Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Sunday 28 January 2018

आज १३ वा स्मृतीदिन स्व.बी.के.कोकरे साहेबांचा...

       एकेकाळी या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रस्तापित भामट्यांनी गोरगरीबांवरती, शेतकर्यांवरती आणि दुबळ्या समाजावरती अन्याय करण्याचा अगदी नंगानाच चालवला होता. या प्रस्तापितांनी चालवलेल्या अन्यायामध्ये सर्वसामान्य जनता अगदी होरपळून निघत होती. त्यातल्या त्यात ज्या धनगर समाजातील महापुरुषांनी राष्ट्रासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली रक्त सांडून बलिदान दिले, ज्या धनगर समाजाने सम्राट अशोकासारख्या राजांना जन्माला घातलं, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणार्या, या भारतभुमीवर अन्याय अत्याचार करणार्या फिरंग्यांना अक्षरश: कापून  काढले त्या महाराजाधिराज शुरवीर राजा यशवंतराव होळकरांना, क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांसारख्या शुरविरांना जन्म दिला त्याच धनगर समाजाची स्वातंत्र्यानंतर अवहेलना झाली. महाराष्ट्रातले परिणामी भारताचे राजकारण हे ठराविकच माजलेली प्रस्तापित घराणेशाही धनगर समाजाला डावलून करत होती. ज्यांना हे  सर्व  काही समजत होते ते मात्र  स्वताच्या ह्रदयावर भला मोठा दगड ठेवून प्रस्तापितांच्या नपुसंकतेचा नंगानाच उघड्या डोळ्यांनी बघत होते. हे थांबवायचं कसं? अन्याय संपवायचा कसा? हे प्रत्येकाला वाटत होते पण पुढे येणार कोण? लढणार कोण? यासाठी आवाज उठवणार तरी कोण? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत होते. प्रत्येकाला कळत होते पण वळत नव्हते.
अशातच बारामती तालुक्यातील उंडवडी (..) जवळील कोकरेवाडी गावातील एका सर्वसामान्य धनगर समाजातील कुटंबामध्ये माता जिजाई पिता खंडेराव कोकरे यांच्या पोटी जून १९६० रोजी अन्यायाने आणि अज्ञानाने ग्रासलेल्या समाजाला प्रखरतेचा प्रकाश देणारा एक तेजस्वी सुर्य जन्माला आला ज्याचे नाव ऐकले तर प्रस्तापितांना आजही घाम फुटतो. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील कोकरेवाडी पो. उंडवडी येथील एक निर्भीड, नीडर व्यक्तिमत्व असलेले तरूण तडपदार युवक केमीकल इंजिनीयरींग मधील गोल्ड मेडल हासिल करणारे समाजावरती होणार्या अन्यायाची जाण असलेले यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेब ज्यांनी धनगर समाजाच्या एस.टी. (अनुसुचित जमाती) आरक्षणाच्या चळवळीला जन्म दिला. ज्या माणसानं धनगर समाजासाठी स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करुन निद्रावस्थेत गाढ झोपी गेलेल्या धनगर समाजाला जागं केलं, चालतं केलं, बोलतं केलं माजलेल्या प्रस्तापितांच्या विरोधात दंड थोपटण्यास प्रवृत्त केलं, आजच्या धनगर समाजातील तरूणांच्या नसानसात, रक्तात नवचैतन्य उभं केलं अशा एका अविरत झंजावातास २८ जानेवारी २००५ रोजी माझा धनगर समाज मुकला असेच मला म्हणावेसे वाटते.
