Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday 23 April 2015

पुन्हा एक नवी दिशा...

⚡👉पुन्हा एक नवी दिशा...✨
अज्ञानाच्या खाईत लोटलेल्या आणि अंधकाराने ग्रासलेल्या माझ्या धनगर समाजाला खरंच एका नव्या दिशेची गरज आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या धनगर समाजाचं भट-ब्राह्मणांनी पार कंबरडंच मोडून ठेवलंय. भाकित सांगून आणि थापा मारुन भोळ्या भाबड्या धनगर समाजाला देवाधिकाच्या नादी लावायचं अन प्रशासनातील सर्व पदे काबूत ठेवायची हा त्या पाठीमागचा गणिमी कावा आज माझ्या धनगर समाजानं वेळीचं ओळखायला हवा.
५००० वर्षापूर्वी ज्या धनगर समाजानं अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरे आज धनगर समाजापासून शेकडो मैल दूर आहेत असं का?? का ही अक्षरं आमच्यापर्यंत पोहचू शकली नाहीत?? ब्राह्मण शिक्षित झाले पण अक्षरांचा शोध लावणारे अडाणी कसे काय राहिले याचा विचार तमाम धनगर बांधवांनी करायला हवा.
भर उन्हाळ्यात दिवसभर आग ओकणार्या सुर्याची किरणे झेलत, अंगाची काहिली होत असताना तप्त उन्हात दगडधोंडे अन काटेकुटे तुडवत शेळ्या मेंढ्या राखणार्या आई-वडिलांची अवस्था काय होते याचा विचार माझ्या धनगर समाजातील विद्यार्थी बांधवांनी  कधी केला का? पावसाळ्यामध्ये कधी कधी अवकाळी पावसाचा फटका तर गारांचा सपाटा सहन करावा लागतो. भर हिवाळ्यातील कडक थंडीमध्ये सुद्धा मेंढ्यांची राखण करावीच लागते.  इयत्ता सातवी नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लगातार दोन महिने मी शेळ्या-मेंढ्याकडेच होतो मग आज या गावी तर उद्या त्या गावी असा रोजचा प्रवास मी स्वतः अनुभवलाय. त्यामुळे उन्हाळा असो पावसाळा अथवा हिवाळा असो तिन्ही ऋतु मध्ये भयंकर ऊन, धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस तसेच अंगाचा थरकाप उडवणारी कडक थंडी यांचा विचार न करता मेंढ्यामागे उभे ठाकायचे हे जणू काय धनगर समाजाच्या पाचवीलाच पुजलेलं, शिवाय इतरांसारखी कोणतीही साप्ताहिक अथवा मासिक सुट्टी माझ्या धनगर समाजातील आई-वडिलांना अनुभवता येत नाही त्यामुळेच शाळा असोत अथवा सरकारी कार्यालये यांपासून दूर राहिलेल्या धनगर समाजाला अंधकारातून प्रकाशात यायला तसा खूप उशीर झाला.
