Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday 22 July 2017

यशवंत युवा सेनेच्या शिलेदाराचा वाढदिवस

यशवंत युवा सेनेच्या शिलेदाराचा वाढदिवस विशेष...
समाजासाठी झटणारे झगडणारे, समाजाच्या प्रश्नांसाठी वाचा फोडणारे, रात्री-अपरात्री समाजबांधवांच्या हाकेला धाऊन जाणारे आमचे परममित्र, कायदेपंडित तथा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस कायदा सल्लागार मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
समाजसेवा हीच ईश्वरसेवा असे मानून अविरत समाजकार्य करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यांतील रड्डे गावचे सुपूत्र कायदेतज्ञ ॲड.रविकिरण रविकिरण कोळेकर साहेब यांच्या बद्दल बोलावे, लिहावे तेवढे कमीच... गेल्या ३० आॅक्टोबर २०१६ रोजी हुलजंती येथे महालिंगराया यात्रेनिमीत्त यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य आयोजित भव्य धनगर महासभेत जलसंधारण तथा राजशिष्टाचार मंत्री ना.राम शिंदे साहेब यांनी महालिंगराया देवस्थानचा विकास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याचे काम यशवंत युवा सेनेचे सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब व यशवंत युवा प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले. त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील समाजबांधवांना एकत्रित करून समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी ॲड.कोळेकर साहेब झटतात झगडतात, जर समाजबांधवांवरती अन्याय होत असेल तर त्यांच्या हाकेला धाऊन जाण्याचे काम हे यशवंत युवा सेनेचे शिलेदार करतात त्यामुळे अशा शिलेदारांस वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याचबरोबर त्यांच्या यशाचा आलेख दिवसागणिक वाढत राहो व त्यांच्या हातून असेच समाजकार्य घडो या छोट्याशा शुभेच्छा.
शुभेच्छूक,
सर्व यशवंत युवा सेना पदाधिकारी,
सर्व यशवंत युवा सैनिक
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य

Monday 17 July 2017

अबब! चक्क हत्तीवरून मिरवणूक...

माणदेशातील बारमाही दुष्काळी भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याची ओळख अखंड महाराष्ट्र राज्यभर आहे. पण याच दुष्काळी भागातील काही विद्यार्थ्यांनी दुष्काळाशी दोन हात करून संकटांशी, परिस्थीतीशी झुंज देत चक्क युपीएससी व एमपीएससी स्पर्धा परिक्षांमध्ये असे यश संपादन केले की त्याला तोडच नाही अशा विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी घेताला आणि काल शनिवार दि.१५ जुलै २०१७ रोजी आटपाडी येथे कोणतीही जातपात न मानता सर्व बहुजन समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून व हत्तीवरुन मिरवणूक काढून नुसत्या आटपाडी तालुक्यांत वा सांगली जिल्ह्यातच नव्हे तर अखंड महाराष्ट्र राज्य आणि भारतात एक आगळा वेगळा उपक्रम राबवून माणदेशातल्या आटपाडी तालुक्यांतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले स्वताच्या हाताने साखर वाटून आटपाडी तालुक्यांतील गुणवंतांचे पालकत्व निभावले असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.

युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी युपीएससी मध्ये यश मिळवलेल्या डाॅ.सचिन मोटे (विभूतवाडी), एमपीएससी मधील अश्विनी शेंडगे व राजश्री पाटील यांचा जो सत्कार व सन्मान सोहळा आयोजित केला तो नुसत्या त्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर माणदेशातील विद्यार्थ्यांनी युवक-युवतींनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा व स्पर्धा परिक्षांमध्ये असेच घवघवीत यश संपादन करावे हा त्या सत्कार सोहळ्यामागचा हेतू होता. दुष्काळाशी दोन हात करून परिस्थीतींशी/प्रस्तापितांशी लढण्याची झगडण्याची प्रेरणा ही आम्हाला मा.गोपीचंद पडळकर साहेबांकडूनच मिळाली आणि तालुक्यांतील विद्यार्थ्यांनीही युपीएससी व एमपीएससी मध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन स्पर्धा परिक्षांची चौकट तोडावी हीच प्रामाणिक अपेक्षा महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांची आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday 14 July 2017

