Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday 27 June 2015

पुन्हा एकदा "मिशन आरक्षण" १५ जुलै २०१५.....



एकेकाळी या हिदूस्थानावर ३५० वर्षापेक्षा अधिक काळ राज्य करणारी आमची औलाद म्हणजेच राजा समाज असणारी आमची जमात गतकाळी अज्ञानपणामुळे गुलामगीरीत जगतेय. जगजेत्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावर्तित करणार्या भारताचे आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, अखंड भारत आणि ईशान्येकडील नेपाळ, भूटान आणि अफगानिस्तान आपल्या अधिपत्याखाली आणणर्या राजा सम्राट अशोकाचे आम्ही वारसदार आज आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून लढतोय आणि झगडतोय. धनगरपुत्र राजा सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील "अशोक स्तंभ" हा आज प्रत्येक भारतीयाच्या खिशात असलेल्या प्रत्येक नाण्यावर अभिमानानं दिसतो कारण हे भारताचं बोधचिन्ह म्हणून गौरवण्यात आलं. तद्नंतर भारतामध्ये तसेच देशोविदेशात जो भारतीय झेंडा डौलाने आणि अभिमानाने फडकतो त्यावरील जे निळसर अशोकचक्र आहे ते सुद्धा धनगरपुत्र राजा सम्राट अशोक यांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची आठवण आम्हा भारतीयांना करुन देतं. आणि आज हीच राजा समाज असलेली आमची औलाद आज गुलामगीरीचं जीवन जगतेय याचं दुख मनोमन होतंय. या राजा समाजाला आपले हक्क मागावे लागतात अशी वेळ का आली?? याला नेमकं जबाबदार कोण असेल तर माझ्याच धनगर समाजातील नेते यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आमचं नेतृत्व जर सक्षम असतं तर आमच्यावर भिक मागायची वेळ आलीच नसती.
गेल्या वर्षी १५ जुलै २०१४ रोजी ता पंढरपूर जि सोलापूर येथून आरक्षण दिंडी पदयात्रा निघाली  अन् २१ जुलै २०१४ रोजी बारामतीला येवून धडकली होती आणि तिथंच अखंड महाराष्ट्रातील ४ लाखांवरती धनगर समाज ठिय्या मांडून आमरण उपोषणासाठी बसला होता. तत्कालीन सरकारने अन्याय तर केलाच होता पण सदरच्या भाजप सरकारने महाराष्ट्रात सरकार आल्यावर १० दिवसात आरक्षणाची अमलबजावणी करू असं आश्वासन दिलं होतं पण आज भाजपचं सरकार आलं १० दिवस दूरची गोष्ट पण १० महिने नव्हे तर ११ महिने उलटून गेलेे पण अजूनही आमच्या वाट्याला तोच अन्याय आणि पोकळ आश्वासनं एवढंच आले आहे. एक म्हण आहे की "आजा मेला अन् नातू झाला घरात माणसं तेवढीच" पाठीमागचं  सरकार त्या लायकीचं होतं आणि आजचं पण त्याच लायकीचं म्हणायची वेळ आली आहे.  "धनगर" आणि "धनगड" या दोन्ही जमाती वेग-वेगळ्या नसून ती एकच "धनगर" जमात आहे असे वैज्ञानिक अहवाल सादर केले. शिवाय धनगड नावाची जमातच या महाराष्ट्रात नाही हे सुद्धा सिद्ध केलं तरीही आमच्यावर अन्याय का??
