभार हा फक्त नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात वाचायला भेटतो मात्र वास्तवात धर्मनिरपेक्ष कुठेही आणि कधीच दिसत नाही आणि असेल तर धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे चालू आहे ते दाखवून द्यावे हे माझे खुले आवाहन.... राजकीय नेत्यांचेच काय घेऊन बसलाय जर राजकारण करायचे असेल तर अगदी तुम्ही स्वता सुद्धा नुसतंच समाज समाज करत बसाल तर तुमचे राजकीय भवितव्य हे अंधारातच राहील शिवाय धनगर समाजाचे नेतृत्व पुढं यायला देखिल वेळ लागेल. आज समाजासमोर अनेक आवाहने आहेत परंतू नेतृत्वाचा अभाव असल्याने ही आवाहने पुढच्या पिढीला देखिल त्रासदायक ठरू शकतात अर्थातच पुढच्या पिढीचे देखिल भवितव्य धोक्यात येऊ शकते. धनगर समाजातील सामाजिक संघटना या केवळ समाज समाज करू शकतात, समाजासाठी आंदोलन मोर्चा सर्व काही सामाजिक संघटनांना करता येते. कदाचित सामाजिक बांधिलकी असेल तर राजकीय नेते समाजाच्या मोर्चात सहभागी होऊ शकतातही पण अन्य वेळी इतर समाजाला सुद्धा सोबत घेऊन जावे लागते तेव्हा खरे नेतृत्व समाजासमोर येते..... तर आणि तरच राजकारणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासाला/जडणघडणीला हातभार लावता येतो. मग तिथे धनगर अथवा कोणीही नेता असो त्यासाठी आजपर्यंतच्या आमदार खासदारांचा इतिहास वाचून बघा... म्हणून अखंड बहुजन समाजाचे वैचारिक प्रबोधन करून समाजाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची भीष्मप्रतिज्ञा गोपीचंद पडळकर या तरूण तडफदार युवा नेत्याने केली अाहे. परंतू मागच्या एक आठवड्यापासून पाहतोय की समाजात ज्या प्रकारच्या उलटसुलट चर्चा चालू आहेत त्यातून नेतृत्व खोडून टाकण्याचा सरळसरळ प्रयत्न चालू असल्याचे एक षडयंत्रच दिसून येते आहे. एका दृष्टीने पाहिले तर दिड ते दोन कोटी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ एकच खासदार तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आमदार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आहेत. कणखर दमदार कर्तृत्ववान असे नेतृत्व तयार करायला, नेतृत्व घडायला फार वेळ लागतो परंतू सोशल मिडीयासारख्या माध्यमांतून तेच नेतृत्व खोडायला फार वेळ वागत नाही पण ज्यांच्या रक्तातच कर्तृत्व आणि  नेतृत्व ठासून भरलेले असते ते नेतृत्व सहजासहजी खोडतां येत नाही हे देखिल तितकेच सत्य आहे. म्हणून समाजबांधवांना माझी विनंती आहे की ज्यांना कोणाला दसरा मेळाव्यासाठी जायचे नसेल तर त्यांनी जाऊ नका परंतू एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या नादात चुकीचे मेसेजेस करून समाजात गैरसमज पसरवू नयेत. समाजातील नेतृत्व जेवढे वाढेल तेवढे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर आहे म्हणून समाजातून जास्तीत नेतृत्व तयार करा पण खोडू नका हीच नम्र विनंती.
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या🙏
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Monday 25 September 2017

पै संदीप रासकर यशस्वी उद्योजक पुरस्काराने सन्मानित



कडेगाव तालुक्यांतील पैलवानकी क्षेत्रातील रासकर कुटूंब हे एक नावाजलेले प्रसिद्ध कुटूंब आणि या कुटुंबाला स्व.पै.खाशाबा रासकर यांच्याकडून लाभलेला पैलवानकीचा वारसा आणि याच जोरावर सिनेसृष्टीला देखिल भुरळ पाडणारा आंतरराष्ट्रीय खिलाडी कुस्तिपट्टू अर्थातच कुस्त्यांमधला जादूगार म्हणून ज्यांना ओळखले जाते असे पै.कृष्णा रासकर उर्फ आप्पा आणि पै.धनाजी रासकर यांचा पुतण्या व स्व.पै.खाशाबा रासकर यांचे नातू धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते पै.संदीप रासकर यांना कडेगाव मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने यशस्वी उद्योजक या पुरस्काराने काल दि.२४ सप्टेंबर २०१७ रोजी सन्मानित करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रात गरूडझेप घेऊन अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने व बेरोजगारांच्या भाकरीचा प्रश्न मिटवल्याने त्यांना यशस्वी उद्योजक या पुरस्काराने गौरवण्यात आले. पाठीमागे स्व.शांता खाशाबा रासकर यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्याच घरातील त्यांचा नातू पै.संदीप रासकर यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळाल्याने रासकर कुटूंब चांगलेच चर्चेत आले आहे. गरिबीच्या झळया सोसून स्वकष्टातून नावारूपास आलेले हे रासकर कुटूंब हे जीवनाचा खडतर प्रवास करून यशाच्या शिखरापर्यंत पोहचल्यावर खरंतर सर्वसामान्यांसाठी रासकर कुटूंब जणू आदर्शच ठरत आहे. आज या कुटूंबातील संख्या ही जवळपास ४० च्या घरात असून देखिल या रासकर कुटूंबाने एकत्रित कुटूंबाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यामुळे या कुटूंबाचे कौतुक करावे तेवढे थोडेच पण यापुढेदेखिल पै.संदीप रासकर यांनी अशीच गरूडझेप घ्यावी व समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लढा उभारावा तसेच बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास असेच प्रयत्नशील राहावे त्यासाठी मल्हारी मार्तंड त्यांना बळ बुद्धी व चातुर्य देवो हीच प्रार्थना व यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळल्याबद्दल पै.संदीप रासकर यांचे त्रिवार अभिनंदन.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

