Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Monday 28 November 2016

एवढे षंढ कसे काय बनलात???


   हा प्रश्न जास्तच जिव्हारी लागणारा आहे हे मला माहीत आहेच... कदाचित काहीजणांना हे पचनी पडणार सुद्धा नाही... काही जणांना हा प्रश्न रुतेल तर कोणी या प्रश्नामुळे खुतेल... पण हा प्रश्न मला एकट्यालाच पडतोय असेही काही नाही. कदाचित तुमच्या आमच्या पैकी स्वाभिमानानं जगणाऱ्यांना नक्कीच हा प्रश्न पडत असावा असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचे कारणही तसेच आहे ते म्हणजे धनगर समाजाच्या दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाची पानं चाळायला जर सुरवात केली तर अक्षरशा अंगावर शहारे येतात, रक्त सळसळू लागतं, नसा (धमन्या) सैरावैरा पळत रक्ताचा पुरवठा संपुर्ण शरीरभर करतात, अहो आहेच आमुचा धनगरांचा गौरवशाली इतिहास असा.... आणि हाच सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास वाचताना जणू काय रणांगणावरती दोन्ही हातात तलवारी घेऊन शत्रुशी झुंज देत असल्याचे वाचक स्वताला समजत असतो, स्वःताच त्या इतिहासातील नायक समजून वाचनाची लढाई लढत असतो. छातीची ढाल करून आणि मनगटाची तलवार करून शत्रुंच्या चारी मुंड्या चित करणाऱ्या थोर महापुरूषांच्या जातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी आहोत असे समजल्यावर, इतिहास वाचल्यावर अभिमानाने छाती भरून येते तेव्हाच खरंतर आमच्यातला स्वाभिमान जागा होतो. पण आजपर्यंत हा आमुचा गौरवशाली इतिहास आम्हापासून लपवून ठेवला, तर काहीजणांनी तो विकृत आणि चुकीचा लिहला त्याचे कारण असे की धनगर समाजाचा जाणूनबुजून विकृत आणि चुकीचा इतिहास लिहणारे इतिहासकारच खरोखर चुकीचेच जन्माला आले होते. असे म्हंटले तरी मला काही वावगे वाटणार नाही.
आज आमचा सत्य आणि रक्तरंजित इतिहास वाचल्यावर, ऐकल्यावर आणि समजल्यावर एकेकाळी राजा समाजात जन्माला आल्याचा अभिमान आम्हाला वाटतो पण दुसरीकडे आताची सद्य परिस्थिती पाहिली तर खरोखरच स्वतालाच त्याची लाज वाटते असे का बरं??? त्याचे कारण असे की आमच्याच काही लोकांनी स्वताचा स्वाभिमान दुसऱ्यांच्या पायाखाली गहाण टाकल्याने धनगर समाजावर ही वेळ आली आहे. स्वाभिमान काय असतो हेच कळले नसल्याने आजपर्यंत धनगर समाजातील नेत्यांनी प्रस्थापित मस्तवाल नेत्यांची चमचेगीरी केली समाजाची दलाली करून समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम हे स्वार्थाने बरबटलेल्यांनी केले कदाचित त्यांना आपल्या ज्वलंत इतिहासाची जाण नसावी. प्रस्तापित नेत्यांची चाकरी करून गुलामी करून फक्त ग्रामपंचायती सोसायट्या आणि पंचायत समिती व जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या पलिकडे मजल मारायची हिम्मत आजपर्यंत धनगर समाजात कधी कोणाची झालीच नाही फक्त बोटावरती मोजण्याइतपत आमदार सोडले तर.... अंगी हत्तीचे बळ असणाऱ्या, थोर महापुरूषांचा वारसा लाभलेल्या आणि करोडोच्या संख्येने असताना देखिल प्रस्तापितांनी टाकलेल्या तुकड्यांवर जगायची सवय लागलेली असल्याने आमच्या धनगर समाजात नेतृत्वाचा अभावच राहिला याची शोकांतिका वाटते. राजकारण समाजकारण हे आपलं काम नव्हे तर ते पवार पाटील देशमुख ठाकरेंनीच करावे ते आपले काम नव्हे असे म्हणत षंढ राहून थंड बसणाऱ्या औलादींना आमचा खरा इतिहासच कधी समजला नाही हे सर्वात मोठं दुर्दैव....