मुख्यमंत्री महोदय मा देवेंद्र फडणवीस म्हणतात की धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी यावरती अभ्यास चालू आहे. अहो फडणवीस साहेब यावरती पीएचडी केली असती एखाद्यानं अन् तुम्ही अभ्यासच कसे काय करताय अजून? आज दहावी-बारावीचे निकाल झाले त्यांची प्रवेश प्रक्रिया सुद्धा संपत आली मग आमच्या धनगर समाजातील मुला-मुलींना अगोदरच राज्यघटनेत असलेल्या डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या सवलती कधी देणार?? आजपर्यंत आमच्यावर अन्याय होत आला आहे आणि अजूनही असंच रहाट गाडगं चालू राहिलं तर आमची पोरं आइ ए एस , आइ पी एस कधी होणार?? जर आम्हाला अनुसुचित जमातीच्या सवलती द्यायला तुम्हाला एवढा अभ्यास करावा लागत असेल तर मग तुम्ही बाबासाहेबांना चुकीचं समजता का?? त्यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये राज्यघटनेच्या कलम ३४२ मध्ये क्र ३६ वर सामाविष्ट केले आहे. फक्त शब्दविवेचन करताना त्याचे टायपिंग करताना र ऐवजी ड झाला आणि या र ड मुळे माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा सगळा राडा च झाला. आज (Chattisgarh)छत्तीसगर ला हिंदीमध्ये छत्तीसगढ़ म्हणतात, (Gurgaon)गुरगाव ला गुढगाव म्हणतात, (Ekar)एकर ला एकर त्याचप्रमाणे (Dhangar)धनगर चा धनगड(Dhangad) झाला आणि आज ६५ वर्षे आमच्यावरती अन्यायच अन्याय झाला मग हा अन्याय आमच्यावरती बाबासाहेबांनीच केला का??
राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करण्याचा अधिकार जर सर्वोच्च न्यायालयाला असेल तर मग न्यायदेवतेनं डोळ्यावरची पट्टी काढून आंधळेपणा बंद करावं, महाराष्ट्र राज्यात एकही धनगड समाजाची व्यक्ति नसताना आमच्या हक्काचं अनुसुचित जमातीचं आरक्षण आम्हास देऊन आम्हाला न्याय द्यावा. त्यासाठी राज्य सरकारने जी शिफारस करावयाची आहे ती शिफारस लवकरात लवकर करावी यासाठी धनगर समाजातील पक्षविरहीत समाजबांधवांनी १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन केले आहे.
धनगर समाजातील लाखो समाजबांधव दि १५ जुलैला आरक्षणाची ज्योत पेटती ठेवण्यासाठी पंढरपूर येथे उपस्थित राहणार आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने घेतलेला हा निर्णय आहे आणि सर्व बुद्धिजीवी वर्गाने या आंदोलनाचे आयोजन केले आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अथवा राजकीय दृष्टीकोणातून आयोजित केलेले हे आंदोलन नाही. आजपर्यंत निमूटपणे आपण अन्याय सहन करत आलो आहोत हे कुठेतरी थांबायला पाहिजे, आपल्या इतिहासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून आपली ओळख काय आहे आणि आपण काय करतोय याचा गांभिर्यानं विचार करुन उद्याच्या पीढीवर अन्याय सहन करायची वेळ येवू देवू नका यासाठी जातीवंत धनगर सभाजबांधवांनी पुनःशा संघटित होऊन आपल्या हक्कासाठी एकत्रित पणे लढाई लढावी. ज्या सरकारला धनगर समाजानं एक गठ्ठा मतदान केलं आणि सत्तेत आणलं ते सरकार आज चांगलंच झोपलंय आणि या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी दि १५ जुलै रोजी अखंड महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती...

