Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Sunday 19 March 2017

पै.संदीप (बापू) रासकर यांचा वाढदिवस उत्साहात...




      पैलवानकीचा वारसा लाभलेल्या धनगर समाजातील महाराष्ट्र राज्याचे तरूण तडफदार  युवा नेते *मा.पै.संदीप रासकर सर* यांचा वाढदिवस भारती विद्यापीठ पुणे येथे दि.१६ मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील धडाडीच्या कुस्तीपटूंची अर्थातच *पैलवानकीची  परंपरा असलेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यांतील रासकर कुटूंबियांचा* महाराष्ट्र राज्यभर चांगलाच बोलबाला आणि दबदबा आहे. समाजासाठी वाहून घेतलेले आणि जनसेवेत कार्यतत्पर असलेले मा.पै.संदीप रासकर सर हे अतिशय गरीब कुटूंबातून व अतिशय खडतर प्रवासातून आलेल्या माता पुरस्कार विज्येत्या शांताबाई खाशाबा रासकर आणि पै.खाशाबा रासकर यांचे नातू तर पै.आनंदराव खाशाबा रासकर यांचे सुपुत्र होत. काही महिन्यापूर्वी "सुलतान" या हिंदी चित्रपटातून पैलवानांना कोणत्या परिस्थतीस व कसे सामोरे जावे लागते याचे चित्रीकरण केले होते ज्वलंत उदाहरण म्हणजे कडेगाव तालुक्यांतील रासकर कुटूंब होय. गरिबीच्या झळया सोसूनही पै.स्व.खाशाबा रासकर यांनी त्यांच्या पै.आनंदराव रासकर, पै.वसंतराव रासकर, पै.कृष्णा रासकर (सर्वांचे लाडके आप्पा) व पै.धनाजी रासकर या चारही मुलांना पैलवानकीसाठी तालमीत पाठवले. आज पैलवानकी हाच त्यांचा एकमेव खानदानी पेशा म्हणून ओळखला जातो. आज कडेगाव तालुक्यांतील एक उमदे आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून पै.आनंदराव रासकर यांना ओळखले जाते तर पै.वसंतराव रासकर हे गावाकडे शेती सांभाळतात. पै.संदीप रासकर यांचे चुलते भारतीय नौसेना मधून रिटायर झालेले आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू तसेच ज्यांना कुस्त्यांचा जादूगार म्हंटले जाते असे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल आंतरराष्ट्रीय १९ पदकाचे मानकरी अर्थातच विजेते माजी सैनिक पै.कृष्णा रासकर (आमचे लाडके आप्पा) यांची महाराष्ट्र राज्यभर चांगलीच ओळख आहे. तर पै.धनंजय रासकर हे सुद्धा भारतीय नौसेना मध्येच स्पोर्टस विभागातील नावाजलेले पट्टीचे कुस्तिपट्टू आहेत. रासकर कुटूंबातील राजकीय वारसा म्हंटले तर सौ.अलकाताई कृष्णा रासकर यांनी माजी सरपंच पद भुषवले आहे.
        पाठीमागे नुकत्याच पार पडलेल्या "स्व.खाशाबा जाधव दुसऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा" मधून ९६ किलो वजनी गटातील सुवर्णपदक विजेते  पै.वैभव रासकर यांचे सख्खे चुलत भाऊ म्हणजे भारती विद्यापीठ पुणे येथे प्राध्यापक असलेले पै.संदीप रासकर सर आहेत.  पै.संदीप रासकर सर यांचे समाजासाठी फार मोठे योगदान असून समाजातील विद्यार्थ्यांसाठी, कुस्तिपटूंसाठी ते नेहमीच झटत असतात,धडपडत असतात व निस्वार्थीपणाने त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करत असतात त्यामुळे पुणे जिल्ह्यात त्यांची वेगळीच ख्याती आहे तर धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी पुणे हायवेवरती केलेल्या रास्तारोको आंदोलनातून महाराष्ट्र राज्यभर त्यांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या घडाकेबाज नेतृत्वामुळे महाराष्ट्र राज्यातील युवा वर्गाचे चांगलेच वलय निर्माण झाले आहे.
