Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 25 April 2017

*यशवंत युवा सेना प्रमुख राज्यभर करणार अहिल्यामाईचा जागर*


३१ मे म्हणजे राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा ३९२ वा जयंती महोत्सव अगदी जवळच येऊन ठेपला आहे आणि विशेष म्हणजे त्याचेच औचित्य साधून सामाजिक व क्रांतीकारी संघटना असलेल्या यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेने यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब अहिल्यामाईचा व समाजाचा जागर संपूर्ण महाराष्ट्रबर करणार असल्याचे यशवंत युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा.उमेशराजे अनुसे यांनी सांगितले. त्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यांतील गावोगावी जाऊन धनगर समाजात व्याख्यानाच्या व समाजप्रबोधनाच्या माध्यमातून जागर करून समाजाला संघटित करणार आहोत असेही सांगितले. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील तमाम यशवंत मावळ्यांनी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी व समाज संघटित करण्यासाठी सहकार्य करावे

*व्याख्यानासाठी संपर्क*

*निर्भिड व सुप्रसिद्ध व्याख्याते*
*मा.विवेक कोकरे साहेब*
*(प्रमुख यशवंत युवा सेना महा.राज्य)*
*98814 59509*

        🙏यशवंत युवा सेना🙏
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍नितीनराजे अनुसे✍*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday 20 April 2017

मोदींच्या एकाधिकारशाहीत धनगर समाज भरडतोय...