आजचे विद्यार्थी अथवा पालक सहज बोलून जातात की शिक्षण घेवून अन् पदव्या हासिल करून काय फायदा?? नोकरीच मिळत नाही. पण त्या सर्वांना माझे एकच सांगणे आहे की बांधवांनो तुम्ही शिक्षण घेताना कधी तुमच्या आई-वडिलांच्या भावनांचा विचार केला होता का???  दिवसभर पायाच्या नडग्या दुखेपर्यंत शेळ्या-मेंढ्यांमागे उभे ठाकलेल्या आणि दुसर्यांच्या शेतात दिवसभर राबराब राबून घाम गाळून ५-५० रु कमविण्यासाठी अपार कष्ट करणार्या आपल्या आई-वडिलांच्या भावना काय असतील याचा विचार कधी केला का?? दिवसभर कष्ट करून थकून भागून घरी परतणार्या आई-वडिलांचा चेहरा अगदी सुकून जातो पण शाळेतून आपला मुलगा/मुलगी घरी आलेत की नाही याचा विचार करत ते झपाझप पावलं टाकत घरी येतात, शाळेतून आल्यानंतर घरासमोर अंगणात खेळत असलेल्या आपल्या मुलाला/मुलीला समोर पाहून त्या सुकलेल्या चेहर्यामध्ये एक विलक्षण आनंद दिसून येतो त्यांच्या ओठांवरती एक हलकसं स्मित हास्य उमटून दिसते, पण त्यांच्या त्या हास्यामध्ये भावना लपलेल्या असतात आणि त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा देखिल असतात याची जाणीव तुमच्या-माझ्या सारख्यांना असायला हवी. जर तुम्ही आम्ही त्यांच्या भावना समजू शकत नसू तर मग आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला अन् आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्या भावना आणि त्यांच्या  अपेक्षा ज्यांना पुर्ण करता येत नसतील तर स्वतःला त्याची लाज वाटायला हवी. आपल्या मुला/मुलीनं खूप शिकावं IAS/IPS/Engineer/Advocate/Doctor/BUSINESSMEN तसेच इतर उच्च पदावरती पोहचावं, स्वतःचं तसेच आई-वडिलांचं नाव रोषण करावं या त्यांच्या भावना असतात मग त्या भावना ज्यांना ज्यांना समजतात तेच यशस्वी होतात.
ज्यांना आई वडिलांच्या हाताला बसणार्या चटक्याची जाण असते त्याला समाजावरती होणार्या अन्यायाचं भान असतं हे नाकारता येत नाही.
 एकदा आजोळी गेल्यानंतर तेथील शेजारच्या आजीनं मला सांगितलेलं एक वाक्य आयुष्यभर माझ्या लक्षात राहील ते म्हणजे "आयबाप आडाणी हायत म्हणून मेंढरं राखत्याती. पोरांनो तुमी तर शिका खूप मोठं व्हा अन् आय-बा च्या पायातली कुरपं मुजवा नायतर तुमीपण मेंढरं राखत बसचाल" त्या आजीच्या वाक्यामुळं आज माझं जीवन बदलले आहे. माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही तर आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मला झाली होती कारण मी सुद्धा दोन महिने त्यांच्यासोबत गावोगावी फिरुन पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढ्या राखलेत तर कधी कधी मला एकट्यालाही दिवसभर मेंढ्यासोबत राहायचा योग आला होता कधी कोण्या शेतकर्यांच्या शिव्या तर कधी मार सुद्धा खावा लागायचा. मला ते अनुभवलेले दिवस नको होते म्हणून सरळ बोर्डिंग गाठलं होतं. धनगर समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ही उणीव नाही भासली पाहिजे, आई-वडिलांच्या कष्टाची प्रत्येकाला जाण असेल तर उद्या भविष्यात धनगर समाजाची पोरं IAS/IPS/Doctor/Engineer/Advocate/Businessman या क्षेत्रात चमकतील हे सांगायला कोणाची गरज पडणार नाही आणि ही एक दगडावरची रेषा आहे.
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday 16 April 2015

समाजामध्ये परिवर्तन पाहिजे की परावर्तन??
यावरती थोडंपार करावे लागेल चिंतन....
आज धनगर समाज खरंच जागा आहे का??
भरकटलेल्या धनगर समाजाला जागं करण्यासाठी काही इतिहासकार, लेखक, विचारवंत तसेच शिक्षित यूवा वर्ग आज जोमाने आणि आक्रमकपणे समाजकार्य करताना दिसून येतोय पण धनगर समाजात लेखकांची आणि अभ्यासकांची संख्या खूप कमी आहे. असे असताना इतर समाजबांधव फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत असंच आजपर्यंत मला जाणवत आले आहे.
समाजासाठी तळमळीने आणि सडेतोडपणे सत्यावरती प्रकाश टाकणारे अनेक लेख लिहून समाजापर्यंत पोहचवण्याचं काम लेखक आणि विचारवंत पोडतिडकीने करत असताना समाजातून त्यांना म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. उलट सत्य समाजासमोर मांडले तर  त्यांना धमक्या आणि शिवीगाळ सुद्धा केली जाते. मग असा समाज खरंच जागा होउ शकतो का?? हा प्रश्न माझ्या मनात घोळत आहे.