कडक प्रहार

तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर त्यासाठी अवश्य लढा द्या,
पण जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर पूर्वीपेक्षाही अन्यायाच्या विरोधात अधिक तीव्रतेने लढा द्याल तरच तुम्हाला न्याय मिळेल.
-नितीनराजे अनुसे

Sunday 24 September 2017

वाळवा तालुक्यात मंत्र्यांना बंदी : सागर मलगुंडे

सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतू सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिल्यास जातीय तेढ वाढेल असे बिनबुडाचे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले होते त्यानुषंगानेच अहिल्या भक्तांच्या भावना भडकल्या. या प्रकाराच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.२८ आॅगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने विराट मोर्चा निघाला व १५ दिवसांचे अल्टीमेटम देऊनही सरकार दरबारी दखल घेतली जात नसेल तर मग मूग गिळून गप्प बसायला आमची काय **ची औलाद नव्हे. त्याचाच परिणाम म्हणून सोलापूर येथे विनोद तावडे यांच्यावर भंडारा उधळून धनगर समाजाच्या पाच वाघांनी त्यांचा निषेध केला होता त्यांची नावे अशी की शेखर बांगळे 
1. शेखर बांगळे
2. उमेश काळे
3. शरणू हांडे
4. महेश घोडके आणि 
5. म्हाळाप्पा नवले
तर सातारा येथे विनोद तावडेंवर बुक्का उधळणारा धनगराचा वाघ
6. मारूती जानकर
आम्ही आमच्या औकातीवर आलो तर काय करू शकतो आणि काय नाही याचा विचार कोणी करू शकत नाही त्यामुळे आमच्या नादाला लागू नका असे आवाहान करत सांगली जिल्ह्यातील वाळवा (इस्लामपूर) तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही आणि जर एखादा फिरला तर त्याची गाडी फोडल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही असे आवाहन यशवंत युवा सेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख मा.सागर (भाऊ) मलगुंडे यांनी केले आहे. 
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Friday 22 September 2017

पुन्हा एकदा धनगरी हिसका: सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा

सोलापूर विद्यापीठाला लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असे प्रतिपादन करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अर्थातच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुन्हा एकदा धनगरी हिसका अनुभवला. काही दिवसांपूर्वीच सोलापूर येथे शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांच्यावरती भंडारा उधळून अहिल्याभक्तांनी नामांतरण लढ्याची खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर तरी सरकार ताळ्यावर यायला हवं होतं पण तसे काहीच झाले नाही याचा अर्थ राज्य सरकारला धनगर समाजाच्या मागण्यांशी काहीच देणे घेणे नाही. केवळ धनगर समाजामुळेच भाजप सरकार आज सत्तेत आहे असे स्वता मुख्यमंत्री यांनी अनेक जाहिर सभेतून वक्तव्य केलेले आहे आणि हे सत्य देखिल आहे हे कोणी नाकारू शकत नाही. परंतू ज्या धनगर समाजाच्या जिवावर हे बहाद्दर सत्तेवर आले त्या धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता दाखवायला हे सरकार कधीच कमी पडले नाही. आश्वासनांवरती आश्वासने देऊन धनगर समाजाच्या मागण्या कधीच पूर्ण न करण्याची शपथच जणू या सत्ताधाऱ्यांनी खाल्ली आहे. मग धनगर समाजाच्या संयमाचा पारा वाढणारच आणि शेवटी संयम सुटल्यावर काय होते ते सोलापूर येथे विनोद तावडेंनी अनुभवले होते पण आज पुन्हा एकदा सातारा येथे मारोती जानकर नावाच्या धनगराच्या वाघाने विनोद तावडेंवर बुक्का फेकून नामांतरण लढ्याचा आक्रोश व्यक्त केला.
धनगर आरक्षणाचे आणि सोलापूर विद्यापीठाच्या नांमांतरणाचे गाजर दाखवून सत्ता हडपली खरी पण जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही आणि सोलापूर विद्यापीठाला लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार आणि फिरला तर काय अवस्था होते याचा अनुभव त्यांना आलाच आहे. सरकार माय बाप हो आतातरी ताळ्यावर या आणि आमच्या मागण्यांची पुर्तता करा नाहीतर आम्ही पेटलेले आहोत मग तुम्हाला पेटवायला आम्ही कमी पडणार नाही.
धनगर समाजबांधवांनो एक विचार सदैव लक्षात राहूद्या आणि त्या विचारावरती मार्गक्रमण करा...
जर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय मात्र मिळालाच पाहिजे.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Wednesday 20 September 2017