२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमध्ये धनगर समाजासमोर हात जोडून मताचा जोगवा मागणारे केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्र राज्यातील फडणवीस सरकार हे सुद्धा पाठीमागच्या आघाडी सरकार प्रमाणेच नपुसंक ठरले. धनगर समाज हा गेल्या ६७ वर्षापासून अनुसुचित जमातीच्या सवलतींपासून वंचित असताना धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता लावायचे काम हे पेशव्यांच्या औलादींनी केले आहे त्यामुळे त्यांच्या पापांचा घडा आता भरत आला असून मल्हार मावळ्यांना आता लढाईला सज्ज व्हावे लागणार आहे. हातात तलवारी घेऊन प्रत्येक धनगर बांधवास छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांचा अवतार घ्यावा लागणार असून पेशवाई नष्ट करावी लागेल तरच धनगर समाजबांधवांना न्याय मिळेल नाही तर मोदींच्या हिटलर शाहीत माझा भोळा-भाबडा धनगर समाज विनाकारण भरडला जाईल.
२०१४ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये सोलापूर येथे व तद्नंतर बारामती येथे स्टेजवरून मोदींनी स्वताहून पवारांवर टिका करत धनगर समाजाला भावनिक करून आरक्षणाचे गाजर दाखवले आणि आज सत्ता आल्यानंतर मात्र धनगर समाजाच्या पाठीत मोदींनी खंजीर खुपसला एवढा मोठा अन्याय माझ्या धनगर समाजावर होत असताना धनगर समाजातील नेते मंडळी मात्र मूग गिळून गप्प आहेत हे कुठेतरी थांबायला हवे. सर्व नेत्यांना माझे सांगणे आहे की तुम्हाला आतातरी शहाणपण सुचू द्या... आतातरी मल्हारी मार्तंड तुम्हाला सद्बुद्धी देवो... आतातरी तुमच्या नसानसातून चंद्रगुप्त मौर्य, राजा सम्राट अशोक, राजे मल्हारराव होळकर, राष्ट्रमता अहिल्याई होळकर, छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर, विरांगणा भिमाई होळकर, स्व.बी.के.कोकरे साहेब यांचे रक्त सळसळत असताना तुम्ही षंढ होऊन थंड राहत असाल तर तुमच्या नसानसात माझ्या थोर महापुरूषांचे रक्त सळसळत नसून ते पाणी आहे असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही.
समाजबांधवांनो आतातरी एकत्रित या, आतातरी एक व्हा... आतातरी पोटजाती भेद टाळा आणि धनगर म्हणून आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरा तरच तुमची दखल घेतली जाईल अन्यथा तुमचे आमचे हाल कोणी कुत्रे देखिल खाणार नाही. मोदींच्या आजच्या स्टेटमेंट वरून तरी तुमच्या आमच्या लक्षात यायला पाहिजे की आजपर्यंत धनगर समाजाचा वापर केवळ सत्तेसाठी केला जातोय. थोडक्यात सांगायचे म्हंटले तर use & through glass सारखी धनगर समाजाची अवस्था मोदी आणि फसणवीस सरकारने केली असून धनगर समाजाला जागृत होणे गरजेचे आहे सतर्क आणि सक्षम होणे गरजेचे आहे. सर्व सामाजिक संघटनांनी आपापसातील मतभेद दूर करून केवळ वैचारिक पातळींवर समाजासाठी एकत्रित येऊन गावोगावी, तालुका तसेच जिल्हा व राज्य पातळींवर आंदोलने मोर्चे काढण्याचे नियोजन करण्यासाठी लवकरात लवकर बैठका आयोजित कराव्यात. आजपर्यंत प्रेमाने मागून बघितले पण आता धनगर समाजाचा संयम सुटला असून आता आर या पारची लढाई करण्याशिवाय गत्यंतर नाही. हरियाणा मध्ये जाटांनी फक्त जाळपोळ केली पण उभा महाराष्ट्र पेटवून टाकायची धमक माझ्या धनगर समाजात असताना धनगर समाज अजून शांतच का?? समाजातील प्रत्येक घटकाने अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी एक व्हायला हवे. धनगर समाजातील माझ्या माता-भगिनींना विनंती आहे की आतातरी तुमच्यातल्या राष्ट्रमाता अहिल्याई जाग्या होऊ द्या. आतातरी तुमच्यातल्या वीरांगणा भिमाई पेटून उठू द्या. षंढ होऊन थंड बसण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात बंड करून गुंड झालेले बरे. धनगर समाजातील माझ्या समाजबांधवांना, युवा वर्गाला, माता-भगिनींना, सर्व नेत्यांना तसेच प्रशासकीय अधिकारी बांधवांना विनंती आहे की जर तुम्हा-आम्हाला आपले अर्थात धनगर समाजाचे आस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर धनगर समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला शिका नाहीतर मागले तसेच म्होरले अशातला प्रकार होईल आणि शेळ्या-मेंढ्या राखून काबाडकष्ट करणारा माझा गोरगरीब व भोळा भाबडा धनगर समाज विनाकारण या मोदींच्या हिटलरशाहीत भरडला जाईल.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

धनगरांनो आतातरी पेटून उठा...

