Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 30 May 2017

होळकर कालीन बारव्यांच्या शोधात भाग-१

*पुरातन बांधकामाचे सुशोभिकरण*
काल दि. २९ मे २०१७ रोजी राज्य महामार्ग क्र. १४३ मल्हारपेठ-पंढरपूर रोड वरती माणदेशातील सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यांतील निंबवडे गावाच्या ईशान्येकडील माण तालुक्याच्या हद्दीत असलेल्या होळकर कालीन बारव्याची पाहणी करताना मी स्वता व आमचे मित्र यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते पप्पू शिंगाडे, सुमितराव मेटकरी व अतीश कोळेकर.
रणरागिणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी केवळ त्यांच्या इंदौर राज्यापुरताच मर्यादित राज्यकारभार केला नाही तर अखंड भारत देशभर त्यांनी विकासकामे केली. प्रशासन व्यवस्थेवर त्यांची चांगलीच जरब असायची. देशभर विकासकामे त्यांनी स्वताच्या खाजगीतूनच केली. मग त्यामध्ये काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि द्वारकापासून आसाम पर्यंत सर्व ज्योतिर्लिंगाचा जिर्नोद्धार, नद्यांवरती घाट, विहीरी, शेततळे, तलाव, आश्रमशाळा, वाटसरूंसाठी धर्मशाळा, उपहारगृहे तसेच बारवे यांचे बांधकाम केले होते. त्यातीलच हा एक होळकर राज्यकालीन बारवा. सद्या हा बारवा पडझड झालेल्या अवस्थेत असून  यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने यशवंत युवा सेना शाखा निंबवडे येथिल युवा कार्यकर्त्यांसह राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारव्याचे सुशोभिकरण व बांधकाम करणार आहोत.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
http://nitinrajeanuse.blogspot.in/2017/05/blog-post_30.html?m=1

पंढरीत यशवंत युवा मेळावा उत्साहात साजरा

देवाची पंढरी, विठ्ठलाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीतील नेपतगाव येथे राष्ट्रमाता रणरागिणी अहिल्याई होळकर यांच्या २९२ व्या जयंतीनिमीत्त यशवंत युवा सेना शाखा नेपतगाव च्या वतीने भव्य यशवंत युवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. न्यायालयीन लढाई संदर्भात बोलताना मा.निवांत कोळेकर सर यांनी समाजाला योगदान देण्यास प्रवृत्त केले.  ७५० वर्षापेक्षाही जास्त राज्यकारभार या भारत देशावर आणि आशिया खंडावर केला असताना देखिल आज धनगर समाज प्रस्तापितांच्या राजकीय आणि सामाजिक दबावाखाली पिचत पडला असून धनगर समाजाला इथून पुढे सक्षम आणि सशक्त करण्यासाठी सर्वप्रथम समाजातील मुले-मुली सुशिक्षीत व्हायला हवीत, समाजाचा आर्थिक समतोल मजबूत असायला हवा त्यासाठी विशेषता युवा वर्गालाच जबाबदारीने काम करावे लागणार असल्याचे टिंग्या फेम व बब्या चित्रपटाचे युवा दिग्दर्शक शरद गोयेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर समाजाच्या न्याय व हक्कासाठी सर्वोतपरी जी काही मदत लागेल त्यास हातभार लावणार असल्याचे देखिल दिग्दर्शक शरद गोयेकर यांनी सांगितले.
समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपले नेतृत्व सक्षम असायला हवे कारण ज्या घराचा कर्ता हा लायक असेल सक्षम असेल मजबूत असेल तर त्या  घरावरती भिक मागायची वेळ कधी येणार नाही आणि त्या धराचा कर्ता जर बलशाली असेल तर त्या घराकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत कोणाची होणार नाही असे प्रतिपादन यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाद्यक्ष मा.प्रा.सचिन होनमाने सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी फसणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला तर गेल्या वर्षी ३१ मे २०१६ ला आश्वासनाच्या माध्यमातून सोलापूर विद्यापीठाचे नामकरण राष्ट्रमाता अहिल्याई होळकर विद्यापीठ करणार असल्याचे सांगितले होते पण तसे जाहीर केले नाही पण जर या ३१ मे २०१७ रोजी अशी घोषणा झाली नाही तर पुढील १० दिवसाच्या आत सोलापूर विद्यापीठावर हजारोंच्या लाखोंच्या संख्येने जाऊन यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने आंदोलन करणार असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले. त्यासाठी समाजबांधवांनी त्या सरकारला बरं वाटल असे काही करू नये तर त्या सरकारच्या नाकात दम ठोकायची धमक फक्त मल्हारबांच्या मावळ्यात असल्याची जाणीव त्या सरकारला करून द्यावी. शिवाय राजा महाराजांच्या धनगर जमातीत जन्माला आलो असताना गुलामाचे जगणे सोडून द्यावे असे प्रतिपादन यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले.
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा राजकीय पक्षांशी काहीएक संबंध नसून राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी व ती मजबूत करण्यासाठी यशवंत युवा सेना ही क्रांतीकारी संघटना कार्य करतेय असे स्व.बी.के.कोकरे साहेबांतचे वारसदार मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत युवा सेना प्रमुख कोकरे साहेब होते तर यशवंत युवा सेना नेपतगाव या शाखेचे उद्घाटन टिंग्या फेम शरद गोयेकर, प्रा.सचिन होनमाने सर,निवांत कोळेकर सर, मा.तानाजी खरात साहेब तसेच अन्य प्रमुख पाहुणे व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Saturday 27 May 2017