ना माझ्यासाठी ना माझ्या स्वार्थासाठी, नाही कोण्या व्यक्तिसाठी...

ही लढाई आहे फक्त आणि फक्त माझ्या धनगर समाजासाठी...

उठ धनगरा हो जागा अन् लढ तुझ्या हक्कासाठी..

उचल तलवार आणि उगार मुठ नाहीतर घे हाती काठी...

कर येळकोट येळकोटचा गजर अन् लाग प्रस्थापितांच्या पाठी...

अन्यायावरती उगार आसूड उद्याच्या भावी पीढीसाठी...

तुम्हावर अन्याय होत असेल तर अखंड समाज असेल तुमच्या पाठी...

हिम्मत हारू नकोस प्रयत्न सोडू नकोस जर
कितीही आणि कोणीही आले तुला आडवण्यासाठी,

फक्त एकदाच "जय मल्हार" बोल अन् लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी. फक्त लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी.

म्हणून आरक्षणाच्या या लढाई साठी दि १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर ता पंढरपूर जि सोलापूर येथे सामाजिक बांधीलकी लक्षात घेवून प्रत्येक समाजबांधवांनी सहभागी व्हावं...ही नम्र विनंती

जय मल्हार!! जय अहिल्या!!
             -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Friday 12 June 2015

आम्ही नेमकं चुकतोय कुठे??