तसे पाहायला गेले तर आदी-अनादीकाळापासूनच माझ्या धनगर समाजाला पैलवानकीचा वारसा लाभला असल्याने तीच धमक तोच दरारा कायम राहणार आणि  सळसळते रक्त हे असेच सळसळत राहणार त्यात काही शंकाच नाही. पैलवानकीचा वारसा जपणाऱ्या व समाजसेवेची आवड असलेल्या *कडेगावच्या रासकर कुटूंबीयांचा आदर्श अख्ख्या महाराष्ट्र राज्याने घ्यावा* असे मला वाटते कारण रासकर परिवारात आज कुटूंबसदस्यांची संख्या ही तब्बल २९ असूनदेखिल आजही चौघे रासकर बंधू एकत्रितच राहतात म्हणजे एकत्रित कुटूंब आणि सुखी कुटूंब आहे हे रासकर कुटूंबाचे खास वैशिष्टय... *आजही चौघे रासकर बंधू एकत्रित असल्याने या कुटूंबियांकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिम्मत होत नाही आणि एखाद्याने केलीच तर त्याची गय देखिल केली जात नाही असा इतिहास रासकर कुटूंबियांचा आहे.* यातूनच एकीचे बळ काय असते याचा प्रत्यय माझ्या  धनगर समाजाला आलाच असेल म्हणूनच समाजाच्या न्याय व हक्कासाठी एकत्रित या आणि एकत्रित लढा उभारूया असे आवाहन आम्हास करावे लागते. असो पै.संदीप रासकर सर हे कुटूंबाचा पैलवानकीचा वारसा पुढे चालवत समाजासाठी झटत असतात झगडत असतात पुढेही त्यांच्या हातून असेच चांगले समाजकार्य घडत राहो व त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच मल्हारीमार्तंड चरणी प्रार्थना करतो.
     भारती विद्यापीठ पुणे येथे झालेल्या वाढदिवस सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेते पै.विजय चौधरी, पै.अर्जूनवीर काका पवार, कुस्तीपट्टू किरण भगत, उप महाराष्ट्र केसरी विकास जाधव, प्रा.कमलाकर चुगले, कडेगावचे माजी सरपंच विजय शिंदे, नगराद्यक्ष अविनाश साहेब तसेच अनेक नगराध्यक्ष, नगरसेवक, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी पै.संदीप रासकर सर यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला व केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
       *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday 17 March 2017

धनगरांनो आतातरी पेटून उठा...

किती दिवस थंड बसणार? किती दिवस षंढ राहणार?? सळसळत्या रक्ताचे वारसदार आपण हातात तलवारी घेऊन कधी बंड करणार?? पिढ्यांनपिढ्या शेळ्या-मेंढ्या राखून, पायाच्या नडग्या वाळवत, ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता पाचविला पुजलेली भटकंती करण्यातच आमचं अख्खं आयुष्य संपून जातं पण आमच्याच जिवावर राजकारण आणि समाजकारण करणाऱ्या औलादी मात्र ऐशोरामात एसी च्या गाडीत आणि एसीच्या माडीत राहतात. कदाचित या जगातील माणुसकीच संपली की काय असाच भास होत आहे. गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे पण प्रस्तापित मस्तवाल नेत्यांनी माझ्या धनगर समाजाचा नुसता वापर करून स्वताची घरं भरली पण आरक्षण देतो म्हणून आश्वासनांवर आश्वासनांचा भडिमार केला तरीही माझ्या धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही उलट त्या डोमकावळ्यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण  मिळू नये म्हणून अनेक पायंडे घातले. त्या प्रस्तापित मस्तवाल नेत्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत धनगर समाजाने त्यांची जागा दाखवून दिली आहे.
