Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 29 August 2017

सोलापूर विद्यापीठ लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

सोमवार दि.२८ आॅगस्ट २०१७ ला झालेला सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा खरोखर यशस्वी झाला. २१ जुलै २०१४ च्या मोर्चा नंतर सरकारला धनगर समाजाची ताकद पुन्हा एकदा कळाली. २५-५० लांखाच्या संख्येने धनगर समाजाचा मोर्चा सोलापूरात घोषणा देत सरकारचा निषेध करत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तिथे अनेक मान्यवरांची भाषणे झाली. सोलापूर विद्यापीठाला लवकरात लवकर राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यावे असे शासनाला आठ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखंड धनगर समाजाने दिला आहे. आणि सरकारला काहीही करून सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावेच लागेल यात काही वादच नाही. या लढ्यात धनगर समाज सर्व ताकदीने रस्त्यावर उतरला आणि सोलापूर शहर पिवळ्या भंडाऱ्यात न्हाऊन निघाले. सर्व माता-भगिनी, समाजबांधव भर पावसात भिजत आंदोलनात उभे होते.
जेव्हा काल रात्री मी स्वता "ही तर येणाऱ्या वादळाची पूर्वसुचना आहे" या आशयाचा पहिला ब्लाॅग लिहला  त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव व पद वापरले नव्हते. केवळ धनगर समाजाच्या नेतृत्वामुळेच अहिल्या कन्यांमुळे आणि तुम्हा आम्हांमुळे मोर्चा यशस्वी झाला असे लिहले व यापुढेही असेच एकत्रित येऊन सरकारला गुडघ्यावर आणू शकतो असेदेखिल सांगितले. परंतू काहीजनांनी बोहल्यावर चढल्यासारखे आपापल्या नेत्यांची नावे पुढे करून मोर्चाचा श्रेयवाद उकळायचा प्रकार चालवला, तर काही जाणकारांनी जाणूनबुजून काहीजनांची नावे डावलली म्हणून त्यासंदर्भात केलेला हा लेखप्रपंच....
सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढ्यासाठी सर्वप्रथमता पहिली उडी घेतली ती यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेनेच... सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यावे यासाठी मोटारसायकल रैली व मोर्चा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने आयोजित करणार आहोत असे शुक्रवार दि.२६ मे २०१७ रोजी नेपतगाव ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे सर्वप्रथमता कोकरे साहेबांनी त्यांच्या भाषणातून जाहिर केले होते. त्या कार्यक्रमास मी स्वता उपस्थित होतो, पंढरपूर चे विठ्ठल नाना, मोहोळचे संजय(आण्णा) क्षीरसागर, सामाजिक विचारवंत मा.निवांत कोळेकर सर, यशवंत सेनेचे सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब, अभिनेता टिंग्या अर्थात यशवंत युवा सेनेचे युवकप्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर तसेच धनगर समाजातील अन्य नेते देखिल उपस्थित होते. त्यानंतर अनेक ठिकाणी पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, बीड, कोल्हापूर येथे ज्या ज्या ठिकाणी अहिल्याई जयंती निमित्त कोकरे साहेब व्याख्यानासाठी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी जेष्ठ नेते आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये समाजबांधवांना, युवकांना सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढ्यात, मोटारसायकल रैली व मोर्चात सहभागी होण्यास आवाहन केले होते. धनगर समाजातीलच काही मोर्चांमुळे यशवंत युवा सेनेने दोन वेळा विद्यापीठ नामांतरण लढ्याचे नियोजन लांबवले होते. पण जेव्हा दि. ०९ आॅगस्ट रोजी विद्यापीठ प्रशासन व्यवस्थेचा कारभार चव्हाट्यावर आला त्याचदिवशी स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब (सरचिटणीस यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य) तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिळून सोलापूर जिल्हा मुख्याधिकारी निवेदन देऊन १५ सप्टेंबर २०१७ रोजी पंढरपूर-सोलापूर भव्य मोटारसायकल रैली व मोर्चा असे नियोजन आखले होते. त्याचदिवशी सर्वत्र सोशल मिडीयावरती पोस्ट फिरू लागल्या, मोटारसायकल रैली १५ सप्टेंबर ला आयोजित केली असल्याचे समजताच तमाम महाराष्ट्र राज्यातील युवकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत होता. तर दुसरीकडे जय मल्हार युवा मंच महाराष्ट्र राज्य चे मा.सिद्धेश्वर आवारे यांनी देखिल यशवंत युवा सेनेचे मोटारसायकल रैलीचे नियोजन पाहून त्याचदिवशी दुपारी ३:३० विराट मोर्चाचे आयोजन केले होते. परंतू समाजातील काहीजणांनी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्याऐवजी धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढावा असे सुचवले व दि.११ आॅगस्ट रोजी सोलापूर विश्रामगृहात बैठक झाली त्यावेळेस मोर्चा २३ आॅगस्ट ला घ्यायचे ठरले त्या बैठकीसाठी यशवंत युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि यशवंत युवा सेना २३ च्या मोर्चात सर्वताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर जर सरकारने या मागणीची दखल घेतली नाही तर १५ सप्टेंबर ला यशवंत युवा सेनेच्या वतीने पूर्वनियोजित मोटारसायकल रैली व मोर्चा काढणार असल्याचे व सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हायचे असे ठरले आणि जर का सरकारने दखल घेतली तर त्यांच्या या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन म्हणून रैली काढणार असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले. त्यानंतर लगेचच ३-४ दिवसांत मोर्चा २३ च्या ऐवजी २८ आॅगस्ट ला घ्यायचा निर्णय झाला. परंतू २८ नंतर लगेचच १५ सप्टेंबर ला काही दिवसांतच धनगर समाजाला मोर्चात सहभागी होण्यासआवाहन करणे योग्य दिसत नव्हते शिवाय समाजबांधव हे प्रत्येकवेळी नोकरी कामधंदा व्यवसाय सोडून कसे काय मोर्चात सहभागी होणार ? म्हणून १५ सप्टेंबर २०१७ ची मोटारसायकल रैली व मोर्चा रद्द करून दि.१९ आॅगस्ट रोजी मंगळवेढा येथील धनगर समाजाच्या बैठकीत यशवंत युवा सेनेने निर्णय घेतला की यशवंत युवा सेना सर्व ताकदीने २८ मोर्चात सहभागी होणार. त्यावेळी मंगळवेढा येथील बैठकीस प्रा.शिवाजीराव बंडगर सर, परमेश्वर कोळेकर, यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.सचिन होनमाने सर, सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा.उमेशराजे अनुसे, मा.अवधूत वाघमोडे साहेब तसेच धनगर समाजबांधव मोठ्या उपस्थित होते.
