Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 31 May 2016

अहिल्याईंच्या प्रशासनाचा अवलंब करा...

माता अहिल्ये तुझी जगभर कीर्ती
तूच होतीस महान प्रशासनकर्ती
माते तुझी घेऊनिया स्फूर्ति
लढण्यासाठी घेऊन तलवार हाती
आम्हीही उतरतो आता रणांगणावरती.....

एक स्त्री असूनदेखिल या देशाच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्ष राज्यकारभार करणारी राज्यकर्ती, १८व्या शतकातील एक आदर्श आणि महान प्रशासक असा उल्लेख अक्षरशा ब्रिटिशांनी करून ठेवला आहे. पण आम्ही अजूनही अंधारातच आहोत. आपल्या राज्यातील प्रजेलाच नव्हे तर अखंड भारतातील प्रजेला पोटच्या लेकरांप्रमाने सांभाळणारी मायमाऊली, एवढेच नव्हे तर जाती-धर्माच्या भींती तोडून स्वताच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवणारी थोर समाजसुधारक, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मंदिरांचा जिर्णोध्दार, मंदिरांचे बांधकाम, मश्चिदींचे बांधकाम, शेतकऱ्यांसाठी शेततळे, तलाव, विहीरी, वाटसरूंसाठी बारवे, धर्मशाला, नदीवरील घाट अशी कीतीतरी विकासकामे प्रजेच्या हीतासाठी करणारी पुण्यश्लोक, वेळप्रसंगी प्रजेच्या रक्षणासाठी हाती तलवार भाले घेऊन दुश्मनांच्या चिंधड्या उडवणारी रणरागीणी, राजमाता, महाराणी, लोककल्याणकारी माता अहिल्याई होळकर यांची आज २९१ वी जयंती त्यानिमीत्त माझ्या राजमातेला मानाचा पिवळा जय मल्हार.
जाती धर्माच्या पलिकडे जाऊन प्रजाहितरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या अहिल्याई होळकर यांची जयंती फक्त धनगर समाजानेच साजरी करणे हा खरंतर अहिल्याईंचा अपमान  आहे पण जातीवादाने बरबटलेल्या या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर अखंड भारत देशामध्ये ही जातावादाची अन् भूरसटलेल्या विचाराची पेरण करून सनातन्यांनी सर्वसामान्यांचे पार कंबरडच मोडलंय. राजमाता अहिल्याई होळकर असो अथवा अन्य कोणी थोर महापुरूष किंवा समाजसुधारक असो यांची जयंती अथवा स्मृतिदीन साजरा करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असताना त्या त्या महापुरूषांचे विचार आत्मसात करून त्या मार्गावर चालणे हे समाजाच्या हीताचे आहे. नुसतंच महापुरूषांच्या जयंत्या साजऱ्या करणं, लोकवर्गणीतून हजारो-लाखो रुपये उधळून डी जे लावून धांगडधींगा घालणे हे समाजजीगृतीचे लक्षण नसून समाजाला त्या महापुरूषांच्या विचारांपासून परावर्तित करण्याचे लक्षण आहे असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
राजमाता महाराणी अहिल्याई होळकर यांची प्रशासन पद्धत पाहून, अहिल्याई होळकर यांचा राज्यकारभार आणि प्रशासन याचा अभ्यास करून युरोप खंडांतील देशांनी विकासाचा पल्ला गाठला, शेती, शिक्षण तसेच औद्योगिकरणातून त्या त्या देशांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली पण त्याच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा भारत देश मात्र अधोगतीच्या मार्गावर आहे यासाठी धर्मनिरपेक्षतेचा उगाच आव आणणाऱ्या भारत देशाची जातीव्यवस्था (धर्मभेद, जातीभेद) ही भारताच्या अधोगतीशी कारणीभूत आहे. आजपर्यंत सनातन्यांनी राष्ट्राप्रति सर्वस्व अर्पन करणाऱ्या महापुरूषांचा इतिहास चुकीचाच लिहला  आणि खरा इतिहास मात्र दडवून ठेवला लपवून ठेवला कारण की चुकीचा इतिहास लिहणारे इतिहासकारच खरंतर चुकीचे जन्माला आले होते.
आज धनगर समाज जागा झाला, समाजाला खरा इतिहास समजू लागला उमजू लागला पण समाजाचे भांडवलीकरण करून, समाजाला प्रस्तापितांच्या दावणीला बांधायचे काम धनगर समाजातील नेत्यांनी केले म्हणजेच आगीतून उठला अन् फुफाट्यात पडला हीच अवस्था धनगर समाजाची झाली आहे. अरे एकेकाळी राजा समाज असणारी ही जमात गुलामगीरीत का वागतेय? हे सांगून सांगून थकलो तरीही धनगर समाज अजून अज्ञानाचं, अंधश्रद्धेचं घोंगडं पांघरून गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय हे समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव आणि याच कारणांमुळे धनगर समाजाचा विकास खुंटलाय असं म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
असो आजचा युवक शिकलाय, सवरलाय, अन्यायाच्या विरोधात लिहायला, वाचायला आणि बोलायला लागलाय त्यामुळे कुठूनतरी आशेचा किरण उगवलेला दिसतोय, कुठूनतरी समाजप्रबोधनास नव अंकुर फुटलेला दिसतोय. आजचा युवक स्वाभिमानाची भाषा बोलायला लागलाय. नक्कीच आजचा यूवक हा उद्याच्या भावी पिढीसाठी एक नवा इतिहास रचून जाईल. एक वेळ अशीही येईल की राजा मल्हारराव होळकर यांचे "मल्हारतंत्र" अवगत करून, रणरागीणी अहिल्याई  होळकर यांचा आदर्श आणि एकमेव अद्वितीय महाराजा यशवंतराव होळकर यांची दूरदृष्टी डोळ्यांसमोर ठेऊन सर्व धनगर समाजबांधव, नेते एकत्रित येऊन क्रांती घडवतील हीच आशा मनी बाळगून समाजप्रबोधनासाठी चालू केलेला हा लेखनप्रपंच....
पुनःश्च एकदा राष्ट्रमाता,राजमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त (३१ मे १७२५) त्यांच्या प्रेरणादायी सक्षम विचारांना व समाज उध्दारक दैदिप्यमान कार्याला विनम्र अभिवादन...! मानाचा पिवळा जय मल्हार!! तसेच सर्व समाजबांधवांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
जय मल्हार! जय अहिल्याई!! जय यशवंत!!!
आपलाच
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ती.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Sunday 1 May 2016