अहिल्या शिक्षण मंडळात भोंगळ कारभार

समाजातील विद्यार्थीनींची शिक्षणाबाबतची गैरसोय होऊ नये त्याचप्रमाणे स्पर्धात्मक परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी पुणे येथिल पंढरी असलेली अहिल्या शिक्षण संस्था ज्या हेतूने स्थापण करण्यात आली तो हेतू धनगर समाजातील काही नालायक नेत्यांच्या भ्रष्टपणामुळे लालसीपणामुळे कुठेतरी लोप पावतोय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. पुणे येथील अहिल्या शिक्षण संस्थेत जो काही प्रकार चालू आहे तो धनगर समाजाला लाजवणारा असून ज्यांच्या बापजाद्यांनी सरकारी खात्याच्या जमिनीवर ही अहिल्या शिक्षण संस्था उभी केली त्या स्व.शिवाजीराव शेंडगे यांचे वारसदार सुरेश शेंडगे यांनी त्यावरती मालकी हक्क दाखवून अहिल्या शिक्षण संस्थेची जागा व इमारत बळकावण्याचा घाणेरडा प्रकार केलेला आहे याकडे धनगर समाजातील संघटनांचे दुर्लक्ष झाले आहे हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल. धनगर समाजातील मेंढपाळांची मुले उच्चशिक्षणासाठी पुणे येथे आल्यानंतर त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शासकीय मालकीच्या जागेवर अहिल्या शिक्षण मंडळाची वास्तू उभी राहिली व त्याचा लाभ मेंढपाळांच्या मुला-मुलींना होत होता परंतु स्व.शिवाजीराव शेंडगे यांच्या पाश्चात्य त्यांचे वारसदार सुरेश शेंडगे व सचिव कुंडलिक वळकुंदे यांनी मनमानी कारभार करून धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतिगृह व वसतिगृहाच्या खालील असलेले पार्किंग (वाहनतळ) बंद करून तेथे स्वताच्या नावाने सुरेश शेंडगे अभ्यासिका चालू केलेली आहे.
एवढेच नव्हे तर अहिल्या शिक्षण मंडळ पुणे येथिल वसतिगृहाची काही इमारत ही आयसीआयसीआय बॅंकेस व एका शोरूमसाठी भाड्याने देण्यात आली असून धनगर समाजातील विद्यार्थ्यांवर टांगती तलवार आली आहे. पुर्वी जवळजवळ १००० विद्यार्थी या अहिल्या शिक्षण मंडळ पुणे येथे प्रवेश घेत होते पण आयसीआयसीआय बॅंक व शोरूम साठी जागा भाड्याने दिल्याने आता फक्त ५००-७०० विद्यार्थी येथे वास्तव्यास आहेत. पैशांच्या लालसेपोटी या महाभागांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून १००० रू प्रति महिना शुल्क आकारला आहे. म्हणजेच एका विद्यार्थ्यांपाठीमागे प्रत्येक महिन्याला १००० ₹ तर ५०० विद्यार्थ्यांचे ५ लाख रूपये होतात तसेच आयसीआयसीआय बॅंक व शोरूमचे प्रत्येक महिन्याला अंदाजे ४०-५० हजार रूपये सुरेश शेंडगे यांच्या खिशात जातात याची चौकशी आजपर्यंत कोणीच केली नाही. सुरेश शेंडगे व कुंडलिक वळकुंदे यांच्या या मनमानी कारभाराबद्दल जर कोणी आवाज उठवला तर स्थानिक गुंड पाठवून त्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे घाणेरडे प्रकार केलेले आहेत शिवाय ज्यांनी ज्यांनी या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला त्या त्या विद्यार्थ्यांना १०-१५ हजार रूपये देऊन मॅनेज करणे अथवा आवाज उठवणाऱ्यांना मोफत प्रवेश देऊन प्रकरण थांवण्याचा प्रकार अहिल्या शिक्षण संस्था पुणे येथे घडत असल्याने त्याचा परिणाम नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. शिवाय सुरेश शेंडगे आणि त्यांचे इतर सर्व बंधू हे दलबदलू अाहेत व विविध पक्षाचे लागेबंध असल्याने त्यांच्यावर कोणाचेही बर्डन अर्थातच दबाव नाही त्यामुळेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
