Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 27 December 2016

हे राष्ट्र पिवळे व्हावे

तलवारीला कळते
              तलवारीचीच भाषा ।।
रक्तातच आहे धनगरांच्या
        स्वाभिमानाची परिभाषा ।।
हे अखंड राष्ट्र पिवळे व्हावे
आता हीच आमची अभिलाषा ।।
      ✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

Monday 26 December 2016

मावळे यशवंतराजे होळकर यांचे


कटू सत्य

आजचा भोंगळ राज्यकारभार करणाऱ्या सत्तापिपासू नेत्यांच्या डोक्यात जर
 "जगातील एकमेव आदर्श राज्यकर्ती आणि प्रशासनकर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रामाता अहिल्याई होळकर"
यांचे विचार पेरले असते तर भारत कधीच महासत्ता देश बनला असता.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
      ✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

मातोश्रींसाठी धावले अहिल्याईंचे मावळे

*मातोश्रींसाठी धावले अहिल्याईंचे मावळे*
दि.२५ डिसेंबर २०१६
काल रात्री दि.२४ डिसेंबर २०१६ रोजी "आम्ही छत्रपती" या व्हाटसप च्या ग्रुपमद्ये चर्चा करत असताना सामाजिक कार्यकर्ते मा.गजानन (भाऊ) ठोंबरे यांनी फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर येथील मेन चौकातच बेवारस अवस्थेत व धूळ पडलेल्या मातोश्रींच्या अर्थातच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या पुतळ्याबद्दल चर्चा केली व समाजाबद्दल खंत व्यक्त केली की ज्या *राष्ट्रमाता अहिल्याईंनी स्वताची संपत्ती खर्ची घालून लोकोपयोगी कामे केली, धरणे बांधली, बंधारे, बारवे, तलाव, विहरी, नदीवरती घाट, वाटसरूंसाठी आश्रमशाळा, उपहारगृह, बारा ज्योतिर्लिंगांचा जिर्नोद्धार, खाजगीतला निधी वापरून जनतेची, गोरगरीबांची विकासकामे केली, शेतकऱ्यांसाठी शेततळे, कणसांनी भरलेली शेती पशू-पक्षासांठी खुली करून त्यांची भूक भागवली एवढेच नव्हे तर पाण्यातील जीवांना देखिल नियमितपणे खाद्य टाकून त्यांची भूक भागवणारी लोकजननी पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्याई होळकर*. जगासमोर एक आदर्श राज्यकर्ती आणि आदर्श प्रशासनकर्ती स्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायमाऊलीचा, लोकजननीचा पुतळा असा धूळ खात आणि पडझड झालेल्या अवस्थेत पडत असेल तर तो माझ्या धनगर समाजाला लागलेला एक कलंक आहे आणि यावरून आपण कसे काय म्हणू शकतो की माझा धनगर समाज जागा झाला आहे ?? त्यापेक्षा मेलेला बरा असे गजानन (भाऊ) ठोंबरे यांच्याप्रमाणेच मलाही वाटते. ग्रुपमद्ये अशी चर्चा झाल्यानंतर त्याच मद्यरात्री मी लगेच पश्चिम महाराष्ट्रातील यशवंत युवा सेनेचे सक्रीय समाजसेवक माळशिरसचे सुपुत्र मा.सचिन शेंडगे साहेब यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली व फोंडशिरस येथील राष्ट्रमाता अहिल्याईंच्या स्मारकाबद्दल त्यांना सांगितले त्यानंतर स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेबांशी मी या सदर घटनेबाबत चर्चा केल्यानंतर *मद्यरात्रीच लातूर वरून यशवंत युवा सेना प्रमुख मा.कोकरे साहेब व सांगली जिल्हा संपर्क प्रमुख मा.राजू वाघमोडे साहेब माळशिरस च्या दिशेने मार्गक्रमण झाले* सामाजिक कार्यकर्ते मा.सचिन शेंडगे साहेब यांनीही लगेच मद्यरात्रीच सर्व यशवंत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी फोनवरती संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली असता आज दि.२५ डिसेंबर २०१६ रोजी दुपारी बारा वाजता यशवंत युवा सेनेचे सर्व पदाधिकारी हे यशवंत युवा सेना प्रमुखांच्या अद्यक्षतेखाली फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापुर येथे एकत्रित आले तेव्हा तेथिल स्थानिक कार्यकर्ते मा.भिसे साहेब, मा.पांडूरंग शेंडगे तसेच मोंडशिरस गावातील समाजबांधव सुद्धा तेथे उपस्थित होते तेव्हा तेथील स्मारकाची पाहणी केल्यानंतर यशवंत युवा सेना प्रमुख मा.कोकरे साहेबांनी खंत व्यक्त केली की ज्या मातेने प्रजेला पोटच्या लेकराप्रमाणे जपून जनहिताची कामे केली त्याच मायमाऊलीच्या पुतळ्याची अशी बिकट अवस्था होत असेल तर आम्हाला अहिल्याईंचे वारसदार म्हणून जगण्याचा कोणताही अधिकार नाही. राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या राज्यकारभाराचा आणि प्रशासन व्यवस्थेचा आदर्श अख्ख्या जगाने घेतला असून त्याआधारावरती इतर देश प्रगतीपथावर पोहचत असताना ज्या मातीत अहिल्याई जन्माला आल्या त्याच भारताच्या परिणामी महाराष्ट्र राज्याच्या मातीत अहिल्याईंचे विचार ज्यांच्या डोक्यात बसत नाहीत तर ती डोकी काय कामाची? असे मला वाटते. त्या मायमाऊलीच्या, राष्ट्रमातेच्या पुतळ्याची ही अवस्था पाहिली तर जिथे असतील तिंथे खुद्द राष्ट्रामाता अहिल्याईंना देखिल लाज वाटत असेल की अरे कोणत्या समाजात जन्म घेतला म्हणून...??
स्व.बी.के.कोकरे साहेबांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मा.सचिन शेंडगे साहेब, माळशिरस तालुका यशवंत युवा सेना प्रमुख मा.आबासाहेब बगाडे, माळशिरस तालुका संपर्क प्रमुख मा.सचिन मोटे, तालुका  विद्यार्थी आघाडी प्रमुख मा.रणजीत शेंडगे तसेच *फोंडशिरस गावचे सामाजिक कार्यकर्ते मा.भिसे साहेब, मा.पांडूरंग शेंडगे तसेच गावातील समाजबांधव या सर्वांनी मिळून तेथिल सुशोभिकरणासाठी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला व राष्ट्रमाता अहिल्याईंच्या स्मारकाच्या कटड्याच्या झालेल्या पडझडीबाबत पुढील दोन दिवसात निर्णय घेऊन त्याचा कायापालट करून सुशोभिकरण करणार* असल्याचे अहिल्याईंच्या स्मारकास हार अर्पण करणाऱ्या मा.भिसे साहेब व मा.पांडूरंग शेंडगे यांनी यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांना  सांगितले. त्यादरम्यान माळशिरस तालुका यशवंत युवा सेनेची बैठक देखिल पार पडली व महाराष्ट्र राज्यातील अशा अनेक बेवारस स्थितीत पडलेल्या पुतळ्यांची माहिती मिळवून तेथील सुशोभिकरणासाठी यशवंत युवा सेना कटीबद्द असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले त्यावरती माळशिरस तालुका यशवंत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी संमती दर्शवली.
*यशवंत युवा सेना मद्ये काम कराणारा प्रत्येक कार्यकर्ता हा कोणत्याही राजकीय नेत्यांची दलाली करून नव्हे तर  स्वताच्या खिशातील पैसा खर्च करून निस्वार्थीपणे समाजासाठी झटत असतो आणि झगडत असतो* समाजाचा सर्वांगीण विकास करून समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणे हेच एकमेव उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवून तो यशवंत सैनिक कार्य करत असतो मग त्यापाठीमागे कोणतेही राजकारण, समाजकारण अथवा अर्थकारण नसते तर असती ती फक्त सामाजिक बांधिलकी व जबाबदारी आणि *यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते हे सामाजिक बांधिलकीसाठी पात्र आहेत कारण ते सर्व गुण यशवंत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमद्ये आहेत* असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. काही उलट्या खोपडीचे भावनेच्या आवेगाने (इतरांनी शिकवल्याने) विचार न करताच लिहून जातात की राजकीय नेत्यांची दलाली करणाऱ्यांनी खोटे समाजप्रेम दाखवू नये कारण ते समाजकारण, राजकारण जास्त काळ टिकत नाही पण यांत दलाली तर कुठेच दिसून येत नाही उलट महाराष्ट्र राज्यात एकमेव "यशवंत युवा सेना" अशी संघटना आहे की ती समाजकारण अथवा राजकारण करत नाही तर ही संघटना स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारधारेवर चालते ती कोणत्याही राजकीय नेत्यांची दलाली करत नाही आणि करणारही नाही तर उलट *आपल्याच धनगर समाजातील नेत्यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी "यशवंत युवा सेना" संघर्ष करते आहे आणि आपल्याच धनगर नेत्यांना आपण मानसन्मान देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करत आहे मग तो नेता कोणत्याही पक्षाचा असो.* तसेच आपल्या धनगर समाजातून अनेक नवनविन नेतृत्व घडविण्यासाठी आणि ते बळकट करून विधानभवनात आणि संसदेत आमदार/खासदार यांचा टक्का कसा वाढवतां येईल यादृष्टीने "यशवंत युवा सेना" कार्य करत आहे. त्याचप्रमाणे आता येऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर जास्तीत जास्त धनगर समाजाचे उमेद्वार निवडून देता येतील यासाठी यशवंत युवा सेना प्रयत्नशील असून त्यातूनच समाजाचे प्रश्न सोडवता येतात आणि *यशवंत युवा सेनेने पिवळा भंडारा उधळून जे सामाजिक कार्य हाती घेतले आहे त्यासाठी अखंड अविरतपणे संघर्ष करून समाजाचे प्रश्न सोडवणार आहे* त्यामुळे उलट्या खोपडीच्यांनी त्यांची उर्जा व्यर्थपणे खर्च न करता यशवंत युवा सेनेच्या माद्यमातून समाजकार्यासाठी हातभार लावावा ही विनंती.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
     *✍️️नितीनराजे अनुसे✍️️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday 15 December 2016

*आमचं आस्तित्व कोणी नाकारू शकत नाही.* ✍️️✍️️✍️️

*आमचं आस्तित्व कोणी नाकारू शकत नाही.* ✍️️✍️️✍️️
मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या टोकावर शत्रुंना नाचवणाऱ्या थोर महापुरूषांच्या जातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी त्यामुळे आमचे आस्तित्व कोणीच नाकारू शकत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. ज्याला भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते असा रणझुंजार लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शुरत्वाची दखल सुरूवातीला पेशव्यांनी घेतली गेली नव्हती, त्यांचे नेतृत्व, रणांगणावरती लढायची मर्दानगी ही  पेशव्यांना व पेशव्यांचे सरदार असलेल्या शिंद्यांच्या डोळ्यात खुपत होती पण जेव्हा धार मधील पवारांच्या समर्थनार्थ महाराजा यशवंतराव होळकर यांनी तलवार गाजवली तेव्हा माळव्यात यशवंतराव होळकर यांचा दबदबा वाढू लागला पुढे पुण्यात आल्यावर शिंद्यांच्या आणि पेशव्यांच्या सैन्याचा धुव्वा उडवल्यानंतर पळपुटा पेशवा कोकणात पळून गेला तद्नंतर सातारच्या छत्रपतींना शुरवीर दुसरे मल्हारराव होळकर यांचा पुत्र राजराजेश्वर खंडेराव होळकर यांच्या नावाने सुभेदारीची वस्त्रं देणे भाग पडले अर्थातच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या योद्ध्याची महाराजा यशवंतराव होळकर यांची दखल पेशव्यांना आणि सातारच्या छत्रपतींना घ्यावी लागली होती हे इतिहास साक्ष आहे.
आजपर्यंत या महाराष्ट्र राज्यातील राजकारणात धनगर समाजाची दखल कोणीच घेत नव्हते मग माजी राज्यमंत्री स्व.शिवाजी(बापू) शेंडगे व माजी राज्यमंत्री मा.आण्णासाहेब डांगे सोडले तर धनगर समाजाला सत्तेत वाटा नव्हताच पण या दोघांनाही राजकारणातून संपवायचे षड्यंत्र प्रस्तापितांनी रचले व त्यांना राजकारणातून थोडक्यात हद्दपारच केले. पण जेव्हा हक्काच्या आरक्षण अंमलबजावणी साठी अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज बारामती मद्ये केवळ पाच ते सहा लाखांच्या संख्येने एकत्रित आला होता तेव्हा धनगर समाजाची काय ताकद आहे याचा प्रत्यय २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत प्रस्तापितांनी उपभोगला. जातीयवादी आघाडी सरकारला घरात बसवून धनगर समाजाने भाजप सत्तेत आणले ते एकगठ्ठा मतदान करूनच यामुळे सरकारला धनगर समाजाची दखल घ्यावी लागली आणि आज धनगर समाजाचे दोन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातही आहेत तर कधी इतिहासांत नव्हे ते एक खासदार राज्यसभेवर घ्यावा लागला त्यामुळे धनगर समाजाचे आस्तित्व कोणी नाकारू शकत नाही हे सर्वांना कळालेच असेल. तशीच परिस्थिती आज पाहायला मिळाली ती म्हणजे केवळ महाराष्ट्र राज्य नव्हे तर अखंड भारतातील एकाही साहित्यसम्मेलनात धनगर समाजातील साहित्यकारांना आणि धनगर समाजाच्या अफाट साहित्याला कधीही मानाचं स्थान मिळाले नाही अर्थातच धनगर समाजाच्या साहित्यकारांना आणि धनगर समाजाच्या अफाट साहित्याच्या बाबतीत दुजाभाव करण्यात आला, पण जेव्हा सोलापुर येथे दि.७ व ८ जानेवारी २०१७ रोजी जगातील पहिल्या आदीवासी धनगर साहित्य सम्मेलनाचे आयोजन केले असल्याचे जाहीर केले आणि त्याची चर्चा राज्यभर व्हायला लागली तेव्हा *डोंबीवली येथे होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसम्मेलनाच्या अध्यक्षपदी  साहित्यिक अक्षयकुमार काळे सर नावाच्या एका धनगर समाजाच्या साहित्यकाराला संधी दिली असल्याचे जाहीर झाले म्हणजेच धनगर समाजाची दखल मराठी साहित्यिकांना घ्यावी लागतेय* याचे हे जिवंत उदाहरण. ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन अद्यक्षपदी निवड झालेबद्दल मा.अक्षयकुमार काळे सर यांचे मी सर्वप्रथमता अभिनंदन करतो.
 भविष्यात महाराष्ट्र राज्याच्या तथा भारताच्या राजकारणात, समाजकारणात, सत्ताकारणात धनगर समाजाला विचारल्याशिवाय काहीच साद्य होणार नाही हे त्रिकासबाधीत सत्य असून आरक्षणाच्या बाबतीत जरी सद्याचे फसणवीस सरकार वेळकाढूपणा करत असेल, खोटी आश्वासने देत असेल अथवा संशोधनाचे निमित्त लावून अंग काढून घ्यायचा प्रयत्न करत असेल तर धनगर समाजाला आपल्या औकातीवर यायला वेळ लागणार नाही आणि मग पेटून उठलेला अखंड धनगर समाज उभा महाराष्ट्र कधी पेटवून टाकेल हे सांगणे अशक्य आहे आणि याची जाणीव प्रस्तापितांना आहेच त्यामुळे लवकरात लवकर धनगर समाजासाठी अनुसुचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करावी लागणारच आहे नाहीतर मग *आमचं आस्तित्व कोणीच नाकारू शकत नाही हे सर्वांना माहित तर आहेच पण ते त्रिकालबाधित सत्य आहे हे विसरून चालणार नाही*
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
      ✍️️*नितीनराजे अनुसे*✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

