Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday 29 June 2017

होळकर कालीन बारव्यांच्या शोधात भाग-२

*पुनर्वसन व सुशोभिकरण*
दि.२९ मे २०१७ रोजी राज्य महामार्ग क्र. १४३ मल्हारपेठ-पंढरपूर रोड वरती माणदेशातील सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यांतील निंबवडे गावाच्या ईशान्येकडील माण तालुक्याच्या हद्दीत असलेल्या होळकर कालीन बारव्याची मी तसेच यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते पप्पू शिंगाडे, सुमितराव मेटकरी व अतीश कोळेकर या सर्वांनी पाहणी केलीच होती. त्याबद्दल मी सविस्तरपणे होळकर कालीन बारव्याच्या शोधात भाग-१ मध्ये वर्णन केलेले आहे


त्यानंतर दि.६ जून २०१७ रोजी त्याच राज्य महामार्ग क्र.१४३ मल्हारपेठ-पंढरपूर या मार्गावर आटपाडी तालुक्यांतील  दिघंची या गावापासून  झरे या गावाकडे जाताना दोन-तीन कि.मी. अंतरावर तशाच प्रकारचा पिंडीच्या आकाराचा होळकर कालीन बारवा पाहावयास मिळाला. सध्या त्या बारव्याची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपाची असून हा बारवा पूर्णता पडझड झालेल्या अवस्थेत आहे. सध्या मी महाराष्ट्र राज्याबाहेर असल्याने मला काही शक्य झाले नाही परंतु माझे सहकारी मित्र  दिघंची गावचे सुपूत्र अजय पाटोळे यांच्या माध्यमातून संबंधित बारव्याचे फोटो संकलित केले गेले आहेत ते खालील छायाचित्रांत पाहावयास मिळतीलच.


रणरागिणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी केवळ त्यांच्या इंदौर राज्यापुरताच मर्यादित राज्यकारभार केला नाही तर अखंड भारत देशभर त्यांनी विकासकामे केली. प्रशासन व्यवस्थेवर त्यांची चांगलीच जरब असायची. देशभर विकासकामे त्यांनी स्वताच्या खाजगीतूनच केली. मग त्यामध्ये काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि द्वारकापासून आसाम पर्यंत सर्व धार्मिक स्थळांचे बांधकाम केले काहींचा जिर्णोध्दार केला मग त्यामध्ये मशिदी असो अथवा मंदिरे... राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई होळकर यांनी सर्व ज्योतिर्लिंगाचा जिर्नोद्धार केला, नद्यांवरती घाट, विहीरी, शेततळे, तलाव, आश्रमशाळा, वाटसरूंसाठी धर्मशाळा, उपहारगृहे तसेच बारवे यांचे बांधकाम केले होते. त्यातीलच हा एक होळकर राज्यकालीन बारवा. दिघंची गावाजवळील हा बारवा पडझड झालेल्या अवस्थेत असून छायाचित्रांत पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेला दिसतो परंतू या बारव्यामध्ये पुर्नता मातीचा संचय झाला असल्याने दगडी बांधकाम केवळ गुडघाभरच निदर्शनास येथे. 


सामाजिक कार्यकर्ते मा.रामभाऊ लांडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून काही संस्थांच्या मदतीने या बारव्याचे पुनर्वसन करण्यात येणार आहे त्याचबरोबर यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने यशवंत युवा सेना शाखा निंबवडे व दिघंची येथिल युवा कार्यकर्त्यांसह राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारव्याचे सुशोभिकरणदेखील करण्यात येणार आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Monday 26 June 2017