सुरक्षेच्या नावाखाली महिलांना संस्थेत घेऊन तर नविनच षड्यंत्र शेंडगे यांनी रचले असून या नेत्यांच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झालेला एखादा नविन विद्यार्थी जर संस्थेतील कमीटीवरती कार्यवाही करण्यासाठी तक्रार देत असेल तर त्या विद्यार्थ्याला विनयभंगाच्या कायद्यात अडकवण्याचेही घाणेरडे राजकारण अहिल्या शिक्षण संस्था पुणेचे सुरेश शेंडगे आणि त्यांचे सहकारी करत आहेत त्यासाठी त्यांनी पवार या महिलेला पुढे करून विद्यार्थ्यांना अडकवण्याचे घाणेरडे प्रकार केलेले आहेत. जर कोणी नविन विद्यार्थी प्रवेश घ्यायला या संस्थेत गेले तर त्यांना पवार नावाची महिला ही *धनगर* ऐवजी एन टी सी च्या जागा संपल्या आहेत असे सांगून दमदाटी करत असते त्या पवार नावाच्या बाईला धनगर म्हणायची खरंतर लाज वाटतेय की काय कोणास ठाऊक?? कारण संस्था ही फक्त धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी असताना एन टी सी चा संबंधच काय? जर कोणी विद्यार्थी वरचडपणा करत असेल तर त्याने विनयभंग केल्याचे स्वःताच सांगते व खालच्या पातळीचे शब्द वापरून विद्यार्थ्यांना त्रास देत असते याची खरोखर त्या महिलेऐवजी विद्यार्थ्यांनाच लाज वाटते. तिथे महिला असल्या कारणाने तेथिल विद्यार्थी काहीच न बोलता हतबल होऊन जातात हे कुठेतरी थांबायला हवे यासाठी सर्व सामाजिक संघटनांनी अशा पैशासाठी हपापलेल्या धनसंपती पिपासू लोकांना धडा शिकवावा व समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. २०१६ मध्ये शनिवार वाडा येथे कार्यक्रमानिमीत्त मा.प्रकाश शेंडगे यांना विद्यार्थ्यांनी गेहराव घालून या प्रकाराबाबतचा जाब विचारला असता स्व.शिवाजीराव शेंडगे यांनी उभा केलेल्या अहिल्या शिक्षण मंडळाशी माझा काहीही संबंध नाही असे सांगून दाखवायचे दात वेगळेच असल्याचा आव आणला पण त्या सर्वांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे मात्र समाजबांधवांनी चांगलेच ओळखले आहे. समाजहिताचा वसा घेऊन आज प्रत्येकजन समाजासाठी संघर्ष करतोय लढतोय झगडतोय पण आपल्यातल्याच औलादी समाजातील विद्यार्थ्यांसोबत असे वागत असतील तर समाजबांधवांनी त्यांना डोक्यावर घेण्याऐवजी पायाखाली घ्यायला पाहिजे. अहिल्या शिक्षण मंडळ पुणे असे या संस्थेला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांचे नाव दिले असताना त्यांचेच वारसदार महिलेचा वापर करून विनयभंगाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करतात याची खरंतर त्या संबंधितांना लाज वाटायला हवी. काही दिवसांपूर्वीच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कार्यवाही करण्यासाठी आवाज उठवला त्यांना अभ्यासिकेतून काढून टाकण्याचे षड्यंत्र रचून नोटीस काढली होती पण कोणत्याही दिवसाची अथवा वेळेची मर्यादा किंवा अंतिम दिनांक दिली गेली नसताना परवा दोन दिवसांपूर्वीच त्या त्या विद्यार्थ्यांच्या खोल्या लाॅक करून त्यांना सील करण्यात आले आहे. तेथिल विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तसेच दैनंदिन जीवनातील वापरात असलेले सर्व सामान हे लाॅक केले असल्याने विद्यार्थ्यांना पुणे सारख्या ठिकाणी उघड्यावर रहावे लागत आहे याची दखल समाजातील नेत्यांनी घ्यायला हवी त्याचबरोबर बापजाद्यांच्या नावावर मालकी हक्क दाखवणारी व्यवस्था बाजूला सारून अहिल्या शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नेमायला हवेत. समाजातील निर्दयी व्यक्तींनी केलेला हा किती भयानक प्रकार पाहायला भेटतोय हे पाहून तळपायाची आग पार मस्तकापर्यंत जाते आहे. सर्व समाजबांधवांनी कृपया अशा घटनेचा व त्या संबंधित व्यक्तींचा निषेध करायला हवा त्याचबरोबर खालील संपर्क क्रमांवरती फोन करून त्या संबंधितांना या प्रकरणाचा जाब विचारावा ही विनंती.
सुरेश शेंडगे - 9867423333
कुंडलिक वळकुंदे - 9822187596

जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday 26 May 2017

आज वाढदिवस कोकरे साहेबांचा

  स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचा वारसा जोपासणारे त्यांच्याच विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे निर्भिड आणि निडर लढाऊ नेतृत्व यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेकजी कोकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
खरंतर २६ मे हा दिवस खरोखरच सुवर्णाक्षरात कोरून ठेवण्यासारखा आहे कारण याच दिवशी भारताच्या इतिहासात आठराव्या शतकात होळकरशाहीची स्थापना झाली होती. त्यामुळे २६ मे या दिवसाला अनन्य साधाराण महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान म्हणून राज्यभर ज्यांचा नावलौकिक आहे असे सुप्रसिद्ध व्याख्याते आणि परखड वक्ते म्हणून त्यांची समाजात आज ओळख आहे. लहानपणापासूनच वक्तृत्वाची आवड असलेल्या कोकरे साहेबांच्या अंगी नेतृत्व गुण कसे काय विकसित होऊ लागले नाही हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. त्यांच्या अंगी असलेल्या नेतृत्वामुळे व निस्वार्थीपणाने समाजकार्य करण्याच्या त्यांच्या या प्रवृत्तीमुळे १९ जून २०१६ रोजी सांगोला जि.सोलापूर येथे यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी सामाजिक संघटनेची स्थापना करून संघटनेच्यावतीने प्रमुखपदाची धूरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली. धनगर समाजाचे क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांचे राहीलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा करारी बाणा, महाराजाधिराज छत्रपती यशवंतराव होळकर यांची दुरदृष्टी डोळ्यासमोर ठेऊन व अहिल्याचरणी नतमस्तक होऊन आणि भंडारा उधळून समाजाला  न्याय व हक्क मिळवून देण्यासाठीच माझा जन्म झाला आहे असे छातीठोकपणे सांगून यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रमुख पद मा.विवेकजी कोकरे साहेब स्वीकारले.
आज महाराष्ट्र राज्यभर राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या जयंतीनिमीत्त समाजाचे प्रबोधन करण्यासाठी जणू काय त्यांनी विडा उतलेला आहे की काय हे कोणास ठाऊक... आपल्या व्याख्यानातून भाषणातून समाजबांधवांना मंत्रमुग्ध करून टाकणारी विवेक कोकरे साहेबांची भाषणं ऐकली तर आजही अंगावर शहारे येतात आणि खरं सांगायचं म्हणजे स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या आडनावांचा सांधर्म्य म्हणावा की योगायोग हे मला माहित पण जेव्हा जेव्हा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब जाहीर स्टेजवरून बोलायला लागतात तेव्हा ते शब्द स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या मुखातून पडत आहेत की काय असाच काही भास होतो. अर्थातच यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या रूपात आम्ही स्व.बी.के.कोकरे साहेबांना पाहतो.त्यांच्या या वक्तृत्वाने आणि नेतृत्वाने प्रेरित होऊन हजारो समाजबांधव युवा वर्ग उत्स्फूर्तपणे यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी संघटनेचे भागीदार होत आहेत. आज यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेला यशवंत मावळ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून धनगर समाजाला एका छत्रीखाली आणण्याचे स्व.बी.के.कोकरे साहेबांचे स्वप्न त्यांच्याच विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेबच पूर्ण करणार हे ही तितकेच सत्य आहे. यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांचे नेतृत्व नेहमीच समाजाच्या न्याय व हक्कासाठी कामी येवो व त्यांच्या हातून असेच निस्वार्थीपणाने अखंड आणि अविरत समाजकार्य घडो हीच त्यांच्यावाढदिवसानिमीत्त मल्हारचरणी छोटीशी प्रार्थना.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Sunday 14 May 2017