दुष्काळातही वाहतोय विकासाचा निर्मळ झरा

 
          स्वार्थाने बरबटलेल्या या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अखंड भारतभूमित सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी निस्वार्थीपणाने झटणाऱ्या व झगडणाऱ्यांची संख्या तशी बोटावर मोजण्याइतपतच आहे त्यातीलच एकमेव जिवंत उदाहरण म्हणजे सर्वसामान्याचा नेता, रणझुंजार जिगरबाज लढवय्या, पडळकरवाडी गावचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याची मुलूख मैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे बंधू मा.श्री.ब्रह्मानंद (शेठ) पडळकर. एकच ध्यास, जनतेचा विकास या ध्येयाने पछाडलेलं एक उमदं नेतृत्व म्हणून अख्ख्या महाराष्ट्र राज्याचं लक्ष वेधून घेणारा धडाडीचा तरून, नुसतंच धडाकेबाज वक्तृत्व नव्हे तर सोबतच निडर नेतृत्व अंगिकारलेला एक सर्वसामान्य कुटूंबातील जन्माला आलेला तळपता सुर्य, ज्याप्रमाणे  सुर्याची किरणे सभोवताली पडतात व त्याच्या लख्ख प्रकाशाने सर्व सृष्टी प्रकाशमय होऊन जाते व अंधार नष्ट होतो त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेच्या हीताचे काम करून जनतेच्या मनात स्वताची एक वेगळीच ओळख करणारा हा तरून तडफदार युवक, जनतेच्या मनामनात असलेला आमदार/खासदार/मंत्री म्हणजेच सर्वसामान्यांचा रांगडा नेता मा.गोपीचंद पडळकर साहेब होय.
खरंतर सांगायची वस्तुस्थिती अशी की सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी तालुकास्थित मौजे झरे या गावाला पाण्याची तीव्र टंचाई भासत होती. असे असताना या गावाला टेंभू योजना असलेल्या कृष्णा-कोयना नदीचे (टेंभूचे) पाणी मिळावे म्हणून अल्पसा सरकारी निधी मिळाला होता पण त्या निधीतून पूर्ण काम झाले नव्हते तर ते अर्धवट झाले होते. कोट्यावधी रूपयांचा निधी येऊनदेखिल प्रस्तापित व्यवस्थेने जाणिवपुर्वक लक्ष दिले नसल्याने या गावावरच नव्हे तर अख्ख्या तालुक्यावर संकट ओढवले होते. पुढील उर्वरित कॅनाॅलचे अर्धे काम रखडल्याने या झरे गावाला पाण्यावाचून वणवण करावी लागत होती, रणरणत्या भर उन्हात पायपीट करून झरे गावातील जनतेला पाण्याची व्यवस्था करावी लागत असे तेव्हा झरे गावाजवळील पडळकरवाडी या गावचे सुपुत्र महाराष्ट्र राज्यातील युवकांच्या गळ्यातील ताइत म्हणून ज्यांची महाराष्ट्र राज्यभर ख्याति अाहे अशी महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे बंधू मा.श्री.ब्रह्मानंद(शेठ) पडळकर हे झरे या गावासाठी देवासारखे धावून आले व त्यांनी रखडलेले टेंभूच्या कॅनाॅलचे उर्वरित काम स्वखर्चाने लवकरात लवकर पुर्ण केले तेव्हा टेंभू योजनेचे पाणी झरे गावच्या ओढ्या-ओघळीने वाहायला लागले, तलाव तुडूंब भरून वाहू लागले एवढेच नव्हे तर त्या पाण्यानं फक्त झरे गावाचीच नव्हे तर आसपासच्या गावांची देखिल तहान भागली, हजारो एकर शेतजमिनी ओलिताखाली आल्या, मुकी जणावरं, पशू-पक्षी देखिल पाणी पिऊन तृप्त झाली. म्हणून रविवार दि.११ डिंसेबर २०१६ रोजी झरे ग्रामपंचायत झरे ता.आटपाडी जि.सांगली व दलित महासंघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने जनतेच्या हीतासाठी झटणाऱ्या झगडणाऱ्या दोन्ही पडळकर बंधूंचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळेस झरे ग्रामपंचायत, दलित महासंघ महाराष्ट्र राज्यचे सर्व पदाधिकारी, आटपाडी तालुक्याचे नेते मा.प्रभाकर पुजारी साहेब, सांगली जिल्हा सोशल मिडीया प्रमुख मा.जयवंत सरगर साहेब, मा.प्रा.विजय वाघमारे (राज्य उपाद्यक्ष दलित महासंघ), आटपाडी तालुका मार्केट कमिटीचे डायरेक्टर मा.विष्णूपंत अर्जून साहेब, मा.राजू(भाऊ) अर्जून, मा.उमेशराजे अनुसे, मा.बिनू (भाऊ) वाघमारे तसेच अनेक मान्यवर युवकसम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व मा.श्री.ब्रह्मानंद (शेठ) पडळकर यांच्या भव्य नागरी सत्कारासी उपस्थित होते.
पाठीमागे काही महिन्यापूर्वीच पडळकर साहेबांनी आटपाडी तालुक्याला मुख्यमंत्र्यांकडून एमआयडीसी मंजूर करून आणली त्याचा लाभ माणदेशातील प्रत्येक घटकाला होणार असून मुंबई-पुणे सारख्या शहरांकडे स्थलांतर करून हमाली करणाऱ्या युवकांना युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी नवसंजीवनीच मिळवून दिली. अशाप्रकारे माणुसकी हरवलेल्या या जगात माणुसकी जपणारी माणसं फार दुर्मिळ आहेत आणि ती माणुसकी युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे बंधू मा.श्री.ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी जपली, तहानेने व्याकुळलेल्या नुसत्या झरे या गावाची नव्हे तर आसपासच्या गावाची, शेतजमिनीची, मुकी जणावरं, पशू-पक्षी तसेच पाण्यावाचून कोमेजलेल्या, वाळून चाललेल्या वृक्ष-वल्लींची तहान भागवून आदर्श प्रशासनकर्ती आदर्श राज्यकर्ती म्हणून जिचा गौरव अख्ख्या जगाने केला त्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा जपण्याचे काम कृतीतून करून दाखवले आणि अहिल्याईंचा वारसा जपणाऱ्यांपैकी तरून तडफदार युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व मा.श्री.ब्रह्मानंद (शेठ) पडळकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचे नाव समोर येते त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच... काहीजणांना वाटले असेल की आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूका आल्यामुळे ही सर्व खटाटोप चालली आहे पण तसे काही नाही तर या गावाला टेंभूचे पाणी पुरवण्यामागे या दोन्ही बंधूंचा शुद्ध हेतू होता तो म्हणजे निस्वार्थीपणाने व माणुसकीच्या नात्यानं या तहानेलेल्या गावाची, मुक्या जणावरांची, पशू-पक्षी-वृक्ष-वल्ली यांची तहान भागवणे बस्स एवढंच बाकी काही नाही.
          म्हणून अशा या निस्वार्थीपणाने झटणाऱ्या झगडणाऱ्या विकासाच्या महामेरूंना अर्थातच दुष्काळात वाहणाऱ्या या निर्मळ झऱ्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या व तमाम जनतेच्यावतीने कोटी कोटी सलाम व मानाचा जय मल्हार. राष्ट्रामाता अहिल्याईंनी देखिल सांगितले आहे की लोकांची अंधारात केलेली कामे उजेडात येतात पण आमच्या माणसांनी उजेडात केलेली कामे ही प्रस्तापित व्यवस्थेकडून, विकाऊ आणि जातीयवादाने बरबटलेल्या प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक मिडीयाकडून ती कामे जास्तच अंधारात ढकलली जातात हे वास्तव सत्य आहे म्हणून आमच्या माणसांनी केलेली कामे उजेडात यावी यासाठी केलेला हा लेखप्रपंच आहे.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
      ✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+918530004123
nitinrajeanuse123.blogspot.com

Sunday 11 December 2016

समाजबांधवांनो फक्त लढ म्हणा

मराठी वांङमय साम्राजावर अधिराज गाजवलेले विख्यात कवि वि.वा. शिरवाडकर उर्फ "कुसूमाग्रज" यांच्या "कणा" काव्यातून प्रेरित होऊन प्रस्थापित यंत्रणेकडून समाजावरती झालेल्या अन्यायाची खंत व्यक्त करताना मला सुचलेल्या काही सुंदर ओळी आणि त्यातूनच समाजप्रबोधन व्हावं हीच प्रामाणिकपणे अपेक्षा...
                -नितीनराजे अनुसे.

ओळखलंत का समाजबांधवांनो मी मोठा नाही कोणी,
तुमच्यातीलच मी सर्वसामान्य गातो महापुरूषांची गाणी.

विचार करत बसलो होतो आजची ही दशा पाहून,
समाजास दिशा द्यावी म्हणतोय बघुया प्रयत्न तरी करुन.

एकाच रक्ताच्या औलादींनी एवढे अत्याचार कसे केले??
अहो आशा दाखवून समाजाला अतोनात लुटले गेले.

विचार नासलेत प्रयत्नही फसलेत प्रस्थापितांच्या नादी लागून,
आमचेच हक्क कसे मिळतील हो प्रस्थापितांकडेच भिक मागून.??

प्रस्थापितांच्या दावणीला जावून समाजाची पार बरबादी झाली,
सुचलं थोडसं शहाणपण म्हणून आमची आजची ही पीढी सावरली.

बुद्धिजीवी वर्गासंगे बांधवांनो अन्यायाच्या विरोधात लढतो आहे,
विस्कटलेल्या समाजाला एकत्रित करून माणसं जोडतो आहे.

वैयक्तिक प्रसिद्दीसाठी नव्हे तर हक्कासाठी मी लढतो आहे,
वैचारिकतेची लढाई लढून समाजासाठी झगडतो आहे.

कपाळी भंडारा लेवून आता नव्या जोमाने लढतोय पुनः
पाठीवरती हात ठेवून समाजबांधवांनो फक्त लढ म्हणा.

       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................

आदीवाशी धनगर समाजाची साहित्य पंढरी

आदिवासी धनगर समाजाची साहित्य पंढरी
ज्या धनगर समाजाने सर्वप्रथम ५००० वर्षांपूर्वी अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरे आज धनगर समाजापासून कोसों दूर गेली ती आता पहिल्या आदीवासी धनगर समाज साहित्यसम्मेलनाच्या माध्यमातून सर्वांसमोर येणार त्याबद्दल सर्वप्रथमता मी त्या सर्वांचे अभिंनदन करतो व आभार मानतो ज्यांनी दि.७ व ८ जानेवारी २०१७ रोजी सोलापूर येथे होणाऱ्या धनगर  समाजाच्या पहिल्या साहित्यसम्मेलनाचे आयोजन केले. साहित्यसम्मेलनाचे संस्थापक अध्यक्ष मा.डाॅ.अभिमन्यू टकले, साहित्यकार मा.अमोल पांढरे साहेब,मा.जयसिंगतात्या शेंडगे तसेच आदीवासी धनगर साहित्यसम्मेलनची सर्व टीम ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेऊन या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन केले त्या सर्वांचे समाजातील एक छोटासा व नवखा लेखक या नात्यानं अभिनंदन करून आभार मानतो. आजपर्यंत आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन, ओबीसी साहित्य सम्मेलन, दलित साहित्य सम्मेलन, मुस्लिम साहित्य सम्मेलन आमुक सम्मेलन तमूक सम्मेलन असेच ऐकत आलो होतो पण धनगर समाजाचे कधी साहित्यसम्मेलन झाले का?? समाजाच्या किती साहित्यिकांना सम्मेलनात मानाचं स्थान होतं?? धनगर समाजात असे कितीतरी साहित्यिकार जन्माला आले असताना त्याचे कधीच मोजमाप झाले नाही अर्थातच धनगर समाजाच्या साहित्याला आणि साहित्यकारांना आजपर्यंत दुजाभाव देण्यात आला ही खरंतर दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. धनगर समाजाचे साहित्य अफाट फार अफाट आहे पण ते कलागुणांच्या माद्यमातूनच पाहायला मिळते त्याचे ऐच्छिक असे साहित्य म्हणावे इतका नाही. आजपर्यंत धनगर समाजाच्या इतिहासावरती, धनगर समाजाच्या जीवनमानावरती, भटकंतीवरती अनेकांनी साहित्य निर्माण केले, चित्रपट काढले पण त्या साहित्याचा माझ्या धनगर समाजाला काही फायदा झाला का?? का नुसतंच धनगर समाजावरती साहित्य लिहून समाजाची सहानुभुती मिळवली पण त्या धनगर समाजाच्या अफाट साहित्याचे जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी त्याबाबतीत कोणतीच ठोस पाऊले उचलली गेली नाहीत याचा अर्थ स्पष्ट असा होतो की धनगर समाजाची जी लोकपरंपरा आहे, जी संस्कृती आहे ती कुठेतरी संपुष्टात आणण्याचे कुटील कारस्थान हे जातीयवादी साहित्यकारांकडून आणि प्रस्थापित व्यवस्थेकडून होत असल्याचेच दिसून येते एवढंच काय तर धनगर समाजाचा इतिहास सुद्धा चुकीचा लिहून तो विकृत करण्याचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते आहे. याचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि हे कुठेतरी थांबायला हवे त्यासाठी धनगर समाजाची संस्कृती, परंपरा, समाजाचे परंपरागत आदीवासी जीवनमान, धनगर समाजाची लोककला, भटकंती, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दुरावस्था हे सर्वच साहित्याच्या माद्यमातून जगाच्या समोर यायला हवे आणि त्या सर्वांचे जतन व संवर्धन व्हायला हवे यासाठी आयोजकांनी सोलापूर येथे दि.७ व ८ जानेवारी रोजी पहिले धनगर आदीवासी साहित्य सम्मेलन आयोजित केले असून धनगर समाजातील जेष्ठ साहित्यकारांना तसेच नवख्या साहित्यकारांना मानाचं स्थान आणि स्वतंत्र व्यासपीठ लाभणार असून त्या दोन दिवशीय साहित्य सम्मेलनासाठी धनगर समाजातील विचारवंत, कवी, लेखक, व्याख्याते, इतिहासकार, ओवीकार, धनगर गजी-ढोल नृत्यकार, धनगर समाजाच्या प्रश्नांचे अभ्यासक तसेच धनगर समाजबांधव या सर्वांनी शनिवार व रविवार दि.७ व ८ जानेवारी २०१७ रोजी सोलापुर येथे उपस्थित राहून पहिल्या धनगर साहित्य सम्मेलनाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
आपलाच एक समाजबांधव
      ✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

आपलेच दात आणि आपलेच ओठ

*आपलेच दात आणि आपलेच ओठ*
हजारो वर्षापेक्षाही अधिक काळ फक्त हिंदुस्थानवर नव्हे तर आशिया खंडावर देखिल प्रभुत्व गाजवलेल्या थोर महापुरूषांच्या जातीत जन्माला आलेले आम्ही त्यांचे भाग्यशाली वारसदार... ना फक्त संस्थानासाठी तर अखंड स्वराज्यासाठी तर कधी या राष्ट्रासाठी अक्षरशा छातीची ढाल आणि मनगटाची तलवार करून पाण्यासारखं रक्त रणांगणात सांडून बलिदान देणाऱ्या शुरवीरांच्या जातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी, एकेकाळी राजा समाज म्हणून थाटात जगणारे आम्ही आज कोणते जगणे जगतोय याचा साधा विचार जरी केला तरी स्वताचीच स्वताला लाज वाटू लागते. मग ही वेळ आली कोणामुळे?? कशामुळे?? आणि का?? याला नक्की जबाबदार कोण?? असे एक ना अनेक प्रश्न मनांत थैमान घालून बसतात तेव्हा ओठांतून नकळतच शब्द फुटतात की या सर्व गोष्टींना माझाच धनगर समाज कारणीभूत आहे, जबाबदार आहे. म्हणूनच सदरचा ब्लाॅग लिहताना *आपलेच दात आणि आपलेच ओठ* हा आशय उचित ठरतो असे माझे वैयक्तिक मत आहे.
गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाज ज्या सवलतींपासून वंचित आहे त्या माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसरशी आजपर्यंत कितीतरी एक ना अनेक मोर्चे माझ्या धनगर समाजाच्या वतीने तहसिल कार्यालय, प्रांत/जिल्हाधिकारी कार्यालय, विधानभवन/ संसदभवन अशा ठिकाणी झाले.  पण एवढे सगळे करूनही आम्हा धनगर समाजाच्या वाट्याला काय आलं ?? नोकरदार वर्गातील माझ्या युवकमित्रांनी, समाजबांधवांनी रजा टाकून खाडे करून मोर्चांना हजेरी लावल्या तर दिवसरात्र पायाच्या नडग्या वाळवत शेळ्या-मेंढ्यांची राखण करणाऱ्या माझ्या वडिलधाऱ्यांनी शेळ्या-मेंढ्यांना  कोंढवाड्यात कोंढून मार्चांना हजेरी लावली त्याचे काय फलित झाले?? दिवसभर ती मुकी जणावरं अन्नपाण्याशिवाय राहीली हेच का त्या मोर्चाचे फलित?? का नोकरीवरती खाडे/रजा टाकल्याने महिन्याखीरी मिळालेला कमी पगार हे त्याचे फलित?? या गोष्टींचा विचार मोर्च्याचे आयोजन करणाऱ्या धनगर समाजातील नेत्यांनी कधी केला होता की नाही कोणास ठाऊक म्हनूनच परवाच्या नागपूर येथील मशाल मोर्चात धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा चा प्रत्यय आला. मला कोणाबद्दल वाइट बोलायचे नाही पण झाला प्रकार तो समाजाला काळीमा फासण्यासारखाच होता. त्याचे कारण असे की ज्या धनगर समाजाने लाखोच्या संख्येने बारामतीसारख्या ठिकाणी एकत्रित येऊन अख्ख्या महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवला त्यानंतर उत्तरप्रदेश मद्येही याच धर्तीवर मोर्चे निघाले मग महाराष्ट्र राज्यात अनेक मुक मोर्चे निघाले, क्रांती मोर्चे निघाले, ॲट्राॅसिटी बचाव मोर्चे निघाले ते धनगर समाजाने काढलेल्या मोर्चाचा आदर्श ठेऊनच. कारण धनगर समाजाने पंढरपूर ते बारामती आरक्षण दींडी यात्रा काढून शांततेच्या मार्गाने ते आंदोलन केले होते तेव्हा पाच ते सहा लाख धनगर समाजबांधव  बारामतीत एकत्रित आला होता पण जर त्या आंदोलनाला वेगळे वळण लागले असते तर आज बारामतीची अवस्था काय झाली असती महाराष्ट्र राज्याची अवस्था काय झाली असती याचा विचार तुम्हीच करायला हवा. पण ज्या धनगर समाजाने आपला आदर्श अख्ख्या महाराष्ट्र राज्यासमोर नव्हे तर अखंड भारत देशासमोर ठेवला त्याच धनगर समाजाच्या मोर्चातून नागपूर सारख्या ठिकाणी माझ्याच धनगर समाजाचे असे धिंदोडे निघावेत हे माझ्यासारख्या सर्वसामान्य समाजबांधवांना अपेक्षित नव्हते.
*खरंतर धनगर समाज पेटून उठला तर उभा महाराष्ट्र पेटवायला फार उशीर लागणार नाही.* अन्यायाच्या विरोधात आम्हालाही लढतां येते, आमच्याही भावनांचे बांध फुटतात, आम्हालाही अन्याय सहन होत नाही त्याचे कारण ही तसेच आहे ज्यांचे रक्त आमच्या नसानसातून सळसळ सळसळ सळसळतंय ते महाराजा यशवंतराव होळकर पुण्याला आले असता पेशव्यांच्या व शिंद्यांच्या कटकारस्थानमुळे पुण्याची काय अवस्था झाली होती?? हडपसर पासून वानवडी आणि पर्वतीच्या पायथ्यापर्यंत पुण्याची दशा न पाहण्याजोगी का झाली होती?? व ज्याला आपण पळपुटा बाजीराव म्हणतो ते पेशवे कोकणात का पळून गेले?? याचा जर रक्तरंजित आणि ज्वलंत इतिहास अभ्यासला तर आजचा धनगर समाज आपल्या औकातीवर आल्यावर काय करू शकतो आणि काय नाही याची भविष्यवाणी करायची गरजही पडणार नाही. पण कोणीतरी म्हंटलंय की खरे शत्रू हे परकीयांमद्ये नसतात तर ते आपल्यातच असतात मग एकवेळ शत्रुंशी लढताना काहीच वाटत नाही पण आपल्याच माणसाशी लढताना फार जड जाते उदा.महाभारतातील कौरवांच्या विरोधात लढताना अर्जूनाची जी अवस्था झाली होती तशीच अवस्था माझ्याच धनगर समाजाची झाली आहे. जिकडेतिकजे आपलेच दिसताहेत मग लढायचं कोणाच्या विरोधात? आपल्यातलेच नेते एकमेकांच्या विरोधात लढायला उभे ठाकलेत. कुठल्यातरी पक्षासाठी, पक्षश्रेष्ठींची धोतरं सांभाळण्यासाठी धनगर समाजाचे भांडवलीकरून, समाजाला त्या लांडग्यांच्या दावणीला बांधून समाजाची दलाली उचलेगिरी करून एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांची जिरवाजिरवी करायचे सर्वत्र चालू आहे आणि जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत तरी माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाचा विकास होऊ शकत नाही. धनगर समाजाने ज्या नेत्यांवर विश्वास टाकला आहे त्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाच्या विश्वासाला धनगर समाजाचे नेते पात्र नाहीत अशी समाजबांधवांची भावना झाली आहे त्यामुळे भविष्यात लोकप्रतिनीधी अडचणीत येऊ शकतात. ज्यांना समाजाने जनतेने विधानसभेत पाठवले, ज्यांना विधानपरिषदा मिळाल्या मंत्रीपदं मिळाली ते माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजामुळेच मिळाले आहे कारण या समाजात जन्माला आला ते तुमचे भाग्य समजा. त्यातल्या ठराविकजणांचा विषय सोडला तर बाकीच्यांनी विधानभवनात, विधानपरिषदेत कधी आरक्षण संदर्भात साधा 'ब्र' देखिल काढला नाही. कितीतरी उन्हाळी पावसाळी हिवाळी अधिवेशने झाली पण भाजप सरकार स्थापण झाल्यानंतर सुरवातीचा काळ सोडला तर नंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा थंडच होत गेला. त्यामुळे साहजिकच धनगर समाजाच्या आमदार/खासदार तसेच मंत्री यांच्यावर धनगर समाजाचा रोष असणार पण आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था असल्याने आपल्याच दाताने आपले ओठ चावले तर त्याचा त्रास आपल्यालाच होत असतो आणि होणारही आहे त्यामुळे आता धनगर समाजातील नेत्यांनी देखिल नुसती आश्वासने देत बसू नये कारण *We are not believe in your statement but now we believe only in implementation regarding our reservation.* आम्ही तुमच्या आश्वासनांवर आता विश्वास ठेवणार नाही तर जे राज्यघटनेत आमच्या हक्काचे अनुसुचित जमातीचे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी धनगर समाजातील नेत्यांनी उर्जा खर्च करावी पण एकमेकांची जिरवाजिरवी करण्यासाठी नव्हे. मग ते आजी माजी आमदार/खासदार असोत, मंत्री संत्री असोत अथवा माझ्या भोळ्या-भाबड्या समाजाचे भांडवलीकरण करून प्रस्थापितांची धोतरं सांभाळणारे नेते असोत त्यांना एक विनंती आहे की बाबांनो तुमच्या स्वार्थासाठी माझ्या समाजाचं भांडवलीकरण करून माझ्या समाजाचे वाटोळे करू नका व माझ्या समाजाची इभ्रत वेशीवर टांगायचा प्रकार करू नका.
*जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे*
            *नितीनराजे अनुसे*
*अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली*
          *+९१७६६६९९४१२३*
*nitinrajeanuse.blogspot.com*