...तेव्हा उभा महाराष्ट्र पेटलेला दिसेल.


आज महाराष्ट्र दिन या दिवशी १०५ हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्या शुरवीरांना खरंतर मानाचा जय मल्हार!! जय महाराष्ट्र!! कोटी प्रणाम!! तसेच कामगार दिनाच्या सर्वांना हर्दिक शुभेच्छा!!
आज राज्यभर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांचे संदेश सर्व सोशल मिडीयावरती फिरताहेत चांगली गोष्ट आहे पण याच महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजावरती जर विनाकारण अन्याय व अत्याचार होत असेल तर मग काय म्हणून महाराष्ट्र दिन साजरा करायचा? असा प्रश्न पडतो.
      कारण काल परवाच "धनगरांना आरक्षणाचे दरवाजे बंद". अशा आशयाची बातमी वाचायला भेटली तेव्हा तळपायाची आग पार मस्तकापर्यंत गेली. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्यूएल ओराम म्हणतात की गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या जनगनणा महासंचालनालयाने (रजिस्टर्ड जनरल ऑफ इंडिया) अर्थातच RGI ने ही मागणी फेटाळली आहे. पण खरंतर ती मागणी धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत सामाविष्ट करण्याबद्दलची होती आणि ती कोणी ? व कधी? पाठवली याबाबत माहिती उपलब्ध नाही.
सांगायची वस्तूस्थिती अशी की धनगर समाज अगोदरपासूनच अनुसूचित जमातीच्या यादीत आहे मग सामाविष्ट करण्याचा प्रश्नच येतो कुठे?? त्यातच सदरच्या राज्य सरकारने अजूनही धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात असा अनुकूल प्रस्ताव केंद्र सरकारला अर्थातच आरजीआय ला पाठवलाच नाही मग धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत सामाविष्ट करण्याचा प्रस्ताव नेमका कोणी? व कधी ? पाठवला याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, जो प्रस्ताव आरजीआय ने फेटाळला आहे. गेल्या ६६-६७ वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित आहे. दिवसभर उन्हातान्हात, थंडीवाऱ्यात धो धो कोसळणाऱ्या पावसाचा विचार न करता रानावनात, डोगरदऱ्यांत राहून जंगलात भटकंती करणाऱ्या या धनगर समाजाला शेळ्या मेंढ्या राखण्यामुळे आपण अनुसूचित जमातीमध्ये आहोत की नाही आहोत याचाच अभ्यास नव्हता अर्थातच शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या धनगर समाजाचे नेतृत्वच म्हणावे असे मजबूत आणि अभ्यासू नव्हते म्हणूनच आजपर्यंत धनगर समाजाची उपेक्षा झाली, अवहेलना झाली.
भारतीय राज्यघटनेत कलम क्र.३४२ वरती असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वर धनगड, ओरान असा स्पष्ट उल्लेख आहे. पण जेव्हा राज्यघटना लिहली गेली तेव्हा भारतीय समाजव्यवस्थेचे चार भागात विभाजन करून भारतामध्ये सर्वसमानता प्रस्थापित करण्यासाठी.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भविष्याचा वेध घेऊनच देशाच्या स्वातंत्र्यापुर्वी दि. ९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठात सादर केलेल्या अहवालाचा संदर्भ घेऊन भारतीय समाजव्यवस्था तयार केली. कोलंबिया विद्यापीठात सादर केलेल्या "आंबेडकर बाबासाहेब वांङमय" या अहवालात भारतीय जनजाती, संस्कृती यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जातीव्यवस्थेच्या लोकसंख्येचा आणि त्या जातीजमाती कोणत्या भागात आढळतात याचा आढावा दिला होता. त्यामध्ये "धनगड" नावाच्या जमातीचा कोठेही उल्लेख आढळून येत नाही मग स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यघटना लिहली गेली तेव्हा अचानक "धनगड" नावाची जमात कशी काय जन्माला आली ?? याचा अभ्यास करायला हवा.