धनगर समाजाचे उपकार नेत्यांनी विसरू नयेत

धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो असे जाहीर वक्तव्य स्वता देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणातून करतात कदाचित फसणवीसांची धनगर समाजाला फसवण्याची ही वेगळीच खेळी असू शकते. पण खैर त्याच सत्ताधारी पक्षामध्ये ना.प्रा.राम शिंदे साहेब आणि ना.महादेव जानकर साहेब हे कॅबिनेट मंत्री आहेत ते फक्त आणि फक्त माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजामुळे आहेत हे विसरून चालणार नाही. *धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही* हे मंत्री महोदय ना.जानकर साहेबांनी जे विधान केले ते त्यावरती गेल्या आठवड्यापासून उलट सुलट चर्चा ऐकायला भेटतात परंतु हे समाजाच्या भावना दुखावणारे विधान ना.जानकर साहेबांना भविष्यात महागात पडू शकते यात काही शंकाच नाही. ना.जानकर साहेबांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी हे विधान केले असेल ते त्यांच्या परीने योग्य आहे कारण एकट्या धनगर समाजाच्या जोरावर पक्ष चालवणे हे शक्य नाही.  त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे आणि जानकर साहेब हे बहुजनांचे नेते आहेत ते एकट्या धनगर समाजाचे नेते नाहीत. म्हणून त्यांनी केलेल्या विधानाकडे राजकीय वर्तुळातून पाहिल्यास काहीच गैर नाही पण सामाजिक वर्तुळातून त्याकडे जर कटाक्ष टाकला तर ते विधान माझ्या धनगर समाजाच्या जिव्हारी लागल्याशिवाय राहणार नाही.
१९९३ नंतर जेव्हा स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या यशवंत सेनेचा सरसेनापती होण्यासाठी मुलाखती घेतल्या गेल्या तेव्हा जानकर साहेबांना सरसेनापती घोषित करण्यात आले त्यानंतर सामाजिक चळवळीत झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या प्रचार व प्रसारासाठी निधी उभा केला तो केवळ धनगर समाजामुळेच... यशवंत सेना गावागावत वाडीवस्तीवर पोहचली होती ती केवळ धनगर समाजामुळेच... आटपाडीमधील कार्यकर्त्यांनी विटा.ता.खानापूर जि.सांगली येथे यशवंत सेना सरसेनापती जानकर साहेब यांना स्काॅर्पियो प्रदान करण्यात आली होती ती केवळ धनगर समाजबांधवांनी दिलेल्या निधीमुळेच... २००३ साली त्याच यशवंत सेनेचे राष्ट्रीय समाज पक्षात विलीनीकरण केले गेले तेव्हा राज्यभर आणि महाराष्ट्र राज्याबाहेर जानकर साहेब दौरे करायचे ते ही धनगर समाजातील समाजबांधवांनी पेट्रोलसाठी स्वताच्या खिशातून शंभर-दोनशे रूपये दिल्यामुळेच... जोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाने बाळसे धरले नव्हते तोपर्यंत धनगर समाजातील कार्यकर्त्यांनीच स्वताच्या खिशाला झळ लावली, ऐन दुष्काळात जनावरांसाठी छावण्या असताना देखिल आपलाच माणुस म्हणून जानकर साहेबांना दौऱ्यासाठी पेट्रोलसाठी खिसे रिकामे केले आणि जानकर साहेब राज्यभर नव्हे तर अखंड देशभर पक्षाचा प्रचार व प्रसार करू लागले तेही धनगर समाजामुळेच... जसजसा पक्ष वाढला तसतशी राजकारणाची हुकी आलेले धनगर व धनगरेतर बलाढ्य, धनाढ्य नेते पक्षप्रवेश करून पक्षाला पैसा पुरवू लागले तेव्हा आजपर्यंत यशवंत सेनेसाठी आणि राष्ट्रीय समाज पक्षासाठी झिजलेले हाडामांसाचे धनगर समाजातील कार्यकर्ते हळूहळू बाजूला होत गेले व इतर समाजातील धनाढ्य बलाढ्य पैसेवाले राजकीय नेते जानकर साहेबांच्या जवळ जाऊ लागले मागेपुढे करू लागले त्यातूनच बहुजनांचा पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष अशी ओळख आम्हीच म्हणजे धनगर समाजातील कार्यकर्ते सांगू लागलो.