षंढ राहून थंड बसण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात बंड करून गुंड झालेले बरे असे समजून संघर्षातून मार्ग काढत राजकारण आणि समाजकारण करणारे आज अग्रेसर होत चालले आहेत हे नाकारून चालणार नाही आणि हे चित्र आज महाराष्ट्राच्या राजकारणातही दिसतंय पण एवढंच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत धनगर समाजाचं नेतृत्व असून चालणार नाही तर त्यासाठी समाजातलं बंडखोर नेतृत्वही उदयास यायला हवं पण ते धनगर समाजातील नेत्यांचे पाय ओढणारं नसावं...  त्यासाठी इतिहास सुद्धा तितकाच अभ्यासायला हवा. ज्याला भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते असा छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर लढणारा योद्धा, सर्व काही संपले असताना पुन्हा शून्यातून स्वताचं साम्राज उभा करत अजिंक्य मानल्या जाणाऱ्या कवायती आणि शिस्तबद्ध फौजेची इभ्रत वेशीवर टांगणारा, इंग्रज अधिकाऱ्यांना अक्षरशा गुढगे टेकायला भाग पाडणारा व इंग्रजांना १९ लढायांमद्ये धूळ चारून त्यांच्या सैन्यांना कापून काढणारा एकमेवाद्वितीय धुरंदर लढवय्या व छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वताचा राज्याभिषेक करवून घेणारा महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी वाफगाव ता.खेड जिल्हा पुणे येथे ३ डिसेंबर रोजी त्यांच्या २४१ व्या जयंती निमित्त उपस्थित राहून तेथिल माती कपाळाला लावाल तर तुम्हाला नेतृत्वासाठी, राजकारणासाठी कुठल्या प्रस्तापित मस्तावलेल्या नेत्यांकडे भिक मागायची वेळ येणार नाही. एवढी ताकत त्या वाफगाव च्या मातीत आहे. वाफगावची माती ही नेतृत्वासाठी प्रेरणा देणारी आहे स्फूर्ती देणारी आहे त्यातूनच नवचैतन्य निर्माण होते त्या प्रेरणाभूमित गेल्यावर रक्त सळसळू लागतं म्हणून शनिवार दि.३ डिंसेबर २०१६ रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंती महोत्सवात सहभागी व्हावे अन्यथा महाराजा यशवंतराव होळकरांचे सळसळते रक्त नसानसात वाहत असतानाही एवढे षंढ कसे काय बनला आहात?? असा आरोप करायला मला काही गैर वाटणार नाही.
काहीजणांना वाटेल की मी जातीयवाद करतोय पण हा जातीयवाद नाही तर पुर्वीपासूनच आणि जन्मापासून शुर, धाडसी असलेला धनगर समाज हा पेटतां निखारा आहे पण सनातन्यांनी व प्रस्तापितांनी आपापले विचार बिंबवल्याने या समाजाच्या पेटत्या निखाऱ्यावरती जी राख जमा झाली आहे ती राख बाजूला करण्याचा प्रयत्न या समाजप्रबोधनाच्या माद्यमातून चालू आहे आणि मी माझ्या समाजाला जागृत केले म्हणजे जातीयवाद केला असे नव्हे. ज्यादिवशी जातीयवाद करेल त्यादिवशी "तुम्ही जातीयवाद करताय" असा आरोप करणारी डोकी शिल्लक ठेवणार नाही हे लक्षात ठेवा.
तर मग आता ठरलं ना संघटना कोणती आहे?? आयोजक कोण आहे?? प्रमुख पाहुणे कोण आहेत?? हे पाहत बसण्यापेक्षा "बहुजन प्रतिपालक आद्यस्वातंत्र्यसेनानी महाराजाधिराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या २४१ व्या जयंतीला जन्मभूमी वाफगाव ता.खेड जि.पुणे येथे सर्वांनी मिळून जाऊद्या व त्या प्रेरणाभुमीतील स्फूर्ती देणारी माती कपाळी लावुया.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday 22 November 2016