यशवंत युवा सेनेचा अनोखा उपक्रम


 यशवंत युवा सेना प्रमुखांच्या आवाहनाला साथ देत पंढरपूर येथील यशवंत युवा सेना शाखा नेपथगावच्या वतीने यशवंत युवा सैनिकांनी वृक्षारोपन मोहिम हातात घेऊन राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. स्त्री असूनदेखिल आदर्श राजकारभार व उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था सांभाळणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याईंचा आदर्श घेऊन युरोपातील राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली मात्र ज्या मातीत माझ्या राष्ट्रमाता अहिल्याईंचा जन्म झाला ती माती मात्र अहिल्याईंच्या विचारांपासून दूर झाली नव्हे तर काही जातीयवादी इतिहासकारांमुळे राष्ट्रमाता अहिल्याईंचा इतिहास अंधारात ठेवण्याचे पाप त्या सनातनी इतिहासकारांनी केले होते. परंतु आज यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही क्रांतीकारी संघटना राष्ट्रमाता अहिल्याईंचा वारसा आणि इतिहास जपत असल्याचे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजेच यशवंत युवा सेना शाखा नेपथगाव ता.पंढरपूर येथील यशवंत युवा सैनिकांनी हाती घेतलेला वृक्षारोपनाचा उपक्रम. यशवंत युवा सेना ही संघटना नुसती प्रसिद्धीसाठी कार्य करत नाही तर सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. मेंढपाळ बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या काय आहेत हे समजून घेणे, त्यांच्यावर जर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांच्या हाकेला धाऊन जाणे, समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढा उभा करणे आणि त्यांना न्याय देणे हीच धमक यशवंत युवा सैनिकांत आहे. झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम माझ्या राष्ट्रमाता अहिल्याईंनी अठराव्या शतकात सुरू केला होता तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन सरकारने हा उपक्रम चालू केला असला तरी तो फक्त कागदोपत्रीच....
परंतु यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे यांच्या आवाहनाला साथ देत आपल्या थोर महापुरूषांचा इतिहास जपण्यासोबतच त्याचे संवर्धन करण्याचे देखिल प्रमाणिकपणे कार्य करत आहे त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात यशवंत युवा सेनेला आणि यशवंत युवा सैनिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यशवंत युवा सेना नेपथगाव शाखेच्या वतीने नेपथगाव परिसरांत वृक्षारोपन करून त्याचे संवर्धन देखिल करण्याची शपथ यशवंत युवा सैनिकांनी व गावकऱ्यांनी घेतली. त्यावेळी वृक्षापोपन करताना यशवंत युवा सेना शाखा नेपथगावचे  प्रमुख मा.काशिनाथ सरगर, उपशाखाप्रमुख मा.तुराराम हेगडकर, मा.अभिजित पालवे, मा.लक्ष्मण पडवळकर उर्फ LP,मा.मायापा हेगडकर, मा.विकास वगरे, मा.अंकुश घोडके,मा.सचिन घोडके, मा.आपा शिदे, नेपतगाचे सरपंच मा.अशोक कदम, माजी सरपंच मा.बाळासाहेब बुधनेर, मा.हर्षवरधन शिदे, मा.संतोष शिदे, मा.सोनाजी कदम, मा.बिरुदेव सलगर, मा.दिलीप कोळेकर, मा.श्रीकांत घोडके,मा.संदीप नरूटे व अन्य मान्यवर व यशवंत युवा सैनिक उपस्थित होते... खरंतर त्या सर्वांना एक अहिल्याईचा मर्द मावळा या नात्यानं पिवळा जय मल्हार.
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना यशवंत युवा सैनिकांना सोबत घेऊन अखंड महाराष्ट्र राज्यभर हा उपक्रम राबवणार असून मल्हारबांच्या वारसदारांनी, अहिल्या भक्तांनी, यशवंतराव होळकरांच्या मावळ्यांनी यशवंत युवा सेनेच्या शिलेदारांना साथ द्यावी असे आवाहन यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajepublications.blogspot.com