आज राष्ट्रीय समाज पक्ष लहानाचा मोठा झाला, हाडामांसाचे चळवळीत झिजलेले कार्यकर्ते पैशाने गरीब असल्याने आपोआप बाजूला वळचणीला पडले ते फक्त झेंडे वागवण्यासाठीच... पण झेंडा खाली तरी कसा टाकणार कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे झाड हे खडकावर लावल्याने फळे उशिरा येतील पण ज्यांना लवकर फळे चाखायची असतील ते पक्षातून बाहेर पडतील असा समज राष्ट्रीय समाज पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे पण २० फेब्रुवारी २०१३ रोजीचा कटगुण जि.सातारा येथील (कार्यक्रमास मी स्वता उपस्थित होतो) तो प्रसंग आठवला तर मला तो 'लवकर अथवा उशिरा फळांबाबतचा' जो समज आहे असे काही वाटतच नाही. कारण ज्या पश्चिम महाराष्ट्र राज्यातून यशवंत सेना व तद्नंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या चळवळीचा जन्म झाला त्या पश्चिम महाराष्ट्रातून सर्वप्रथमता निधी जमा करून जानकर साहेबांना गाडी प्रदान केली त्याच पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाला गाडी (एसटी) गेल्यावर गाडीला हात करायची सवय आहे या जानकर साहेबांच्या वक्तव्यानेच मला हैरान केले होते कारण गाडी (एस टी) आल्यानंतर सर्वात पहिले तिकीट काढलेला पश्चिम महाराष्ट्रातील माझा भोळा भाबडा धनगर समाज सढळ हातानेच पक्षासाठी खिशातून पैसा काढत होता. मग आजपर्यंत चळवळीत संघटनेसाठी आणि पक्षासाठी झिजलेल्या कार्यकर्त्यांची काय किंमत राहिली?? असो... हा लेख त्यांना विरोध करण्यासाठी अथवा समर्थन करण्यासाठी नसून वस्तुस्थिती सांगण्यासाठी आहे कोणीही वाईट घेऊ नये.
पण गेल्यावर्षी एका ठुकार पत्रकाराने बातमी दिली की जानकर साहेब म्हणताहेत "धनगर समाजाने मला फसवले" या बातमी नंतर आम्ही त्या ठुकार पत्रकाराचा चांगलाच समाचार घेतला होता, भगवानगडावरील पवारांच्या विरोधातील वक्तव्यांने अख्खा महाराष्ट्र उलट सुलट चर्चा करत असताना जानकर साहेबांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असे ब्लाॅगच्या माध्यमातून जानकर साहेबांवर केलेले आरोप आम्ही खोडून काढले http://nitinrajeanuse.blogspot.in/2016/10/blog-post.html?m=1 महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज तेव्हा जानकर साहेबांचे समर्थन करत होता. जेव्हा जेव्हा धनगर समाजाचे नाव पुढे करून जानकर साहेबांना अडवण्याचे घाणेरडे राजकारण केले जायचे तेव्हा दुसरे कोणी नव्हे तर धनगर समाजातील कार्यकर्ते आपापल्या परीने लढायचे आणि आजही लढताहेत. १५ जुलै ते २१ जुलै २०१४ आरक्षण दींडी निघाल्यानंतर आमरण उपोषण सोडण्याच्या दिवशी स्वता देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर जमातीला आरक्षण देणार असल्याचे कबुल केले तेव्हा आरक्षण दिंडी मध्ये स्वता जानकर साहेब देखिल सामिल झाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाने एकगठ्ठा मतदान धनगर समाजातील नेत्यांमुळेच भाजपाच्या पारड्यात टाकले आणि भाजपला सत्तेवर आणले. भाजपासोबत युती झाली असल्याने व धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते शिवाय धनगर समाजाला दोन कॅबिनेट मंत्री पद द्यायची बोलणी देखिल झाली असल्याने त्यानुषंगाने भाजपचेच विधानसभा सदस्य ना.