Monday 28 November 2016

एवढे षंढ कसे काय बनलात???


   हा प्रश्न जास्तच जिव्हारी लागणारा आहे हे मला माहीत आहेच... कदाचित काहीजणांना हे पचनी पडणार सुद्धा नाही... काही जणांना हा प्रश्न रुतेल तर कोणी या प्रश्नामुळे खुतेल... पण हा प्रश्न मला एकट्यालाच पडतोय असेही काही नाही. कदाचित तुमच्या आमच्या पैकी स्वाभिमानानं जगणाऱ्यांना नक्कीच हा प्रश्न पडत असावा असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचे कारणही तसेच आहे ते म्हणजे धनगर समाजाच्या दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाची पानं चाळायला जर सुरवात केली तर अक्षरशा अंगावर शहारे येतात, रक्त सळसळू लागतं, नसा (धमन्या) सैरावैरा पळत रक्ताचा पुरवठा संपुर्ण शरीरभर करतात, अहो आहेच आमुचा धनगरांचा गौरवशाली इतिहास असा.... आणि हाच सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास वाचताना जणू काय रणांगणावरती दोन्ही हातात तलवारी घेऊन शत्रुशी झुंज देत असल्याचे वाचक स्वताला समजत असतो, स्वःताच त्या इतिहासातील नायक समजून वाचनाची लढाई लढत असतो. छातीची ढाल करून आणि मनगटाची तलवार करून शत्रुंच्या चारी मुंड्या चित करणाऱ्या थोर महापुरूषांच्या जातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी आहोत असे समजल्यावर, इतिहास वाचल्यावर अभिमानाने छाती भरून येते तेव्हाच खरंतर आमच्यातला स्वाभिमान जागा होतो. पण आजपर्यंत हा आमुचा गौरवशाली इतिहास आम्हापासून लपवून ठेवला, तर काहीजणांनी तो विकृत आणि चुकीचा लिहला त्याचे कारण असे की धनगर समाजाचा जाणूनबुजून विकृत आणि चुकीचा इतिहास लिहणारे इतिहासकारच खरोखर चुकीचेच जन्माला आले होते. असे म्हंटले तरी मला काही वावगे वाटणार नाही.
आज आमचा सत्य आणि रक्तरंजित इतिहास वाचल्यावर, ऐकल्यावर आणि समजल्यावर एकेकाळी राजा समाजात जन्माला आल्याचा अभिमान आम्हाला वाटतो पण दुसरीकडे आताची सद्य परिस्थिती पाहिली तर खरोखरच स्वतालाच त्याची लाज वाटते असे का बरं??? त्याचे कारण असे की आमच्याच काही लोकांनी स्वताचा स्वाभिमान दुसऱ्यांच्या पायाखाली गहाण टाकल्याने धनगर समाजावर ही वेळ आली आहे. स्वाभिमान काय असतो हेच कळले नसल्याने आजपर्यंत धनगर समाजातील नेत्यांनी प्रस्थापित मस्तवाल नेत्यांची चमचेगीरी केली समाजाची दलाली करून समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम हे स्वार्थाने बरबटलेल्यांनी केले कदाचित त्यांना आपल्या ज्वलंत इतिहासाची जाण नसावी. प्रस्तापित नेत्यांची चाकरी करून गुलामी करून फक्त ग्रामपंचायती सोसायट्या आणि पंचायत समिती व जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या पलिकडे मजल मारायची हिम्मत आजपर्यंत धनगर समाजात कधी कोणाची झालीच नाही फक्त बोटावरती मोजण्याइतपत आमदार सोडले तर.... अंगी हत्तीचे बळ असणाऱ्या, थोर महापुरूषांचा वारसा लाभलेल्या आणि करोडोच्या संख्येने असताना देखिल प्रस्तापितांनी टाकलेल्या तुकड्यांवर जगायची सवय लागलेली असल्याने आमच्या धनगर समाजात नेतृत्वाचा अभावच राहिला याची शोकांतिका वाटते. राजकारण समाजकारण हे आपलं काम नव्हे तर ते पवार पाटील देशमुख ठाकरेंनीच करावे ते आपले काम नव्हे असे म्हणत षंढ राहून थंड बसणाऱ्या औलादींना आमचा खरा इतिहासच कधी समजला नाही हे सर्वात मोठं दुर्दैव....
षंढ राहून थंड बसण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात बंड करून गुंड झालेले बरे असे समजून संघर्षातून मार्ग काढत राजकारण आणि समाजकारण करणारे आज अग्रेसर होत चालले आहेत हे नाकारून चालणार नाही आणि हे चित्र आज महाराष्ट्राच्या राजकारणातही दिसतंय पण एवढंच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत धनगर समाजाचं नेतृत्व असून चालणार नाही तर त्यासाठी समाजातलं बंडखोर नेतृत्वही उदयास यायला हवं पण ते धनगर समाजातील नेत्यांचे पाय ओढणारं नसावं...  त्यासाठी इतिहास सुद्धा तितकाच अभ्यासायला हवा. ज्याला भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते असा छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर लढणारा योद्धा, सर्व काही संपले असताना पुन्हा शून्यातून स्वताचं साम्राज उभा करत अजिंक्य मानल्या जाणाऱ्या कवायती आणि शिस्तबद्ध फौजेची इभ्रत वेशीवर टांगणारा, इंग्रज अधिकाऱ्यांना अक्षरशा गुढगे टेकायला भाग पाडणारा व इंग्रजांना १९ लढायांमद्ये धूळ चारून त्यांच्या सैन्यांना कापून काढणारा एकमेवाद्वितीय धुरंदर लढवय्या व छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वताचा राज्याभिषेक करवून घेणारा महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी वाफगाव ता.खेड जिल्हा पुणे येथे ३ डिसेंबर रोजी त्यांच्या २४१ व्या जयंती निमित्त उपस्थित राहून तेथिल माती कपाळाला लावाल तर तुम्हाला नेतृत्वासाठी, राजकारणासाठी कुठल्या प्रस्तापित मस्तावलेल्या नेत्यांकडे भिक मागायची वेळ येणार नाही. एवढी ताकत त्या वाफगाव च्या मातीत आहे. वाफगावची माती ही नेतृत्वासाठी प्रेरणा देणारी आहे स्फूर्ती देणारी आहे त्यातूनच नवचैतन्य निर्माण होते त्या प्रेरणाभूमित गेल्यावर रक्त सळसळू लागतं म्हणून शनिवार दि.३ डिंसेबर २०१६ रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंती महोत्सवात सहभागी व्हावे अन्यथा महाराजा यशवंतराव होळकरांचे सळसळते रक्त नसानसात वाहत असतानाही एवढे षंढ कसे काय बनला आहात?? असा आरोप करायला मला काही गैर वाटणार नाही.
काहीजणांना वाटेल की मी जातीयवाद करतोय पण हा जातीयवाद नाही तर पुर्वीपासूनच आणि जन्मापासून शुर, धाडसी असलेला धनगर समाज हा पेटतां निखारा आहे पण सनातन्यांनी व प्रस्तापितांनी आपापले विचार बिंबवल्याने या समाजाच्या पेटत्या निखाऱ्यावरती जी राख जमा झाली आहे ती राख बाजूला करण्याचा प्रयत्न या समाजप्रबोधनाच्या माद्यमातून चालू आहे आणि मी माझ्या समाजाला जागृत केले म्हणजे जातीयवाद केला असे नव्हे. ज्यादिवशी जातीयवाद करेल त्यादिवशी "तुम्ही जातीयवाद करताय" असा आरोप करणारी डोकी शिल्लक ठेवणार नाही हे लक्षात ठेवा.
तर मग आता ठरलं ना संघटना कोणती आहे?? आयोजक कोण आहे?? प्रमुख पाहुणे कोण आहेत?? हे पाहत बसण्यापेक्षा "बहुजन प्रतिपालक आद्यस्वातंत्र्यसेनानी महाराजाधिराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या २४१ व्या जयंतीला जन्मभूमी वाफगाव ता.खेड जि.पुणे येथे सर्वांनी मिळून जाऊद्या व त्या प्रेरणाभुमीतील स्फूर्ती देणारी माती कपाळी लावुया.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday 22 November 2016

३ डिंसेबरला वाफगाव येथे भव्य जयंती महोत्सव


भारताच्या रक्तरंजित इतिहासातील एकमेव अद्वितीय महायोद्धा ज्याला भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते असा रणझुंजार लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४१ व्या जयंतीनिमीत्त "यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य"च्या वतीने दि.३ डिंसेबर २०१६ रोजी वाफगाव ता.खेड जि.पुणे येथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मभूमीत अर्थातच आमच्या प्रेरणाभूमीत भव्य जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, यशवंत युवा सेना कार्याद्यक्ष मा.विष्णू देशमुख साहेब, सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब तसेच अन्य यशवंत मावळे महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी वाफगाव येथे गेल्या दोन महिन्यापूर्वी जाऊन ठिकाणाची पाहणी करून आले होते व त्या अनुषंगाने जयंती महोत्सव साजरा करणार असल्याचे निवेदन सुद्धा देऊन आले होते. दि.१३ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबई येथे धनगर समाजाच्या राज्यस्तरीय केडरकॅंप दरम्याण यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी जाहीरही केले होते की अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज फौजेचा धुव्वा उडवून त्यांची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकर यांची भव्य जयंती "यशवंत युवा सेनेच्या" वतीने महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी वाफगाव ता.खेड जि.पुणे येथे साजरी करणार असून सर्व समाजबांधवांनी तसेच यशवंत मावळ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखिल केले होते.
ज्यांनी सर्वप्रथम इंग्रजांचा धोका ओळखून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले एवढेच नव्हे तर त्या फिरंग्यांना अक्षरशा कापून काढले, कित्येक इंग्रज अधिकाऱ्यांनी ज्यांच्यासमोर गुडघे टेकवले, कधीही न हारता जवळ जवळ १९ लढाया जिंकून इंग्रजांचा पराभव केला असे एकमेवाद्वितीय महाराजा यशवंतराव होळकर इतिहासात आपली तलवार गाजवून गेले पण भारतीय इतिहासकारांच्या लेखणीला जणू गंज लागला होता की काय कोणास ठाऊक म्हणून त्यांनी  छत्रपती शिवरायानंतर स्वताचा राज्याभिषेक करवून घेणाऱ्या महाराजाधिराज यशवंतराव होळकरांचा इतिहास जाणूनबुजून लपवून ठेवला होता. आज हळूहळू धनगरांचा गौरवशाली आणि सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला रक्तरंजित इतिहास समाजासमोर येतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. त्या अनुषंगानेच शनिवार दि.३ डिंसेबर रोजी वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर यांचा भव्य जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी तमाम यशवंत मावळ्यांची नस असलेल्या यशवंत युवा सेनेच्या वतीने आयोजन करण्यात आले असून राजकारणाच्या चपला दूर ठेवून सर्व पक्षभेद, मतभेद, मनभेद व संघटना भेद विसरून सर्व नेत्यांनी, समाजबांधवांनी, यशवंत मावळ्यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मभूमीत (वाफगाव) अर्थातच प्रेरणाभूमीत उपस्थित राहून या इतिहासाचे साक्षीदार व्हावे.
ठिकाण:- वाफगाव ता.खेड जि.पुणे
दि.:- ३ डिंसेबर २०१६
वार :- शनिवार
वेळ :-
स.०८:०० वा.शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी
स.१०:०० वा. मुख्य जयंती महोत्सव
आयोजक :-
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य

पिढ्यानपिढ्या जरी गेल्या आमच्या मेंढराच्या पाठी ।।
सळसळत्या रक्ताच्या अजून तरी बनल्या नाहीत गाठी ।।
अन्याय करणाऱ्या औलादींच्या आता नका लागू पाठी ।।
कारण महाराजा यशवंतराव होळकरांचे मर्दमावळे,
पुन्हा आवळतोय आम्ही तळपत्या तलवारीच्या मुठी ।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Saturday 15 October 2016

जानकर साहेबांच्या वक्तव्याचा विपर्यास...


   ज्यांनी धनगर समाजाच्याच नव्हे तर गोरगरीब मराठा समाजासह महाराष्ट्र राज्यातील तमाम बहुजनांच्या पाठीत खंजीर खूपसला त्या बारामतीच्या पवारांना राजकारणातून संपवण्याची भाषा कॅबिनेट मंत्री मा.ना.महादेवजी जानकर साहेब यांनी भगवानगडावर केली. बारामतीचे वाटोळे करणार या वाक्यांचा विपर्यास करून मिडीया वाल्यांनी जानकर साहेबांना टार्गेट करण्याचा घाणेरडा प्रयत्न केला आहे सर्वप्रथमता त्या विकाऊ इलेक्ट्रॉनिक मिडीयावाल्यांचा तसेच प्रिंट मिडीयावाल्यांचा जाहिर निषेध.  जानकर साहेबांच्या या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून ते सोशल मिडीयावरती व्हायरल करून लोकांची डोकी भडकवण्याचा प्रकार परकीयांप्रमाणेच पवारांचे तळवे चाटणाऱ्या स्वकीयांनीदेखिल केला आहे. संस्कृतीची भाषा कोण कोणाला शिकवतंय याच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर हसायलाच येतंय राव.... जानकर साहेबांनी जी भाषा वापरली ती योग्यच आहे कारण जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना त्याच भाषेत बोलायला पाहिजे त्यांची पुजा करून थोडेच चालेल..... जनतेच्या विकासनिधीत भ्रष्टाचार करणाऱ्यांना अर्थातच हरामी करणाऱ्यांना हरामखोर नाही म्हणायचे तर मग काय दादा म्हणायला पाहिजे का?? आता ही दादागीरी टगेगीरी भरपूर झाली , महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनतेने आणि शेतकऱ्यांनी खूप काही सोसले ते आता असह्य होत आहे. पाठीमागे जनता पाण्यावाचून तडफडत असताना धरणात मुतायची भाषा करणारे, धनगर समाज ज्यांना लेकरांप्रमाने सांभाळतो त्या शेळ्या-मेंढ्यासांठी चारा छावण्या मिळाव्यात असे दौंडमद्ये निवेदन देणाऱ्या मेंढपाळांना तुमची कुत्री-गाढवं आम्ही सांभाळायचे का?? असे म्हणून अखंड धनगर समाजाच्या भावना भडकवणारे, ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करून महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मुंड्या मुरगळणारे बारामतीकर पवार हे भ्रष्टाचार करतात, लोडशेडींग मुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तेव्हा लोडशेडींगमुळे अंधाराचा फायदा घेऊन लोकसंख्या वाढविण्याची भाषा हा बारामतीचा टग्या  करतो तेव्हा लोक रस्त्यावर न उतरतां त्या बांडगुळांचा सत्कार करतात पण त्याच बांडगुळांच्या विरोधात आवाज उठवला तर वेश्याप्रमाणेच पैशासाठी विकलेली लोकं मात्र जानकर साहेबांच्या विरोधात बोलू लागतात हे सर्वात मोठं दुर्दैव म्हणावे लागेल.
आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर समजेलच की बारामतीचे पवार हेच जातीयवादी नेते आहेत पण आता बहुजन समाजातील नेतृत्व पुढे येऊ लागल्याने पवारांच्या पोटात मळमळ व्हायला लागली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेला रडवणारे जानकरसाहेब काही थोड्या मतांच्या फरकामुळे दुसऱ्या क्रमांकावर गेले ते पुढच्या लोकसभा विधानसभा निवडणूकीत बारामतीच्या पवारांना रस्त्यावर आणायला कमी करणार नाहीत या भीतीने जानकर साहेबांना अडवण्याचे घाणेरडे राजकारण हे बारामतीकर (पवार) करत आहेत आणि त्यांना विकली गेलेली मिडीया ही पवारांची बाजू घेत आहे. धनगर समाजाच्या मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब व मा.ना.महादेवजी जानकर साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने व डाॅ.विकास महात्मे यांना राज्यसभेची खासदारकी दिल्याने पवारांची डोकेदुखी जास्तच वाढली त्यातच बारामतीत टग्याच्या उपस्थिमद्ये टग्याला भाषणातून खडेबोल सुनावणाऱ्या युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब नावाचं वादळ घोंगावू लागल्याने पवारांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली म्हणून हे बहुजन समाजातील नेतृत्व संपवण्यासाठी पवारांनी राजकीय तिडे टाकायला सुरवात केली आहे. धनगर समाजाचे जेष्ठ नेते मा.आ.अनिल गोटे साहेबांना तेलगी प्रकरणात अडकवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते आता बहुजन समाजातीलच छगनराव भुजबळ यांना अंडा सेल मद्ये टाकून दिवंगत माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री मा.ना.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या कन्या मा.ना.पंकजाताई मुंडे-पालवे यांच्याविरोधात देखिल षड्यंत्र रचून त्यांना संपवण्याचे राजकारण बारामतीकर करताहेत. त्या बारमतीकरांना म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील जनतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या पवारांना संपवण्याचे वक्तव्य हे जानकर साहेबांनी केले म्हणून जानकर साहेबांना जातीत अडकवण्याचा प्रकार पवार आणि पवारांचे चमचे करत आहेत आणि त्यांना मदत करण्याचे चोख काम हे त्या पवारांनी टाकलेल्या तुकड्यांवर जगणारी धनगर समाजातील काही मंडळी करत आहेत हे कुठेतरी थांबायला हवे. धनगर समाजाने आतातरी आपल्या शत्रुंना ओळखायला शिकावं नाहीतर हे बारामतीचे बोके धनगर समाजाचं वाटोळं करतील यांत तीळमात्र शंका नाही.
जय मल्हार ।। जय अहिल्या ।। जय यशवंत ।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com

Monday 5 September 2016

षंढ राहू नका अन्यायाविरोधात बंड करा...