किती दिवस थंड बसणार? किती दिवस षंढ राहणार?? सळसळत्या रक्ताचे वारसदार आपण हातात तलवारी घेऊन कधी बंड करणार?? पिढ्यांनपिढ्या शेळ्या-मेंढ्या राखून, पायाच्या नडग्या वाळवत, ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता पाचविला पुजलेली भटकंती करण्यातच आमचं अख्खं आयुष्य संपून जातं पण आमच्याच जिवावर राजकारण आणि समाजकारण करणाऱ्या औलादी मात्र ऐशोरामात एसी च्या गाडीत आणि एसीच्या माडीत राहतात. कदाचित या जगातील माणुसकीच संपली की काय असाच भास होत आहे. गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे पण प्रस्तापित मस्तवाल नेत्यांनी माझ्या धनगर समाजाचा नुसता वापर करून स्वताची घरं भरली पण आरक्षण देतो म्हणून आश्वासनांवर आश्वासनांचा भडिमार केला तरीही माझ्या धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही उलट त्या डोमकावळ्यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण  मिळू नये म्हणून अनेक पायंडे घातले. त्या प्रस्तापित मस्तवाल नेत्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत धनगर समाजाने त्यांची जागा दाखवून दिली आहे.
आजच्या सरकारची देखिल तिच अवस्था आहे. थोडक्यात सांगायचे म्हंटले तर गावाकडे एक म्हण आहे ती म्हणजे  आजा मेला अन् नातू झाला घरात माणसं तेवढीच.... म्हणजेच पाठीमागच्या पवार पाटील देशमुखांच्या आघाडी सरकारने दिले नाही आणि या फडणवीस सरकारला देखिल धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण द्यायचे नाही असेच दिसतेय. त्याचे कारण असे की फडणवीस सरकारने ज्या TISS चे भूत धनगर समाजाच्या मानगुटीवर बसवले आहे त्याची काही आवश्यकता नव्हती आणि नाही कारण एखाद्या जातीला/जमातीला अनुसुचित जाती/जमाती मध्ये नव्याने सामाविष्ट करायचे असल्यास राज्य सरकार संबंधित संस्थांची अहवाल सादर करण्यासाठी नेमणूक करू शकते पण धनगर जमात ही अगोदरपासूनच राज्यघटनेमध्ये अनुसुचित जमातीच्या ३४२ कलम वरील महाराष्ट्र राज्याच्या नवव्या परिशिष्टात अ.क्र.३६ वरती आहे तेथे असलेला उल्लेख हा ओराॅन, धनगड असून भारत सरकारकडून प्रसिद्ध झालेल्या अनेक गॅझेट्स मध्ये अ.क्र.३६ वरती ओराॅन, धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे त्याशिवाय १९८६ साली राज्यसभेत खा.सुर्यकांता पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सभापती महोदय रामविलास पासवान यांनी महाराष्ट्रातील धनगर व धनगड हे वेगळे नसून एकच आहेत असे सांगितले पुढे ते म्हणाले की राज्य सरकारने त्याबाबतीत केंद्र सरकारकडे शिफारस केली तर केंद्र सरकारकडून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळतील. मग असे असताना देखिल धनगर समाजाला आजपर्यंतही अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या जात नाहीत. माझ्या  धनगर समाजातील कित्येक पिढ्या अशाच बरबाद झाल्या, धनगर समाजातील लाखो मुले-मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहीली हजारो तरूण-तरूणी आय ए एस, आय पी एस बनण्यापासून कोसो दूर राहीली याचे एकमेव कारण म्हणजे आजपर्यंतच्या सत्ताधारी आणि सत्तापिपासू मस्तवाल नेत्यांनी आमच्या हक्कावरती गदा आणली. अनेक आंदोलने झाली, मोर्चे झाले कालच १६ मार्च रोजी दहिवडी ता.माण जि.सातारा येथे मल्हार क्रांती मोर्चा झाला पण सरकार मात्र हातावर हात ठेवूनच शांत बसलंय.
आरक्षणाबरेबरच विद्यार्थांची शिष्यवृत्ती आणि मेंढपाळांसाठीही शेळ्यामेंढ्यांच्या चाऱ्याची मोठी समस्या भेडसावत आहे. आज माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाचा शुल्क धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडणारा नाही त्यामुळे अर्ध्यातूनच शिक्षण सोडून द्यावे लागते त्याशिवाय डाॅक्टर आॅफ फिलाॅसाफि (Ph.D) च्या विद्यार्थ्यांना देखिल भरमसाठ प्रवेश शुल्क देऊन प्रवेश घ्यावा लागतो मग हे कुठे तरी थांबावयला हवे. दुसरीकडे भयानक दुष्काळ सतावत असताना मेंढपाळांना मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी वणवण फिरावे लागते पण मेंढपाळांची चराऊ कुरणे आजतागायत सरकारकडे जमा आहेत वन खाते मेंढपाळांना चराऊ कुरणात चारणीसाठी परवानगी देत नाही. भटकंती शिवाय माझ्या मेंढपाळ बांधवांचा वडिलधाऱ्यांना मार्गच सुचत नाही मग मेंढपाळांनी नक्की करायचे काय? जगायचे तर कसे जगायचे आणि मरायचे तर कसे मरायचे? असा प्रश्न पडला असताना आता जगण्यासाठी अन्यायाच्या विरोधात कुऱ्हाड भिरकवण्याशिवाय धनगरांसमोर पर्याय नाही. एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय गत्यंतर नाही. जेवढे शांत बसाल तेवढे खाली दाबायचा प्रयत्न करणारी पेशवाई पुन्हा उदयाला आली आहे त्यासाठी त्या पेशवाईचा बिमोड करण्यासाठी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांची दुरदृष्टी डोळ्यांसमोर ठेवून लढायला सज्ज व्हा आणि आजपर्यंत झाले ते झाले पण धनगरांनो इथूनपुढे पेटून उठा आणि पेटवून टाका तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना आणि हिसकावून घ्या
आपले हक्क आणि अधिकार.....
घेऊ नका माघार.. आता करूया जागर
   येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
       *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