आज जनावरांची म्हणजेच कुत्र्या-मांजरांची जनगनना होते पण माझ्या धनगर समाजाची जनगनना होत नाही. का होत नाही? कशासाठी होत नाही?? असा आम्ही कधी विचारच केला नाही. कारण तितका विचार करण्याइतपच आमची बुद्धि पार भ्रष्ट झाली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
आज देशामध्ये गाई-म्हैसी, कुत्री-मांजरे एवढंच नव्हे तर जंगली प्राण्याची देखिल जनगनना होते. कुठे आणि कधी मोजायला जातात ते कोणास ठाऊक? म्हणजे भारत सरकारला जनावरांची जनगनना करायला वेळ, पैसा सर्व काही आहे पण माणसांची म्हणजे माझ्या धनगर समाजाची जनगनना करायला त्यांना सवड नाही.
जनगनना न झाल्याचा परिणाम काय? तर
राज्य घटनेत बाबासाहेबांनी कलम ३४२ मध्ये क्र ३६ वरती धनगड(धनगर) समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये १९५० साली सामावेश केला असून आमच्या अज्ञानपणामुळे आम्हाला ते माहीत नव्हते.  आज धनगर समाजाची जनगनना न झाल्याने धनगर समाजाची खरी लोकसंख्या कीती आहे हे अजूनही अंधारातच आहे. "र" आणि "ड" च्या फरकामुळे धनगर आणि धनगड हे एकच आहेत त्यासाठी अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी म्हणून खंबाटकीच्या घाटामध्ये स्व बी के कोकरे साहेबांनी सर्वप्रथम रास्तारोखो केल्यानंतर सांगली मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीच्या उपस्थिति मध्ये धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी करण्याऐवजी धनगर समाजाला भटक्या जमाती-क मध्ये घातलं. आज धनगर समाज हा राज्य पातळीवरती भटक्या जमाती-क (Nomadic Tribes-C) च्या सवलतींचा लाभ घेतोय तर महाराष्ट्राबाहेर हा धनगर समाज इतर मागास वर्ग  (Other Backward Class) च्या सवलतींचा लाभ घेतोय. त्यावेळी राज्य पातळीवरती धनगर समाजातील लोकसंख्येचा विचार करून (धनगर समाजातील पोटजातींचा विचार न करता) भटक्या जमाती-क मध्ये ३.५% आरक्षण दिले. पण धनगर समाजाच्या अनेक पोटजाती या महाराष्ट्र राज्यात आहेत त्यां सर्वांची जर जनगनना केली तर फक्त महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये धनगर समाज हा सर्वात जास्त आणि लोकसंख्येने १ क्रमांकाचा समुह असणारी जमात आहे. पण निश्चित लोकसंख्या ही सर्व जनगनना झाल्यानंतरच समजेल. मग सरकार जाणूनबुजून धनगर समाजाची जनगनना का करत नाही?? त्याचं उत्तर असं आहे की महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज हा भटक्या जमाती-क मध्ये आहे आणि पोटजातींचा विचार न करता भ.ज.-क (NT-C) चे ३.५% आरक्षण धनगर समाजाला दिलं गेलं आणि आमच्यातल्या आमच्यातच पोटजातींमध्ये भांडण लावायचं काम प्रस्थापितांनी केलं. याचा अर्थ असा की या राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक १ वरती असणार्या धनगर समाजाला फक्त ३.५% मध्ये गुंतवायचं आणि बाकीचा मलिदा इतरमागास वर्गातील व खुल्या वर्गातील समाजाला द्यायचा ही रणनीति आम्ही कधी अभ्यासणार???
एकुण लोकसंख्येच्या टक्केवारीवरुन त्याच्या निमपट आरक्षण द्यायचं अशी तरतूद असताना ३.५% आरक्षण म्हणजे महाराष्ट्र राज्यात धनगर समाज फक्त ७% एवढाच आहे का?? आज जर जनगनना केली तर धनगर समाज १७% नव्हे तर त्याहूनही अधिक आहे मग आमच्या बांधवांनी फक्त ३.५% मध्येच स्पर्धा करायची का??