स्व बी के कोकरे साहेब धनगर समाजाला सोडून गेले नाहीत तर धनगर समाज स्व बी के कोकरे साहेबांना मुकला असे म्हणणे योग्य वाटते कारण ना.सि.इनामदार यांची झुंज कादंबरी वाचल्यानंतर स्व बी के कोकरे साहेबांना  समाजावारती होणार्या अन्यायाची चीड येऊ लागली झुंज कादंबरीतून प्रेरित होऊन ते पेटून उठले पुढे ते इंदौर ला गेले समाजभुषण स्व.पांडुरंग गडदे मास्तर, स्व श्रीरंग वाघमोडे, मा.दुर्योधन रूपनवर साहेब, मा.रामभाऊ वाघमोडे साहेब, मा.देविदास (बापुसाहेब) हटकर सर, मा.राजू जांगळे साहेब, मा.गोरे मास्तर, धनगर समाजाची मुलुखमैदानी तोफ, सुप्रसिद्ध व्याख्याती अहिल्या कन्या प्रियदर्शनी कोकरे हिचे वडिल मा.नंदकुमार कोकरे सर तसेच अन्य लहान-थोर , नोकरदार वर्ग, अशी कितीतरी वीस-एकविसीतली मिसूरडी फुटलेली पोरं गोळा करून समाजाला संघटित करून क्रांतीचा मार्ग अवलंबण्यासाठी यशवंत सेनेचा आराखडा बनवला फलटण जि.सातारा येथील धुळोबाच्या यात्रेमध्ये धुळदेवाचे दर्शन घेऊन भंडारा उधळला यशवंत सेनेची स्थापना करून क्रांतीची मशाल पेटवली. कोणतीही दळणवणाची व्यवस्था नसताना प्रतिकुल अशा परिस्थीतीत धनगर समाजाच्या प्रत्येक घराघरात यशवंत सेना पोहचवण्यासाठी स्व.बी.के.कोकरे साहेबांनी आणि जिवास जीव लावणाऱ्या यशवंत मावळ्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. यशवंत सेनेच्या मावळ्यांनी राज्यभर अगदी धुमाकुळ घातला होता. कोणत्याही पासशिवाय मंत्रालयाचे गेट धाडकन उघडणारा  उरात जिगर बाळगणारा नेता प्रस्तापितांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणारा हाच तो वाघ धनगर समाजावरती अन्याय करणार्या आणि धनगर समाजाचा शत्रु असलेल्या बारामतीच्या बोक्याला खूले आवाहन करत ताठ मानेनं जगायचा आणि तरण्याबांड पोरांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाऊन धनगर समाजाला जागं करायचा. पण नियतीला हे मान्य नव्हतं प्रस्तापित मस्तावलेली यंत्रणा या ढाण्या वाघाला पुढे येऊ देत नव्हती कदाचित स्व बी के कोकरे साहेबांची आर्थिक परिस्थीती कमजोर असल्याचा फायदा घेत तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी धनगर समाजातीलच धनसंपत्तीने मजबूत असलेल्या काही अज्ञानी माणसांना हाताला धरून स्व बी के कोकरे साहेबांची राजकीय हत्याच केली. स्व बी के कोकरे साहेबांची लढाई ही अन्यायाविरोधात होती, त्यांचा विरोध कोण्या एका व्यक्तिला नव्हता तर धनगर समाजाच्या जीवावरती राजकारण करून सत्ता-संपत्ती बळकावणार्या सत्तापिपासू प्रस्तापित व्यवस्थेला त्यांचा विरोध होता.