आजच्या सरकारची देखिल तिच अवस्था आहे. थोडक्यात सांगायचे म्हंटले तर गावाकडे एक म्हण आहे ती म्हणजे *आजा मेला अन् नातू झाला घरात माणसं तेवढीच....* म्हणजेच पाठीमागच्या पवार पाटील देशमुखांच्या आघाडी सरकारने दिले नाही आणि या फडणवीस सरकारला देखिल धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण द्यायचे नाही असेच दिसतेय. त्याचे कारण असे की फडणवीस सरकारने ज्या TISS चे भूत धनगर समाजाच्या मानगुटीवर बसवले आहे त्याची काही आवश्यकता नव्हती आणि नाही कारण एखाद्या जातीला/जमातीला अनुसुचित जाती/जमाती मध्ये नव्याने सामाविष्ट करायचे असल्यास राज्य सरकार संबंधित संस्थांची अहवाल सादर करण्यासाठी नेमणूक करू शकते पण धनगर जमात ही अगोदरपासूनच राज्यघटनेमध्ये अनुसुचित जमातीच्या ३४२ कलम वरील महाराष्ट्र राज्याच्या नवव्या परिशिष्टात अ.क्र.३६ वरती आहे तेथे असलेला उल्लेख हा ओराॅन, धनगड असून भारत सरकारकडून प्रसिद्ध झालेल्या अनेक गॅझेट्स मध्ये अ.क्र.३६ वरती ओराॅन, धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे त्याशिवाय १९८६ साली राज्यसभेत खा.सुर्यकांता पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सभापती महोदय रामविलास पासवान यांनी महाराष्ट्रातील धनगर व धनगड हे वेगळे नसून एकच आहेत असे सांगितले पुढे ते म्हणाले की राज्य सरकारने त्याबाबतीत केंद्र सरकारकडे शिफारस केली तर केंद्र सरकारकडून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळतील. मग असे असताना देखिल धनगर समाजाला आजपर्यंतही अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या जात नाहीत. माझ्या  धनगर समाजातील कित्येक पिढ्या अशाच बरबाद झाल्या, धनगर समाजातील लाखो मुले-मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहीली हजारो तरूण-तरूणी आय ए एस, आय पी एस बनण्यापासून कोसो दूर राहीली याचे एकमेव कारण म्हणजे आजपर्यंतच्या सत्ताधारी आणि सत्तापिपासू मस्तवाल नेत्यांनी आमच्या हक्कावरती गदा आणली. अनेक आंदोलने झाली, मोर्चे झाले कालच १६ मार्च रोजी दहिवडी ता.माण जि.सातारा येथे मल्हार क्रांती मोर्चा झाला पण सरकार मात्र हातावर हात ठेवूनच शांत बसलंय.
आरक्षणाबरेबरच विद्यार्थांची शिष्यवृत्ती आणि मेंढपाळांसाठीही शेळ्यामेंढ्यांच्या चाऱ्याची मोठी समस्या भेडसावत आहे. आज माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाचा शुल्क धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडणारा नाही त्यामुळे अर्ध्यातूनच शिक्षण सोडून द्यावे लागते त्याशिवाय डाॅक्टर आॅफ फिलाॅसाफि (Ph.D) च्या विद्यार्थ्यांना देखिल भरमसाठ प्रवेश शुल्क देऊन प्रवेश घ्यावा लागतो मग हे कुठे तरी थांबावयला हवे. दुसरीकडे भयानक दुष्काळ सतावत असताना मेंढपाळांना मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी वणवण फिरावे लागते पण मेंढपाळांची चराऊ कुरणे आजतागायत सरकारकडे जमा आहेत वन खाते मेंढपाळांना चराऊ कुरणात चारणीसाठी परवानगी देत नाही. भटकंती शिवाय माझ्या मेंढपाळ बांधवांचा वडिलधाऱ्यांना मार्गच सुचत नाही मग मेंढपाळांनी नक्की करायचे काय? जगायचे तर कसे जगायचे आणि मरायचे तर कसे मरायचे? असा प्रश्न पडला असताना आता जगण्यासाठी अन्यायाच्या विरोधात कुऱ्हाड भिरकवण्याशिवाय धनगरांसमोर पर्याय नाही. एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय गत्यंतर नाही. जेवढे शांत बसाल तेवढे खाली दाबायचा प्रयत्न करणारी पेशवाई पुन्हा उदयाला आली आहे त्यासाठी त्या पेशवाईचा बिमोड करण्यासाठी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांची दुरदृष्टी डोळ्यांसमोर ठेवून लढायला सज्ज व्हा आणि आजपर्यंत झाले ते झाले पण धनगरांनो इथूनपुढे पेटून उठा आणि पेटवून टाका तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना आणि हिसकावून घ्या 
*आपले हक्क आणि अधिकार.....*
*घेऊ नका माघार.. आता करूया जागर*
   *येळकोट येळकोट जय मल्हार*
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
       *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
 

Thursday 16 March 2017

मुजरा माझ्या मल्हारबांस...