धनगर, हटकर, व्हटकर, खुटकर, कुचेकर, सनगर, झेंडे धनगर, बंडी धनगर, खांडा धनगर अजूनही अधिक पोटजाती धनगर समाजात आहेत या सर्वांना महाराष्ट्र राज्यात फक्त ३.५% मध्ये अडकवलंय आणि बाकीचा इमाव मध्ये कमी लोकसंख्या असणारा समाज उरलेलेल्या २३.५%चा मलिदा खातोय त्याचाच परिणाम माळोरानी, रानावनातून भटकणार्या धनगर समाजाला याचा लाभच घेता आला नाही. आमचा धनगर समाज डोंगरदरी आणि दूर माळोरानी वास्तव्य करत आहे. काही ठिकाणी धनगर समाजाच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथे ना विजेची सोय आहे ना पाण्याची सोय  नाही शिक्षणाची व्यवस्था. त्यांच्याजवळ मी भारतीय आहे असे दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी साधं रेशन कार्ड सुद्धा नाही. भारतामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही. विजेची सोय नसल्यामुळे टीवी (दुरदर्शन), वृत्तपत्र  काय असतं तेच त्यांना माहीत नाही.
मग त्या आमच्या धनगर समाजबांधवांची जनगनना झाली का?? आणि झाली तर जनगनना कधी होणार?? तोपर्यंत आमची पुढची पीढी बरबाद करायचं सरकारचं धोरण आहे का?? कधी जाऊन तर बघा त्या ठिकाणी मग कळेल त्या सावरा-पिचड-मोघे-पुरकेला की हा धनगर समाज आदिवासी पेक्षाही अत्यंत हालाखीचं जीवन जगतोय की नाही ते... नुसत्याच शहरातील चार दोन कुटुंबांचा सर्वे करून हे भुंकु लागलेत.
 आज राष्ट्र पातळीवरती आमच्या समाजातील युवकांना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागतेय हे कीती दुर्दैव म्हणावे लागेल. आज राज्यघटनेत बाबासाहेबांनी तरतूद केल्याप्रमाणे जर अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळाले तर धनगर समाजाची पोरं राखीव आरक्षणातून राज्य आणि राष्ट्र पातळीवर नक्कीच पुढे येतील आणि शैक्षणिक राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदावरती पोहचतील. आज दहावी-बारावीचे निकाल झाले सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या तरी सरकार आल्यावर १० दिवसात आणि तद्नंतर १५ दिवसांत निर्णय घेणार असे म्हणनारे मुख्यमंत्री धनगर आरक्षणावरती कसली पीएचडी करताहेत तेच समजत नाही?? आज धनगर समाजातील हजारो विद्यार्थ्यांना ३.५% स्पर्धा करावी लागणार आणि खुल्या वर्गात तर आमच्या पोरांना संधीच देत नाहीयेत मग कुठल्यातरी खाजगी विद्यालयात लाखो रूपये डोनेशन फी भरून प्रवेश घ्यावा लागणार हे मात्र नक्की पण आर्थिक मागासलेपणा असलेला समाज एवढे पैसे आणणार कुठून??? जर आरक्षण दिले तर महाराष्ट्र राज्यात शरद पवाराच्या पै-पाहुण्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना पैसे कोठून भेटणार याचं गणित तुमच्या डोक्यात कसं काय येत नाही??? आम्ही अशा गोष्टींचा विचार करत नसलेमुळे आम्हा स्वतःचे व पर्यायानं धनगर समाजाचे फार मोठं नुकसान झाले आहे. यासाठी आमची जनगनना व्हायला हवी म्हणून सरकारवरती जर दबाव आणला तर आपले हक्क आपल्याला मिळतील व त्याचा लाभ माझ्या धनगर समाजातील गोरगरीब समाजबांधवाला नक्कीच होईल  हे सांगायला मला काही वावगं वाटणार नाही. आम्ही आजपर्यंत चुकत आलोय कारण आम्ही अज्ञानी होतो आणि अज्ञानपणामुळं आमच्या मागण्या काय आहेत हे आम्ही सांगू शकलो नाही. पण आता आम्ही शिकलो-सवरलो एवढंच नव्हे तर लिहायला लागलो आणि बोलायला देखिल लागलो. आता येथून पुढे पोटजाती बाजूला ठेवून अखंड धनगर समाजबांधवांनी फक्त "धनगर" म्हणून एकत्रित यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. तरच आम्ही सरकारला गुडघ्यावर टेकायला भाग पाडू आता आम्ही नुसतंच मागत बसणार नाही तर आमच्या हक्काचं हिसकावून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही ही आमची धनगराची औलाद आहे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Monday 8 June 2015