हुंडाबळी

हुंडाबळी "प्रथा ही समाजाची-व्यथाही समाजाचीच"
(दि.२२ जुलै २०१६ रोजी प्रकाशित केलेला ब्लाॅग)
 (हुंडा ही प्रथा समाजाची-हुंडाबळी व्यथाही समाजाचीच)

        समाजामद्ये फिरताना वावरताना आसपासचे वातावरण हे सडलेल्या अंड्याप्रमाणे इतके उग्र (दुषित) झालेले पाहून अक्षरशा सामाजिक व्यवस्थेचा किळस वाटतो. दैनंदिन जीवनामध्ये रोजच काही ना काही घडतच असते पण यामद्ये सर्रास महिलांचेच का बळी जातात?? तेच समजत नाही. सरकार दरबारी महिला सबलिकरणाच्या गोष्टी मात्र हवेतच विरून जातात पण वास्तवात काहीच नसतं. रोजच वर्तमानपत्रातून स्त्रिभ्रूणहत्या, बलात्कार यांसारख्या मानवी जीवनाला काळीमा फासणाऱ्या बातम्या वाचताना डोळ्यांत पाणी येते त्यांव्यतिरिक्त हुंड्यासाठी होणारा विवाहितेचा छळ अर्थातच 'हुंडाबळी' हे सुद्धा समाजासमोरील एक मोठे आवाहनच आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी, कल्याणासाठी कायदे बनवले जातात पण कधी ते आमलातच येत नाहीत आणि जर आमलात आणले तर आरोपीला दंड आकारुन काही कालावधीची शिक्षा दिली जाते व कालांतराने ती शिक्षा माफही होते याचाच अर्थ पुन्हा गुन्हा करण्यासाठी त्या आरोपीला रान मोकळेच... मग सुड घेण्यासाठी पुन्हा कोणत्या ना कोणत्या महिला त्या लांडग्यांच्या शिकार होणार हे मात्र नक्की.
असो आपली न्यायव्यवस्था आंधळी आहे, जोपर्यंत डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे तोपर्यंत असंच चालत राहणार बाकी काय??? हुंडा न दिल्याने विवाहीतेवर छळ करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांपाठोपाठ लग्नागोदरच हुंड्याची भरमसाठ मागणी करून गोरगरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्या कुमारिकेचा बळी घेणेयाचेही प्रकार आज समाजात वाढत चाललेत. पाठीमागे काही महिन्यांपूर्वी एका मुलीने आत्महत्या केली होती त्यामागचं कारण जर अभ्यासले तर आजच्या या सामाजिक व्यवस्थेचा मला धिक्कार करावासा  वाटतो. सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेली ती मुलगी जेमतेम चांगली शाळा शिकलेली. आर्थिक परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हतेच सोबत लहान बहिणीच्यापण शिक्षणासाठी तरतूद करावी लागणार होती. आई-वडिलांना तिच्या लग्नाची घाई झालेली नसतानादेखिल परिस्थीती त्यांना मजबूर करत होती. शिवाय धाकल्या मुलीला शिकवावी आणि लागलीच तिचंही हात पिवळे करावेत असा त्यांचा उद्देश होता. तिच्यासाठी पाहुणे यायचे मुलगी सर्वांना पसंत पडायची पण हुंड्याचा विषय निघाला की ते लग्न मोडायचं  असे कितीतरी वेळा झाले. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने हुंडा देणे शक्य नव्हते. थोडाफार हुंडा ठिक असतो पण हुंड्याचा भरमसाठ आकडा ऐकला की त्या बिचाऱ्याला, गोरगरीब शेतकऱ्याला डोक्याला हात लावावा लागायचा. अहो एवढी रक्कम तो आणणार तरी कोठून??  एकतर महाराष्ट्र राज्यांत पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण आत्महत्या हा एकमेव पर्याय नव्हे म्हणून कसंबसं आर्धीकोर भाकरी खाऊन जीवन जगायचं ठरवलं तर दुसरे संकट आ वासून उभा राहायचं.मग नक्की करायचं काय ?? मग तो गोरगरीब शेतकरी असो अथवा गोरगरीब मजूर असो त्यांच्यापुढं आत्महत्येशिवाय पर्यायच उरत नाही. मुलीला एकामागून एक पाहुणे यायचे आणि हुंड्यापायी लग्न मोडून जायचे याचा परिणाम मुलीच्या त्या कोवळ्या मनावरती होणार नाही तर काय होणार?? एकतर हुंड्यामुळे लग्न ठरत नसल्याने समाजामद्ये विविध गोष्टींवर उलट-सुलट चर्चा चालतात, पारावर बसणाऱ्या समाजातील रिकामटेकड्या लोकांना याबद्दल काहीच माहित नसताना ते मुलींलाच दोषी ठरवतात. मग खचून गेलेली मुलगी स्वताला आई-वडिलांवरचं ओझं समजून आत्महत्येचा पर्याय निवडते आणि जीवन संपवून टाकते.
मग त्या मुलीच्या आत्महत्येला कोण जबाबदार असेल?? लग्न ठरत नसल्याने समाजात चाललेल्या उलट-सुलट चर्चेला कंटाळून आत्महत्या केलेली मुलगी जबाबदार असेल?? का हुंडा न देणारा दुष्काळामुळे खचलेला गोरगरीब शेतकरी बाप?? का ज्या प्रथा समाजानं पाडल्या तो समाज?? का ज्या समाजानं पारावर बसून चौकाचौकात त्या मुलीची बदनामी करून त्या हतबल असलेल्या पित्याची इज्जत काढली तो समाज??  कोण जबाबदार आहे याचा जरा अभ्यास कराल का हो??
       हुंडा कोणाला द्यावा?? अन् कोणाला देवू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे इट्स डजन्ट मॅटर ॲंड नो आॅब्जेक्शन, पण सोन्यासारख्या पोरींचे कन्यादान करूनही तिचा सांभाळ करावा म्हणून हुंडा द्यावा लागत असेल तर तो मुलगा काय निष्क्रिय आहे का सुस्त?   जर तो मुलगा काही कमवूच शकत नसेल तर वडिलधाऱ्यांनो तुमच्या सोन्यासारख्या पोरीचं वाटोळं कशाला करताय?? माझ्या मते एखाद्या अंध-पंगूसाठी हुंडा दिला तर ती गोष्ट वेगळी आहे कारण तो कमवू शकत नाही पण ज्याला दोन हात दोन पाय आहेत व्यवस्थित धडधाकट असूनही दोन-चार रुपये कमवता येत असूनही त्याला हुंडा देत असाल तर मग त्यांच्यात आणि अंध-पंगूमद्ये काय फरक राहिला?? आय एम साॅरी पण मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत कारण आठराव्या शतकात राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी "हुंडाबंदी" केली होती. म्हणजेच एकविसाव्या तंत्रज्ञानविकसित शतकात आजच्या सरकारला जे सुचतं