Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Friday 29 April 2016

एकत्रिकरणातूनच समाजाचा विकास -मा.विवेक कोकरे

एकत्रिकरणातूनच समाजाचा विकास -मा.विवेक कोकरे

समाजाच्या अज्ञानपणामुळे विखुरल्या गेलेल्या धनगर समाजाला एकत्रित करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन यशवंत सेनेचे महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष मा. विवेक कोकरे साहेब यांनी काल मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर तसेच पेन्नूर (मोहोळ) येथे आयोजित केलेल्या बैठकीदरम्याण केले. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मा.विवेक कोकरे साहेबांनी मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला तसे मोहोळ तालुक्यातील धनगर समाजबांधवांशी चर्चा केली होती. कोणतीही व्यक्ती समाजापेक्षा मोठी नाही तर समाज सर्वापेक्षा मोठाच असतो म्हणून समाजाला कोणी वेठीस धरू नये अथवा स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचे कोणी भांडवलीकरण करू नये असेही त्यांनी सांगितले. धनगर समाज पोटजाती मध्ये विभागला आहेच शिवाय अज्ञानपणामुळे विखुरला गेला. या भरकटलेल्या समाजाला जर एकत्रित केले तरच समाजाचा विकास होऊ शकतो आणि त्यासाठी मी अहोरात्र कार्य करायला तयार असल्याचे यशवंत सेना युवक प्रदेशाध्यक्ष मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यामध्ये मा.एडव्होकेट रविकिरण कोळेकर साहेब आणि सहकाऱ्यांनी बैठकीचे अतिशय उत्कृष्टरित्या नियोजन केले होते त्यावेळी ३०-३५ युवक बैठकीसाठी उपस्थित होते तर पंढरपूर येथे मा.नानासाहेब खांडेकर व सांगोला येथे मा.विशाल वाघमोडे, अवधूत वाघमोडे यांनी बैठकीचे नियोजन केले होते. काल दि.२७ रोजी.लग्नसराई चे दिवस असतानादेखिल प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव चर्चेसाठी उपस्थित राहिले होते यारुनच लक्षात येते धनगर समाज प्रगतीच्या दिशेने जायला सज्ज झाला असून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करुन अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या  क्रांतीची मशाल देणाऱ्या यशवंत सेना संस्थापक स्व बी.के.कोकरे साहेबांच्या क्रांतीकारी संघटनेच्या माध्यमातून एकत्रित येत असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या नात्याने युवा पिढी यशवंत यशवंत सेनेत सहभागी होत आहेत. यशवंत सेना नेहमीच व्यक्तीपेक्षा समाज मोठा या तत्वाने काम करत राहील असे यशवंत सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष मा.विवेक कोकरे साहेब बोलताना म्हणाले.
मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, मोहोळ येथील दौऱ्यामध्ये मा.विवेक कोकरे साहेबांसोबत मा. विशाल वाघमोडे, मा.विशाल कोकरे, मा.राजाराम वाघमोडे आदी युवक सहभागी झाले होते.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday 19 April 2016

...तर धनगर म्हणवून घेऊ नका


धनगर समाजात जन्माला आलेली एकाच मातेची अर्थातच अहिल्याईची आम्ही लेकरं आज पोटजातीच्या विळख्यात अडकून बसलोय म्हणूनच माझा धनगर समाज इतरांपेक्षा ५०-६० वर्ष पाठीमागे आहे असे म्हणायला काही वावगं वाटणार नाही. आज कोणी म्हणतो मी हटकर, कोणी म्हणतो मी खूटेकर, कोणी म्हणतो झेंडे धनगर, तर कोणी म्हणतो बंडे धनगर, कोणी म्हणतो अहिर, तर कोणी म्हणतो डंगे धनगर, कोणी म्हणतो अमुक धनगर तर कोणी म्हणतो तमूक धनगर. अशा रीतीने प्रत्येकाने व्यवसायनुरूप, कुळानुरूप आणि कर्तव्याच्या आधारावर पोटजाती वाटून घेतल्या आणि एकत्रित गुण्यागोविंदाने जगणाऱ्या माझ्या धनगर समाजाचे विभाजन केले. अरे नुसतेच विभाजन केले नाही तर पार वाटोळे केले माझ्या धनगर समाजाचे, पण आजच्या सुशिक्षित युवा वर्गाने तरी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा. असाच पोटजातींचा डंका मिरवत बसला तर आरक्षणाची अंमलबजावणी दुरच सोडा ज्या ज्या वेळी समाजातील आपल्याच आई-बहिणींवरती अन्याय अत्याचार  होईल त्या त्या वेळी पोटजातीच्या अहंकाराने माजलेली आपलीच माणसं मदतीला धावून येणार नाहीत हे सत्य नाकारू शकत नाही.
एकाच रक्ताच्या आम्ही औलादी अर्थातच मल्हारबांचे मावळे, लोककल्याणकारी रणरागिणी महाराणी अहिल्याईची आम्ही लेकरं, अद्वितीय महाराजा भारताचा नेपोलीयन बोनापार्ट म्हणून अख्खं जग ज्यांना ओळखते त्या राजे यशवंतराव होळकरांचे आम्ही वारसदार आज पोटजातीच्या नावाखाली वेगवेगळे बस्तान बसवतोय अन् प्रस्तापित जातींना डोक्यावर घेऊन मिरवतोय कीती दुर्दैव आमचे... जेवढे धनगर म्हणून जगाल आणि धनगर म्हणूनच एकत्रित याल तरच आपले हक्क/अधिकार आपण हिसकावून घेऊ शकतो पण पोटजातींचा स्वाभिमान बाळगून आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत हे बोंबलत बसला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही उलट धनगर समाज अजून जास्तच पोटजातीत विभागला जाईल आणि एकदा का धनगर समाज विभागला गेला तर या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अखंड भारतात सनातनी विचारांनी बरबटलेली आणि ज्यांनी धनगर समाजाला आजपर्यंत अंधारात ठेवले होते अशी प्रस्तापित पिलावळ एकेकाळी राजा समाज असणाऱ्या जमातीवर राज्यकारभार करायला एकहाती मोकळी होइल याचा विचार माझ्या धनगर समाजातील तरुण बांधवानी करावा.
आज समाजात विवाह असो अथवा कोणताही कार्यक्रम सोहळा असो जिथे तिथे पोटजातींचेच साखळदंड आडवे येताहेत मग पोटजातींचा अहंकार बाळगणारे धनगर कसले? असाच प्रश्न मला पडतो. होळकर(विरकर)-शिंदे यांचा हकटर-खुटेकर मधील रोटी बेटी व्यवहार, तद्नंतर अहिल्याईंनी मुक्ताचा विवाह यशवंतराव फणसे यांच्याशी करुन दिला होता, राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर यांच्यातील भोसले-होळकर कुटुंबात झालेला रोटी-बेटी व्यवहार आजही चालत आहे मग त्याच माझ्या धनगर  समाजात आज आम्हाला पोटजातींचा अडथळा कशासाठी?? जर तसे असेल  तर धनगर समाजबांधवांनो ज्यांना ज्यांना  पोटजातीला प्राधान्य द्यायचे असेल, पोटजातींचा डंका मिरवायचा असेल अथवा पोटजातींचाच उदोउदो करायचा असेल तर धनगर जमातीच्या प्रमाणपत्राऐवजी त्या त्या पोटजातींचीच प्रमाणपत्रे घ्या अन् स्वताला धनगर म्हणवून घेऊ नका.
एक कट्टर धनगर
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com