आजकाल कोपर्डी प्रकरणाचे निमित्त लावून मराठा मुक मोर्चा निघताहेत. खरोखरच त्या निषेधार्थ मूक मोर्चे, आंदोलने झालीच पाहिजेत. त्या पिडीत मुलीच्या कुटूंबियांना न्याय मिळालाच पाहिजे पण लोकशाहीने मोर्चे आंदोलने काढण्याचा अधिकार दिला म्हणजे असे नाही की आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या खचलेल्या पिचलेल्या धनगर आणि दलित समाजाचे घटनेनं दिलेले अधिकार हिसकावून घ्यायची तुमची भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची नसून घरात बसून शंतरंजीचा खेळ खेळणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांची ही चाल आहे. त्याचे कारण असे की कधी नव्हे इतिहासांत पहिल्यांदाच धनगर समाजातील दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले शिवाय भारताच्या इतिहासांत पहिल्यांदाच धनगर समाजाचा खासदार लोकसभेत नव्हे तर राज्यसभेवर गेला म्हणून त्या घरात बसलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागले. मग वजीरांना (बिनडोक मराठा अभ्यासक ज्याच्याशी फोनवरून माझे बोलणे झाले होते त्यांना) सांगून प्याद्यांना रस्त्यावर उतरवून दलित समाजाचा अधिकार असलेल्या ॲट्राॅसिटी कायद्याचे हक्क रद्द करण्याची मागणी म्हणजेच शिवरायांच्या राज्यात केलेला जातीयवाद आहे हे विसरू नका. शिवाय त्या अभ्यासकाबरोबर (???) माझी बाचाबाची झाली कारण तो म्हणत होता की धनगर समाजाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज अनुसुचित जमातीचे म्हणजेच आदीवाशींचे आरक्षण मागतोय ही त्या बिनडोकने केलेली बिनबुडाची भाषा होती. पुढे तो हे पण म्हणाला की या लढाईमद्ये आदीवाशींच्या बाजूने मराठा समाज ठामपणे उभे राहणार असून धनगर समाजाच्या आरक्षणाला आम्ही विरोध करू. पण मराठा समाजातल्या कोणत्याही नेत्यांना जाऊन विचारा की बाबांनो मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता तेव्हा धनगर समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. मग आम्ही आमच्या हक्काचे मागतोय जे आम्हाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत दिले आहे. आम्हाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळायला पाहिजे म्हणून आम्ही आरक्षण मागतोय यातला विषय नाही. अरे तुम्ही "ख्वाडा" चित्रपट पाहिलाच असेल जातीवरून शिवीगाळ केली अन्याय केला तर आम्ही काय करू शकतो ते त्या चित्रपटाच्या माध्यमातून शिकून घ्या. एकतर आजपर्यंत मी मराठा समाजाच्या विरोधात बोललो नव्हतो लिहलंही नव्हते पण तुमच्याच मराठा समाजातले बिनडोक अभ्यासक मला लिहायला भाग पाडताहेत. पुढे त्या मराठा समाजाचे अभ्यासक म्हणतात धनगर समाजातील नेत्यांना जातीचा फायदा करून घ्यायची सवय आहे म्हणूनच धनगर समाजाच्या नेत्यांना खासदार व मंत्रीपद दिले जाते. मग मराठा समाजाचे अभ्यासक म्हणवून घेणाऱ्या बिनआकलेच्या कांद्यांनो आजपर्यंतचा इतिहास काढून बघा महाराष्ट्र राज्याचे जेवढे मुख्यमंत्री झाले त्यातील एक-दोन सोडले तर सर्वच मराठा समाजाचे होते मग बाकीच्या खात्यात मराठा समाजाचे कीती मंत्री होते याचा आकडा तुम्हीच काढा मग सांगा की महाराष्ट्र राज्यात जातीयवाद कोणी केला?? आज जरी तुमच्या (जातीयवादी) राजांनी घरात बसून शंतरजचा खेळ मांडला असेल तर मांडू द्या कारण आम्ही पण शंतरंज च्या खेळात माहीर आहोत. कोण कशी चाल करतोय याची खबर ना खबर आम्हाला असते. कारण जगजेत्या सिकंदराला पराभूत करणाऱ्या आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य , राजा सम्राट अशोक, थोरले मल्हारराव होळकर , राष्ट्रमाता अहिल्याई होळकर, अजिंक्यवीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जमातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी आहोत आणि स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या नादाला लागू नका. नाद केला तर बाद करायला आम्हाला वेळ लागणार नाही. आज तुम्ही कोपर्डीच्या प्रकरणाचे निमित्त लावून जरूर एकत्रित या कारण लोकशाहीने तुम्हा-आम्हाला अधिकार दिला आहे पण आमच्या विरोधात जर तुम्ही आमच्या दलित बांधवाचे व धनगर समाजाचे हक्क हिसकावून पाहू इच्छित असाल तर माझा एक धनगर समाजबांधव शंभरजनांना पुरून उरेल हे लक्षात ठेवा.
आजपर्यंत माझा धनगर समाज आणि दलित मराठा समाजातील नेत्यांच्या मागे-पुढे करत होता आजही धनगर समाजाचे नेते मराठा समाजाच्या समाजातील नेत्यांची चमचेगीरी, हुजरेगीरी करत आहेत पण आता इथून पुढे ते शक्य नाही. पण बांधवांनो मराठा समाजातील नेत्यांनी प्यादे रस्त्यावर उतरवून स्वता घरात बसून वजीरांच्या साह्याने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात चाल खेळली, दलित समाजाची ॲट्राॅसिटी काढून घेण्यासाठी चाल खेळली पण ही चाल खेळून त्यांचाच म्हणजेच मराठा समाजातील नेत्यांच्याच पराभव झाला त्यामुळे तुम्ही आम्ही जिंकलो आहोत. पण आता इथून पुढे षंढ बसू नका प्रस्तापित यंत्रणा जातीयवाद करत तुमच्या आमच्या विरोधात आवाज उठवत आहेत मग डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणेच "थंड राहून षंढ बसण्यापेक्षा अन्यायाविरोधात बंड करून गुंड झालेलं बरं" या सल्ल्याप्रमाणे बंड करायला पुढे यावे नाहीतर त्या गोडबोल्या औलादी सुखाने जगू देणार नाहीत. बांधवांनो ज्याप्रमाणे मराठा समाज गट-तट, पक्षभेद, संघटना भेद बाजूला ठेवून एकत्रित येत असेल तर मग तुम्ही-आम्ही सुद्धा पक्षभेद, मनभेद, मतभेद, गट-तट बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात बंड करायला पुढे यावं हीच नम्र विनंती.
जय मल्हार। जय अहिल्या।। जय यशवंत।।
 जय भीम।। जय ज्योती।। जय शिवराय।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

जातीयवाद काय असतो ते आता मी शिकवतो...

जातीयवाद काय असतो ते आता मी शिकवतो...
सुरवातीलाच मी सांगू इच्छितो की आमचेच धनगर समाजातील नेते नालायक असल्यामुळे प्रस्तापितांची धनगर समाजाला विरोध करण्याइतपत मजल जाते. अगोदरपासूनच मी सांगत आलोय की धर्मनिरपेक्ष राज्यकारभार या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर अखंड भारतामद्ये कुठेही दिसून येत नाही. जिकडे-तिकडे जाती-पातीचा आणि धर्माचा अवडंब माजलाय. आजपर्यंत धनगर समाजात जागृती करत असताना मला काहीजण म्हणत होते की नितीनराजे अनुसे जातीयवाद करतोय पण आता मी शिकवतो की जातीयवाद नेमका काय असतो ते. कदाचित माझा मित्रपरिवांर असलेल्या मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावतीलही पण कृपया त्यांनी वस्तूस्थिती समजून घ्यावी गैरसमज करू नयेत. माझा विरोध हा सर्व गोरगरीब मराठा समाजाला नाही तर बिनआकलेच्या अभ्यासकांना व नेत्यांना आहे. आजकाल कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यातून मराठा समाजाचे मुक मोर्चे निघाले आणि अजूनही निघणार आहेत. त्यामद्ये लाखो मराठा समाजबांधव माता-भगिणी सहभागी झाल्या. खरंतर कोपर्डीमधील हे प्रकरण म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारेच होते. त्याचा निषेध केलाच पाहिजे त्याविरोधात आवाज उठवून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण आरोपी हा आरोपी असतो, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्याला कोणती जात अथवा धर्म नसतो. पण निमित्त कोपर्डीं प्रकरणाचे लावून जर दलित-आदीवाशींच्या हक्कावर गदा आणायचा प्रयत्न करत असाल तर त्यातून स्पष्ट दिसून येते की तुम्ही (मराठा) कोपर्डीमधील मुलीला न्याय मिळावा म्हणून मुक मोर्चे काढत नाही तर तुमच्या डोळ्यात सतत खुपत असणाऱ्या दलितांना आणि धनगर समाजाला विरोध करायचा म्हणून केलेला हा उद्योग आहे.
ॲट्राॅसिटी रद्द करण्याची मागणी म्हणजे कोपर्डीमधील अत्याचारित मुलीला व त्या पिडीत कुटुंबाला न्याय मागणे नव्हे. कारण आजकाल ॲट्राॅसिटी असताना तुम्ही (मराठा व इतर तत्सम जाती तसेच ब्राह्मण) दिवसाढवळ्या दलित बांधवांना शिवीगाळ करता. मारहाण करता.तेव्हा न्याय मिळावा म्हणून दलित बांधव ॲट्राॅसिटी अधिकाराखाली तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकत होते. पण जर तुमच्या मागणीवरून ॲट्राॅसिटी रद्द केली तर (ॲट्राॅसिटी तर मुळात रद्दच होणार नाही) तुम्हाला शिवीगाळ करायला रान मोकळेच होईल ना.. मग माझ्या दलित आदीवाशी बांधवांनी कोणापुढे गाऱ्हाणं मांडायचं??? आजची वस्तूस्थिती अशी आहे की तुमचे (मराठा समाजाचे) आमदार/खासदार/मंत्री असल्यामुळे आमचा दलित-आदीवाशी अथवा धनगर समाजबांधव जर पोलिस स्टेशनला गेला तर त्याची तक्रार घेतली जात नाही, घेतलीच तर त्याची दखल घेतली जात नाही अन्यथा वरतून आमदार/खासदार/मंत्र्यांचे फोन वाजतात मग ते प्रकरण संबंधित पिडीत समाजबांधवांवर दबाव आणुन मागे घ्यायला लावले जाते ही खरी आजची वस्तूस्थिती आहे त्यात दुष्काळात तेरावा महिना जसा पडावा तसाच दलितांना दिलेला हा ॲट्राॅसिटीचा अधिकार हिसकावून घ्यायची तुम्ही भाषा बोलतां मग हा जातीयवाद नव्हे तर काय आहे??
 पुढे याच मराठा मुकमोर्चातून मराठा समाजाचे बिनडोक अभ्यासक कोणत्याही अभ्यासाशिवाय धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करून आदीवाशी बांधवांना धनगर समाजाच्या विरोधात भडकावण्याचे काम करत आहेत. परवा मी त्या बिनआकलेच्या (अभ्यासकाशी??) फोनवरून बोललो की तुम्ही काय डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा बुद्धीमान आहात का?? बाबासाहेब आंबेडकर काय मुर्ख होते का ?? आणि तुम्ही खूप शहाणे झालात का?? धनगर समाज अगोदरपासूनच राज्यघटनेत कलम क्र.३४२ वरती असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या नवव्या परिशिष्टात अ.क्र.३६ वर अनुसुचित जमातीच्या यादीत आहे. त्यासंबंधित संदर्भ तपासा  महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार १२ जुलै १९९६ व महाराष्ट्र शासन राजपत्र सोमवार १९ मार्च २००१, त्याचप्रमाणे जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००७-०८ व जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००९-१० या सर्व महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या राजपत्रामध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वर ओरॉन, धनगर असा स्पष्ट उल्लेख सुद्धा आहे. तिथे स्पष्ट उल्लेख ओराॅन धनगर असा आहे. मग ते मराठा समाजाचे बिनडोक अभ्यासक म्हणतात की धनगर समाजाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज आदीवाशींचे आरक्षण मागत आहे. म्हणून मराठा समाज धनगर समाजाच्या विरोधात आदीवाशींच्या बाजूने लढाई लढणार आहे. मग आता माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना जरातरी अक्कल यायला पाहिजे की त्या मराठा अभ्यासकांचा बोलवतां धनी कोण आहे हे माहित असताना सुद्धा त्यांची धोतरं सांभाळत बसायला लाज वाटत नाही का?? ज्यावेळी डिसेंबर १९८९ साली आमचं दैवत स्व.बी.के.कोकरे साहेबांनी खंबाटकीच्या घाटात अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात म्हणून तीव्र आंदोलन केले तेव्हा २१ जानेवारी १९९० रोजी सांगली येथे तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधींच्या उपस्थितीमद्ये तात्कालीन मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा ढोल बडवला पण २३ मे १९९० रोजी धनगर समाजाची मुळ मागणी असलेल्या अनुसुचित जमातीच्या अंमलबजावणीची मागणी लाथाडून धनगर समाजाला भटक्या जमाती (क) मद्ये घालायचं पाप पवारांनी केले. आजचे मराठा अभ्यासक वल्गना करताहेत की धनगर समाज १९९० पर्यंत ओबीसी चे आरक्षण घेत होता व १९९० नंतर भटक्या जमातीच्या सवतींचा लाभ घेऊ लागला मग भटक्या जमातीचे आरक्षण आम्हाला मराठ्याच्या पवारांनीच दिले ना?? पण अरे बिनडोक असलेल्या अर्धवट अभ्यासकारांनो नीट अभ्यास करून बोला धनगर समाजाला डाॅ.बाबासाहेबांनी राज्यघटनेत अनुसुचित जमातीच्या तरतूद करून ठेवलीय पण इथल्या प्रस्तापित व्यवस्थेने अर्थातच मराठा नेत्यांनी धनगर समाजाला त्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा अंमल होऊ दिला नाही. हे वास्तव सत्य आहे ते त्या धनगरांचा शत्रु असलेल्या पवारांना जाऊन विचारा ज्यांच्या सांगण्यावरून आज तुम्ही बोंबलताय. पण काहीही असो धनगर समाजातील दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले म्हणून मराठा समाजाच्या पोटात दुखायला लागले आहे हे नाकारू शकत नाही. अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा अंमल का होऊ दिला नाही याच्या पाठीमागे पवारांची रणनीती फार मोठी आहे ती म्हणजे  जर धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर त्यांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ धनगर समाजाच्या तांब्यात येईल आणि आमदार/खासदार जर धनगर समाजाचे झाले तर मराठ्यांनी जायचे कुठे??? त्यानंतर अनेक विधानसभा व लोकसभा मतदारसंघ हे धनगर समाजाच्या ताब्यात जातील म्हणून पवारांनी अनुसुचित जमातीच्या बाबतीत धनगर समाजाबद्दल उलट-सुलट रिपोर्ट देऊन धनगर आरक्षणाचा जणू काय पायंडा पाडलाय.
पाठीमागे सुद्धा रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवायला मराठा समाज पुढे आला होता कारण श्रीमंत तुकोजीराव होळकरांनी त्या वाघ्याचं स्मारक रायगडावर बसवलं होतं म्हणून मराठा समाजाच्या पोटात दुखत होते. म्हणून धनगराचा वाघ असलेल्या वाघ्याचं स्मारक मराठ्यांनी हटवले होते पण धनगर समाजाची ताकद पाहून आर.आर.पाटलांनी २४ तासाच्या आत वाघ्याचं स्मारक पुन्हा तिथे बसवले हा जिवंत इतिहास तुमच्या समोर आहे. त्यामुळे  आता लाखो मराठा रस्त्यावर आला म्हणून हूरळून जाऊ नका. कारण २०११ च्या जनगणनेनुसार फक्त ज्यांच्या जातीच्या दाखल्यावर "धनगर" असा उल्लेख आहे त्यांची लोकसंख्या दीड-दोन कोटींच्या घरात आहे पण जेव्हा हटकर, खुटेकर, काटकर, सनगर, अहिर, डंगे, ठेल्लारी, खाटीक धनगर अशा एकून धनगर समाजातील ५२  पोटजातींची जर लोकसंख्येचा जर आकडा निघाला तर महाराष्ट्र राज्यात एक क्रमांकाची लोकसंख्या एकट्या धनगर समाजाची असेल आणि याची जनगनना आता सरकारने नाही केली तरी "यशवंत युवा सेनेच्या" माध्यमातून जनगनना करत आहोत. पोटजाती विरहीत धनगर समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्र नव्हे तर भारतात एक नंबरवर असेल. मग जर मराठा समाज आज धनगर आणि दलित समाजाच्या विरोधात मुक मोर्चातून एकत्रित येत असेल तर एकटा धनगर समाज एका बाजूला झाला तर या भारतावर फक्त आणि फक्त धनगर समाजाचे वर्चस्व असेल. पण राष्ट्रमाता अहिल्याईंच्या प्रशासन आणि राज्यकारभाराचा आणि डाॅ.बाबासाहेबांच्या विचारधारेचा अादर्श ठेवून जर धनगर-दलित एक झाला तर मराठ्यांना कोणी कुत्रे विचारणार नाही हे लक्षात ठेवा. कोपर्डी प्रकरणाचे निमित्त लावून जर तुम्ही धनगर समाजाच्या आणि दलितांच्या विरोधात जर बोलत असाल तर उद्या थोरला भाऊ या नात्यांनं दलित आदीवासींना सोबत घेऊन धनगर समाज तुमच्या विरोधात उभा करू शकतो एवढी धमक आमच्याच आहे आणि बघायचंच असेल तर सांगा ते ही करून दाखवतो. कारण तुमच्या बिनडोक मराठा अभ्यासकांची सर्व महिला, शेतकरी, दलित यांना सोबत घेऊन जाण्याची गोड भाषा आम्ही जन्मापासूनच ऐकतोय पण वास्तवात मात्र इतर समाजातील महिलांवरती बलात्कार, अत्याचार करायला मराठा असतो यांचे पुरावे देतो. ज्याला जानता राजाची बिरूदावली लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या "जानता राजा" या रंजनाला कलंक लावला ते शरद पवार कृषिमंत्री असताना २००६ साली ७५०० वरती शेतकरी आत्महत्या करतात मग शेतकऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची भाषा म्हणजे ही तुमची पोपटपंची आहे कारण फोडा-तोडाचं राजकारण आजपर्यंत मराठा समाजानं केलं त्यामुळे तुमच्या सोबत कोण येणार??? जातां जाता एकच सांगतो की एक म्हण आहे ती म्हणजे "एकवेळ मुठभर सराटा सोबत ठेवा पण एक मराठा नको". आता त्यापुढे जाऊन सांगतो नोव्हेंबर २०१२ साली तारीख आठवत नाही पण त्यावेळी मी केरळ मद्ये असताना थोर साहित्यिक स्व.प्रा.रा.चि.ढेरे यांच्यासोबत माझे फोनवरून बोलणे झाले त्यावेळी त्यांनी मला फोनवरून शिवाजी महाराज हे धनगरच होते याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यावेळी त्यांच्या "शनिशिंगणापुरचा शंभू महादेव" या कांदंबरीची बायंडींग झाली नव्हती ज्यांना कोणाला अभ्यासायचे असेल तर त्यांनी "शनिशिंगणापुरचा शंभू महादेव" ही कादंबरी वाचावी कारण अखंड २० वर्षे रिसर्च करून प्रा.रा.चि.ढेरे सर यांनी कादंबरी लिहली होती. पाठीमागच्या एक-दोन महिन्यापूर्वी प्रा.रा.चि.ढेरे सर यांचा मृत्यू झाला त्यांनी मला भेट घ्यायला सांगितले होते पण माझी अन् त्यांची भेट होऊ शकली नाही हे माझं दुर्दैव. आजपर्यंत मला काहीजण बोलत होते की नितीनराजे अनुसे जातीयवाद करतात तर त्यांना माझे खुले आवाहन आहे की धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे चालतोय ते मला अगोदर दाखवून द्या मगच माझ्यावर आरोप करा. पण ज्या दिवशी मी जातीयवाद करायला सुरवात करेल त्यादिवशी धनगर समाजबांधव एकत्रित येतील तेव्हा फक्त आणि फक्त तलवारीच हातात दिसतील हे विसरू नका. आजच्यासाठी एवढंच पुष्कळ आहे उद्याचा भाग नंतर...
जय मल्हार। जय अहिल्या।। जय यशवंत।।
 जय भीम।। जय ज्योती।। जय शिवराय।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
(धनगर समाजाच्या प्रश्नांचा अभ्यासक)