Wednesday 12 July 2017

भव्य मोटारसायकल रैलीचे नियोजन लांबवले

बारामती येथील २१ जुलै रोजी होणाऱ्या व मुंबई येथे १ आॅगस्ट रोजी होणाऱ्या धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्या आंदोलनात कोणताही व्यत्यय येऊ नये व समाजाचे अधिकार व हक्क समाजाला लवकरात लवकर मिळावेत म्हणून २६ जुलै २०१७ रोजी यशवंत युवा सेना आयोजित करण्यात आलेली सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे यासाठी भव्य मोटारसायकल रैली यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्यच्या वतीने आयोजित करण्यात आली होती परंतु समाजाच्या न्याय व हक्कासाठी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ती भव्य मोटारसायकल रैली २६ जुलै ऐवजी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी दिली. समाजाचे प्रश्न सुटावेत व समाजाला न्याय मिळावा ही या क्रांतीकारी संघटनेची विचारधारा आहे स्व.बी.के.कोकरे साहेबांची ही विचारधारा जपणे आणि जोपासणे हे यशवंत युवा सेनेचे आद्य कर्तव्य आहे. धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षण लढ्यासोबतच समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मात्र राजकीय नेत्यांकडून मंत्र्यांकडून त्याकडे जाणूनबूजून दुर्लक्ष केले जात असून त्याकारणास्तव धनगर समाजाला प्रचंड अन्याय सहन करावा लागत आहे. मेंढपाळांच्या समस्या सोडवण्यासाठी यशवंत युवा सेना आणि यशवंत युवा सेनेचे शिलेदार नेहमीच हाकेला धाऊन जात असतात आणि समाजबांधवांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे समाजापेक्षा यशवंत युवा सेना ही संघटना काही फार मोठी नाही पण समाजाच्या प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडण्याची धमक ही  यशवंत युवा सेनेच्या शिलेदारांत आहे त्यामुळे मेंढपाळ बांधवांच्या मनामनात, समाजातील माता-भगिनींच्या, समाजबांधवांच्या ह्रदयात यशवंत युवा सेना या संघटनेने घर निर्माण केले आहे.
अारक्षणाच्या लढाईबरोबरच समाजातील अन्य प्रश्नांची दखल राज्य सरकारला आणि प्रशासनाला घ्यायला लावल्याशिवाय यशवंत युवा सेना शांत बसणार नाही. जातीयवादी प्रस्तापित नेत्यांच्या धोरणामुळे सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले गेले नाही. परंतु यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने पंढरपूर-सोलापूर या मार्गाने हजारो मोटारसायकलची भव्य रैली काढून आंदोलन छेडणार असल्याची माहिती यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी दिली असून या भव्य मोटारसायकल रैली आणि भव्य आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रपती पुरस्कार विजेता, युवा दिग्दर्शक तथा यशवंत युवा सेनेचे युवक प्रदेशाद्यक्ष मा.शरद गोयेकर यांनी केले आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             *उमेशराजे अनुसे*
       पश्चिम महाराष्ट्र प्रमुख
🙏यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य🙏
       +919766878717
 AAnuse01@gmail.com