प्रा.राम शिंदे हे गृहराज्य मंत्री असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष असलेल्या जानकर साहेबांना कॅबिनेट मंत्री पद देणे उचित वाटत नव्हते. म्हणून प्रथमता ना.प्रा.राम शिंदे साहेब यांना कॅबिनेट मंत्री व तद्नंतर ना.महादेवजी जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. हे सर्व झाले ते फक्त धनगर समाजामुळेच झाले कारण भाजप सरकारला आणि परिणामी आघाडी सरकारला देखिल कळून चुकले होते की धनगर समाज मनात आणलं तर काय करू शकतो आणि काय नाही... त्यामुळे धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही हे विधान सामाजिक वर्तुळातून समाजाच्या भावना दुखावणारे आहे.
काहीजण म्हणाले की जर शरद पवार यांनी असे मराठा समाजाबद्दल वक्तव्य केले असते तर मराठा समाजबांधवांनी अभिमानाने सांगितले असते की आमचा नेता अठरा पगड जातीला सोबत घेऊन जातो पण हे नुसतेच बोलून नव्हे तर कृतीतून दाखवून द्यायचे असते. शरद पवारांनी बहुजनांच्या नावाखाली सत्ता गाजवली पण कामं फक्त त्यांच्याच जातीतील पाहुण्याराऊळ्यांचीच केली. त्यांनी आपापली आणि आपापल्या बगलबच्च्यांची घरे भरली आहेत आणि त्यांचे बगलबच्चे देखिल तीच पवार नीती वापरत आहेत म्हणून त्यांना फरक पडत नाही तर फरक पडतो तो आपल्या शेळ्या-मेंढ्या राखून पायाच्या नडग्या वाळवणाऱ्या माझ्या वडिलधारांना मेंढपाळांना... ज्यांनी ऊन वारा पावसाचा विचार न करता पै पै कमवली होती ती चळवळीसाठी पक्षासाठी दिली... फरक पडतो त्या हाडामांसाच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी काॅलेज शाळा बुडवून  पक्षाचा प्रचार प्रसार केला जे आज बेरोजगारीच्या नावखाली सडत पडलेले दिसतात.... फरक पडतो त्या तरूणांना जे पक्षाच्या प्रचार व प्रसारासाठी नोकरीवर टांगती तलवार ठेवून घरादाराचा विचार न करता पक्षासाठी रस्त्यावर उतरतात... राजकारण हे नेहमीच राजकारणाच्या पद्धतीनेच चालावे व समाजकारण हे समाजकारणाच्याच पद्धतीने... पण जर राजकारण करत असताना समाजबांधवांच्या भावना समजून घेणे फार महत्वाचे असते. ना.जानकर साहेबांच्या या वक्तव्याचे समर्थन करताना आणि या वक्तव्याचा विरोध करताना दोन्हीकडील कार्यकर्ते कोणत्या थराला जाऊन समर्थन करत आहेत याचे भान त्यांना राहत नाही म्हणून मला थोडंफार लिहावसं वाटलं.
खरंतर कोणीही या बाबतीत गैरसमज करून घेऊन नये कारण सांगायची वस्तुस्थिती अशी की नेता अथवा मंत्री मग तिथे कोणीही असो ज्या समाजात तो जन्माला आला आहे त्या समाजाशी त्याची नाळ जोडलेली असते हे सर्वज्ञात असतेच पण उगाचच केवळ राजकारणासाठी मी या समाजामुळे मंत्री झालो नाही त्या समाजामुळे झालो नाही असे जाहीर वक्तव्य करू नये. अशा वक्तव्यातून तुम्हाला इथपर्यंत पोहचवणाऱ्या माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाच्या भावना दुखवू नयेत अन्यथा हा भोळा भाबडा धनगर समाज जवळ यायच्या ऐवजी तुमच्यापासून खूप  दूर जाईल अर्थातच हा समाज पुन्हा जर का अंधकारात ढकलला गेला तर या समाजाला पुन्हा प्रकाशात यायला फार काळ लागेल.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