त्यानंतर यशवंत युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वजण बैठका आयोजित करून, सोशल मिडीयावरती विराट मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करत होते. जय मल्हार युवा मंचचे संस्थापक सिद्धेश्वर आवारे साहेब यांनी देखिल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले, यशंवत सेना सोलापूर (रजि.) चे मा.स्वप्निल हुक्के तसेच कार्यकर्त्यांनी सोलापूर विद्यापीठावर प्रतिकात्मक बॅनर लावून विद्यापीठाचे नामांतरण केले. यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी अहमदनगर, सोलापूर तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातही मोर्चाच्या संदर्भात बैठका घेऊन जास्तीत जास्त समाजबांधवांना मोर्चात सहभागी होण्यास आवाहन केले. त्यानंतर शनिवार दि.२६ आॅगस्ट रोजी मा.सिद्धेश्वर आवारे यांनी मुंडण करून जातीयवादी सरकारचा निषेध केला. त्याचा परिणाम असा झाला की राज्यातील सामाजिक वातावरण तापले गेले. व्हाटसॲप, फेसबुक, ट्वीटर, इंन्स्टाग्राम तसेच ब्लाॅगस्पाॅटच्या माध्यमातून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त समाजबांधवांपर्यंत मोर्चा संबंधी माहिती पोहचवण्यात आली. मग त्यामध्ये साप्ताहिक घोंगडी चे संपादक मा.बंडू खांडेकर साहेब, साप्ताहिक महालिंगरायाचे संपादक प्रा.नागेश मासाळ सर, माणदेश नगरी, दामाजी इ.वृत्तपत्रासह सोशल मिडीया अगदी हादरवून सोडणारे समाजातील जेष्ठ विचारवंत मा.बापूसाहेब हटकर,  यशंवत सेनेचे सरचिटणीस मा.रामभाऊ लांडे साहेब, व्याख्याते अविनाश धायगुडे, निवांत कोळेकर, अवधूत लालगे, श्रावण मोटे, संदिप (दादा) बादड, यशवंत युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा.उमेशराजे अनुसे यांनी सोशल मिडीयावर जोरदार प्रचार व प्रसार त्याचप्रमाणे आटपाडी तालुक्यात सकल धनगर समाज बैठकीचे आयोजन केले होते. ज्ञानेश्वर काळे, मा.संतोष वाघमोडे साहेब, मा.रोहित पांढरे, मधूकर हाके, अक्की बर्वे, अशोक खरात, राजू वीर, शेखर बंगाळे, स्वप्निल हुक्के, राहूल सलगर, सुरेश भावले, निवांत कोळेकर सर, प्रशांत खटके, किरण सोनवलकर, विक्रम ढोणे, राम जवान राहूल वावरे, प्रशांत खटके, आबासाहेब भानवसे, संतोष खाताळ, अविनाश कोळेकर, अविनाश मेटकरी तसेच ज्ञात अज्ञात सर्व समाजबांधवांनी आपापल्या परीने सर्वोतोपरी मदत करून मोर्चा यशस्वी केला होता. मोर्चाच्या काही दिवस अगोदर तमाम युवकांनी तीव्र इच्छा व्यक्त केली होती की युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर यांनी देखिल या मोर्चात सहभागी व्हावे जेव्हा पडळकर साहेब यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे अशी मागणी केली तेव्हा काहीजनांनी त्यांच्यावर समाजातीलच विरोधकांनी टिकाचिप्पनी करत मोर्चात त्यांनी हे उद्योग बंद करून मोर्चात सहभागी व्हावे असेही लिहायला मागेपुढे पाहिले नाही. पण भाजपचे स्टारप्रचारक असताना देखिल सर्वप्रथमता समाज आणि नंतर पक्ष या विचारप्रमाणे सोलापूर येथिल भव्य विराट मोर्चात सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन देखिल केले व ते म्हणाले की इतर विद्यापीठांना महापुरूषांची नावे देताना जातीय तेढ निर्माण झाली नाही मग या विद्यापीठाला नाव देतानाच जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणाऱ्यांना/कुलगुरूंना वेड लागले आहे की काय? शिवाय गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे बंधू सांगली जिल्हा समाजकल्याण सभापती मा.ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी मोर्चासाठी येणाऱ्या अहिल्या भक्तांसाठी वीस हजार लिटर बिस्लेरींची व्यवस्था देखिल केली होती. मोर्चामध्ये धनगर समाजाचे पितामह जेष्ठ नेते आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब, लोकनेते आण्णासाहेब डांगे, माजी आमदार प्रकाश (आण्णा) शेंडगे, आमदार राम वडकुते साहेब, आमदार रामहरी रूपनर साहेब, आमदार नारायण(आबा) पाटील, मा.संजय(आण्णा) क्षीरसागर, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष मा.विश्वासराव देवकाते (नाना पाटील), मा.शशिकांत तरंगे साहेब, मा.उत्तमराव जानकर, मा.अर्जून दादा सलगर, मा.सुरेश(भाऊ) कांबळे तसेच मा.रामभाऊ लांडे, मा.सिद्धेश्वर आवारे, स्वता मोर्चाप्रसंगी स्टेजवरून सुत्रसंचालन करणारे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब हे देखिल तमाम यशवंत युवा सैनिकांच्या फौजफाट्यासह मोर्चात सहभागी झाले होते. यशवंत युवा सेनेचे पदाधिकारी हे स्वताहून स्वयंसेवकासारखे या मोर्चात काम करत होते त्यामध्ये बिरूदेव शिंगाडे, ॲड.रविकिरण कोळेकर, उमेशराजे अनुसे, अवधूत वाघमोडे, बालाजी सलगर तसेच अन्य ज्ञात अज्ञात कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाला आठ दिवसाचे अल्टिमेटम दिले असून जर आठ दिवसांत यावरती निर्णय झाला नाही तर यशवंत युवा सेनेच्या वतीने उग्र आंदोलन करून सोलापूर विद्यापीठाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे यांनी दिला आहे.