जातीवाद नक्की कोण करतंय??

 मी जातीवाद करतोय अशा काही अल्पशा प्रतिक्रिया मला ऐकायला भेटतात. पण खरा जातीवाद कोण करतय याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. या महाराष्ट्र राज्याच्या छाताडातून कष्टकर्यांच्या जातीतून आणि वरिष्ठांच्या  पातीतून जो समाज वेगळा केला गेला तो दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा आमचा बहुजन समाज वेगळा केला गेला. मग तिथे महार मांग चांभार कुंभार ढोर न्हावी साळी तेली कोष्टी वंजरी हटकर धनगर सनगर रामोशी वडर बेडर मुसलमान लिंगायत असो परीट अथवा लोणारी अन् बेलदार, गोरगरीब असलेला कुणबी मराठा असो या सर्वांवरती अन्याय करण्याचं काम प्रस्थापित आणि महाराष्ट्रातील चिमूटभर असलेल्या सनातनी आणि प्रस्थापित माजलेल्या २००-३०० घराण्यानी केलंय.
पाठीमागे ६ जनपथ, दिल्ली या शरद पवाराच्या निवासस्थानी धनगर समाजातील एक युवक DCC बैंकमधून कर्ज काढण्यासाठी मान्यता मिळावी या हेतूने शरद पवारांकडे जातो व बारामती येथील लोणी भापकर या गावातून आल्याचे मुद्दामहून  सांगतो त्यावेळी लोणी भापकर नाव ऐकल्यानंतर शरद पवारांचा चेहरा उल्हासित होतो पण थोड्याच वेळात शरद पवारांचा द्वारपाल त्या भेटायला आलेल्या युवकाची चिठ्ठी शरद पवारांकडे देतो त्यावेळी चिठ्ठीवरील त्या युवकाचे  'मासाळ' (मासाळवाडी ता बारामती येथील धनगर समाजातील "मासाळ" कुटूंबातील युवक) हे आडनाव वाचल्यानंतर शरद पवार म्हणतो की काम होणार नाही. म्हणजे धनगर समाजातील मासाळ असल्याने त्याचे काम होऊ शकत नाही. त्या धनगर समाजातील युवकानं काय त्याच्या खिशातलं मागीतलं होतं का??
पण सहा महिने उलटल्यानंतर लोणी भापकर येथील मराठा समाजाचं पोरगं शरद पवारच्या ६ जनपथ दिल्ली येथील निवास्थानी जाऊन शैक्षणिक फी माफ व्हावी या उद्देशानं जातं तर तिथे जाग्यावरच एक लाख रू फी लगेच माफ होते पण धनगर समाजातील एखादा युवक शरद पवारांकडे गेला तर त्याचे काम होत नाही.
अरे शरद पवार कुठून आली एवढी मस्ती?? कुठून आला तुला एवढा सत्तेचा माज?? या गोष्टीचा कोणाला  पुरावा हवा असेल तर मी हा पुरावा सादर करतो. मी माझ्या पदरचं लिहतोय किंवा माझ्या खिशातलं लिहतोय असा विषय नाही, कोणाला बदनाम करायचं हा देखिल विषय नाही. पण शाहू फुले आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि पै-पाहुण्या रावळ्यांचे राजकारण करायचे याला घराणेशाही म्हणतात लोकशाही नव्हे, आणि खरी लोकशाही जन्माला घालायची असेल तर पवार पाटील देशमुख ठाकरेंना घरात बसवावं लागेल तरच भारत एक महासत्ता देश बनू शकतो नाहीतर या देशाची सत्ता पवारांच्या हातात गेली तर देशाचं  वाटोळं झालं म्हणून समजा.. बारामती मतदारसंघातील माझा भोळा भाबडा धनगर समाज शरद पवाराला मतदान करतो म्हणून शरद पवाराची चरबी वाढतेय, धनगर समाज पवारांना मतदान करतो म्हणून मासाळवाडी सारख्या खेडेगावाला पाणी देणार नाही अशा धमक्या देण्याचे प्रकार अजित पवार नावाचा टग्या करतो. धनगर समाजाला केंद्राने आरक्षण नाकारले असे नरेंद्र मोदीचे शरद पवारांना पत्र आल्याचा खोटा गौप्यस्पोट सुप्रिया सुळे सारखी शरद पवाराची माजलेली पोरगी करते. खरा धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीसाठी शरद पवारांचा विरोध आहे कारण धनगर समाजाला जर अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर राजकारणात आणि प्रशासनात धनगर समाजाची पोरं चांगल्या पदावरती असतील आणि चमकतील सुद्धा त्यामुळे राज्यात आणि परिणामी भारतामध्ये पवार पाटील देशमुख ठाकरे यांना राजकारण करता येणार नाही हा त्यापाठीमागचा खरा हेतू आहे. ज्यादिवसी धनगर समाज शरद पवाराच्या घराण्यात मतदान करणार नाही त्या दिवसी खरी लोकशाही जन्माला आल्याचे सार्थक होईल.  धनगर समाजाबरोबर लिंगायत समाजाला जर अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर लिंगायत समाजाची पोरं पुढे येतील याची भीती शरद पवारांना आहे. मग प्रकाश शेंडगे आणि राम वडकुते यांना याची जाणीव व्हायला हवी होती पण स्वतःच्या लाचारीसाठी अन् स्वार्थासाठी ते शरद पवारांचे तळवे चाटताहेत असा आरोप करायला मला काही वावगं वाटणार नाही. प्रकाश शेंडगे आणि राम वडकुते जर तुम्ही धनगर समाजाचे नेते असता तर धनगर समाजावर असा अन्याय झालाच नसता. धनगर समाजातील नेते स्वतःची पोळी भाजून घेण्यात पटाईत आहेत त्यामुळे धनगर समाजाला ST च्या सवलती मिळू नयेत यासाठी वारंवार गदा आणायचे काम पवार घराणे आणि त्यांची मस्तावलेली पिलावळ करत आहे हे विसरता कामा नये,
अरे कुणाला ऊल्लु बनवायला निघालात??? आम्ही आता तुमचे बाप आहोत हे विसरू नका. या शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना रस्त्यावर भिक मागायची वेळ आणल्याशिवाय हा जातीचा धनगर कदापी शांत बसणार नाही. म्हणून जातीवादी कोण आहेत आणि खरा जाती जातीवाद कोण करतंय याचा विचार तुम्ही करा.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Tuesday 2 June 2015