क्रांतीची धगधगती मशाल विझू देऊ नका : नितीनराजे अनुसे

         देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्ष होत आली तरीही पारतंत्र्याचं जीणं (जीवन) जगत असलेल्या माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले अधिकार मिळत नसतील तर त्या अधिकारांपासून/हक्कांपासून धनगर जमातीला वंचित ठेवणाऱ्या शोषणकर्त्या औलादी असलेल्या सत्तापिपासू राजकर्त्यांच्या विरोधात स्व.बी.के.कोकरे साहेबांनी जो आरक्षणाचा लढा उभा केला आहे तो लढा थांबवू नका. हक्काच्या आरक्षणासाठी (अनुसुतित जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी) आरक्षणाची जी चळवळ उभा केली आहे ती चळवळ बलशाली करा. ज्या क्रांतीच्या मशाली स्व.बी.के.कोकरे साहेबांनी आम्हा युवकांच्या हातात दिल्या आहेत त्या धगधगत्या मशाली शमता (विझता) कामा नयेत त्या अशाच पेटत्या ठेवा. धनगर जमात ही एक आदिम आणि मुख्यत्वे मेंढपाळ व्यवसाय असणारी जमात असून या जमातीने कोणत्या राजाच्या पोटी जन्म घेतला नाही तर या मातीवरती होणारी परकीय शत्रुंची आक्रमणं रोखण्यासाठी छातीवर घाव झेलून आणि छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर दुश्मनांना सळो की पळो करून सोडणाऱ्या थोरले श्रीमंत राजे मल्हारराव होळकरांचा वारसा लाभलेली ही जमात आहे, स्त्री असून देखिल हातात शस्त्र आणि शास्त्र घेऊन दिल्लीचे तख्त अबाधित राखत भारताच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्ष राज्यकारभार करून जगातील एकमेव उत्तम प्रशासक म्हणून ज्यांचा गौरव केला जातो अशा अखंड भारतभर जाती-धर्मापलिकडेही जाऊन विकासकामांचा अद्भूत डोंगर रचणाऱ्या महाराणी रणरागीणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची लेकरं आणि अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत(इज्जत) जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या महाराजाधिराज छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या सळसळत्या रक्ताचा वारसा असणारी जमात आहे. एखादी गोष्ट मनात आणली तर ती क्षणात हिसकावून घेण्याची धमक ज्यांच्या रक्तात आहे अशा धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले अनुसुचित जमातीचे अधिकार जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत स्व.बी.के.कोकरे साहेबांनी उभा केलेली आरक्षणाची चळवळ थांबणार नाही आणि थांबूही देणार नाही मग जर कोणी आडवा आला तर त्याला उभा चिरायची देखिल धमक आम्ही बाळगतो हे कोणी विसरू नका. एकतर आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही त्यामुळे आमच्या वाटेला जर कोणी जात असेल, तर त्यांच्या वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय
आम्ही आमच्या वाटेला परतत नाही हा आमुचा इतिहास आहे.
खिंचनी होगी तलवार,
अब तांडव करना ही होगा ॥
औकात भूल गये है कुछ कुत्ते,
अब इतिहास दोहराना ही होगा ॥
इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. आमुचा इतिहास आजही जिवंत आहे आणि आम्ही युवक छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांचे वारसदार तो इतिहास जिवंत ठेवण्यासोबतच नविन इतिहास घडवण्याची नुसती भाषा बोलत नाही तर ते करून देखील दाखवतो म्हणूनच धनगर समाजातील तमाम युवक-युवतींना माझे आवाहन आहे की स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करून धनगर समाजाच्या ज्या क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांनी तुमच्या-आमच्या हातात जी क्रांतीची धगधगती मशाल दिली आहे ती क्रांतीची मशाल अशीच पेटती ठेवा एकवेळ गरज पडली तर समाजावर अन्याय करण्याऱ्यांची राखरांगोळी करून टाका पण क्रांतीची धगधगती पेटती मशाल मात्र विझू देऊ नका. नाहीतर पुढची पिढी तुमच्या-आमच्या तोंडात शेण घातल्याशिवाय राहणार नाही.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१८५३०००४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

Thursday 22 June 2017

समाजातील संवेदनशीलता नष्ट होतेय का?