Saturday 30 July 2016

मी समाजकार्य का करतोय? भाग-२

मी समाजकार्य का करतोय? भाग-२
भाग-१ वरतून क्रमश: http://nitinrajeanuse.blogspot.in/2016/07/blog-post.html?m=1
2. स्वार्थासाठी/मुलींसाठी आई बापाला सोडणाऱ्या औलादी अशी माझी बदनामी केली जातेय.
खरंतर ही जी टीका आहे ती हास्यास्पदच म्हणावी लागेल. बांधवांनो समाजकार्य करणारा प्रत्येक समाजप्रबोधक असो अथवा नेता असो तो समाजासमोर ठेवलेला एक आरसा असतो आणि त्या आरशासारखा तो वागत असतो. तो समाजप्रबोधक/नेता काय करतो? कसा वागतो? कुठे जातो? याकडे सर्व जनतेचे लक्ष असते. मग तो समाजप्रबोधक/नेता इतरांनी टीका करावी बदनामी करावी असा एकही पाॅइंट पाठीमागे ठेवत नाही. मग त्या टीका करणाऱ्या नालायकांना जरातरी अक्कल पाहिजे होती मी असा कोणता मुद्दा पाठीमागे सोडेल का.???  मी  कोणत्यातरी मुलीसाठी/स्वार्थासाठी आई-वडिलांना सोडले अशा पद्धतीने माझ्या चारित्र्यावर शिंताड्या उडवल्या. अरे असे लिहण्यागोदर कमीत कमी माझ्या घरी येऊन माझ्या आईवडिलांची विचारपूस  तरी करून जायला हवं होतं, घरी राहिले माझ्या गावात/तालुक्यात येऊन चौकशी करायला हवी होती तेव्हा तुला कळलं असतं अन् माझ्याबद्दल हे असं लिहायला तेव्हा तुला लाज देखील वाटली असती. अरे खऱ्या जन्मदात्या बापाऐवजी तु ज्या नेतृत्वाला तुझा बाप म्हणतोय कमीत कमी त्या बापाला तरी विचारायचे होते तो तुझा बाप माझ्या मातोश्रींना "आई" म्हणत तिच्या हातचे जेवण जेऊन गेला. बापाच्या नात्याने त्यांनी तुला सांगितले असते की नितीनराजे अनुसे कोणासाठी आई-वडिलांना सोडणारी/विसरणारी औलाद नव्हे. पण  मला समाजकार्यापासून परावृत्त करणाऱ्या हिजड्या प्रवृत्तीच्यांनो तुमच्यात जर धमक असेल तर समाजासाठी काम करा, तुमच्यात जर हिंमत असेल तर निस्वार्थीपणाने काम करा पण माझ्यावर टीका करायला मुद्दा सापडत नाही म्हणून माझ्या चारित्र्यावर विनाकारण शिंताड्या उडवायचा प्रयत्न करत असाल आणि मला बदनाम करायचं षड्यंत्र रचत असाल तर तो तुमचा हांडगापणा झाला.
3. १००-२०० रुपयांसाठी बाप बदलणाऱ्या औलादी अशीही माझ्यावर टीका केली जाते.
जो माझा जन्मदाता आहे तोच माझा बाप आहे माझ्या बापाची जागा दुसरं तिसरं कोणी घेऊ शकत नाही. एखादं नेतृत्व नालायक असेल, निष्क्रिय असेल, समाजाचा वापर करून स्वार्थ बघत असेल तर ते नेतृत्व अवश्य बदलायला हवं नाहीतर समाजाचं वाटोळं होईल. तुमची प्रवृत्ती अशी आहे की जो नेतृत्व करतो त्यालाच तुम्ही बाप मानता मग जन्मदात्याला काय म्हणतां कोणास ठाऊक?? असो ज्या नेतृत्वाला तुम्ही बाप मानता त्या बापाला  जाऊन विचार ज्यावेळी संघटना स्थापन केली आणि संघटनेला निधी गोळा करायचा विचार झाला तेव्हा सुरवातीपासून सात-आठ जणांमद्ये फाऊंडर मेंबर हा नितीनराजे अनुसे सुद्धा एक होता जो स्वताच्या पगारामधील दर महिन्याला हजार हजार रुपये वर्गणी देत होता. तेव्हा तो तुमचा बाप बाहेर संघटनेसाठी  दौरे करत होता. आज नितीनराजेंनी त्यांच्या चेहऱ्यावरचा चढवलेला खोटा मुकूट बाजूला केला, समाजासमोर तुमचा (निस्वार्थीपणाचा) बुरखा फाडला तेव्हा तुमच्या पायाखालची वाळू सरकली मग समाजात माझी बदनामी करायची म्हणून १००-२०० रुपयांसाठी नितीनराजे नेत्यांच्या मागे फिरतो असे लिहतां सांगता तर मग १ रुपयांसाठी जरी नितीनराजे एखाद्या नेत्यांच्या मागे पळालाय असा महाराष्ट्र राज्यात एकतरी नेता दाखवा मी तुमच्या टांगेखालून जातो. असा एकतरी नेता दाखवा ज्यांच्याकडे मी स्वार्थासाठी गेलोय.. लिहायचं स्वातंत्र्य दिलंय म्हणून बायल्यांसारखं उगाच काहीतरी लिहीत बसू नका समाज हसतोय तुमच्यावर याचं भान राखा. शेंबड्या पोरांचं सोडून द्या काहीही लिहीत बसताहेत अशिक्षित अर्धवट कुठले... पण कमीत कमी त्या मानलेल्या बापाला तरी अक्कल पाहिजे होती की पोरांवर चांगले संस्कार करावेत नाहीतर त्याला बापच जबाबदार राहतो आणि लोकं सुद्धा बापालाच नावं ठेवतात.
            बांधवांनो एवढंच नव्हे तर काही बहाद्दरांनी मला धमक्या देणे वार्नींग देणे असले प्रकार केले. नितीनराजेंना मुंबईत फिरू देणार नाही, सातारा मद्ये फिरू देणार नाही, हात पाय काढेल असल्या धमक्या त्या प्रस्तापितांच्या नव्हे तर माझ्याच धनगर समाजबांधवांच्या??? अरे काय तुमच्या बापाचं राज्य आहे का?? इथे दंडिलशाही नाही लोकशाही आहे याचं भान राखा.... पण मी असल्या फालतुक दादांच्या धमक्यांना जुमानत नाही आणि तुम्हाला धमक्या द्यायची माझी प्रवृत्ती नाही. तो काळ होता समाजावर अन्याय करणाऱ्या प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरे यांच्या विरोधात लिहायचं म्हटलं की त्यांची पॅंट ओली व्हायची, पाठीमागे आरक्षण लढ्यादरम्याण धनगर समाजाचा शत्रु असणाऱ्या सर्व प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरे यांच्यावर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी बेधडकपणे सडेतोडपणे लिहीत होतो तेव्हा आज कुठेतरी तरून पोरं डेरींग करून लिहायला लागली पण त्यातील काही दुसऱ्याला बाप माननारी ही शेंबडी कार्टी टांग वर करायला लागले याचेच वाईट वाटते. खरंतर मला हे लिहायचे नव्हते असल्या फालतु टीकेला प्रत्यूत्तर देत बसायचे नव्हते, भरपूर जणांनी मला फोन करून विचारले की नितीनराजे तुमच्यावर टीका होतेय पण तुम्ही बोलत का नाही?? प्रत्यूत्तर का देत नाही?? पण एका पत्रकाराने मला मोठ्या भावाच्या नात्याने सल्ला दिला होता की टीका वगैरे आणि प्रत्यूत्तर देत बसू नकोस समाजप्रबोधन चालूच ठेव. भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष्य देऊ नकोस तर त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांसाठी बिस्कीट फेकून पुढे चल पण दगड मारू नकोस, नाहीतर फुकटचा वेळ वाया जाईल पण माफ करा मला मी शांत राहून बघितले, एकदा पाहिलं दोनदा पाहिलं पण हे अति व्हायला लागलं, आपणच समाजप्रबोधन करत असताना असल्या फालतु गोष्टींमद्ये वेळ घालवणे यांत काही अर्थ नव्हता म्हणूनच गप्प राहिलो होतो, समाजप्रबोधन चालूच होते, अन्याय व अत्याचार याविरोधात आवाज उठण्यासाठी जवळजवळ साडेआकराशे व्हाटसप ग्रुप, फेसबुक अकौंटस, फेसबुक पेजेस, ब्लाॅग्ज या सोशल मिडीयाच्या माद्यमातून शक्य तेवढे प्रबोधन करतच होतो आजही करत आहे त्यात खंड पडू देणार नाही. पण जर कोणी विनाकारण माझ्या चारित्र्यावर शिंताड्या उडवत असेल तर त्याला त्याच शब्दात त्याची लायकी दाखविल्याशिवाय त्याला अक्कल येणार नाही म्हणून केलेला हा लेखप्रपंच.
कृपया माझी एक नम्रपणे विनंती आहे की इथून पुढे हे असले बदनामी करायचे, टीका करायचे, घाणेरडे प्रकार थांबवा टीका करायची असेल बदनामी करायची असेल तर वैयक्तिक वर यायचं असेल तर मी पण धनगराची औलाद आहे मला काही कमी समजू नका एकेकाची कापडे फाडून समाजासमोर त्याला ***उघडा करायची धमक माझ्यात आहे हे विसरू नका. पण हे माझ्यावर टीका करणाऱ्यांना नव्हे तर सर्वांनाच सांगतोय की असल्या फालतु गोष्टी मद्ये वेळ घालवत बसाल, नेत्यांवरती चिखलफेक करत बसाल तर काही साद्य करू शकणार नाही. तो चिखल उतरवता उतरवता विधानसभा/लोकसभा निघून जातील मग बसाल टाळ्या वाजवत. बांधवांनो तुमच्याकडे काही चांगले विचार असतील, समाजासाठी एखादे चांगले प्रकल्प असतील, काही योजना असतील तर त्यावरती चर्चा करून ते ते उपक्रम समाजासाठी राबवुया. मेंढपाळांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, महिला सबलीकरण त्याचप्रमाणे धनगर आरक्षण हा एक आपल्या सर्वांचा आघाडीवर असलेला मुद्दा आहे. आणि आरक्षण आपल्या हक्काचे आहे, त्यासाठी श्रेय्यवाद बाजूला ठेवून सर्व संघटनेच्या पदाधीकाऱ्यांनी एकत्रित यावं, चर्चा करावी. एकीचे बळ हे खूप शक्तिशाली असते ते तुम्ही लहानपणापासूनच शिकला पण आहात आणि अनुभवलेलेही आहे. त्यासाठी एकत्रित या आणि एकत्रित येऊन समाजाचा विकास करूया.
रागाच्या भरात लिहताना जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर उदरांतकरणाने माफ करा🙏
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday 28 July 2016