गाढव आणि कुत्र्याच्या गोष्टीप्रमाणे माझ्याच धनगर समाजातील समाजबांधवांनी एकमेकांचे पाय ओढता, विरोध करता स्व बी के कोकरे साहेबांना साथ दिली असती तर आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री धनगर समाजाचा असता अन् गांधी पवार पाटील देशमुख ठाकरे यांसारखी प्रस्तापित घराणे रस्त्यावर आली असती पण खैर आमच्याच समाजात आजही एकी नाही त्यामुळेच घोडं पेंड खात बसलंय. आजही तीच अवस्था आहे धनगर समाजातील तरुणांच्या हातात क्रांतीची मशाल देणारे आमचे रणझुंजार दैवत स्व.बी के कोकरे साहेब आज धनगर समाजात नाहीयेत याचंच मनोमन दुख होत आहे. जरी प्रस्तापितांनी स्व बी के कोकरे साहेबांना संपवले असले तरी त्यांची विचारधारा अजूनही जिवंत आहे. स्व.बी.के.कोकरे साहेबांनी स्थापण केलेली यशवंत सेना कधीच पंढरपूर येथिल मेळाव्यात लोप पावली त्या मेळाव्यात वक्रतुंडाच्या सांगण्यावरून स्व.शिवाजी बापू शेंडगे यांनी यशवंत सेना काॅंग्रेस मध्ये विलीन झाल्याचे जाहीर केल्याने यशवंत सैनिकांत गोंधळ उडाला त्यापाठीमागे पवारांचे कपट कारस्थान होते पण यशवंत सेना तिथेच विस्कळीत झाली पुन्हा नव्याने कितीतरी संघटना स्थापण झाल्या पण त्या स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या संघटनेच्या नावानेच स्थापण झाल्या.
आज समाजात कितीतरी यशवंत सेना उदयास आल्या पण युवा पिढी संभ्रमावस्थेत आहे की स्व.बी.के.कोकरे साहेबांची खरी संघटना कोणती?? त्याचे उत्तर असे आहे स्व.बी.के.कोकरे साहेबांची अधिकृत अशी कोणतीच संघटना आज महाराष्ट्र राज्यात नाही. स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या जीवनचरित्र मध्ये संशोधनातून मी याबाबतीत उल्लेख केलेला आहे ते जीवनचरित्र प्रकाशित झाल्यानंतरच वाचकांसमोर येईल. कदाचित काहीजणांना ही गोष्ट खटकेल पण जे सत्य आहे ते कोणी नाकारू शकत नाही. ज्या संघटना आहेत त्या फक्त आमचीच स्व.बी.के.कोकरे साहेबांची संघटना असल्याचे लेबल लावून डंका पिटत आहेत त्याबद्दल माझे काही दुमत नाही पण समाजबांधवांच्या प्रश्नांचे निराकरण करताना त्याचे योग्य उत्तर देणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आज समाजप्रबोधनाच्या माध्यमातून स्व बी के कोकरे साहेबांच्या अविरत झंजावाताची विचारधारा हीच "महाराष्ट्राची विचारधारा" धनगर समाजातील लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या नसानसात आणि डोक्यात पेरण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. स्व.बी.के. कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार मा.विवेक कोकरे यांच्या नेतृत्वाखाली स्व बी के कोकरे साहेबांची विचारधारा समाजात पेरून "यशवंत युवा सेना" महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून अखंड धनगर समाजाला जागृत करुन वैचारिक, आर्थिक, समाजिक, शैक्षणिक राजकीय दृष्ट्या सक्षम आणि बलशाली करण्यासाठी प्राणपणाने सत्कार्य करीन हीच भंडारा उधळून शपथ घेतो आज त्यांचा १३ वा स्मृतिदिन त्यानिमित्ताने माझे आदर्श धनगर समाजाचं दैवत क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेब यांना विनम्र अभिवादन करतो.
     आम्हा तरूनांच्या हातात क्रांतीची मशाल देणाऱ्या रणमर्दास माझा मानाचा आणि विनम्र जय मल्हार कोटी कोटी प्रणाम. क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब तुमच्यावर ज्यांनी ज्यांनी अन्याय केला त्यांना धडा शिकवल्याशिवाय तुमचे स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही ही पिवळ्या भंडाऱ्याची शपथ घेतो. तुमची विचारधारा समाजात पेरण्यासाठी आजही आम्ही कटीबद्द आहोत हीच माझ्यासारख्या तुमच्याच विचारधारेतून पेटून उठलेल्या चिनगारी कडून १३ व्या स्मृतीदिनानिमीत्त भावपूर्ण आदरांजली.
💐💐💐💐💐💐💐
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंत!
      ✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
Email:- nitsanuse123@gmail.com

nitinrajeanuse123.blogspot.com