Image may contain: sky and outdoor
धनगर म्हंटलं की रांगडा गडी, एकेकाला लाल मातीत लोळवणारा बलशाली, पैलवान (ताकदवान), बुद्धिमान, चपळ अशी कितीतरी विशेषणे लावली तरी कमीच पडतील, शत्रूंशी लढताना निधड्या छातीवर तलवारींचे  वार झेलणारा लढवय्या आणि तितकाच सर्वांशी आपुलकीने वागणारा एक प्रेमळ आणि मनमिळावू व्यक्ति अशीच ओळख असणारा धनगर हा मुक्या जनावरांची शेळ्या-मेंढ्यांची तहान-भूक जाणू शकतो तर आम्हांसारख्या चालत्या बोलत्या माणसाच्या भावना समजणे त्याला काहीच अवघड नाही. पण हल्ली धनगर समाजातील संवेदनशीलताच लोप पावत चाल्लीय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
खरंतर हे इतर दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या समाजाला उद्देशून लिहीत नाहीये तर मतलबी दुनियेमध्ये स्वताचा स्वाभिमान विसरणाऱ्या धनगर समाजातील समाजबांधवांना हे उद्देशून लिहतोय कदाचित काहीजनांच्या हे जिव्हारी लागेल पण त्यागोदर मी त्यांची जाहीर माफी देखिल मागतो. कारण माफी न मागण्याइतपत तरी मी काही निर्दयी आणि निष्ठूर नाहीये. खरंतर दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे वारसदार असलेल्या जमातीला उद्देशून लिहायची गरज पडायला नको होती पण आपल्याच धनगर समाजाने मला मजबूर केले म्हणून लिहावेसे वाटले त्याचे कारण असे सोमवार दि.१२ जून २०१७ रोजी घडलेली घटना ही सर्वांना माहीतच असावी. कारण आजकालची जवळपास ७५ ते ८० % युवा पिढी फेसबुक/व्हाटसप सारख्या सोशल मिडीयामध्येच रमलेली दिसते. असो... "श्रीमंत थोरले मल्हारराव होळकर प्रतिष्ठान पुणे"चे श्री.संतोष वाघमोडे साहेब यांनी त्यांच्या फेसबुक अकौंट वरतून तसेच व्हाटसपच्या माध्यमातून सदरच्या घटनेचा सविस्तर असा वृत्तांत दिला होता शिवाय त्या पिडीत कुटूंबियांना मदत करण्याचे त्यांनी आवाहन देखील केले होते. घडलेली घटना खरंतर घडायलाच नको होती अशी अगदी ह्रदय पिळवटून टाकणारी ती घटना ह्रदयाचे पार ठोके बंद पाडणारी होती. अरे पोटच्या पोरासारखं ज्यांना जपलं, तळहातावरच्या फोडासारखी ज्यांची काळजी घेतली, चराऊ कुरणे सरकारच्या घशात गेली म्हणून ज्यांच्या चाऱ्याच्या शोधात दरवर्षी सहा-सात महिने घरदार सोडून वणवण केली, पोरंबाळं शिकून मोठे होतील खुर्चीवरची नोकरी करून चार पैसे मिळवतील म्हणून ऊन-वारा-पाऊस यांचा विचार न करता पायाच्या नडग्या वाळेपर्यंत ज्यांची राखण केली अशा काळजाच्या तुकड्यासारख्या बाळू गोपाळा शिंगटे व आबू गोपाळा शिंगटे या कुटूंबियांच्या एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ४५ शेळ्या आणि मेंढ्यांवरती निसर्गाने घाला घातला. डोळ्यादेखत पोटच्या लेकराचा मृत्यू व्हावा अशी काळजाच्या तुकड्यासारखी जपलेली जितराबं वीज पडून एका क्षणात मृत्यूमुखी पडत असतील तर काळजाचा ठोका चुकणार नाही तर आणखीन काय होणार? डोळ्यादेखत त्या वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेळ्या-मेंढ्या जेसीबी मशीनच्या साहाय्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढतानाचा तो शिंगटे कुटूंबियांचा आक्रोश कदाचित तुमच्या कानावर पडला नसावा... ज्यांच्या घरात आजपर्यंत शेळ्या-मेंढ्या नाहीत त्यांना या घटनेबद्दल कदाचित काहीच वाटले नसेल असे मी मानतो पण ज्यांच्या घरात कधीतरी शेळ्या मेंढ्या होत्या किंवा आजही आहेत त्यांची ह्रदयं नक्कीच पिळवटली असतील. पण आजची परिस्थिती जणू अशी झाली आहे की माझ्या धनगर समाजातील संवेदनशीलताच कमी झाली अाहे मग कशी काय पिळवटतील कोणाची ह्रदयं?  कसे काय चुकतील कोणाच्यातरी काळजाचे ठोके?
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुकास्थित ढवळपुरी गावचे हे शिंगटे हे मेंढपाळ कुटूंब करडा-कोकऱ्यांचे आणि लेकरांचे लटांबणे घोड्याच्या पाठीवर लादून चाऱ्याच्या शोधात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका येथे पोहचले असताना सोमवार दि.