        मनगटाच्या जोरावर आणि सळसळत्या तलवारीच्या टोकावर दुश्मनांना कोलून टाकणाऱ्या आणि अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या रणमर्दास अर्थातच थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना त्यांच्या ३२३ व्या जयंतीनिमीत्त मानाचा जय मल्हार कोटी कोटी प्रणाम. घोड्यांच्या टापांनी अख्खा हिंदूस्तान ढवळून काढणाऱ्या मल्हाररावांना युद्धतंञात पारंगत असलेला एक धुरंदर लढवय्या म्हणून ओळखले जाते ते त्यांच्या अंगी असलेल्या कुशल "मल्हारतंत्र" आणि "मल्हारनीती"मुळेच...
एके दिवशी मामाच्या मेंढ्या चारायला घेऊन गेल्यानंतर मल्हाररावांनी पाहिले की मामाच्या शेतामधून सजवलेल्या अंबारीचे हत्ती, घोडे सैनिक शेतातील पिकाची नासधूस करत पिक तुडवत चालले होते तेव्हा त्यांनी त्याच रानातील एक ढेकुळ उचलला तो सरळ सजवलेल्या हत्तीवर अंबारीत बसलेल्या पेशव्याच्या पाठीत मारला. धनगरांच पोर ते रक्तातच धनगरी बाणा जसाच्या तसाच.... डोळ्यात निखारा जसाच्या तसाच....  निर्भिडही तेवढाच.... मल्हारवांनी पेशव्यांस ढेकुळ मारला तसे सर्वजण अवाक् झाले एवढी हिम्मत झाली कोणाची असा प्रश्न पेशव्यांच्या सरदारांना पडला, पेशव्याचे काही सैनिक मल्हाररावांकडे धावून गेले पण त्या धनगराच्या पोराचे धाडस पाहून त्याला शिक्षा केली नाही तर सैन्यात सामिल करून घेतले ती टोळी होती दाभाड्यांच्या कंठाजी कदमबांडेंची आणि तेथूनच शिपाईगिरी करत असतानाच आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर मल्हाररावांनी अनेक लढाया गाजवल्या बड्या बड्या शत्रुंना मल्हाररावांनी तलवारींचे पाणी पाजले त्यांच्या शौर्याची दखल घेत बाजीराव पेशव्यांनी २६ मे १७२९ ला त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. एक धनगरांचे पोर काठीने मेंढ्या हाकता हाकता स्वराज्यासाठी तलवारीने शत्रुंना कधी हाकू लागले तेच समजले नाही.
