Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Sunday 25 February 2018

पै.कृष्णा रासकर क्रिडारत्न पुरस्काराने सन्मानित

खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते राज्यस्तरीय क्रिडारत्न पुरस्कार स्विकारताना  पै कृष्णा (आप्पा) रासकर

               कडेगाव तालुक्यांतील पैलवानकी क्षेत्रात धनगर समाजातील रासकर कुटूंब हे एक नावाजलेले प्रसिद्ध असलेले कुटूंब आणि या कुटुंबाला स्व.पै.खाशाबा रासकर यांच्याकडून लाभलेला पैलवानकीचा वारसा आणि याच जोरावर सिनेसृष्टीला देखिल भुरळ पाडणारा आंतरराष्ट्रीय खिलाडी कुस्तिपट्टू अर्थातच कुस्त्यांमधला जादूगार म्हणून ज्यांना ओळखले जाते असे पै.कृष्णा रासकर उर्फ आप्पा आणि पै.धनाजी रासकर यांचा पुतण्या स्व.पै.खाशाबा रासकर यांचे नातू धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते पै.संदीप रासकर यांना कडेगाव मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने यशस्वी उद्योजक या पुरस्काराने दि.२४ सप्टेंबर २०१७ रोजी सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय पै.कृष्णा (आप्पा) रासकर यांचे सुपूत्र देखिल पै.वैभव रासकर हे कुमार महाराष्ट्र केसरी तसेच मुंबई कामगार केसरी चे मानकरी ठरले आहेत.
           आंतरराष्ट्रीय कुस्तिपट्टू ज्यांना कुस्त्यांचा जादूगार म्हणून ओळखले जाते असे पै. कृष्णा रासकर उर्फ आमचे लाडके रासकर आप्पा यांना आज दि.२५ फेब्रुवारी २०१८ रोजी हुतात्मा अपंग बहुद्देशिय विकास कल्याणकारी संस्था कराड आयोजित कराड येथे तृतीय राज्यस्तरीय हुतात्मा गौरव पुरस्कार २०१८या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यस्तरीय क्रिडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पै. कृष्णा (आप्पा) रासकर हे भारतीय सैन्यदलातील माजी नौसैनिक आहेत. नौदलात कार्यरत असताना पै. कृष्णा रासकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर कुस्त्यांच्या स्पर्धांमध्ये एकुण सुवर्ण पदक, रौप्य पदक कांस्य पदक मिळवली आहेत. एवढेच नव्हे तर सोलापूर येथील मिनीअलौंपिक स्पर्धा, बिहार मधील हिंद केसरी स्पर्धा तसेच दिल्ली येथिल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजवली असून एका वर्षात त्यांनी सुवर्ण पदक, रौप्य कांस्य पदक मिळवली आहेत. रासकर आप्पा यांना पैलवानकीचा वारसा लाभला असून आज त्यांचे बंधू पै.धनंजय रासकर हे देखिल भारतीय नौसेना मध्ये राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पट्टीचे कुस्तीपट्टू आहेत. अशा प्रकारे रासकर कुटुंबाने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे नाव उज्वल केले आहे त्यामुळे त्या परिवारातील सदस्य पै.कृष्णा (आप्पा) रासकर यांना लोकप्रिय खासदार मा.राजू शेट्टी याच्या हस्ते राज्यस्तरीय क्रिडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल आमचे लाडके आप्पा आदरणीय पै.कृष्णा रासकर यांना क्रिडारत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हर्दिक हर्दिक शुभेच्छा।।
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