https://m.facebook.com/nitinrajeanuse123/

Thursday 4 May 2017

धनगर समाजाला प्रबोधनाची गरज

एकेकाळी राजा जमात असलेल्या धनगर समाजाची स्वातंत्र्यानंतर अवहेलनाच झाली. आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, राजा सम्राट अशोक, श्रीमंत थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, राष्ट्रमाता रणरागीणी अहिल्याई होळकर, छत्रपती महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर, विरांगणा भिमाई होळकर अशा थोर महापुरूषांचा राजामहाराजांचा वारसा लाभलेल्या या धनगर जमातीची पिचेहाट का झाली? कोणामुळे झाली? कशी झाली? याचा विचार केला, त्यावरती चिंतन केले, मनन केले तर खरोखर एकेकाच्या तळपायाची आग पार मस्तकापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे धनगर जमातीचे अज्ञान आहे आणि धनगर जमातीच्या याच अज्ञानाचा फायदा घेऊन प्रस्तापित व्यवस्थांनी आजपर्यंत कुरघोडीचे राजकारण केले. आजकाल धनगर समाज जागृत झाला शिकला सवरला, लिहायला लागला वाचयला आणि बोलायला लागला अन्यायाच्या विरोधात आवाज देखिल उठवू लागला पण आपल्याच माणसाचे पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती समाजाला अधोगतीकडे घेऊन गेली त्यामुळेच प्रगतीचे द्वार धनगर समाजाला उघडतां आले नाही ही माझ्या धनगर समाजाची सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
आजकाल धनगर समाजाचे एखादे नेतृत्व पुढे येऊ पाहत असेल तर आपल्याच समाजातील लोक त्याचे पाय ओढून त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात ही खेकडा प्रवृत्ती समाजातून जर नष्ट झाली आणि एकमेकांच्या हातात हात देऊन जर आपण चालत राहिलो तर या देशाचे अर्थकारण, राजकारण, सत्ताकारण आणि समाजकारणाचा केंद्रबिंदू केवळ धनगर समाजच असेल तेव्हा आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, राजा सम्राट अशोकांचे आणि राष्ट्रमाता अहिल्याईंचे स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत धनगर समाजाचे निस्वार्थी, अभ्यासू आणि सक्षम नेतृत्व पुढे येणार नाही तोपर्यंत प्रस्तापितांच्या सत्ताकारणात धनगर समाज असाच पिचत पडेल. त्यासाठी नेतृत्व करणारा नेता हा कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल पण त्या त्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना अथवा पक्षांना प्रथम प्राधान्य देण्यागोदर माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाला सर्वप्रथमता प्राधान्य दिले तर समाजाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. धनगर समाजाचे भांडवलीकरण करून जर कोणी नेता स्वताचा स्वार्थ साधत असेल तर त्या नेत्याला डोक्यावर घेण्याऐवजी त्याला पायाखाली घ्यायला समाज मागेपुढे पाहणार नाही त्यासाठी समाजप्रबोधन आणि समाज जागृती फार महत्वाची ठरते. धनगर समाजाच्या संघटनात्मक बाबी या कुमकवत असल्या कारणाने धनगर समाजाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामध्ये पुणे-मुंबई सारख्या शहरातील धनगर समाज सोडला तर खेड्यापाड्यात डोंगरदऱ्यांतून शेळ्या मेंढ्याची राखण करणाऱ्या धनगर समाजाला अनेत समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी धनगर समाजाचे संघटन मजबूत असायला हवे. धनगर आरक्षण, मेंढपाळांच्या समस्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्राबाबतचे प्रश्न, महिला सबलीकरण अशी एक ना अनेक आवाहने धनगर समाजासमोर असताना समाजातील युवकांनी स्वतावरती जबाबदारी घेऊन एकत्रित येऊन समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे.
आजकाल फेसबुक व्हाटसपच्या माध्यमातून पाहत असताना निदर्शनास आलेली गोष्ट म्हणजे धनगर समाजात पोटजातीचं विष विनाकारण कालवले जात आहे ते कुठेतरी थांबावयास हवं अन्यथा एकसंघ होऊ पाहणारा धनगर समाज पोटशाखांमध्ये विखूरला जाईल व भविष्यात एकत्रित नसल्याचा फटका अखंड धनगर समाजास सोसावा लागेल. पोटजाती भेद थांबवा असे सांगणाऱ्या जेष्ठ लेखकांना, समाजप्रबोधक, विचारवंताना शिवीगाळ करण्याचे प्रकार थोरले श्रीमंत सुभेदार मल्हारराजे होळकरांच्या मावळ्यांना शोभत नाहीत कृपया ते समाजहीतासाठी थांबवावेत. आजच्या पिढीला पोटशाखांच्या नावाखाली विनाकारण भडकवले जात आहे त्यामुळे सळसळत्या रक्ताचे तरूण भरकटताना दिसत आहेत ही फार मोठी शोकांतिका असून त्यासाठी युवा वर्गाने पोटशाखा भेद टाळून आंतरपोटजातीय विवाह करून धनगर समाजाला एकत्रित करण्यासाठी योगदान द्यावे व त्यास समाजातील विवीध संस्था तसेच संघटनांनी प्रोत्साहन द्यावे. असे केले तर नक्कीच समाजात जागृती होईल समाजाचे प्रबोधन होईल व त्यानुसरून धनगर समाज एकसंघ व्हायला फार वेळ लागणार नाही.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com