मी समाजकार्य का करतोय? भाग-१

मी समाजकार्य का करतोय? भाग-१

बांधवांनो गेल्या चार-पाच वर्षापासून सोशल मिडीयाच्या माद्यमातून तसेच सामाजिक कार्यक्रमातून, उपक्रमातून समाजप्रबोधन करून समाजबांधवांची डोकी नांगरून त्यामद्ये प्रबोधनाचे बियाणे पेरायचे काम आजपर्यंत  प्रामाणिकपणे करत आलोय. ज्या माणसाने स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करून अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला जागं केलं त्या स्व.बी.के.कोकरे साहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजाला जागृत करण्याचे काम चोखपणे बजावतोय. आज स्व.बी.के.कोकरे साहेबांचे नाव घेऊन समाजकारण आणि राजकारण करणारे भरपूर आहेत पण स्व.बी.के.कोकरे साहेबांचा इतिहास समाजासमोर मांडण्यासाठी मी स्वता व मा.रामभाऊ लांडे साहेब यांनी वारंवार लेख लिहून त्याचप्रमाणे भाषणातून व्याख्यानातून स्व.बी.के.कोकरे साहेब यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला करून दिली विशेषता युवा वर्ग त्यांच्या इतिहासापासून वंचित होता म्हणून मी त्यांचे जीवनचरित्र लिहतोय आणि मा.रामभाऊ लांडे साहेब हे सुद्धा लवकरच क्रांतीवीर स्व.बी.के.कोकरे यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित करत आहेत. यांव्यतिरिक्त आजकाल झोपेतून उठून स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या नावाने स्वार्थासाठी संघटना चालवणाऱ्यांना त्या रणझुंजार नेत्याचे, वाघासारखी डरकाळी फोडून प्रस्थापितांना घाम फोडणाऱ्या रणमर्दाचे आजचे आधारहीन आई-वडील दिसत नाहीत ही खरंतर शोकांतिकाच म्हणावी लागेल. बांधवांनो मी काही फार मोठा विचारवंत नाही, फार मोठा वक्ता अथवा व्याख्याता नाही पण सर्वसामान्य मेंढपाळ कुटूंबातील पोरगा(आजही वडील मेंढ्या राखतात गरज म्हणून नव्हे तर पारंपरिक व्यवसाय म्हणून) आजपर्यंत इजिप्त, स्पेन, फ्रांस, इस्राइल, जिबूती अशा आशिया व्यतिरिक्त आफ्रिका व युरोप खंडांतील विविध देशांचे मी दौरे केले, माझ्याकडे आज घरदार नोकरी सर्व काही व्यवस्थित असताना देखील इतरांसारखे स्वतापुरते न जगता दिशाहीन समाजाला दिशा देण्यासाठी, समाजाला न्याय मिळावा म्हणून वेळात वेळ काढून समाजकार्य करतो, समाज जागृती करतो हा काही मी माझा मोठेपणा सांगत नाही. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यापासून समाजप्रबोधन करत, समाजाचा इतिहास समाजासमोर मांडत असताना समाजाच्या विरोधात काम करणाऱ्यांचा समाचार मी लेखणीच्या माध्यमातून सडेतोडपणे घेतला होता. खरंतर त्यांनी माझा बांध रेटला होता म्हणून मी त्यांच्याविरोधात लिहीत नव्हतो तर त्यांची समाजाबद्दलची भावना बदलावी व समाजाचे प्रश्न सोडवावेत या अपेक्षेने लिहीत होतो. त्याचप्रमाणे समाजाचा वापर करून घेणाऱ्यांचा (निस्वार्थीपणाचा) बुरखा फाडल्याने काहीजणांच्या पायाखालची वाळू सरकली जाते मग काय करावे हे त्या गड्यांना सुचत नव्हते पार भांबावून गेल्यानंतर मग कुठल्यातरी हिजड्या प्रवृत्तीच्या कार्ट्यांना ज्यांना साधी चड्डीची नाडी बांधता येत नाही अशा शेंबड्या पोरांना पुढे करून माझी बदनामी करणे माझ्यावर टीका करणे आणि तरीही नाहीच जमलं तर माझ्या चारित्र्यावर शिंताड्या उडवणे असले खालच्या पातळीवरचे धंदे त्यांनी केले त्याबद्दल त्यांच्यावर टीका म्हणून नव्हे तर (मला समाजकार्यापासून परावृत्त करण्यासाठी) त्यांच्या चाललेल्या त्या खटाटोपीला हे माझे प्रत्यूत्तर आहे.
1.  स्वार्थासाठी आणि मोठेपणासाठी हे सर्व उद्योग करणाऱ्या औलादी अशी माझ्यावर टीका केली जाते.
बांधवांनो जेव्हापासून धनगर आरक्षणाचा मुद्दा तापू लागला तेव्हापासून ठराविक जणांच्या प्रतिक्रिया ऐकल्या/वाचल्या. राज्यघटनेत जे आरक्षण दिले आहे ते आमच्या हक्काचे आहे आणि हे हक्काचे हिसकावून घ्यायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन चर्चा करा विचारविनीमय करा अशी विनंती, आवाहन करत होतो. आरक्षणाबद्दलचे महत्व पटवून देत माझ्या अभ्यासातील पुरावे देत होतो. वेगवेगळे मोर्चे काढत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित येऊन एकच विराट मोर्चा काढा असेही सांगत होतो. यांत नेमका स्वार्थ कोणता?? आणि जर मला स्वार्थासाठी करायचं असतं, मोठेपणासाठी करायचं असतं तर इतरांनी जसं मोर्चाचं नेतृत्व करून आमदारक्या/खासदारक्या मिळवल्या, तसे मी पण काहीतरी मिळतंय का ते बघू शकलो असतो आणि काहीतरी पदरात पाडून घेतले असते. तसे महाराष्ट्र राज्यभर सर्व जिल्ह्यात/तालुक्यात माझा भरपूर संपर्क आहे. पण नाही तसे मला काही करायचे नाही कारण मला समाजाला जागृत करायचं होतं आणि समुद्रात भरकटलेल्या नौकेप्रमाणे दिशाहीन समाजाला खारीचा वाटा म्हणून का होईना पण योग्य दिशा देण्यासाठी चाललेली धडपड हाच एकमेव माझा "स्वार्थ" आहे यांत कोणताही मोठेपणा नाही. कोणी म्हंटलं सामाजिक संघटनेत पद हवे होते पण दिले नाही म्हणून (निस्वार्थीपणाचा) बुरखा फाडला त्यांना समजावून सांगा मला पदाची आवश्यकता नव्हती आणि मी कोणतेही पद घेऊ शकत नव्हतो उलट जिथे होतो तिथे पदे वाटायचं काम मी स्वता करत होतो त्या संघटनेतील कीतीतरी पदे माझ्या सांगण्यावरुन दिलेली आहेत आणि आजही समाजासाठी झटणाऱ्या झगडणाऱ्या संघटनेची पदं वाटायची जबाबदारी माझ्याकडे आहे. माझे कार्य हे कोणत्याही एका संघटनेसाठी नसून सर्व समाजासाठी आहे, सामाजिक संघटनांसाठी आहे ज्या संघटना खरेखरंच समाजासाठी काम करतात. जर कोणाला पद पाहिजे असेल तर सांगा पण ज्यांना पद द्यायचे आहे ती व्यक्ती निष्कलंकित असावी, निष्क्रिय नसावी, निस्वार्थी असावी तसेच जातीसाठी माती खाणारी असावी समाजावर ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्या वेळी अन्याय करणाऱ्यांचं हात वरचेवर कलम करण्याची धमक असावी त्याला समाजातून पुढे नेता करायची जबाबदारी माझी राहिल.
पुढील झालेल्या माझ्यावरील टीका आणि प्रत्यूत्तर भाग-२ मद्ये..
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday 22 July 2016

हुंडाबळी "प्रथा ही समाजाची-व्यथाही समाजाचीच"

हुंडाबळी
 (हुंडा ही प्रथा समाजाची-व्यथाही समाजाचीच)

        समाजामद्ये फिरताना वावरताना आसपासचे वातावरण हे सडलेल्या अंड्याप्रमाणे इतके उग्र (दुषित) झालेले पाहून अक्षरशा सामाजिक व्यवस्थेचा किळस वाटतो. दैनंदिन जीवनामध्ये रोजच काही ना काही घडतच असते पण यामद्ये सर्रास महिलांचेच का बळी जातात?? तेच समजत नाही. सरकार दरबारी महिला सबलिकरणाच्या गोष्टी मात्र हवेतच विरून जातात पण वास्तवात काहीच नसतं. रोजच वर्तमानपत्रातून स्त्रिभ्रूणहत्या, बलात्कार यांसारख्या मानवी जीवनाला काळीमा फासणाऱ्या बातम्या वाचताना डोळ्यांत पाणी येते त्यांव्यतिरिक्त हुंड्यासाठी होणारा विवाहितेचा छळ अर्थातच 'हुंडाबळी' हे सुद्धा समाजासमोरील एक मोठे आवाहनच आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी, कल्याणासाठी कायदे बनवले जातात पण कधी ते आमलातच येत नाहीत आणि जर आमलात आणले तर आरोपीला दंड आकारुन काही कालावधीची शिक्षा दिली जाते व कालांतराने ती शिक्षा माफही होते याचाच अर्थ पुन्हा गुन्हा करण्यासाठी त्या आरोपीला रान मोकळेच... मग सुड घेण्यासाठी पुन्हा कोणत्या ना कोणत्या महिला त्या लांडग्यांच्या शिकार होणार हे मात्र नक्की.
असो आपली न्यायव्यवस्था आंधळी आहे, जोपर्यंत डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे तोपर्यंत असंच चालत राहणार बाकी काय??? हुंडा न दिल्याने विवाहीतेवर छळ करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांपाठोपाठ लग्नागोदरच हुंड्याची भरमसाठ मागणी करून गोरगरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्या कुमारिकेचा बळी घेणेयाचेही प्रकार आज समाजात वाढत चाललेत. पाठीमागे काही महिन्यांपूर्वी एका मुलीने आत्महत्या केली होती त्यामागचं कारण जर अभ्यासले तर आजच्या या सामाजिक व्यवस्थेचा मला धिक्कार करावासा  वाटतो. सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेली ती मुलगी जेमतेम चांगली शाळा शिकलेली. आर्थिक परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हतेच सोबत लहान बहिणीच्यापण शिक्षणासाठी तरतूद करावी लागणार होती. आई-वडिलांना तिच्या लग्नाची घाई झालेली नसतानादेखिल परिस्थीती त्यांना मजबूर करत होती. शिवाय धाकल्या मुलीला शिकवावी आणि लागलीच तिचंही हात पिवळे करावेत असा त्यांचा उद्देश होता. तिच्यासाठी पाहुणे यायचे मुलगी सर्वांना पसंत पडायची पण हुंड्याचा विषय निघाला की ते लग्न मोडायचं  असे कितीतरी वेळा झाले. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने हुंडा देणे शक्य नव्हते. थोडाफार हुंडा ठिक असतो पण हुंड्याचा भरमसाठ आकडा ऐकला की त्या बिचाऱ्याला, गोरगरीब शेतकऱ्याला डोक्याला हात लावावा लागायचा. अहो एवढी रक्कम तो आणणार तरी कोठून??  एकतर महाराष्ट्र राज्यांत पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण आत्महत्या हा एकमेव पर्याय नव्हे म्हणून कसंबसं आर्धीकोर भाकरी खाऊन जीवन जगायचं ठरवलं तर दुसरे संकट आ वासून उभा राहायचं.मग नक्की करायचं काय ?? मग तो गोरगरीब शेतकरी असो अथवा गोरगरीब मजूर असो त्यांच्यापुढं आत्महत्येशिवाय पर्यायच उरत नाही. मुलीला एकामागून एक पाहुणे यायचे आणि हुंड्यापायी लग्न मोडून जायचे याचा परिणाम मुलीच्या त्या कोवळ्या मनावरती होणार नाही तर काय होणार?? एकतर हुंड्यामुळे लग्न ठरत नसल्याने समाजामद्ये विविध गोष्टींवर उलट-सुलट चर्चा चालतात, पारावर बसणाऱ्या समाजातील रिकामटेकड्या लोकांना याबद्दल काहीच माहित नसताना ते मुलींलाच दोषी ठरवतात. मग खचून गेलेली मुलगी स्वताला आई-वडिलांवरचं ओझं समजून आत्महत्येचा पर्याय निवडते आणि जीवन संपवून टाकते.
मग त्या मुलीच्या आत्महत्येला कोण जबाबदार असेल?? लग्न ठरत नसल्याने समाजात चाललेल्या उलट-सुलट चर्चेला कंटाळून आत्महत्या केलेली मुलगी जबाबदार असेल?? का हुंडा न देणारा दुष्काळामुळे खचलेला गोरगरीब शेतकरी बाप?? का ज्या प्रथा समाजानं पाडल्या तो समाज?? का ज्या समाजानं पारावर बसून चौकाचौकात त्या मुलीची बदनामी करून त्या हतबल असलेल्या पित्याची इज्जत काढली तो समाज??  कोण जबाबदार आहे याचा जरा अभ्यास कराल का हो??
       हुंडा कोणाला द्यावा?? अन् कोणाला देवू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे इट्स डजन्ट मॅटर ॲंड नो आॅब्जेक्शन, पण सोन्यासारख्या पोरींचे कन्यादान करूनही तिचा सांभाळ करावा म्हणून हुंडा द्यावा लागत असेल तर तो मुलगा काय निष्क्रिय आहे का सुस्त?   जर तो मुलगा काही कमवूच शकत नसेल तर वडिलधाऱ्यांनो तुमच्या सोन्यासारख्या पोरीचं वाटोळं कशाला करताय?? माझ्या मते एखाद्या अंध-पंगूसाठी हुंडा दिला तर ती गोष्ट वेगळी आहे कारण तो कमवू शकत नाही पण ज्याला दोन हात दोन पाय आहेत व्यवस्थित धडधाकट असूनही दोन-चार रुपये कमवता येत असूनही त्याला हुंडा देत असाल तर मग त्यांच्यात आणि अंध-पंगूमद्ये काय फरक राहिला?? आय एम साॅरी पण मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत कारण आठराव्या शतकात राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी "हुंडाबंदी" केली होती. म्हणजेच एकविसाव्या तंत्रज्ञानविकसित शतकात आजच्या सरकारला जे सुचतं ते आठराव्या शतकात माझ्या राजमाता अहिल्याईंना सुचत होते आणि प्रशासकीय व्यवस्थेमधून त्यांनी हे आमलात देखील आणले होते. पुढे अहिल्यामाईंचाच आदर्श डोळयासमोर ठेवून सतीप्रथेला, हुंडा प्रथेला थोर समाजसुधारक राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी देखील विरोध केला होता, या प्रथेच्या विरोधात ब्रिटिश सरकारने कायदे बनवले होते 'हुंडाबंदी' केली होती पण या कायद्यांना 'हुंडाबंदीला' विरोध करायचं काम बाळ गंगाधर टिळकांनी केले, बाय दि वे...  "आमुक-आमक्याने मुलींकडून एवढा हुंडा घेतला तर आम्ही पण तेवढा घेणार दोन रुपये जास्तच पण कमी नाही"अरे ही काय रस्सीखेच चाललीय का??? तुमच्या या रस्सीखेचमुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरातील निष्पाप मुलींचे बळी जातायेत याचा विचार करा. आज समाजातील हुंडा घेणाऱ्या बांधवांना मला सांगायचे आहे की "स्वताचा घाम गाळून, दिवसरात्र राबराब राबून शेतीतून धान्य पिकवायचं, एकाऐवजी आर्धीकोर भाकरी खाऊन पोरालेकरांना एकवेळ उपाशी ठेवून शेतात पिकवलेलं बाजारात बाराच्या भावात विकायचं, तिथं शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे व्यापारी अधाश्यासारखं शेतकऱ्यांना लुटत असतात मग त्यातूनही आलेल्या दीडदमडीत घरसंसार चालवायचा, मुला-मुलींची शिक्षणं, मुलीचे लग्न अशा कितीतरी समस्या त्या गोरगरीब शेतकऱ्यांसमोर उभा राहतात". मग अशा दुष्काळाने खचलेल्या जगाच्या पोशिंद्याकडून जर त्याच्या मुलीसाठी लग्नात हुंड्याची मागणी करत असाल तर तुमच्यासारखा हांडगा माणूस या जगात कोणी शोधून सापडणार नाही. कदाचित माझ्या या बोलण्याचा राग येत असेल पण हुंड्यापायी लग्न मोडलेल्या त्या आत्महत्या केलेल्या मुलीचा एकवेळ भाऊ होऊन बघा तुम्हीसुद्धा माझ्यासारखीच कडवट भाषा बोलाल अथवा हुंडा न दिल्यामुळे सासरकडील लोकांनी जाळून मारलेल्या विवाहितेचा भाऊ नाहीतर एकवेळ बाप होऊन बघा तुमचे डोळे रक्तासारखे लाल होतील आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखीच डोळ्यात अंजन घालणारी भाषा बोलाल आणि शेवटी सर्व काही करूनही जर तुम्ही हतबल असाल तेव्हा तुमच्यावरसुद्धा आत्महत्या करायची वेळ येईल. म्हणूनच म्हणतो अरे कमवायचे असेल ना तर स्वताच्या हिंमतीवर स्वताच्या ताकदीवर कमवा पण मागतकऱ्यांसारखा हुंडा मागत बसू नका आणि कृपया हुंड्यापायी गोरगरीब घराण्यातील निष्पाप मुलींचे बळी घेऊ नका ही नम्र विनंती.
"हुंडाबंदीसाठी एकमेकांच्या हातात हात देऊन निष्पाप मुलींचे जीवन वाचवा एवढंच सांगायचा माझा उद्देश आहे." धन्यवाद
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१८५३०००४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Wednesday 20 July 2016

धनगर बांधवांनो गांभीर्य लक्षात घ्या...


   अज्ञानाच्या खाईत बुडलेल्या अन् अंधश्रद्धेत गुरफटलेल्या समाजाला ज्ञानरूपी कंदिलाची आवश्यकता आहे. आज जर पाहिले तर शहरापासून दूर  रानावनात डोंगरदऱ्यातून भटकंती करण्यामुळे शिक्षणाचे प्रमाण समाजात फार कमी आहे त्यातूनही आजचा युवा वर्ग सुशिक्षीत झाला शिकला सवरला, लिहायला लागला, वाचायला लागला बोलायला लागला. अन्यायाच्या विरोधात पेटून उठू लागला. धनगर समाजाचा खरा इतिहास जाणूनबुजून लपवून ठेवला गेला यापाठीमागे सनातन्यांचे आणि प्रस्तापितांचे फार मोठे षड्यंत्र आहे. तरीही धनगर समाजाच्या इतिहासावरती संशोधन झाले लपवून ठेवलेला धनगर समाजाचा खरा इतिहास समाजासमोर आला. आज धनगर समाजातील वक्ते, व्याख्याते जीव तोडून समाजाला इतिहास सांगतात आणि समाजप्रबोधन करतात.  इतिहासकार, लेखक, विचारवंत आपला अमुल्य वेळ काढून निस्वार्थीपणाने समाजाचे प्रबोधन करण्यासाठी अहोरात्र झटत असतात. विस्कटलेला अन् विखुरलेला धनगर समाज आज कुठेतरी एकत्रित येतोय, महापुरूषांच्या जयंत्या साजऱ्या करून युवा वर्ग एकोप्याचे दर्शन घडवून आणतात.
पण समाजातील काही लोक जरा प्रमाणापेक्षाही जास्तच शिकले आणि अतिशहाणे झाले असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. कदाचित माझ्या या बोलण्याचा कोणालाही राग येऊ शकतो पण त्याची मला पर्वा नाही. कारण कालपरवा आयबीएन लोकमत वरती "जानकर हे हटकर तर राम शिंदे खुटेकर" या आशयाची बातमी पाहिली अन् माझ्या मस्तकाची शिरच उठली. आजपर्यंत नव्हते पण आता कुठेतरी धनगर समाजातील नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. एकीकडे अहिल्यामाईंचे माहेरकडील वंशज मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांची राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्रिपदावरती वर्णी लागली तर दुसरीकडे २५ वर्ष वणवण फिरून बहुजन समाजाला न्याय मिळावा म्हणून घरादाराचा त्याग करणाऱ्या मा.ना.महादेवजी जानकर साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, मेंढपाळाचा पोरगा राज्याचा मंत्री बनला. धनगर समाजातील दोन नेते कॅबिनेट मंत्री झाले या पण नेत्यांना पोटजातीत अडकवायचे काम समाजातील खूप शिकलेले अतिशहाणे लोक करताहेत तेव्हा नाइलाजाने म्हणावेसे वाटते की शिकलेल्यापेक्षा जर हे लोक अडाणी असते तर कमीत कमी पोटजातीचा डंका पिटून समाजाचं वाटोळं करून घ्यायची दुर्बुद्धी त्यांना सुचली नसती. आज पोटजातीत विखुरलेला धनगर समाज एकत्रित यावा म्हणून समाजातील इतिहासकार, लेखक, विचारवंत हे वारंवार सांगतात की पोटजाती सोडून "धनगर" म्हणून एकत्रित या पण समाजातील अतिशहाणे लोक मात्र पोटजातीचा डंका पिटत आम्हीच कसे काय श्रेष्ठ हे सांगत जुन्या विचारातच गुरफटलेले दिसून येतात. पण त्यांना पोटजातीचा एवढा डंका पिटून नक्की काय साद्य करायचे आहे राम जाणं....
     माझ्या या बोलण्याचा काहीजणांना राग आला असेल, काहींना पटलेही नसेल पण माझे विचार सर्वांनाच पटावेत असे काही बंधन नाही. मी हटकर, मी खुटेकर, सनगर, झेंडे, बंडे, डंगे अहिर तर कोणी म्हणतो घोंगडी धनगर असे म्हणण्यात व आम्ही श्रेष्ठ की तुम्ही श्रेष्ठ करण्यातच आमचे आयुष्य संपले आणि पोटजातीत विभागला गेल्यामुळे धनगर समाज आजपर्यंत मागासलेलाच राहिला. समाजाला प्रगतीपथावर घेवून जाणाची भाषा करत असतानाच नेत्यांना पोटजातीत अडकवून समाजाला विभागायची भाषा करणारे सुद्धा आपल्याच रक्ताचे आपलेच सगेसोयरे करताहेत याचेच दुःख वाटते. एकाच आईची लेकरं एकाच रक्ताची माणसं हाडवैरी कशी काय बनताहेत?? तेच कळत नाही. ज्याप्रमाणे घरातील गोष्टी चव्हाट्यावर येतात त्याचप्रमाणे आपआपसांत पोटजातीत भांडत बसलेल्या आपल्याच माणसांमुळे आयबीएन लोकमत सारखी प्रसिद्धी माद्यमे (Electronic media, print media, Social media) ही आपल्या धनगर समाजातील नेत्यांना पोटजातीच्या चौकटीत अडकवताहेत. पोटजातीचा अहंकार बाळगणाऱ्यांना हे पाहायला कदाचित आज बरं वाटत असेल पण पोटजातीला खतपाणी घालत बसलो तर उद्या भविष्यात धनगर समाजातील नेत्यांना आपल्याच धनगर समाजबांधवांच्या मतांची भिक मागावी लागेल हे भयानक आणि कटू सत्य आहे. जानकर साहेबांना हटकर मद्ये तर राम शिंदे साहेबांना खुटेकर मद्ये अडकवून आपण आपल्याच पायावर दगड मारतोय याची जाणीव ठेवा. घराला घरपण तेव्हाच असतं जेव्हा घरातील प्रत्येक सदस्य घराशी एकरूप झालेला असतो आणि घरातील एखाद्या सदस्यावर जर अन्याय झाला तर घरातील सर्व सदस्य एकत्रित येतात पण जर घरात एकमेकांचे पटत नसेल, या ना त्या कारणावरून वाद होत असतील तर तुमच्या घराचं वाटोळं करायला टपलेल्या गिधाडांना आयतीच संधी मिळते मग ते तुमच्या घरातील समस्यांचा कसा वापर करून घेतील आणि तुमच्या घराचं कसं वाटोळं करतील ते सांगता येणार नाही. म्हणूनच ओरडून ओरडून सांगतोय की धनगर समाजबांधवांनो पोटजातीत भांडत बसण्यापेक्षा "धनगर" म्हणूनच सर्वांनी एकत्रित या, समाजाचा विकास करा नाहीतर समाजाचं वाटोळं करायला बाकीची गिधडं टपूनच बसलेत याची जाणीव असुद्या. आपापल्यातील पोटजातीचा वाद विकोपाला जाऊ शकतो त्यातून भविष्यात आपलेच नुकसान होईल याचं गांभीर्य जरा लक्षात घ्या.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Monday 18 July 2016