धनगर समाजाचे काही अभ्यासक ,लेखक, विचारवंत तसेच शिक्षित युवा वर्ग आज आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि समर्थ आहेत, समाज जागृति करुन त्यांना काही स्वार्थ साधायचा नाही तर त्यांचा हेतू एकच आहे की गाढ निद्रावस्थेत झोपलेल्या माझ्या धनगर समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे आपल्या सोबत घेवून चालायचं आणि अंधश्रद्धेतून मुक्त करून सक्षम, समर्थ तसेच शक्तिशाली धनगर समाज बनवून समाजाची ओळख अख्ख्या भारतभुमिला करुन द्यायची. पण अंधकारातून बाहेर न पडणारा आणि अंधश्रद्धेतून मुक्त न होऊ पाहणारा समाज बदल घडवू शकतो असं मला यथकांचीतही वाटत नाही.
धनगर समाजातील अभ्यासक, विचारवंत, लेखक, कवि तसेच शिक्षित युवा वर्ग आपापल्या परीने समाज जागृति करत असताना त्यांस अडथळा आणायचे काम काही विकृत मंडळी करत आहेत, एखादा लेख अथवा कविता जर लिहून पाठवल्या तर ठराविक समाजबांधव प्रतिसाद देतात पण इतर मात्र खूप शहाणा आहेस का?? इतिहासकार आहेस का?? स्वतःला अभ्यासक समजता का?? तुम्ही काय चाणक्य आहात का?? असे कमेंट करत बसतात. मला सुद्धा काहीजण म्हणाले की तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरुन कार्य करत आहात आणि स्वतःची प्रसिद्धि करून घेत आहात. पण त्यांना मी सांगू इच्छितो की बाबांनो आम्हाला समाजाची जाण आहे आमच्यावरती होणार्या अन्यायाचं भान आहे, म्हणून आम्ही पाठीमागे राहिलेल्या समाजाला सोबत घेवून निघालोय...
जर धनगर समाज एकत्रित येवून लढू लागला तरच आपल्याला आपल्या हक्काचं ST चं आरक्षण मिळेल, आरक्षणा व्यतिरीक्त शिष्यवृत्तीची देखिल गंभीर समस्या आज विद्यार्थी बांधवांना सतावतेय. आपल्याला आरक्षण आणि शिष्यवृत्ती या समस्या जर solve झाल्या तर प्रशासनामध्ये धनगर समाजाची पोरं चमकतील. याशिवाय अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहत आहेत. आज आमच्यासारखे लेखक समाजामध्ये जागृति करत असताना आम्हास धमक्या आणि शिवीगाळ यांसारख्या गोष्टीचा त्रास होणं स्वाभाविकच आहे. कारण अमेरिका सारख्या Well developed country मध्ये अब्राहम लिंकन यांनी गुलामगीरी प्रथेला विरोध केला तर तेथील उच्चस्तरीय लोकांनी त्यांची हत्या केली,  भारतातील राजाराम मोहन रॉय यांनी विधवेशी लग्न करुन समाजासमोर आदर्श ठेवला  तेव्हा काही समाजकंटकांचा त्रास त्यांना सहन करावा लागला होता. संत तुकोबांची देखिल हत्या करण्यात आली होती, मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करणारे आणि अस्पृष्यता हटवणारे राष्ट्रपिता महात्मा फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांनाही उच्चवर्णियांकडून त्रास सहन करावा लागला एवढेच नव्हे तर महात्मा फुलेंना मारेकरी धाडले होते हे सुद्धा तितकंच सत्य आहे, बी के कोकरे साहेबांची देखिल हत्या करण्यात आली. अशी अनेक उदाहरणे देता येतील..
ज्या ज्या लोकांनी सत्य मांडायचा आणि संघर्ष करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना विरोध झाला आणि आजही होत आहे.