nitinrajeanuse123.blogspot.com

Tuesday 20 February 2018

वाचक अभिप्राय ; धनगरांनो जागे व्हा... लेखक - अविनाश धायगुडे

धनगरांनो जागे व्हा... लेखक- अविनाश धायगुडे

वाचक अभिप्राय
पुस्तकाचे नाव :- धनगरांनो जागे व्हा
लेखकाचे नाव :- अविनाश धायगुडे (युवा व्याख्याते)
समाजप्रबोधनाच्या माध्यमातून कडीला कडी जोडत जावी त्याची पुढे साखळी व्हावी असेच समाजप्रबोधनाच्या साखळीशी जोडले गेलेले आमचे सहकारी, बंधुतुल्य प्रिय मित्र तथा युवा व्याख्याते लेखक मा. अविनाश धायगुडे आपणांस मानाचा 
जय मल्हार॥
रविवार दि. ०५ फेब्रुवारी २०१७ रोजी विद्येचे माहेरघर पुणे येथे स्वारगेट जवळील राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या स्मारकाजवळ आपली सर्वप्रथमता भेट झाली. त्यानंतर जहागीरदार अमरजितराजे बारगळ (दादा) यांच्या घरी भेटीसाठी तुम्ही तुमचे मित्र, यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब मी असे आपण सर्वजण एकत्रित आलो असता तुम्ही लिहलेलेधनगरांनो जागे व्हा...” हे पुस्तक तुम्ही मला आदराने, आत्मीयतेने भेट दिले. खरंतर त्याच रात्री मीधनगरांनो जागे व्हा...” हे पुस्तक वाचून हातावेगळे केले होते. प्रतिक्रियांच्या स्वरूपातील अभिप्राय लेखन देखिल मी तेव्हाच केले होते परंतू वेळे अभावी आणि काही तांत्रिक अडचणींमुळे मी तुम्हाला प्रतिक्रियांच्या स्वरुपात अभिप्राय पाठवू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व....
      धनगरांनो जागे व्हा... या आशयावरून मी एकटाच नव्हे तर अखंड धनगर समाजातील प्रत्येक वाचक हा समाजप्रबोधनाच्या निष्कर्षापर्यंत पोहचतो आणि त्याच वेगाने त्याच उत्साहाने पुस्ताकाचे स्वागत करून मनमुरादपणे वाचनाचा आनंद घेऊ लागतो. हल्ली समाजमन हे भरकटलेले असून निद्रावस्थेत असलेल्या समाजाला जागे करण्यासाठी आदरणीय होमेश भुजाडे सर यांच्याधनगरांची दशा आणि दिशाया समाजप्रबोधनपर पुस्तकापाठोपाठधनगरांनो जागे व्हा...” या तुमच्या पुस्ताकातून धनगर समाजाला जागे करण्याचा तुम्ही जो प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला एक सर्वसामान्य वाचक या नात्याने खरंतर सलाम करतो. प्रस्तुत समाजप्रबोधनपर पुस्तकात धनगर समाजाला जागे करण्यासाठी तुम्ही सरळ इतिहसामध्ये हात घालून समाजमनाची पाळं-मुळं हलवली आणि समाजाची जी दयनीय अवस्था झाली आहे त्या दयनीय अवस्थेचा अभ्यास करून त्यावरती ज्या काही उपाययोजना करता येतील याचा शोध घेऊन तुम्ही लिखान केले आणि भरकटलेल्या समाजमनाला तुम्ही एकप्रकारे पुस्तकाच्या आशयाला शोभेल असे समाजाला जागे करण्याचे फार मोठे कार्य केले आहे. इतिहासाचे दाखले देत कर्तृत्ववान अशा राष्ट्रमाता अहिल्याई होळकर तसेच विरांगना भिमाई होळकर तसेच वीर शहीद शिंग्रोबा धनगर यांच्या अलौकिक इतिहासाची तुम्ही जाणीव करून दिल्याने समाजमनामध्ये अज्ञानाची जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी तुम्ही भरून काढली आणि समाजाला प्रबोधनातून जागृतीकडे खेचून आणले. खरंतर मेंढपाळाला धनगरांना मार्गदर्शक म्हणून संबोधले आहे परंतू त्याच धनगरांना जागे करावे लागते हे आपल्या समाजाचं दुर्दैव ओळखून समाजाने काय करायला हवे आणि काय नको याचे अचूक विवेचन केल्याने माझ्या सारखा वाचक प्रेमी तुमच्या या समाजप्रबोधनावर भाळला गेला.
       मी काही फार मोठा लेखक नाही व्याख्याता नाही अथवा विचारवंतदेखिल नाही पण जेव्हाधनगरांनो जागे व्हा...” हे समाजप्रबोधनपर पुस्तक वाचून हातावेगळे केले तेव्हा मला यामधून खूप काही शिकायला मिळाले. लहान वयात तुम्ही तुमच्या कुशाग्र बुद्धीचे दर्शन समाजाला घडवले आणि एका युवा व्याख्यात्याबरोबरच एका युवा लेखकाचा देखिल जन्म झाला. आज जरी मी तुमच्यापेक्षा वयोमानाने मोठा असलो तरीही मी स्वताला एक विद्यार्थी समजून जेवढे जास्त शिकायला मिळेल तेवढे शिकून घेत असतो. समाजबांधवांना देखिलधनगरांनो जागे व्हा...” हे समाजप्रबोधनपर पुस्तक फार आवडले हे प्रथम आवृत्तीच्या सर्व प्रति संपल्यावरूनच हे लक्षात येते. त्यामुळेधनगरांनो जागे व्हा...” या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरात लवकर प्रकाशित करून आम्हा वाचक प्रमींना ते वाचण्याची संधी द्यावी ही प्रामाणि अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे तुमच्या लेखनीची धार अशीच तळपत राहून समाजमनावर समाजप्रबोधनाचा आघात (प्रहार) करत राहो याच तुम्हाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हर्दिक हर्दिक सदिच्छा.
आपलाच
  • ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
Email :- nitsanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.com