शाब्बास रं पट्ट्या शाब्बास ....



नसानसात सळसळतं ते रक्तच असतं धनगराचं,
अन्यायाच्या विरोधात पेटून उठतं ते रक्तच असतं धनगराचं,
कीतीही आली संकटे तरी कधीच मागे हटत नसतं
कारण,
जिंकण्याचं सामर्थ्य ज्यामद्ये असतं ते रक्तच असतं धनगराचं.
            मनगटाच्या आणि बुद्धीच्या जोरावर सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली दुश्मनांच्या चिंद्या उडवणारी आमची औलाद. शत्रुंच्या चारी मुंड्या चित करून त्यांना आस्मान दाखविण्याचा आमचा वारसा आम्ही कधीच विसरत नाही कारण "मल्ल"राक्षसाला हरवणाऱ्या "मल्हार"चे आम्ही भक्त, शत्रुंना धूळ चारून अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या श्रीमंत मल्हारराव होळकरांचे आम्ही वारसदार आमचा धनगरी बाणा आणि कणा जसाच्या तसाच आजही आहे. पाठीमागे पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या "स्व.खाशाबा जाधव दुसऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धे"त धनगराच्या वाघाने, धनगराच्या पट्ट्याने म्हणजेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याच्या पै.वैभव रास्कर याने ९६ किलो वजनी गटातून सुवर्णपदक पटकावले. त्याबद्दल या धनगराच्या वाघाचं हर्दिक हर्दिक अभिनंदन.
पै वैभव रास्कर हा माजी सैनिक पै.कृष्णा रास्कर (सर्वांचे लाडके "रास्कर आप्पा") यांचा मुलगा असून भारतीय नौदलात कार्यरत असताना भारताचं नेतृत्व  करावे असे रास्कर आप्पांना वाटत होते पण त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले ही खंत त्यांचा मुलगा पै.वैभव रास्कर याने पुर्ण करावी आणि भारताचा तिरंगा जगात फडकवावा ही त्यांची इच्छा आहे. ही त्यांची इच्छा पुर्ण होवो ही मल्हारचरणी प्रार्थना
पै. वैभव रास्कर चे चुलते पै.धनाजी रास्कर हे सुद्धा भारतीय नौदलात पैलवानच आहेत खरंतर धनगर समाजालाच पैलवानकीचा वारसा लाभलेला आहे. सांगली जिल्ह्यातील बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखले जाते ते बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) हे सुद्धा पैलवानच आहेत आज कुठेही कुस्तीचा फड असला तरी आप्पा अवर्जून उपस्थित राहून पैलवानांना कुस्तीपटूंना प्रोत्साहन देतात चांगल्या पैलवानास विजेत्यास स्वता बक्षिसही देतात. धनगर समाजातला पै.वैभव रास्कर सुद्धा असाच पोरगा आज महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपल्या आई-वडिलांचे समाजाचे नाव रोषण करत भारताचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येतोय त्याबद्दल सुवर्णपदक विजेता पै.वैभव रास्कर याने घवघवीत यश मिळवल्याबद्दल त्याचे पुनःश्च एकदा त्रिवार अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हर्दिक हर्दिक शुभेच्छा!!!
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday 15 July 2016

सळसळते रक्त जेव्हा विचारते मला...

सहज मनाशीच विचार करत बसलो असताना नसानसात सळसळ करणाऱ्या माझ्या सळसळत्या रक्तानंच एकेदिवशी मला  प्रश्न विचारला की "धनगर समाज एवढा षंढ कसा काय झालाय??" डोक्याला शाॅकच बसला राव, अचानक या विचारलेल्या प्रश्नामुळे आसपासचे वातावरणही गंभीर झाल्याचे जाणवले, सगळीकडे निरव शांतता पसरलेली होती, डोक्यात विचाराची चक्रं सुरू झाली, रक्तवाहिण्या पहिल्यापेक्षाही जलद गतीने रक्ताचा पुरवठा करण्यासाठी धावू लागल्या, या एकाच प्रश्नामुळे लाखो विचारांचा अक्षरशा आगडोंब उसळला, एकामागून एक अशा विचारांनी थैमान घातले मग पाठीमागे इतिहासांत डोकावून पाहिलं तेव्हा "एवढं आम्ही षंढ कसे काय झालोय?" याची मला स्वतःलाच लाज वाटायला लागली.
अरे एकेकाळी राजा समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी आज नक्की कोणतं गुलामगीरीतलं जगणं जगतोय तेच आम्हाला कळत नाही आणि कळलं तर वळत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका. धनगर पुत्र आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य चे आम्ही वारसदार, आशिया खंडावर प्रभुत्व गाजवणाऱ्या राजा सम्राट अशोकाच्या तलवारीची आम्ही तळपती धार, अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या श्रीमंत मल्हारराव होळकरांचे मावळे, महान आणि उत्तम प्रशासक म्हणून अख्ख्या जगाने जिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला त्या रणरागीणी राष्ट्रमाता अहिल्यामाईंचे आम्ही भक्त, अजिंक्य मानल्या जाणाऱ्या शिस्तबद्ध ब्रिटिश फौजांना सलग अठरा वेळा कापून काढून त्यांची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या सळसळत्या रक्ताचे आम्ही वारसदार आज स्वताला या सर्व महापुरूषांचे मर्दमावळे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. पण वास्तवात मात्र प्रस्तापितांची चाकरी/चमचेगीरी/दलाली करण्यातच आमच्या समाजाचे आणि नेत्यांचे आयुष्य संपून जाते मग आउटपुट येते ते फक्त शून्य आणि शून्यच.... आज भारतातीलच काही नालायक इतिहासकार छाती फूगवून सांगतात की ब्रिटिशांनी १५० वर्ष भारतावर राज्य करून भारतीयांना गुलाम बनवलं पण त्यांना जावून सांगा अरे या जगाच्या पाठीवर हजारो वर्षापेक्षाही जास्त काळ राज्यकारभार केला आहे तो फक्त माझ्या धनगर समाजाने मग आम्ही कोणाकोणाला गुलामगीरीत वागवलं याचा इतिहास काढून बघा तुम्हाला तो सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास वाचायला तुमचं आयुष्य पुरणार नाही.
ज्या माणसाने स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करून अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला जागे करून माझ्या सारख्या युवकांच्या हातात क्रांतीची मशाल दिली त्या स्व बी के कोकरे साहेबांची विचारधारा आज धनगर समाजाला प्रगतीपथावर घेवून जावू शकते पण त्या स्व बी के कोकरे साहेबांना खरंतर प्रस्तापितांनी संपवले पण ती बंदूक धनगर समाजातील नेत्यांच्याच खांद्यावर ठेवून मस्तावलेल्या आणि माजग्या प्रस्तापितांनी स्व बी के कोकरे साहेबांची राजकीय हत्या केली. याचा अर्थ आमच्याच माणसांना आम्हीच संपवले, संपवण्यासाठी मदत केली कीती लाजिरवाणी गोष्ट म्हणावी ही. पाठीमागे एक पोस्ट सोशल मिडीयाच्या माद्यमातून व्हायरल होत असताना पाहिले त्यामद्ये कुत्र्याच्या आणि गाढवाच्या शर्यतीचे वर्णन केले आहे. गाढवापेक्षा कुत्रा हा धावण्यामद्ये चपळ असतो तेज असतो पण दुर्दैव त्याचे असे की प्रत्येक गल्लीगल्लीत, चौकाचौकात रस्त्यारस्त्यावर त्यांच्याच जातबांधवांनी भूंकून त्याला हुसकावून लावले विरोध केला कारण की "हर कुत्ता अपने इलाखें का शेर होता है।" तसेच झाले पण गाढवाला मात्र कोणीच विरोध केला नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे धावण्यामद्ये चपळ असलेल्या कुत्र्याच्या अगोदर गाढव त्या सिंहासनावर जाऊन बसतो. त्यावेळी कुत्रा स्वतालाच म्हणतो की माझ्याच जातबांधवांनी मला विरोध केला नसता तर आज त्या उकिरंड्यात लोळणाऱ्या गाढवाऐवजी मी सिंहासनावर बसलो असतो.
माझ्याही धनगर समाजाचे अगदी त्या कुत्र्याच्या आणि गाढवांच्या गोष्टीप्रमाणेच झाले आहे. एकेकाळी राजा समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी, दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे वारसदार आणि शुरवीरांच्या आणि थोर महापुरूषांचा वारसा लाभलेल्या माझ्या धनगर समाजातील आपलीच माणसं आपल्याच माणसाच्या पायात पाय अडकवताहेत आणि पुढे जाणाऱ्याला पाडताहेत म्हणूनच आपण सिंहासनावर बसू शकत नाही. अरे एखादा पुढे जात असेल तर त्याला प्रेरणा द्या, प्रोत्साहन द्या, मदत करा तरच धनगर समाज इतिहास घडवू शकतो. त्यासाठी ज्या दिवशी धनगर समाजातील एकमेकांचे पाय ओढायचे आणि पायात पाय अडकवायची ही खेकडा प्रवृत्ती नाहीशी होईल तेव्हा मात्र धनगर समाज सिंहासनावर बसून भारतावर राज्यकारभार करेल हे त्रिकालबाधित सत्य आहे. आज धनगर समाज विकासपासून कोसो मैल दूर असून दुसऱ्यांची गुलामगीरी करण्यात अन एकमेकांना शिव्या घालण्यात आमची उर्जा खर्च करत बसतो. खरंतर सळसळत्या रक्ताला मात्र इतिहासाची जाण आहे पण सनातनी विचारांचा पगडा पडल्यामुळे आम्ही आमच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करतो आणि आमच्या इतिहासापासून आम्हाला दूर ठेवणे यापाठीमागे ब्राह्मणांचे खूप मोठे षड्यंत्र काम करत आहे याची जाणीव सर्वांना असायला हवी. अवर्जून सांगावेसे वाटते की झाडूमधील काड्या ज्यावेळी एकत्रित असतात त्यावेळी कचरा साफ करतात पण त्या काड्या ज्यावेळी बाजूला पडून विस्कटल्या जातात तेव्हा मात्र कचरा बनून जातात म्हणून वेगळे होऊन कचरा बनू नका तर एकत्रित येऊन समाजाचा विकास करा. म्हणूनच म्हणतो उठ धनगरा उगार मूठ, तूच थांबव आता तुझी लूट. महाराजा यशवंतराव होळकरांचे तुम्ही आम्ही वारसदार मग एवढा अन्याय होत असताना "षंढ होऊन थंड राहण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात बंड करून गुंड झालेले अधिक बरे."
(सुचना:- कृपया वरील कुत्र्याच्या आणि गाढवांच्या शर्यतींमधील जी प्रवृत्ती सांगितलेली आहे ती आपल्या धनगर समाजातील असलेली घाणेरडी प्रवृत्ती दर्शविली आहे. ती प्रवृत्ती कोणा एखाद्या व्यक्तिसाठी प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरित्या उद्देशून नाही लिहली. चूकून कोणीही ती स्वतावरती ओढवून घेऊ नये. कारण गैरसमज करून घेण्याचे प्रमाण आजकाल जास्तच वाढले आहे पण धनगर समाजाच्या विकासासाठी ही खेकडा प्रवृत्ती समाजातून मुळासह उखडून टाकायला हवी त्यासाठी तुम्ही-आम्ही सर्वांनी एकत्रित यायला हवे. त्यानिमीत्ताने केलेला हा लेखप्रपंच..)
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
        ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
https://nitinrajeanuse123.blogspot.in

Wednesday 13 July 2016

वारी वारी आरक्षणाची वारी...