Sunday 9 July 2017

मेंढपाळांच्या मदतीसाठी धावले यशवंत युवा सेनेचे शिलेदार


शुक्रवार दि. ७ जुलै २०१७ रोजी सांगलीच्या वाळवा तालुक्यांतील माणिकवाडी गावचे मेंढपाळ बांधव चारणीसाठी भटकंती करत करत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात आले असता अनकढाळ येथे काही मराठा समाजाच्या विकृत लोकांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण देखील केली तेव्हा मेंढपाळ बांधवांनी देखिल त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले परंतु चिंधके येथील मराठा समाजातील काही समाजकंटक लोक त्या मेंढपाळांच्या बकऱ्या टेम्पोमध्ये भरून घेऊन गेले. सदरच्या मेंढपाळ बांधवाचे भाऊ आनंद गढाळे यांनी मला याबाबत लागलीच खबर दिली असता मी सदरचा वृत्तांत यशवंत युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मा.अवधूत वाघमोडे साहेब यांना सांगितला व लगेच त्यांनी कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली व घटनेची चौकशी केली. यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे संपर्क प्रमुख मा.अवधूत वाघमोडे साहेब, यशवंत युवा सेनेचे खंबीर नेतृत्व मा.बिरूदेव शिंगाडे तसेच अन्य कार्यकर्त्यांसह पोलिस यंत्रणा देखिल घटना स्थळी दाखल झाली असता मराठा समाजातील त्या कटू वृत्तीच्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली. मेंढ्या का उचलून असा जाब विचारला असता त्यांनी सांगितले की मेंढपाळ बांधवांनी ८० वर्षाच्या आज्जीला मारहाण केली आहे परंतू आज्जीला समोर बोलावल्यानंतर कळले की आज्जीच्या हातावरील जखम ही दहा दिवसांपूर्वीची आहे. एकीकडे छत्रपती शिवरायांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे आपल्यातीलच जिजाऊंना पुढे करून खोटेनाटे सांगत गोरगरिब धनगर मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्या उचलून न्यायच्या असा प्रकार योग्य दिसतोय का? चिंधके येथिल मराठा समाजाचे लोक नेहमीच असे करतात, मेंढपाळ बांधवांना त्रास देत असून, मारहाण करून शेळ्या मेंढ्या उचलून घेऊन जातात असे अनकढाळ येथील रहिवाश्यांनी माहिती दिली. त्यांवर पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरले आहे शिवाय इथून पुढे जर पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करत असलेल्या मेंढपाळ बांधवावर असा अन्याय अत्याचार केला तर जेलची हवा खावी लागेल असा सज्जड दम भरविला.
यशवंत युवा सेनेचे शिलेदार हे वेळेवर मेंढपाळ बांधवांच्या हाकेला धाऊन आले व त्या गावगुंडाकडून मेंढपाळांना बकऱ्या परत केल्याने महाराष्ट्र राज्यभर त्यांचे कौतुक केले जात आहे. यशवंत युवा सेना ही एक क्रांतीकारी संघटना असून ती ग्राउंड लेवलला समाजबांधवांच्या मनामनात ठासून भरलेली आहे. ही संघटना आर्थिक प्राबल्य नसल्याने कदाचित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडीया पासून कोसों दूर असली तर मेंढपाळ बांधवांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत असल्याने व त्यांच्या हाकेला धाऊन जात असल्याने समस्त मेंढपाळ बांधवांच्या मना मनात यशवंत युवा सेनेच्या शिलेदारांनी घर निर्माण केले आहे. यशवंत युवा सेना संघटनेला मुळात प्रसिद्धीची गरज नसून स्व.बी.के.कोकरे साहेबांचा वारसा जपत धनगर समाजाला, समाजबांधवांना, मेंढपाळ बांधवांना न्याय, हक्क व अधिकार मिळवून देण्याती जबाबदारी यशवंत युवा सेनेच्या शिलेदारांवरती आहे. त्यामुळे धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांवर, माता-भगिनींवर जर अन्याय अत्याचार होत असेल रात्री अपरात्री कधीही संपर्क करावा यशवंत युवा सेना आणि यशवंत युवा सेनेचे शिलेदार समाजावर अन्याय करणाऱ्यांचे हातपाय कलम करण्यास कधीही सज्ज आहे.
मेंढपाळांच्या मदतीसाठी धावून आलेल्या यशवंत युवा सेनेचे शिलेदार मा.अवधूत वाघमोडे साहेब (महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख), मा.बिरूदेव शिंगाडे (यशवंत युवा सेना सांगोला) तसेच अन्य सर्व शिलेदारांचे व कार्यकर्त्यांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday 7 July 2017

आमच्या पोरास्नी शाळा कसली ठाऊकच नाय...