वाघांनो तुम्हाला मानाचा पिवळा जय मल्हार


एकदा मागून पाहिलं दोनदा मागून पाहिलं एवढंच नव्हे तर अनेकदा मागून पाहिले पण सोलापूर विद्यापीठाला लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यायला आडदांड सरकार राजीच होत नाही. नेहमीच आश्वासनांवरती आश्वासने देवून अक्षरशा आश्वासनांचा अगदी महापूर येऊन धडकला तरी निर्दयी सरकार मात्र शांतच बसले आहे तेव्हा धनगरांच्या संयमाचा बंधारा फार काळ टिकणार नव्हता आणि शेवटी तेच झाले धनगर समाजाचा संयम अखेर सुटला... काल परवा अखंड महाराष्ट्र राज्याने याची देही याची डोळा दुरदर्शन, वर्तमानपत्र तसेच सामाजिक माध्यमातून (सोशल मिडीयातून) पाहिले. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणासाठी शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे हे सोलापूर येथे आले असताना मंचावरून भाषण करत होते तेवढ्यात विद्यापीठाच्या नामांतरण संदर्भात घोषणा देत व यळकोट यळकोट जय मल्हार असा जय जयकार करत मल्हार मावळ्यांनी सभागृह दणाणून सोडले. शिक्षणामंत्र्यांच्या निषेधार्थ पत्रके भिरकावली व भंडारा देखिल उधळला. पिवळ्या भंडाऱ्याची ताकद काय असते हे लवकरच समजेल सत्ताधाऱ्यांना पण ज्या यशवंतसैनिकांनी भंडारा उधळला त्या पाच वाघांची अर्थातच स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या वारसदारांची नावे पुढीलप्रमाणे
1. शेखर बांगळे
2. उमेश काळे
3. शरणू हांडे
4. महेश घोडके आणि
5. म्हाळाप्पा नवले
या पाच वाघांना मानाचा पिवळा जय मल्हार व त्यांचे त्रिवार अभिनंदन. खरंतर कौतुक करावे तेवढे कमीच पण  क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचा वारसा असाच जपत रहा ही खरी काळाची गरज आहे. तरच समाजाला न्याय मिळू शकतो, धनगर समाज अन्यायाच्या साखळदंडातून मुक्त होऊ शकतो. जर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर त्यांच्या तोंडात वाजवून न्याय मिळवू या विचाराचे आम्ही आहोत हे एकदा सरकारला दाखवून दिले आणि इथून पुढे देखिल असेच दाखवून देऊ.
अगोदर कितीतरी वेळा सांगितले पण त्यांना समजले नव्हते म्हणून आता सांगतो की, सर्व गोष्टीला अंत होता म्हणूनच धनगर शांत होता पण एक लक्षात ठेवा आता आमची शांतता भंग झाली आहे त्यामुळे आता पेटलेला एकेक धनगर महाराष्ट्र पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Wednesday 13 September 2017

यळकोट यळकोट जय मल्हार

अटकेपार झेंडे फडकावून
राखिले आणि रक्षिले दिल्लीचे तख्त
    आता पुन्हा उठा आणि खेळवा
           तुमच्या नसानसात
    मर्द धनगरांचे सळसळते रक्त
-✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspaot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Monday 11 September 2017

वाढदिवस आमच्या रामभाऊंचा


समाजाविषयी तळमळीने संशोधन आणि लेखन करणारे धनगर समाजाच्या प्रश्नांचे गाढे अभ्यासक, समाज प्रबोधक, थोर विचारवंत, धडाकेबाज व्याख्याते, थोर समाजसेवक तसेच आमचे मार्गदर्शक बंधूतुल्य परममित्र यशवंत सेनेचे सरचिटणीस मा.रामभाऊ लांडे साहेब यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा!!
💐💐💐💐💐💐💐
मा.रामभाऊ लांडे साहेब यांच्या कार्यावरती आणि जिवनावरती लिहावं तेवढं कमीच आहे हे सर्वांना ज्ञातच आहे तरीही त्यांच्या हातून असेच अभूतपूर्व आणि अतुलनीय समाजकार्य घडो हीच त्यांच्या वाढदिवसानिमीत्त मल्हारी मार्तंड चरणी छोटीशी प्रार्थना🙏🙏🙏
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
शुभेच्छूक,
        ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspaot.com
Email :- nitsanuse123@gmail.com