३ डिंसेबरला वाफगाव येथे भव्य जयंती महोत्सव


भारताच्या रक्तरंजित इतिहासातील एकमेव अद्वितीय महायोद्धा ज्याला भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते असा रणझुंजार लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४१ व्या जयंतीनिमीत्त "यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य"च्या वतीने दि.३ डिंसेबर २०१६ रोजी वाफगाव ता.खेड जि.पुणे येथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मभूमीत अर्थातच आमच्या प्रेरणाभूमीत भव्य जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, यशवंत युवा सेना कार्याद्यक्ष मा.विष्णू देशमुख साहेब, सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब तसेच अन्य यशवंत मावळे महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी वाफगाव येथे गेल्या दोन महिन्यापूर्वी जाऊन ठिकाणाची पाहणी करून आले होते व त्या अनुषंगाने जयंती महोत्सव साजरा करणार असल्याचे निवेदन सुद्धा देऊन आले होते. दि.१३ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबई येथे धनगर समाजाच्या राज्यस्तरीय केडरकॅंप दरम्याण यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी जाहीरही केले होते की अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज फौजेचा धुव्वा उडवून त्यांची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकर यांची भव्य जयंती "यशवंत युवा सेनेच्या" वतीने महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी वाफगाव ता.खेड जि.पुणे येथे साजरी करणार असून सर्व समाजबांधवांनी तसेच यशवंत मावळ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखिल केले होते.
ज्यांनी सर्वप्रथम इंग्रजांचा धोका ओळखून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले एवढेच नव्हे तर त्या फिरंग्यांना अक्षरशा कापून काढले, कित्येक इंग्रज अधिकाऱ्यांनी ज्यांच्यासमोर गुडघे टेकवले, कधीही न हारता जवळ जवळ १९ लढाया जिंकून इंग्रजांचा पराभव केला असे एकमेवाद्वितीय महाराजा यशवंतराव होळकर इतिहासात आपली तलवार गाजवून गेले पण भारतीय इतिहासकारांच्या लेखणीला जणू गंज लागला होता की काय कोणास ठाऊक म्हणून त्यांनी  छत्रपती शिवरायानंतर स्वताचा राज्याभिषेक करवून घेणाऱ्या महाराजाधिराज यशवंतराव होळकरांचा इतिहास जाणूनबुजून लपवून ठेवला होता. आज हळूहळू धनगरांचा गौरवशाली आणि सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला रक्तरंजित इतिहास समाजासमोर येतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. त्या अनुषंगानेच शनिवार दि.३ डिंसेबर रोजी वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर यांचा भव्य जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी तमाम यशवंत मावळ्यांची नस असलेल्या यशवंत युवा सेनेच्या वतीने आयोजन करण्यात आले असून राजकारणाच्या चपला दूर ठेवून सर्व पक्षभेद, मतभेद, मनभेद व संघटना भेद विसरून सर्व नेत्यांनी, समाजबांधवांनी, यशवंत मावळ्यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मभूमीत (वाफगाव) अर्थातच प्रेरणाभूमीत उपस्थित राहून या इतिहासाचे साक्षीदार व्हावे.
ठिकाण:- वाफगाव ता.खेड जि.पुणे
दि.:- ३ डिंसेबर २०१६
वार :- शनिवार
वेळ :-
स.०८:०० वा.शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी
स.१०:०० वा. मुख्य जयंती महोत्सव
आयोजक :-
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य

पिढ्यानपिढ्या जरी गेल्या आमच्या मेंढराच्या पाठी ।।
सळसळत्या रक्ताच्या अजून तरी बनल्या नाहीत गाठी ।।
अन्याय करणाऱ्या औलादींच्या आता नका लागू पाठी ।।
कारण महाराजा यशवंतराव होळकरांचे मर्दमावळे,
पुन्हा आवळतोय आम्ही तळपत्या तलवारीच्या मुठी ।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