१२ जून २०१७ रोजी सायंकाळी सुदवडी येथे मेंढ्या चारत असतानाच निसर्गाचा कोप झाला आणि एका क्षणात हे शिंगटे कुटूंब उघड्यावर आले. पारंपरिक व्यवसाय असला तरी  पोटाची खळगी भरण्यासाठी उदरनिर्वाचा एकमेव पर्याय म्हणून जवळपास ६ ते ७ लाखाची मालमत्ता असलेल्या शेळ्या-मेंढ्यांची डोळ्यांसमोर अगदी माती माती होऊन जात असेल कोणाचा टाहो फुटणार नाही ओ?? पण आजकाल धनगर समाजातील ह्रदय एवढी असंवेदनशील होतील असे स्वप्नातदेखील वाटले नाही त्याचे कारण असे की संतोष वाघमोडे साहेब यांनी "श्रीमंत थोरले मल्हारराव होळकर प्रतिष्ठान पुणे" यांच्यावतीने १०००० रूपये देणार असल्याचे सांगितले शिवाय समाजबांधवांनी ज्यांना जमेल त्या पद्धतीने १००, २००, ५००, १००० अशी आर्थिक मदत करून त्या उघड्यावर पडलेल्या शिंगटे कुटूंबियांना आधार द्यावा असे आवाहन केले होते. शासकीय मदत मिळेलच परंतु सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी गत असते हे सर्वांना ठाऊकच आहे परंतू धनगर समाजबांधवांना मदतीसाठी आवाहन करणारी ती पोस्ट आजपर्यंत १००० पेक्षा जास्त व्यक्तींनी व्हाटस/फेसबूकच्या माध्यमातून शेअर व फाॅरवर्ड केली शिवाय कमीत कमी ५०००० (पन्नास हजार) पेक्षाही जास्त व्यक्तींनी सदरची घटना फेसबुक/व्हाटसपच्या माध्यमातून पाहिली व ती पोस्ट आवडली म्हणून दर्शवले (किती निर्लज्जपणाचा कळस म्हणावा). शिवाय आतापर्यंत ५०० पेक्षाही जास्त फोन सदर घटनेतील पिडीत कुटूंबातील संतोष आबू शिंगटे यांच्या संपर्क क्रमांकावरती आले व मदत करण्याचे आश्वासन दिले. पण १२ जून पासून आतापर्यंत या शिंगटे कुटूंबियाच्या अकौंट वरती अवघे २४ हजार रूपये जमा झालेत. यालाच संवेदनशील समाज म्हणायचे का? नुसताच फोन करून पुळका दाखवणे आणि फेसबुक/व्हाटसप च्या माध्यमातून भावनिक आणि अतिसंवेदनशील असल्याचे दाखवणे हे कितपत योग्य आहे.?
Image may contain: one or more people, people standing and outdoor
एकीकडे अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचे हक्क मिळवण्यासाठी याच मेंढपाळ बांधवांना आणि त्यांच्या पोटच्या पोरासारख्या असलेल्या शेळ्या-मेंढ्यांना दाखवून सरकार दरबारी आरक्षणासाठी भिक मागता आणि दुसरीकडे याच मेंढपाळ बांधवांवरती आणि शेळ्या-मेंढ्यावरती जर निसर्गाचा कोप झाला, निसर्गाने घाला घातला तर प्रसिद्धी माध्यमातून तुम्ही स्वता प्रसिद्ध होता पण त्या त्या पिडीत कुटुंबाकडे दुर्लक्ष करता एवढे स्वार्थी कसे काय झाला तुम्ही? ज्या धनगर समाजाची ओळख ही शेळ्या-मेंढ्या राखणारा समाज म्हणून होते त्याच शेळ्या-मेंढ्या राखणाऱ्या या मेंढपाळ बांधवांना आपल्याच समाजातील काहीजण स्वताला ब्राह्मण समजणारे धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांना वाऱ्यावर सोडून दुय्यम दर्जाची वागणूक देत असतील तर समाज एकत्रिकरणाला काय अर्थ आहे? आंदोलनात मेंढपाळ पाहिजेत, मोर्चासाठी, रास्तारोखोसाठी त्यांच्या शेळ्या-मेंढ्या पाहिजेत पण जेव्हा याच शेळ्यामेंढ्या महामार्गावर ट्रकच्या खाली मुंगीसारख्या चिरडल्या जातात तेव्हा त्या मेंढपाळ बांधवांला साधं विचारायलाही कोणी धजत नाही किंवा पुढे येत नाही किती निर्लज्जपणाची ही गोष्ट म्हणायची? जर शेळ्या-मेंढ्यांसाठी चराऊ कुरणे उपलब्ध नसतील तर भटकंती करण्याशिवाय माझे वडिलधारे असलेल्या मेंढपाळांकडे पर्यायच नाही मग अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ काय नुसते मुंबई-पुणे सारख्या शहरात राहणाऱ्यांना आणि कोणताही डाग न पडलेले पांढरे कपडे घालून समाजाचे लेबल लावणाऱ्यांनाच आरक्षण पाहिजे का? तसे असेल तर मग आरक्षणाच्या लढाईत माझ्या मेंढपाळ बांधवांचा आणि पोटच्या लेकरासारखं जपलेल्या शेळ्या-मेंढ्यांचा वापर करू नका तुम्हाला आरक्षण कसे मिळते तेच बघूया....
एकीकडे दारूसाठी, गुटखा, तंबाखू, विमल, पान, सिगारेट यांच्या व्यसनासाठी दिवसा हजारों रूपये खर्च करणारी भरपूर मंडळी धनगर समाजात आहेत, मित्रांना बोलावून पार्टीमध्ये एका रात्रीत ५० हाजरांपेक्षा जास्त पैसे उधळणारे देखिल धनगर समाजात आहेत, लाखो करोडों रूपयांच्या अलिशान वातानुकुलीत गाड्यांतून फिरणारे देखिल धनगर समाजात आहेत पण अतिक्रमणात घरं उध्वस्त झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीमधून रस्त्यावर आलेल्या माझ्या बेघर आणि आधारहीन गोरगरीब मेंढपाळ बांधवांना जर तुमच्याकडून १००-२०० रूपयाची मदत मिळत नसेल तर त्याच मेंढपाळ बांधवांच्या नावावर स्वताची प्रसिद्धी करणारे आणि त्यांच्याच नावावर आरक्षणाची भिक मागणारे तुमच्या सारखे स्वार्थी आणि निर्लज्ज  या जगात कोणी नसतील.
Image may contain: one or more people and outdoor
अजूनही समाजात जर संवेदनशीलता शिल्लक असेल तर खालील पिडीत कुटूंबाच्या अकौंट वर तुम्हाला शक्य होईल तसे १००, २००, ३००, ५०० अथवा १००० किंवा त्यापेक्षा अधिक ज्यांच्या त्यांच्या परीने शक्य असेल त्यांनी पाठवून सामाजिक बांधिलकी जोपासावी अन्यथा समाज एकत्रितकरणाची भाषा वापरू नये.
Account Holders Name:-
Santosh Abu Shingate
ICICI Bank
Acc.No. 032101646506
IFSC code - ICICI0000321
आपल्यातीलच एक सर्वसामान्य मेंढपाळ कुटूंबातील पोरगा...
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday 15 June 2017