नाराज झालाय माझा कामगार बांधव...
आज माणगंगा सहकारी सागर कारखाना लि सोनारसिद्धनगर आटपाडी येथील मतमोजणी पार पडली व शेवटी हापाहापाचा माल गपापाला अशीच अवस्था झाली. विजय जरी घराणेशाहीचा झाला असला तरी सभासदांचा व स्वाभिमानी शेतकर्यांचा पुन्हा एकदा विश्वासघात झाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ज्या कामगारांचा पगार गेल्या २९ महिन्यापासून दिला नाही तो कामगार वर्ग मात्र दुखी आहे नाराज आहे कारण मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी पैनल लावताच त्या सर्व कामगारांचा ३ महिन्याचा पगार एकदम दिला. पडळकर साहेबांनी परिवर्तन पैनल लावल्याने कामगार वर्ग खूश होता पण राजेंद्र देशमुख यांच्या संस्थेतील लाचार/गुलाम बुद्धिजीवी वर्गामुळे माणगंगा सहकारी साखर कारखान्यातील गोरगरीब कामगारांच्या आनंदावरती जणू काय विरझन पडले. त्याच कामगारांच्या खाते उतार्यावरती सव्वासे कोटींचे कर्ज काढून स्वतःच्या घशात घालणार्या राजेंद्र देशमुख यांना त्या गोरगरीब कामगारांच्या भावना कधी समजणार?? सदरच्या साखर कारखान्याची डागडुजी करण्यात आली पण ज्या मशनरी कारखान्यात बसवल्या आहेत त्या जुन्या  कारखान्याच्या असून ३०रु किलो वजनाने विकत घेतलेल्या आहेत आणि कारखान्यात नवीन मशनरी बसवल्याचा दावा करुन करोडो रूपये घशात घालण्याचा काळाबाजार उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही, आज १००/२०० रुपयासाठी  लाचार झालेल्या सभासदांनी कामगारांस तसेच सांगोला, आटपाडी आणि माण या तालुक्यातील ऊस उत्पादकांना योग्य न्याय दिला नाही. खरंतर निष्ठूर आणि निर्दयी लोक माझ्या गोरगरीब शेतकर्यांच्या आणि कामगारांच्या भावना काय समजणार??? आज राजेंद्र देशमुख यांच्या पैनल चे उमेद्वार विजयी झाले असले तरी त्यांनी कधी शेतामध्ये ऊस लावला आहे का?? शेतीला पाणी देताना काय अडचणी येतात ते या उमेद्वारांना कधी माहीतच नाही. खरंतर राजेंद्र देशमुख यांच्या संस्थेत काम करणारा वर्ग हा बुद्धिजीवी वर्ग असला तरी एका ट्रैक्टर ड्राइवर च्या ईशार्यावरती नाचन्याची कला त्यांच्या अंगी चांगलीच उतरली असून त्याच राजेंद्र देशमुख यांच्या  संस्थेत नोकरी मिळावी म्हणून १०-२० लाख रूपये देवून ते बुद्धिजीवी (बुद्धिजीवी कसले हे स्वतःची बुद्धि दुसर्यांच्या बुटाखाली गहाण टाकणारे) लोक लोकांनी मान्य केलेल्या संस्थेत नोकरी करतात. या संस्था आणि कारखाने काय त्या देशमुखाच्या बापाची जहागिरदारी नव्हे..
श्रीमंत भवानराव पंत यांनी बक्षिसपत्र दिलेल्या जमिनीवरती ही संस्था ऊभी झाली ती पण लोकवर्गणीतून आणि कष्टातून...
खरंतर अन्यायाच्या विरोधात वाचा फोडायला हवी असं आम्हाला  शाळेत शिकवलं जातं पण याच संस्थेतील  शिक्षकांनी चक्क अन्याय करणार्या अपराध्याला सहाय्य करणे कितपत योग्य वाटते?? त्यांच्याच संस्थेतील काही लोक मला बोलले की देशमुखाच्या संस्थेत एक मजबूरी म्हणून आम्ही काम करतोय. एखादा अपवाद वगळला तर आज थकल्या भागलेल्या माझ्या गोरगरीब कामगार बांधव आणि ऊस ऊत्पादक बांधव यांच्यावर वेळोवेळी अन्याय करणारे जल्लाद म्हणजे राजेंद्र देशमुख यांच्या ताटाखालचे मांजर बनून राहिलेला लाचार आणि स्वार्थी वर्ग.
हाडाची काडं करून कारखान्यात काम करणार्या माझ्या बांधवांवर आज कुर्हाड कोसळली आहे आता राहिलेल्या २६ महिन्याच्या पगाराची आशाच गोरगरीब कामगारांनी सोडून दिली आहे. पैशाच्या लालसेपोठी दीनदुभळ्या आणि दुष्काळाच्या खाईत होरपळलेल्या सभासदांना आणि मतदार बांधवांना खरेदी करणार्याचा घाणेरडा प्रकार जिथं चालतो मग याला काय लोकशाही म्हणायचं का?? राजेंद्र देशमुखाने कारखाना लुटून दुष्काळात संस्था चालवल्या असतील त्यामुळेच कारखान्यावर सव्वासे कोटी रुपयांचे कर्ज झाले. त्या राजेंद्र देशमुखाने टाकलेल्या तुकड्यावर पळणार्या आणि छौ म्हणले की भुंकणार्या कुत्र्यांना राजकारण काय असते आणि कशासाठी केले जाते याची जाणीव त्यांना मुळीच नाहीये.
आज जरी पडळकर साहेबांच्या परिवर्तन पैनल चा पराभव झाला असला तरी ३ महिन्याचा पगार मिळाल्यामुळं कामगार बांधवांच्या चेहर्यावरती जे समाधान दिसलं त्यातच आमचा खरा विजय आहे.
     
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................