हे बोल ऐकल्यावर चटकण डोळ्यात पाणी उभा राहिले आणि थोडा वेळ स्थिर झालो. हे बोल आहेत पायाच्या नडग्या वाळेपर्यंत शेळ्या-मेंढ्यांसाठी चाऱ्याच्या शोधात आणि कुटूंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरून भटकंती करणाऱ्या सुळेवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील माझ्या मेंढपाळ बांधवांचे. यशवंत युवा सेनेचे मुंबई विभाग प्रमुख मा.तानाजीराजे गोयेकर यांनी चारणीवरून परत निघालेल्या मेंढपाळ बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मेंढपाळ बांधवांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते यांची विचारपूस करून यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना तुमच्या सोबत असल्याचा विश्वास आणि दिलासा दिला.
एकीकडे शासनाने ६-१४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था केली असताना देखिल माझ्या धनगर समाजातील मुला-मुलींना मात्र अणवानी पायानं शेळ्या-मेंढ्यांच्या मागे फिरावे लागते ही फार मोठी शोकांतिका आहे. अलिशान एअरकंडीशन गाड्यांतून, स्कूल बसेसमधून शाळेला जाणारी मुले पाहिली की आमच्या धनगर समाजातील मुला-मुलींना देखिल शाळेला जाण्याची ओढ लागते पण ते आमच्या मुलांच्या नशिबात नसतं त्याचे कारण असे की जी मुले एअरकंडीशनर गाड्यांतून आणि स्कूल बसेसमधून शाळेला जातात त्यांच्याच बापजाद्यांनी चराऊ कुरणे सरकारच्या घशात घातली आणि माझ्या मेंढपाळ बांधवांवरती भटकंतीची वेळ आली. कुठेही रानावनात दऱ्याखोऱ्यांत उन वारा पाऊस यांचा विचार न करता आज इथे तर उद्या तिथे असा प्रवास करत, कोणा शेतकऱ्यांच्या शिव्या/मार खात, गावगुंडांचा आणि गावच्या पाटलांचा त्रास सहन करत काळ्या रानात तीन दगडाच्या चुलींवर स्वयंपाक करून दगडाचे उसे आणि आभाळाचे पांघरूण करून धरती मातेच्या खुशीत निश्चित झोपायला देखिल मिळत नाही कारण जंगलातील हिंस्र पशूपासून शेळ्या-मेंढ्यांचे रक्षण करायला देखिल पहारा करावा लागतो हेच आमच्या मेंढपाळ बांधवांचं जगणं. मग लहानपणापासून आई बापाच्या मागं मागं आयुष्याचा अर्धा संसार आणि करडाकोकरांचं लटांबणं पाठीवर लादलेल्या घोड्याचा लगाम धरून अणवाणी पायानं चालणं हे आमच्या धनगर समाजातील मेंढपाळांच्या मुलांच्या नशिबी असेल तर कधी जाणार आमची पोरं शाळेत? कुठे जाणार ती मुलं दोन-चार शब्द शिकायला? ज्यांच्या राहण्याचा ठाऊठिकाणाच त्यांना माहित नाही तर कोणत्या शाळेत त्यांनी प्रवेश घ्यायचा? इतर समाजातील मुला मुलींना ज्या सुखसोई, शैक्षणिक सुविधा, सवलती मिळतात पण त्या सवलती मात्र माझ्या धनगर समाजातील मेंढपाळांच्या मुलामुलींना उपभोगता येत नाहीत त्याचे कारण म्हणजे भटकंती आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे.
परवा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे मुंबई विभाग प्रमुख मा.तानाजीराजे गोयेकर यांनी सुळेवाडी गावच्या त्या मेंढपाळ  बांधवांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांनी विचारपूस केली असता आमच्या पोरास्नी शाळा कसली ठाऊकच नाय असे त्यांनी स्पष्ट सांगितले. चारणीसाठी बाहेरगावी असताना पाऊस पडला नाही पण गावाकडे थोडाफार पाऊस झाल्याने सर्व कुटूंबकबिला घेऊन घराकडच्या दिशेने निघाल्याचे मेंढपाळ बांधवांनी सांगितले. राष्ट्रपती पुरस्कार विजेता तथा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे युवक प्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर दिग्दर्शीत धनगर समाजाच्या ज्वलंत परिस्थीतीवर आधारित बब्या चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्या चित्रपटात अभिनय करणारा आपल्याच समाजातील युवक एक सिनेअभिनेता आपल्याशी चर्चा करतोय हे समजल्यावर माझ्या मेंढपाळ बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता त्यांना फार समाधान देखिल वाटले. मा.तानाजीराजे गोयेकर यांनी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी संघटनेबद्दल मेंढपाळ बांधवांना सांगितले की ही संघटना स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या विचारधारेवर मार्गक्रमण करत असून मेंढपाळांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पुढे येतोय कधीही गरज लागली, कुठे अन्याय/अत्याचार होत असेल तर हाक द्या यशवंत युवा सेनेचा मावळा या नात्यानं आम्ही तुमच्याजवळ पोहचू असे सांगून मा.तानाजीराजे गोयेकर यांनी आपला संपर्क क्रमांक त्या मेंढपाळ बांधवांना दिला.
यशवंत युवा सेना ही संघटना यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि स्व.बी.के कोकरे साहेबांच्या विचारधारेवर चालत असून आज महाराष्ट्र राज्यात यशवंत युवा सेनेची यशस्वी वाटचाल होत आहे. तरी तळागळापर्यंत वाड्यावस्तीवर ही संघटना लवकरात लवकर पोहोचवून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एका झेंड्याखाली एकत्रित यावे असे आवाहन यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे मुंबई विभाग प्रमुख तथा सिनेअभिनेते मा.तानाजीराजे गोयेकर यांनी केले आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com