आज जे लेखक विचारवंत आणि शिक्षित यूवा वर्ग समाजासाठी झटत असताना त्यांना नातेवाईकांकडेही लक्ष देता येत नाही नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच घरातील सदस्यांना वेळ देता येत नाही, मित्रपरिवारांपासून थोडंसं दूर झाल्यासारखं वाटतय पण डोळ्यासमोर समाजाची झालेली  दशा दिसत असताना समाजाला दिशा देणं गरजेचं आहे. आम्ही काय कोणावरती उपकार करत नाही पण एक सामाजिक बांधीलकी जोपासून निस्वार्थपणे समाजासाठी झटतोय आणि झगडतोय तरच आपल्या पुढच्या शंभर पिढ्या कोणाकडेही गहाण न पडता स्वाभिमानांनं जगतील, मग याची जाणीव प्रत्येक समाजबांधवांना का होत नाही???
कोल्ह्या कुत्र्यांचं जीवन जगायचंय की जागृत होऊन पुन्हा राजेशाही थाटात वावरायचंय??? याचा निर्णय जेमतेम आजच्या सुशिक्षित युवा वर्गानं तरी घ्यायला हवा.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Sunday 12 April 2015

सत्य नेहमी कडूच असतं...
आज खरं सांगायला गेलो तर लोकांना बरं वाटत नाही अन् बरं सांगायला गेलो तर खरं वाटत नाही. मग खरंबरं करत कुरबुर व्हायला सुरवात होते. अर्थातच सत्य हमेशा परेशान होता है/करता है। असंच सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यापासून धनगर समाजावर सतत अन्यायाचीच कुर्हाड कोसळत आली होती आणि आजही तोच प्रकार आहे. स्व बी के कोकरे साहेबांनी ती अन्यायाची कुर्हाड सावरायचा प्रयत्न करुन बारामतीतून धनगर समाजाला "यशवंत सेना" या संघटनेखाली एकत्रित आणले, पण शरद पवारांच्या मनात पाल चुकचुकली की जर धनगर समाज बी के कोकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाला तर मग भविष्यात आपल्याला राजकारण करता येणार नाही. बी के कोकरे साहेबांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने पवारांनी काट्यानं काटा काढायचा हा डाव आखला आणि आर्थिक बाबतीने समृद्ध असलेल्या  धनगर समाजातीलच स्व.शेंडगे बापूंना जवळ केले. ही सत्य परिस्थिति समाजासमोर मांडली म्हणजे आम्ही काही गुन्हा केला का?? कारण त्यावेळची अशी परिस्थिति पुन्हा उद्भवू नये हा त्या पाठीमागचा उद्देश्य आहे.
आज जे धनगर नाहीयेत असे लोक मला आर्वाच्च भाषा वापरून शिवीगाळ करताहेत त्या भामट्यांना छाती ठोकपणे सांगतो की बाबांनो ज्यांनी धनगर समाजाची दिशाभुल करून समाजाचं वाटोळं केल त्याबद्दल मी माझं मत मांडलं होतं आणि आपली बाजू स्वतंत्रपणे मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार देखिल आहे. जर तुमची बाजू स्ट्रॉन्ग असेल तर तुमचं मत तुम्ही मांडू शकता. आर्वाच्च भाषा वापरून आणि घाणेरड्या शिव्या देवून तुम्ही तुमच्यावरती झालेले आई-वडिलांचे संस्कार इतरांना दाखवून देताय हे विसरु नका. मग माझी लायकी काढण्यागोदर तुम्ही स्वतःची लायकी तपासून पहा.
तुम्ही फोन करून सांगताय की आमच्या नेत्यावर टीका करु नका, चांगली गोष्ट आहे. धनगर समाजाच्या कोणत्याही नेत्यावर मी टीका करणार नाही पण जर माझ्या धनगर समाजाचं नाव घेवून जर कोणी बारामतीच्या बोक्याचं तळवे चाटत असेल तर त्याला समाजासमोर उघडा नागडा केल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या धनगर समाजावरती काय अन्याय होतोय ते पहायचं असेल तर धनगर समाजात जन्माला या.