ते आठराव्या शतकात माझ्या राजमाता अहिल्याईंना सुचत होते आणि प्रशासकीय व्यवस्थेमधून त्यांनी हे आमलात देखील आणले होते. पुढे अहिल्यामाईंचाच आदर्श डोळयासमोर ठेवून सतीप्रथेला, हुंडा प्रथेला थोर समाजसुधारक राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी देखील विरोध केला होता, या प्रथेच्या विरोधात ब्रिटिश सरकारने कायदे बनवले होते 'हुंडाबंदी' केली होती पण या कायद्यांना 'हुंडाबंदीला' विरोध करायचं काम बाळ गंगाधर टिळकांनी केले, बाय दि वे...  "आमुक-आमक्याने मुलींकडून एवढा हुंडा घेतला तर आम्ही पण तेवढा घेणार दोन रुपये जास्तच पण कमी नाही"अरे ही काय रस्सीखेच चाललीय का??? तुमच्या या रस्सीखेचमुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरातील निष्पाप मुलींचे बळी जातायेत याचा विचार करा. आज समाजातील हुंडा घेणाऱ्या बांधवांना मला सांगायचे आहे की "स्वताचा घाम गाळून, दिवसरात्र राबराब राबून शेतीतून धान्य पिकवायचं, एकाऐवजी आर्धीकोर भाकरी खाऊन पोरालेकरांना एकवेळ उपाशी ठेवून शेतात पिकवलेलं बाजारात बाराच्या भावात विकायचं, तिथं शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे व्यापारी अधाश्यासारखं शेतकऱ्यांना लुटत असतात मग त्यातूनही आलेल्या दीडदमडीत घरसंसार चालवायचा, मुला-मुलींची शिक्षणं, मुलीचे लग्न अशा कितीतरी समस्या त्या गोरगरीब शेतकऱ्यांसमोर उभा राहतात". मग अशा दुष्काळाने खचलेल्या जगाच्या पोशिंद्याकडून जर त्याच्या मुलीसाठी लग्नात हुंड्याची मागणी करत असाल तर तुमच्यासारखा हांडगा माणूस या जगात कोणी शोधून सापडणार नाही. कदाचित माझ्या या बोलण्याचा राग येत असेल पण हुंड्यापायी लग्न मोडलेल्या त्या आत्महत्या केलेल्या मुलीचा एकवेळ भाऊ होऊन बघा तुम्हीसुद्धा माझ्यासारखीच कडवट भाषा बोलाल अथवा हुंडा न दिल्यामुळे सासरकडील लोकांनी जाळून मारलेल्या विवाहितेचा भाऊ नाहीतर एकवेळ बाप होऊन बघा तुमचे डोळे रक्तासारखे लाल होतील आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखीच डोळ्यात अंजन घालणारी भाषा बोलाल आणि शेवटी सर्व काही करूनही जर तुम्ही हतबल असाल तेव्हा तुमच्यावरसुद्धा आत्महत्या करायची वेळ येईल. म्हणूनच म्हणतो अरे कमवायचे असेल ना तर स्वताच्या हिंमतीवर स्वताच्या ताकदीवर कमवा पण मागतकऱ्यांसारखा हुंडा मागत बसू नका आणि कृपया हुंड्यापायी गोरगरीब घराण्यातील निष्पाप मुलींचे बळी घेऊ नका ही नम्र विनंती.
"हुंडाबंदीसाठी एकमेकांच्या हातात हात देऊन निष्पाप मुलींचे जीवन वाचवा एवढंच सांगायचा माझा उद्देश आहे." धन्यवाद
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com