...वारी वारी आरक्षणाची वारी...
आजकाल कोणीही उठतोय अन् राज्यघटनेत नसतानाही आरक्षण मागत बसतोय अशी परिस्थिती या महाराष्ट्र राज्यात दिसून येतेय. ज्या वंचित घटकाला राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करून ठेवली होती त्या आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिक व राजकीयदृष्ट्या मागासलेल्या धनगर समाजाला अजूनही अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तोपर्यंत इतर समाज पायात पाय अडकवण्याठी आरक्षणाची वारी वारी करत  बसलेत हे कीती मोठे दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र राज्याचे.??
बाबासाहेबांच्या विचारावरती, राज्यघटनेवरती हे संबंध राष्ट्र सुरळितपणे मार्गक्रमण करते आहे पण सनातनी आणि पुरोगामी विचारांनी बरबटलेल्या राजकारण्यांना फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि भारतीय राज्यघटनाच मान्य नाही असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. आणि जर राज्यघटना मान्य असती तर आज धनगर समाजाला घटनादत्त अधिकार असलेले अनुसूचित जमातीची अंमलबजावणी कधीच झाली असती. डाॅ.बाबासाहेबांनी राज्यघटनेमद्ये शोषित समाजाच्या उद्धारासाठी राज्यघटनेत तरतूद केली नसती तर आज धनगर-बहुजन समाजातील पोरं ब्राह्मनांच्या घरी धुणे-भांडी करत बसली असती हे सत्य विसरून चालणार नाही. इतिहासांतही डोकावून पाहिले तर बहुजन समाजाच्या त्याचप्रमाणे दलित अस्पृश्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या महात्मा फुलेंचे विचार हे बाळ गंगाधर टिळकांना पटत नव्हते कारण टिळक हे सनातनी विचारांचे होते. आजही महाराष्ट्र राज्यांत नव्हे तर अखंड भारतामद्ये बहुजन समाजाच्या विकासाचा जर चढता आलेख पाहिला तर सनातन्यांच्या ज्या औलादी राजकारण करताहेत त्यांच्या पोटात दुखू लागते.
आज इतर समाजाच्या तुलनेत धनगर समाज हा विकासपासून कोसो दूर आहे. जन्मापासूनच आयुष्याचा संसार लादलेल्या घोड्याच्या पाठीवर बसून आमची भटकंती सुरू झाली, कोकऱ्या-करडांचं लटाबणं सोबत घेऊन वेळप्रसंगी काट्या-कुट्यांचा, दगडधोंड्यांचा विचार न करता अनवाणी पायानं पोटाची खळगी भरण्यासाठी गावच्या गावं पालथी घालणारी आमची धनगर जमात रानावनात आणि जंगलातच राहिली. पोरं-बाळं सोबत घेऊन रोजच्या भाकरीसाठी वणवण फिरण्यामुळे धनगर समाजातील मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. समाजात शिक्षणाची कमतरता असल्याने विकासाच्या प्रवाहापासून ही धनगर जमात दूरच राहिली. ६-१४ वयोगटातील मुलां-मुलींना मोफत शिक्षणाची व्यवस्था करून काय फायदा?? गावोगाव भटकंती करणाऱ्या मेंढपाळांची पोरं आई-वडिलांसोबतच या गावावरून त्या गावाला भटकंती करणार मग ६-१४ वयोगटातील मुलं-मुली शिक्षण घेणार तरी कोठून??
शेळ्या-मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे, गायराने ही सरकारने हडपली. काही ठिकाणी मस्तावलेल्या माजग्या पुढाऱ्यांनी स्वताच्या खाजगी कंपन्या उभा केल्या तर सर्रास चराऊ कुरणांवरती वनखात्याने मेंढपाळांना पाबंदी घातली. मग शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करण्याशिवाय मेंढपाळांसमोर पर्यायच उरत नाही मग धनगर जमातींमधील मुलं-मुली शिक्षण घेणार कोठून? रानावनात, जंगलात राहणाऱ्या, तीन दगडाच्या चुलींवर स्वयंपाक करून आदिवासी जीवन जगणाऱ्या या जमातीचा सर्व अभ्यास करूनच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीला अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले होते पण "र" चा "ड" झाल्यामुळे सगळा राडा झाला आणि धनगर समाजाची हजारो मुलं-मुली आय ए एस, आय पी एस, डाॅक्टर, इंजीनीयर, वकील होण्यापासून वंचित राहिली.
आजपर्यंत धनगर समाज अज्ञानाचं घोंगडं पांघरून गाढ निद्रावस्थेत झोपी गेला होता पण आता समाज कुठेतरी जागृत होऊ लागला आहे. त्यामुळे समाजातील जागृत युवा वर्गाने तरून-तरूनींनी समाजाच्या न्याय व हक्कासाठी धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यात सहभागी व्हावे. जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होतं नाही तोपर्यंत धनगर समाजाचा काहीच उद्धार होणार नाही. जर धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजीवणी झाली तरच उद्याची पीढी सुज्ञान आणि सुशिक्षीत असेल. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर हजारो IAS/IPS, Advocates, Doctors, Engineers या समाजातूनच उदयाला येतील आणि भारताचं प्रशासन चालवतील, अखंड भारताचा राज्यकारभार धनगर समाजातील पोरं चालवतील तेव्हा राष्ट्रमाता अहिल्यामाईंचे स्वप्न साकार होईल अन्यथा उद्याच्या पिढीवरही आजच्यासारखे अन्याय व अत्याचार सहन करायची वेळ आली तर उद्याची पिढी तुमच्या-आमच्या तोंडात शेण घातल्याशिवाय राहणार नाही. "र" चा "ड" झाला म्हणून धनगर समाज रडत बसलाय ही भाषा बोलणाऱ्यांनो पुन्हा बोलताना थोबाड सांभाळून बोला नायतर ही धनगराची औलाद तुम्हाला बोलायला तुमचे थोबाडच जाग्यावर ठेवणार नाही हे लक्षात ठेवा. आम्ही इतरांसारखे राज्यघटनेत नसताना भिक मागत बसत नाही तर डाॅ.बाबासाहेबांनी राज्यघटनेत दिलेले आमचे हक्काचे मागतोय पण आमचा जर संयम सुटला तर लाथा घालून हिसकावून घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही कारण आमच्या नसानसात महाराजा यशवंतराव होळकरांचं रक्त सळसळतंय.... राज्यघटनेत आरक्षण दिले नसताना देखील इतर समाजातील समाजबांधव आणि त्या त्या समाजातील नेते पक्ष, संघटना, गट-तट बाजूला ठेवून आरक्षणासाठी एकत्रित येतात, चर्चा करतात आणि आंदोलन मोर्चे रास्तारोखो करतात पण धनगर समाजातील नेते मात्र मी मोठा होतोय की तू मोठा होतोय म्हणून भांडत बसलेत अन् एकमेकांची जिरवाजिरवी करत बसलेत त्यामुळे धनगर समाजाचे वाटोळं होतंय. धनगर समाजाचे एखादं संघटन मजबूत असावं म्हणून एखाद्याला उठवून उभा करून घोड्यावर बसवला तर तो धनगर समाजाला फाट्यावर मारून समाजातील नेत्यांनाच विरोध करत स्वार्थासाठी स्वताचंच घोडं दामटत बसतोय मग या सर्व प्रकाराला नक्की काय म्हणायचे?? तरी एक म्हण सर्वज्ञात आहेच "धनगरी जत्रा अन कारभारी सतरा" असे नाइलाजाने मला म्हणावेसे वाटतेंय.
बाभळीच्या काट्याला तलवार बनवलं असतं,
पळसाच्या पानाला ढाल बनवलं असतं,
माझ्याच धनगर समाजात आज एकी नाहीये,
नाहीतर.....महाराष्ट्रावर नव्हे तर
अख्ख्या भारतावर फक्त आमचंच राज्य असतं.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday 5 July 2016

यशवंत युवा सेनेची बैठक उत्साहात पार पडली

यशवंत युवा सेनेची बैठक उत्साहात पार पडली

रविवार दि.३ जुलै २०१६ रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात यशवंत युवा सेनेची पहिली बैठक उत्साहात पार पडली. पश्चिम महाराष्ट्रातून यशवंत मावळे बहुसंख्येने या बैठकीमद्ये सहभागी झाले होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडासा व्यत्यय आला यामुळेच काही भागातील कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते. धनगर-बहुजन समाजातील वंचिताच्या न्याय व हक्कासाठी, प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी युवा वर्ग यशवंत युवा सेनेच्या माध्यमातून एकत्रित येत असल्याचे चित्र सांगोला येथे पार पडलेल्या बैठकीतून दिसून आले.
धनगर-बहुजन समाजावरती परकीयांप्रमाणेच स्वकीयांनीसुद्धा अन्याय व अत्याचार केलेला आहे आणि आजही करत आहेत याचा समाचार घेण्यासाठीच युवकांनी भंडारा उचलला असून धनगर-बहुजन समाजावर झालेला अन्याय अत्याचार सहन करून घेतला जाणार नाही असे प्रतिपादन यशवंत युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाद्यक्ष मा.प्रा.सचिन होनमाने सर यांनी केले. त्याचप्रमाणे समाजातील नेत्यांमधील चाललेले वाद, एकमेकांवरची टीकाटीपनी संपवून युवा वर्गाने यशवंत युवा सेनेच्या माद्यमातून एकत्रित यावे व समाजहितासाठी हातभार लावावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मा.अनिल महारनवर साहेब यांनी केले. धनगर समाज त्याचप्रमाणे बहुजन समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच स्वाभिमानी आणि स्वावलंबी युवकांनी एकत्रित येवून यशवंत युवा सेनेची स्थापना केली असून या संघटनेची जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि मी ती जबाबदारी स्वीकारली असून माझ्या हातून समाजहीताचेच कार्य पार पडेल. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठीच त्याचप्रमाणे महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे व पक्ष, गट-तट बाजूला ठेवून धनगर समाजातील युवकांनी महाराजा यशवंतराव होळकरांचा वारसा जपत नविन इतिहास घडिविण्यासाठी यशवंत युवा सेनेत सहभागी व्हावे असे आवाहन करत कोणत्याही नेत्याला विरोध न करता समाजाच्या हीतासाठी पिवळ्या भंडाऱ्याची शपथ युवकांनी घेतली असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले.
या बैठकीदरम्यान उपस्थित समाजबांधवांनी तसेच धडाडीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे पदांचा कार्यभार स्वीकारला. यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाद्यक्ष मा.प्रा.सचिन होनमाने साहेब तसेच बहुसंख्य धनगर समाजातील त्याचप्रमाणे बहुजन समाजातील समाजबांधवांच्या उपस्थितीमध्ये विविध पदांवरती कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून ती पुढील प्रमाणे...
१)मा.विष्णू देशमुख साहेब
(कार्याद्यक्ष यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य)
 मो.नं.+91 99-60-444256

२)मा.अॅड.रविकिरण कोळेकर साहेब
(सरचिटणीस यशवंत युवा सेना महा.राज्य)
मो.नं.+91 8275-206651

३)मा.अवधूत वाघमोडे साहेब
(यशवंत युवा सेना संपर्क प्रमुख महा.राज्य)
मो.नं.+91 98-90-506501

४)मा.ज्ञानेश पाटील सर
(सांगली जिल्हा संपर्क प्रमुख यशवंत युवा सेना)
मो.नं.+91 91-45-131950

५)मा. आण्णासाहेब कोळेकर
(आटपाडी तालुका प्रमुख यशवंत युवा सेना)
मो.नं.+91 96-89-136365

६)मा.दिनेश हुबाले (दादा)
(माण तालुका प्रमुख यशवंत युवा सेना)
मो.नं.+91 97-65-127726

     या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची भंडारा लावून निवड करण्यात आली त्याचप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेची व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निष्ठा राखणार त्याचप्रमाणे ज्या समाजासाठी या यशवंत युवा सेना संघटनेची स्थापना त्या समाजासाठी अहोरात्र कार्य करणार असल्याची शपथ सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याबरोबर स्व बी के कोकरे साहेबांचे नुसतेच विचार सांगून नव्हे तर ते कृतीतून दाखवून देणार असल्याचीही शपथ नवनिर्वाचित युवा पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याबद्दल त्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनापासून हार्दिक हर्दिक अभिनंदन, समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी त्याचप्रमाणे माता-भगिणी व समाज रक्षणासाठी तुमच्या हातून चांगले कार्य घडो हीच मल्हारचरणी प्रार्थना.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

ह्रदयं झालीत दगडाची, संवेदना कोठून येणार??

ह्रदयं झालीत दगडाची, संवेदना कुठून येणार??
       मी फार मोठा विचारवंत नसलो तरी सामाजिक बांधिलकीची जबाबदारी म्हणून एक लेखक या नात्याने या विषयाला हात घालावासा वाटला. कारण आजचे आसपासचे दुषित वातावरण पाहिले की माझ्या मस्तकाची शीर उठते अन् तळपायाची आग पार मस्तकापर्यंत जाते आणि मेंदूवर आघात करायला सुरवात करते. आज आजूबाजूच्या वातावरणात फिरताना/वावरताना समाजात "संवेदना" शिल्लकच राहिली नाही हे दिसून येते आणि ते तितकेच सत्यही आहे. कालपरवा कोल्हापूर मधील बोंद्रेनगर येथील घडलेली घटना ताजी असतानाच रोजच्याच वृत्तपत्रात तशाच आणि चित्रविचित्र घटना घडल्याची कीतीतरी उदाहरणे देता येतील.
       आज सकाळी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासात खचाखच गर्दी असल्याने उभा राहूनच प्रवास करवा लागला तेव्हा बाजूलाच बाकड्यावरती बसलेल्या एका वृद्धाच्या हातात असलेल्या लोकमत वृत्तपत्रातकडे सहज नजर गेली अन् पुन्हा पुन्हा माझे डोळे त्या वृत्तपत्रातील बातमीकडे विस्फारून पाहत होते अशी "बापानेच सहा वर्षाच्या चिमुरड्या मुलीला नदीत फेकले" या आशयाची बातमी वाचली अन् अक्षरशा माझे मन सुन्नच झाले. मुलीचं आणि बापाचं नातं हे अनोख्याप्रकारचे असते कारण बाप मुलीला मुलापेक्षाही जास्त जीवापाड जपत असतो आणि बापाला सांभाळून घेणारी फक्त मुलगीच असते. वडिलांच्या आवाजात जरी बदल झाला तरी मुलगी पटकन ओळखते असे नाते असताना त्या बातमीबद्दल लाखो विचारांनी डोक्यात थैमानच घातले. बाप दगडाच्या ह्रदयाचा कसा काय बनू शकतो?? यांवर माझा विश्वासच बसत नव्हता. आजच्या परिस्थीतीचा आढावा घेतघेतच विचार मनांत येत होते. मुलींच्याच बाबतीत घडणाऱ्या या मानवाच्या वाइट प्रवृत्तीला कसा आळा घालायचा?? यासाठी डोक्यात विचारचक्र सुरू झाले मग ठरवले की ज्याप्रमाणे इतिहासांत तलवारीने शत्रूंची डोकी नांगरली जायची, सपासप कापली जायची त्याचप्रमाणे या एकविसाव्या शतकातील वासनेने हपापलेल्या, गोरगरीब मजबूर असलेल्या तरुणींच्या आब्रुचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांची त्या नराधमांची जर डोकी नांगरायची असतील तर कलमच चालवावं लागेल आणि प्रतिष्ठीतेचा बुरखा पांघरलेल्या नागरिकांना एक चपराक द्यावी म्हणून यासाठी मांडलेला हा लेखप्रपंच.
     स्त्रिभ्रूणहत्या, मुलींची छेडछाड, बलात्कार, विवाहीतेवर अन्याय अत्याचार, हुंडाबळी इत्यांदी सारख्या धटनांची यादी वाढवेल तितकी वाढतच जाईल पण कमी नाही आणि अशा प्रकारच्या घटना रोजच्याच आहेत आणि त्या काही नवीन नाहीत असे एखादा रोजचाच वाचक सहज बोलून जातो मग त्या वाचकाला माझा पुढचा प्रश्न असा असेल की 'आजपर्यंत घडलेल्या घटनांमद्ये अथवा इथून पुढे घडणाऱ्या घटनांमद्ये जर तुमची मुलगी असेल, आई-बहिण असेल आणि तुमच्याच नातेवाईंकापैकी कोणी स्त्री अथवा पत्नी असेल तर तुम्ही काय केले असते??' ती घटना तुमच्यासाठी नविन नसून जूनीच असेल तर या जगात तुमच्यासारख्या संवेदनाशून्य असलेल्या व्यक्तींचा आणि प्रवृत्तीचा मी खरंतर धिक्कार करतो. कारण त्या त्या पिडीत मुलीचा बाप, भाऊ, मुलगा अथवा पती या नात्याला तुम्ही कलंक आहात असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. म्हणूनच की काय आजच्या वर्तमानपत्रातील ती घटना घडली असावी. ज्या चिमुरडीला तिच्या बापाने नदीमद्ये फेकून दिले सुदैवाने ती वाचली दहा तास मृत्यूशी झुंज देत होती. पण त्या घटनेचे कारण असे की वरील परिस्थीती भविष्यात कधीही उद्भवू शकते म्हणूनच...  या एकविसाव्या शतकात मराठी फिल्मइंडस्ट्रीच नव्हे तर बाॅलीवूड अथवा हाॅलीवूड असो यांसख्या चित्रपटातून भावना चाळवतील अशी लुभावणारी दृश्य दाखवल्याने तरूण पिढीच्या मनावरती विपरीत परिणाम झाला आणि होतही आहे. चित्रपटातील तोकडी आणि तंग कपडे पाहून भारतीय संस्कृत्ती विसरून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत अंगप्रदर्शन करणाऱ्यांमुळे आज समाजातील तरूणांच्या लैंगिक वासना भडकवल्या जातात मग मस्तावलेली टपोरी पोरं वाटेल तसे जीवन जगू लागतात. रस्त्यावरून एकटी चाललेली तरूणी म्हणजेच त्यांच्या बापाचा माल असे समजून तुटून पडतात, मग त्या घरच्यांचे संस्कार नसलेल्या त्या टपोऱ्या पोरांच्या हव्यासापोटीच कमजोर आणि मजबूर मुली त्या वासनाधीन लांडग्यांच्या शिकार बनतात. जर एखाद्या मुलीसोबत अशी घटना घडत असेल, कोणी तिची छेडछाड करत असेल, कोणी त्रास देत असेल तर ती मुलगी कधीही आणि कोणाकडेही तक्रार करत नाही याकडे त्या दुर्लक्ष करतात आणि जर पालकांकडे तक्रार केलीच तर बदनामी होईल म्हणून पालकच त्या मुलीची मुस्कटदाबी करून तिला शांत राहण्यास प्रवृत्त करतात मग सततच्या या त्रासाला कंटाळून पल्लवी बोडेकर सारख्या आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुली ऐन तारूण्यातच आत्महत्या करून जीवनयात्रा संपवितात.
     राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्याई होळकर, क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या लेकी असा अन्याय अत्याचार करणाऱ्या टपोऱ्यांना त्यांच्या मुस्काडात वाजवून प्रतिकार करत नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस जास्तच वाढत चाललेत. मग अशा घटना सर्रास घडत असतानाच मुलीची बदनामी होऊ नये म्हणून इज्जतीसाठी मूग गिळून बसण्याशिवाय पर्याय नसतो मग पुढे मुलीच्या लग्नासाठी देखील खिशात आणा नसताना समाजातील हुंडापद्धतीलाही सामोरे जायचे असते, भविष्यातील मुलीच्या भल्यासाठी झटत असताना आजूबाच्या वासनेने बरबटलेल्या कुत्र्यांशी दोन हात करण्यापेक्षा दगडासारखं ह्रदय बनवून तिला गर्भात मारणे अथवा मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीचा जीव घेणं हे बापालाही मान्य नसतं पण आजूबाजूचे दुषित झालेले वातावरण त्या बापाला दगडासारखं ह्रदय बनवण्यास मजबूर करते. पण पोलिसयंत्रणा, कायदा आणि सुव्यवस्था मात्र हातावर हात बांधून शांत बसते आणि मग ज्या बापाच्या हातून हे अपराध घडतात ते बापच गुन्हेगार ठरतात, त्यांना लगेच शिक्षा होते पण मुलींची छेडछाड काढणारी, इज्जत लुटणारी, समाजातील हुंडाबळी घेणारी कुत्री मात्र मोकाटच बोंबलत फिरतात त्यांना आवर घातला पाहिजे.
      खरंतर ही जबाबदारी आता सामाजिक संघटनांवरती येऊन ठेपली असली तरी आज काही सामाजिक संघटना (सर्वच नव्हे) अशा घटनांचा (स्वार्थासाठी) निषेध करतात, पिडीतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करून त्यांची जबाबदारी स्विकारतात खरं पण स्वताच्या प्रसिद्धीसाठी त्याचा एवढा अवडंब करतात /टेंभा मिरवतात की त्यांच्याशिवाय एवढे चांगले काम कोणीच करू शकत नाहीत या अहंकारात गडी नाचत असतात बोंबलत असतात पण ज्याप्रमाणे "दिव्याखाली अंधार" असतो त्याप्रमाणे मुलींची छेडछाड, बलात्कार, स्त्रिभ्रूणहत्या, हुंडाबळी यांसारख्या घटनांना कारणीभूत असलेल्या कलंकित पोरांना सोबत घेवून अशा संघटना काम करत असतील तर तुमच्या त्या कार्याला काय अर्थ?? त्या कलंकित वृत्तीच्या आणि संकुचित बुद्धीच्या वासनेने भुकेलेल्या गिधडांना स्वताच्या आई-बहीणींदेखील दिसत नाही एवढे त्यात बुडालेले असतात मग त्या संबंधित संघटनेतला प्रत्येक कार्यकर्ता बदनामीस पात्र ठरतो. त्या कलंकितांची ह्रदयं ही दगडाची असल्याने त्यांना सोबत घेऊन काम करणाऱ्यांची ह्रदयं सुद्धा दगडाचीच आहेत असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही, मग "संवेदना" कुठे शिल्लक राहतेय तेच मला समजत नाही.???

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com