मी कोणत्या पक्षाचा समर्थक नाही, कोणत्याही संघटनेचा सभासद देखिल नाही अन् कोणत्या नेत्याचा दलालही नाही. कोणत्या नेत्याकडून मी चहाची देखिल अपेक्षा करत नाही पण जे बाजारबुणगे धनगर समाजाची चमचेगीरी करुन धनगर समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम करताहेत त्या त्या नेत्यांनी एकतर आपले विचार बदलावेत नाहीतर राजकीय सन्यास घ्यावा कारण माझ्या धनगर समाजाचं नाव घ्यायचा देखिल अधिकार त्यांना नाही.
मला फोन करून अथवा मेसेज पाठवून धमक्या द्यायचं बंद करा. असल्या फालतु आणि पोकळ धमक्यांना मी कधी घाबरत नाही. आणि असल्या धमक्यांना घाबरून मी माझं समाजकार्य सोडणार नाही. मी एखादा निर्णय घेत असेल तर मागचा-पुढचा विचार करूनच निर्णय घेतो. त्यानंतर मग आर या पार पुढे काय प्रसंग उद्भवतील याचीही मला जाणीव आहे आणि त्यावरती उपाय सुद्धा आहेत. असे निर्भीडपणे आपले मत मांडायला हिम्मत तर लागतेच पण तेवढी धमक देखिल असायला हवी. एखाद्या पालतू कुत्र्यानं सांगाव की आमुक-आमक्या नेत्यावर टीका करु नका, बाकी कोणावरही कर. पण जर डोळ्यादेखत माझ्या समाजाचं बाजारीकरण आणि वाटोळं होत असेल तर मुग गिळून गप्प बसायला मी काय गांडूची औलाद नाही हे तुम्ही विसरु नका. समाजाला योग्य दिशा द्यायचं काम माझ्यासारखेच भरपूर विचारवंत करताहेत आणि त्यांना सुद्धा अशा गोष्टींचा सामना करावा लागतोय. आज समाजामध्ये जागृति झाली आहे त्यामुळे दलालांना समाज चांगलाच ओळखून आहे. माझ्या विचारामुळे  याचे काय परिणाम होतील हे तुम्ही मला सांगत बसू नका कारण लहानपणापासूनच मी परिणाम झेलत आलोय त्यामुळे परिणामाची भाषा मला शिकवू नका. तुमची असभ्य भाषा ऐकुण देखिल मी सभ्यपणे तुमच्याशी संवाद साधत असेल तर त्याचवेळी तुम्हाला अक्कल यायला हवी होती तरीपण तुम्ही जर शिव्या देवून मला धमक्या देत असाल तर मग माझा सळसळत्या रक्ताचा अन् अहिल्येच्या भक्ताचा धनगरी हिसका दाखवायला मला क्षणाचाही वेळ लागणार नाही.
सर्व गोष्टीचा अंत म्हणून धनगर शांत आहे. तर तुम्ही आमचा अंत बघू नका नाहीतर....याद राखा...
खबरदार....!!!
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

Monday 6 April 2015

धनगर समाजाचं बाजारीकरण होतंय हे कीतीजरी ओरडून ओरडून सांगितलं तर बेजबाबदार असलेल्या माझ्या धनगर समाजाला याचं काहीच वाटत नाही. मी आमुक-आमक्याच्या गटाचा तर तु तमुक-तमक्याच्या गटाचा असं विभाजन झालंयअन् एकमेकांच्या विरोधात लढायलाही तयार झालोय. अरे एकाच रक्ताच्या अन् एकाच जातीत जन्माला आलेल्या औलादी आपण आज गट-तट करत बसलोय. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या भावा-भावाचं पटत नाही, भाव-भावकी अन् गावागावात देखिल असंच चाल्लय जणू काय जन्मापासूनच एकमेकांचे कट्टर दुश्मनच आहोत.
कधीतरी आत्मचिंतन करा मनन करा, भावभावकीत अन् गावकीत चर्चा करा ती पण स्वतःच्या विचारानंच करायला हवी. कोणत्या भामट्या प्रस्थापितांच्या विचारातून अथवा माजलेल्या प्रस्थापित नेत्यांच्या सांगण्यावरून नको.