राष्ट्रपती पुरस्कार विजेता टिंग्या फेम मा.शरद गोयेकर यांची यशवंत युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष पदी निवड



आज गुरूवार दि.१५ जून २०१७ रोजी आटपाडी ता.आटपाडी दि.सांगली येथे झालेल्या यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या विशेष बैठकी दरम्यान यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती पुरस्कार विजेता व आपल्या सर्वांचा लाडका टिंग्या अर्थातच बब्या चित्रपटाचे युवा
दिग्दर्शक मा.शरद गोयेकर यांची
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या
युवक प्रदेशाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली.
या विशेष बैठकी दरम्याण झालेल्या सर्व निवडी पुढील प्रमाणे...
1. मा.शरद गोयेकर. (युवक प्रदेशाध्यक्ष यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य)
2. मा.श्री.पै.राहूल रूपनवर-पाटील. (सांगली जिल्हा प्रमुख यशवंत युवा सेना)
3. मा.श्री.तानाजीराजे गोयेकर. (मुंबई विभाग प्रमुख यशवंत युवा सेना)
4. मा.मयुर कुदनर. (अहमदनगर जिल्हा प्रमुख यशवंत युवा सेना)
5. मा.श्री. महेश कचरे (सातारा जिल्हा प्रमुख यशवंत युवा सेना)
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही एक क्रांतीकारी आणि लढवय्या संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून समाजाचे, वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निस्वार्थीपणाने अहोरात्र कार्य करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार विजेता टिंग्या फेम तथा बब्या चित्रपटाचा युवा दिग्दर्शक मा.शरद गोयेकर यांनी केले. त्याचप्रमाणे यशवंत युवा सेना प्रमुखांनी दिलेली जबाबदारी निस्वार्थीपणाने व यशस्वीरित्या पार पाडणार असल्याची शपथ नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी घेतली. यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब म्हणाले की यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना कोणत्याही स्वार्थी हेतूने समाजकार्य करत नाही तर स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारवरती ही संघटना मार्गक्रमण करत आहे, त्यांनी उभा केलेली आरक्षणाची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी निस्वार्थीपणाने समाजासाठी अहोरात्र झटत आहे झगडत आहे. यशवंत युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची व यशवंत सैनिकांची ही तळमळ पाहूनच राष्ट्रपती पुरस्कार विजेता टिंग्या फेम मा.शरद गोयेकर यांनी यशवंत युवा सेनेच्या युवकप्रदेशाध्यक्ष या पदाचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे यशवंत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता नुसतेच पद लावून न घेता जबाबदारीने व निस्वार्थीपणाने काम करावे असे आदेश दिले आहेत.
यशवंत युवा सेनेच्या या विशेष बैठकीसाठी यशवंत युवा सेनेचे प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, यशवंत युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मा.अवधूत वाघमोडे साहेब, यशवंत युवा सेना माण तालुका प्रमुख मा.दिनेश(दादा) हुबाले, आटपाडी तालुक्याचे युवा नेतृत्व मा.आबासाहेब भानवसे तसेच यशवंत युवा सेनेचे अन्य पदाधिकारी व छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांचे मावळे उपस्थित होते.
यशवंत युवा सेनेच्या वरील सर्व नवनिर्वाचित पदीधिकाऱ्यांचे झालेल्या निवडीबद्दल हर्दिक हर्दिक त्रिवार अभिनंदन तसेच तुमच्या हातून समाजासाठी निस्वार्थीपणाचे कार्य घडो व त्यातूनच अत्याचारविरहीत सुज्ञ, सुशिक्षित, सतर्क व सजग अशा राजा समाजाचा जन्म व्हावा हीच माफक अपेक्षा व त्यास हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
शुभेच्छूक,
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Saturday 3 June 2017

