Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday 17 March 2016

एक धनगर लाख सिकंदर... :नितीनराजे अनुसे


         मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर भल्या-भल्या दुश्मनांना चारीमुंड्या चित करणाऱ्यांच्या जमातीत जन्माला आलेली आम्ही माणसं आमच्या थोर महापुरूषांनी सुवर्णाक्षरात कोरुन ठेवलेला आमचा दैदिप्यमान इतिहास विसरतो आणि मग तिथेच आमचा विकास खुंटतो. जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधीच प्रगती/विकास करू शकत नाही हे तितकच सत्य आहे. या भारत देशावर इंग्रजांनी आक्रमण करून फंद फितुरी करत १५० वर्षे राज्य केले तर भारतीय इतिहासकार त्या फिरंग्यांचा उदो उदो करत बसले आणि निर्लज्जप्रमाणे सांगू लागले की इंग्रजांनी भारताला १५० वर्षे गुलामगीरीत ठेवलं. पण धनगर समाजाने या भारतावरती नव्हे तर आशिया खंडाच्या विशाल भूभागावरती ३५० वर्षापेक्षा अधिक राज्यकारभार करून गुलामगीरीत ठेवले होते इंग्रजांना कापून काढत यशवंतराव होळकरांनी त्यांना सळो की पळो करून सोडले होते हे प्रत्येकाच्या लक्षात असूद्या.
       आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, राजा सम्राट अशोक, थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर, रणरागिणी राजमाता महाराणी अहिल्याई होळकर, आद्यस्वातंञ्यसेनानी महाराजा यशवंतराव होळकर, आद्यमहिला स्वातंत्र्यसेनानी वीरांगणा भिमाई होळकर अशा थोर महापुरूषांचा जमातीत जन्माला आलेले दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे आम्ही वारसदार, आम्हाला आमचाच इतिहास माहित नसल्याने इथल्या माजलेल्या आणि मस्तावलेल्या प्रस्तापितांची गुलामगीरी अन् चमचेगीरी करण्यातच आजच्या सरदारांनी (प्रस्तापितांच्या चपला उचलणाऱ्या नेत्यांनी) समाधानता स्विकारली हे धनगर समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. कदाचित आमचा इतिहास चुकीचा लिहला गेला कारण आमचा इतिहास लिहणारे इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण आमचा इतिहास दुरुस्त करण्यासाठी तरी कीतीजण प्रयत्न करतात याचा पण अभ्यास करायला हवा.
        आज जर धनगर समाजाला आपला खरा इतिहास समजला तर प्रेमळ तितकाच अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारा आणि ध्येय्यवेडा असलेला धनगर समाज पुन्हा या जगावरती राज्य करू शकतो पण आजपर्यंत आम्हाला आमचे आस्तित्व समजले नव्हते म्हणून धनगर समाजाचे फार मोठे नुकसान झाले. आज आम्हाला आमच्या आस्तित्वाची जाणीव करून घ्यावी लागेल, त्यासाठीच
आता
गरज आहे आमचा खरा इतिहास जाणून घेण्याची
गरज आहे तरुणांमध्ये स्वाभिमान जागवण्याची
गरज आहे समाजाला जाग्रूत करण्याची
गरज आहे समाज प्रबोधन करण्याची
गरज आहे समाज संघटन करण्याची
गरज आहे समाजाला योग्य दिशा देण्याची
गरज आहे समाजाचे प्रश्न समजून घेण्याची
गरज आहे ते समाजाचे प्रश्न सोडवण्याची
गरज आहे स्व.बी.के.कोकरे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची
यासाठी हवा आहे विश्वास अन् साथ फक्त तुमची
 पुन्हा एकदा खवळून उठेल धनगर समुद्रासारखा,
 पुन्हा एकदा पेटून उठेल धनगर वादळासारखा,
 पुन्हा एकदा धनगर भरवेल धडकी सह्याद्रीच्या पर्वतरांगेला अन्     पुन्हा एकदा कवेत घेईल त्या  हिमालयाला. सळसळत्या रक्तामध्ये अन्यायाची चीड आणि लालबुंद डोळ्यामध्ये रसरसलेला निखारा साठवून ठेवलेला धनगर ज्यादिवशी पेटून उठेल आणि ज्यादिवशी महाराष्ट्रातील एकाच रक्ताचा अन् हाडामांसाचा प्रत्येक धनगर जातीसाठी माती खाऊन हक्कासाठी रस्त्यावर उतरेल तेव्हा महाराष्ट्राचा फक्त हरियाणा (जाटांचे आंदोलन) होणार नाही तर यशवंतराव होळकरांच्या वारसदारांनी घडवलेल्या नवीन इतिहासाची पुस्तकं वाचायला मस्तकं शिल्लक राहणार नाहीत.
म्हणूनच म्हणतो खबरदार जर आम्हावर अन्याय कराल तर उद्याचा सुर्य उगवू देणार नाही.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५ ३००० ४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com