जरा आपल्या थोर महापुरुषांचा इतिहास आठवा, कुठं ती राजेशाही अन् कुठं तुम्ही जगताय ती तुमची गुलामगीरी. लाज वाटायला पाहिजे तुम्हा-आम्हाला अरे एकेकाळी राजा समाज असणारी आपली औलाद आज प्रस्थापित घराणेशाहींच्या गुलामगीरीत वावरतेय, राजेशाहीच्या थाटामध्ये जगणारे आपण दुश्मनांच्या छाताडावर थय्याथय्या नाचणारे आपण मर्द रांगडं गडी आज प्रस्थापितांची गुलामगीरी अन् चमचेगीरी करत बसलो आहोत. अरे आज तुम्हाला जर आपल्या पुर्वजांसारखं  राजेशाही थाटात जगता येत नसेल तर त्यापेक्षा मेल्यालं बरं हे बोललो तर मला वावगं ठरणार नाही. अखंड भारत एका छत्रीखाली आणणारे राजा सम्राट अशोक, अटकेपार झेंडे फडकवणारे राजे मल्हारराव होळकर, २८ वर्षे दिल्लीच्या तख्तावर बसून हिंदुस्तानच्या विशाल भूभागावर राज्य करणारी रणरागीणी राजमाता अहिल्यामाई होळकर, इंग्रजांच्या विरोधात लढताना  न हारता १८ लढाया जिंकलेले व कोणत्याही दुश्मनावर चाल करत कधीही पराभव न पत्करता लढलेले महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर, वीरांगना ताराबाई होळकर व वीरांगना भिमाई होळकर, अशा या धनगर समाजातील महापुरूषांचा इतिहास सुवर्णाक्षरात कोरुन ठेवलेला असताना त्याच राजा समाजात जन्माला आलेल्या तुम्ही-आम्ही औलादी कोणतं जगणं जगतोय याचीच लाज वाटतेय आम्हाला.
"अरे झुकल्या गेल्या होत्या माना माझ्या धनगर जातीतील राजांच्या दरबारी, पण कोणापुढंही न झुकणारी ही माझी औलाद धनगरी"
 मग प्रस्थापित पवार पाटील देशमुख ठाकरेंच्या चपला उचलणार्यांनो तुम्हाला माझ्या धनगर समाजाचं नाव घ्यायचा देखिल अधिकार राहनार नाही. कारण दुसर्यांपुढे झुकणारे माझ्या धनगर समाजात जन्माला येत नाहीत त्यांनी त्यांची जात तपासून घ्यावी.
माझ्या धनगर समाजाला उल्लू बनवायचं तुम्ही सोडून द्या, माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला फसवून प्रस्थापितांच्या दावणीला बांधायचं तुम्ही सोडून द्या. आजपर्यंत धनगर समाजाच्या नावावरती तुम्ही तुमची घरं भरलीत, तुम्ही माझ्या धनगर समाजाचं काहीच भलं केलं नाही उलट तुमचा स्वार्थ तुम्ही साधला आहात. माझ्या बोलण्याचा कदाचित तुम्हाला राग येत असेल तर मग शहाणे व्हा अन् प्रस्थापितांची गुलामगीरी  चमचेगीरी, चाकरी करायचं सोडून पिवळ्या झेंड्याखाली एकत्रित  या.
 आज तुम्ही-आम्ही जर एकत्रित येवून जर लढू लागलो तर या जगातील कोणतीही शक्ति तुम्हाला आडवी येणार नाही, तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही, जर ठरवलं आणि एकजुटीनं लढलो तर आपले हक्क आपल्याला मिळतीलच पण या देशावरती पुन्हा एकदा धनगर समाज राज्य करेल अन् माझ्या राजा सम्राट अशोकाचं स्वप्न साकार होईल. त्यासाठी एकत्रित या नाहीतर तुम्हाला भंडार्राची शपथ इथून पुढं माझ्या धनगर समाजाचं नाव जरी घेतलं तर खबरदार.... आणि याद राखा....
तलवारी हातात घ्यायची वेळ आमच्यावर येवू देवू नका...
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
  nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com