निंबवडे येथे राष्ट्रमाता अहिल्याई जयंतीनिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन

निंबवडे ता. आटपाडी जि.सांगली येथे राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या २९२ व्या जयंती निमित्त उद्या रविवार दि. ४ जून २०१७ रोजी  भव्य जंगी मिरवणूक व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदरच्या
 कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा.गोपीचंद पडळकर साहेब
(महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ)

प्रमुख वक्ते
मा.विवेक कोकरे साहेब
(प्रमुख:- यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य)
मा.स्वप्निल दडस
(बाल व्याख्याते)
मा.सौ.किर्ती नितीनराजे अनुसे

प्रमुख पाहुणे
मा.तुषारशेठ विरकर
(नगराध्यक्ष म्हसवड नगरपरिषद)
मा.प्रा.सचिन होनमाने
(यशवंत युवा सेना प्रदेशाध्यक्ष म.राज्य)
मा.जयवंतराव सरगर
(सो.मि.अध्यक्ष भाजप सांगली जिल्हा)
मा.विष्णू देशमुख
(यशवंत युवा सेना कार्याध्यक्ष महा.राज्य)
मा.प्रभाकर (शेठ) पुजारी
(तालुक्याचे नेते)
मा.विनायक मासाळ
(उद्योगपति)

सत्कारमुर्ति
मा.ब्रह्मानंद पडळकर साहेब
(समाजकल्याण सभापती जि.प.सांगली)
मा.तानाजी (शेठ) यमगर
(उपसभापति पंचायत समिती आटपाडी)
मा.सौ.पुष्पाताई जयवंत सरगर
(सदस्य पंचायत समिती आटपाडी)
मा.दादासो मरगळे
(सदस्य पंचायत समिती आटपाडी)
मा.सौ.भुमिका बेरगळ
(सदस्य पंचायत समिती आटपाडी)

सन्माननीय उपस्थिती
मा.मंगेश (दादा) मगदूम
(सरपंच ग्रामपंचायत निंबवडे)
मा.सुरेश मुढे
(सरपंच ग्रामपंचायत मुढेवाडी)
मा.दिलीप कोकरे
(सरपंच ग्रामपंचायत वाक्षेवाडी)

राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या जयंतीनिमीत्त जंगी मिरवणूक
वार रविवार
दि.४ जून २०१७
वेळ. सायं ५:०० वाजता.
मुख्य कार्यक्रमाची वेळ
सायं. ७:०० वाजता.

स्थळ:-
निंबवडे ग्रामपंचायत जवळ
निंबवडे ता.आटपाडी जि.सांगली

आयोजक;
    समस्त धनगर समाज
निंबवडे, मुढेवाडी, वाक्षेवाडी,
  अनुसेवाडी व यशवंतनगर
  ता.आटपाडी जि.सांगली