मोर्चात सहभागी होऊन मोर्चा यशस्वीरित्या पार पाडला आणि सरकारच्या पायाखालची वाळूच सरकली त्यामुळे या मोर्चात सहभागी झालेल्या सर्व मोर्चेकऱ्यांचे, अहिल्याईंच्या लेकींचे व सर्व यशवंत मावळ्यांचे, माता-भगिनींचे हर्दिक अभिनंदन व आभार.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
आपलाच,
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Monday 28 August 2017

ही तर येणाऱ्या वादळाची सुरवात आहे...


आज सोमवार दि.२८ आॅगस्ट २०१७ रोजी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण लढ्यात महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधव एकवटला होता. जिकडे पहावे तिकडे सोलापूर शहर अगदी पिवळे पिवळे झाल्याचे दिसून येत होते. सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असे विधान शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी केल्याने धनगर समाज बांधवांच्या भावना भडकल्या आणि स्वता लोकप्रतिनिधींनी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा अपमान केल्याने धनगर समाजाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा आयोजित केला होता. लाखोंच्या संख्येने धनगर समाजबांधव, माता-भगिनी, समाजातील सर्व संघटना तसेच सर्व पक्षातील धनगर समाजातील तसेच धनगरेत्तर नेते या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य सरकार हे नेहमीच धनगर समाजाच्या मांगण्याचा कधीच विचार करत नाही परंतू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत अधिकार दिल्याने आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी लाखोंच्या संख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरला व एकप्रकारे सरकारला दाखवून दिले की आम्ही अजूनही संघटित आहोत. एखाद्याला सत्तेत कसं आणायचं अथवा सत्तेतून खाली कसं खेचायचं हे आम्हाला चांगलं जमतं. जर या गोष्टींची तात्काळ अंमलबजावणी होत नसेल तर आज जसा शांततेने मोर्चा काढला होता तसा भविष्यात शांत राहणार नाही. मोर्चाला उग्र स्वरूप कसे आणायचे हे आम्हाला चांगलेच कळते. त्यामुळे राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव देऊन विद्यापीठाचा सन्मान करावा अन्यथा धनगर समाजातील युवा वर्ग शांत बसणार नाही मग होणाऱ्या परिणामास राज्य सरकार व प्रशासन व्यवस्था जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
स्त्री शक्ती ही महान शक्ती आहे त्यामुळे अहिल्याईंच्या लेकी अशाच मोर्चात सहभागी होत राहिल्या तर सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू. त्यामुळे समाजबांधवांनी जास्तीत जास्त माता-भगिनी मोर्चात कशा सहभागी होतील त्यासाठी प्रयत्नशील राहावे व अशीच धनगर समाजाची एकजूट दाखवावी ही नम्र विनंती. आजच्या या विराट मोर्चात प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या सर्व अहिल्या कन्यांचे, माता-भगिनींचे, समाजबांधवांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
आपलाच,
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com