मल्हार आया मल्हार आया म्हटलं तरी उत्तर भारतालाच नव्हे तर अफगाणिस्तानच्या अब्दालीला देखील कापरं भरायचं. मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापांचे जरी आवाज ऐकायला आले तरी कित्येक गावंच्या गावं ओस पडायची हीच त्यांची धमक होती अन् हाच त्यांचा दरारा. आजही उत्तर भारतीयांच्या कानात मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापाचे आणि येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजराचे आवाज निनादत असतील... लढाईत सर्वात पुढे राहून राहून, सैन्यांचे नेतृत्व करून मुसंडी मारत शत्रुंना वायूवेगाने कापत सुटणाऱ्या मल्हाररावांचा दबदबा एवढा होता की शत्रुपुढे "मल्हार" जरी नाव उच्चारले तरी त्यांची पळता भुई थोडी व्हायची. मल्हाररावांचा स्वभाव जितका प्रेमळ होतका तितकाच राकटसुद्धा. एकदा कुंभेरीच्या लढ्यामध्ये सुरजमल जाटाने किल्ल्याला वेढा घातला होता मल्हाररावांचे सुपुत्र शुरवीर खंडेराव होळकर माचावर लढत सैन्यांचे नेतृत्व करत शत्रुंना तोंड देत होते इतक्यात सुरजमल जाटाकडून जेजाल्याचा गोळा आला आणि खंडेरावांच्या छाताडावर आदळला , खंडेराव धारातीर्थी कोसळले. स्वतःच्या मुलाला डोळ्यासमोर ठार केलेलं पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली नसानसात रक्त सळसळू लागले डोळे लालबुंद झाले हाताच्या मुठी आवळल्या गेल्या अन् त्यांनी मल्हारी मार्तंडाची शपथ घेतली की या सुरजमल जाटाचा शिरच्छेद करून, कुंभेरीची माती खणून यमूनेत टाकेन तरच दक्षिणेला (महाराष्ट्रात) परत जाइन. पण भयभीत झालेल्या सुरजमल जाटाला काय करावे सुचत नव्हते तेवढ्यात सुरजमल जाटाची पत्नी हंसिका हिने जयाप्पा शिंद्यांशी बोलणी करून सुरजमल जाटाचा पेशव्यांसोबत सुलुख घडवून आणला. तेव्हापासूनच मल्हाररावांचा  पेशव्यांवरील अन् शिंद्यावरील विश्वास उडाला होता त्याचा प्रत्यय १७ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणि १८ व्या शतकाच्या पहिल्या दशकात येतो जेव्हा महाराजाधिराज शुरवीर योद्धा यशवंतराव होळकर राष्ट्रासाठी स्वतंत्रपणे इंग्रजांशी झुंज देत होते तेव्हा पेशवे आणि शिंदे हे दोन्ही होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी खटाटोप करत होते. एवढेच नव्हे तर यशवंतराव पुण्यावर चालून आले तेव्हा शेपटी गुंडाळून पळपुटा पेशवा जेव्हा कोकणात पळून गेला आणि कोकणातून पत्रव्यवहार करून त्यांनी यशवंतराव होळकरांना सांगितले होते की होळकरांचं राज्य या राष्ट्राच्या मातीवरती अन्याय व अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश सरकारकडे विलीन करावं. याचाच अर्थ मल्हाररावांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली ती म्हणजे "एकवेळ दुश्मनांवरती विश्वास ठेवला तरी चालेल पण पाठीत खंजीर खूपसणाऱ्या शिंद्यांवरती अन् पेशव्यांवरती कधीच विश्वास ठेवायचा नाही".
सांगायचा मथित अर्थ एवढाच की आजही आम्ही विनाकारण शेंडीने गळा कापणाऱ्या मॉडर्न पेशव्यांच्या आहारी जाऊन समाजाचे आणि परिणामी देशाचे वाटोळे करून घेतोय हे आम्हाला अजूनही कळत नाही.
 आज १६ मार्च हा एक ऐतिहासिक आनंदाचा दिवस म्हणजेच  सतराव्या शतकात आजच्या पाकिस्तानमधील अटकेपार मराठेशाहीचा  झेंडा डौलाने फडकवणाऱ्या रणझुंजार रणमर्दाची ३२४ वी जयंती त्यानिमीत्त थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा विनम्र जय मल्हार.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
         ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com