"धनगर" या शब्दाचा "धनगड" असा शब्दछल झाल्याने धनगर समाज विकासापासून कोसो दूर आहे, जसे Gurgaon चे गुडगाव, Orissa चे ओडिसा, Acer चे एकड त्याचप्रमाणे Dhangar चे धनगड असा स्पेलिंग मिस्टेक झाल्याने धनगर समाजावर फार मोठा अन्याय झालेला आहे. आजही महाराष्ट्र राज्यात आणि परिणामी भारतामध्ये "धनगड" नावाची कोणतीही जमात आस्तीत्वात नाही अथवा धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी जेव्हा जेव्हा आंदोलने झाली तेव्हा "धनगड" नावाच्या जमातीचा एकही व्यक्ती विरोधात पुढे नाही. मग राज्यघटनेत उल्लेख असलेल्या धनगड जमातीचे आरक्षण नक्की कोण लाटतंय? धनगड जमात आस्तित्वातच नाही तर मग ३६ नंबर वर असलेल्या धनगड जमातीचा आदिवासी विकास निधी नेमका कोण लाटतोय याकडे गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात म्हणून सर्वप्रथम १९८९ साली यशवंत सेना संस्थापक स्व.बी.के.कोकरे साहेबांनी जेव्हा लाखो यशवंत सैनिकांना सोबत घेऊन खंबाटकीच्या घाटात आंदोलन केले होते त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी सांगली येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात पंतप्रधान राजीव गांधीच्या उपस्थितीत धनगर समाजाला "अनुसूचित जमाती" ऐवजी जाणूनबुजून "भटक्या जमातीत" घालण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता दाखवून धनगर समाजाला भटक्या जमातीत घातले आणि आजच्या धनगर समाजातील हजारो मुलामुलींचे भविष्य अंधारात ठेवले. धनगर समाजाची हजारो पोरं आय ए एस, आय पी एस बनण्यापासून वंचित राहिली याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे धनगर समाजाचा खरा शत्रू शरद पवार होय.
धनगर समाजावरती झालेल्या अन्यायाला बारामतीचा बोका जेवढा जबाबदार आहे तेवढेच धनगर समाजातील ठराविकजण सोडले तर बाकीचा सुशिक्षित वर्ग / प्रशासकीय अधिकारी  जबाबदार आहेत आणि धनगर समाजाचे भांडवलीकरण करुन समाजाचे बाजारीकरण करुन प्रस्तापित नेत्यांचे तळवे चाटणारे धनगर समाजातील पुढारी/नेते तितकेच जबाबदार आहेत. कारण त्या नेत्यांना समाजासाठी राजकारण करायचे नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचा वापर करुन स्वतःची घरं भरायची आहेत त्यामुळे त्यांना समाजाबद्दल काही घेणेदेणे नाही. यासाठी माडीत आणि साडीत गुरफटलेल्या व्यावसायिक बांधवानी सुशिक्षित वर्गाने जर प्रामुख्याने लक्ष घातलं तर धनगर समाजाला न्याय आणि आपले हक्क मिळायला क्षणमात्रही विलंब होणार नाही. आज केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्यूएल ओराम बरळतात की धनगर समाजाला आरक्षणाचे दरवाजे बंद आहेत पण ओरामांना कुठे माहित आहे की इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या यशवंतराव होळकरांचा वारसा लाभलेला क्रांतीकारी हाडाचा अन् सळसळत्या रक्ताचा प्रत्येक धनगर जेव्हा अन्यायाच्या विरोधात खवळून उठेल, पेटून उठेल तेव्हा उभा महाराष्ट्रही पेटलेला दिसेल आणि धनगर समाजाला बंद असलेले आरक्षणाचे दरवाजेे देखील आपोआप उघडलेले असतील. जिथे मराठी=मरहट्टी भाषिकांच्या प्रदेशात जर  मरहट्टींना (कर्नाटक शब्द मर=मेंढी,मेंढरू  व  हट्टीजन-मेंढ्या राखणारे, मेंढ्या पाळणारे धनगर)  यांना जर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नसेल तर मग आजचा महाराष्ट्र दिन काय म्हणून साजरा करायचा?  पाठीमागे जाटांनी हरियाना पेटवला होता तर केंद्र सरकार त्यांची दखल घ्यायला लागले पण डोळ्यावरती अज्ञानाचे घोंगडे पांघरून घेतलेले धनगराचे वाघ जेव्हा पेटून उठतील तेव्हा उभा महाराष्ट्र पेटलेला दिसेल हे मात्र नक्की.
  जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com