Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Monday 30 October 2017

भावपूर्ण श्रद्धांजली...

*भावपूर्ण श्रद्धांजली*
आमचे बंधुतुल्य, समाजसेवक तसेच पैठण तालुक्याचे उगवते नेतृत्व कायदेपंडित ॲड.मच्छिॅद्र कर्डिले साहेब यांचे काळाच्या ओघाने नियतीला मान्य नसताना अचानक अपघाती दुःखद निधन झाल्याने त्यांच्या आत्म्यास चिरकाल शांती लाभो.
शोकाकुल
   *यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य*
*सर्व धनगर समाजबांधव महाराष्ट्र राज्य*

Saturday 28 October 2017

चांगभलं बिरोबा अन् आरक्षणाचा खेळखंडोबा...

चांगभलं बिरोबा अन् आरक्षणाचा खेळखंडोबा…
खरंतर दोन वर्षांपूर्वी लिहलेला हा ब्लाॅग आज मुद्दामहून पुन्हा प्रकाशित करतोय.... वस्तुस्थिती अजून काही बदललेली दिसतच नाही. डॉ बाबासाहेबांनी धनगर समाजाला राज्यघटनेत कलम ३४२ च्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अ.क्र.३६ वरती आरक्षण दिलेले आहे. केवळ शब्दच्छल झाल्याने अर्थातच “धनगर” ऐवजी “धनगड” (र चा ड) झाल्याने सगळा राडा झाला आहे. गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाज अनुसुचित जमातीच्या सवलतींपासून वंचित असल्याने धनगर समाजाचे झालेले नुकसान पुढील ६० ते ७० वर्षातसुद्धा भरून न येणारे आहे. यास रानोमाळी डोंगरदरीतून भटकणार्या धनगर समाजाचे अज्ञान जरी कारणीभूत असले तरी संविधानाच्या/राज्यघटनेच्या आधारावरती राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याहून अधिक जबाबदार आहे. धनगर समाजाला खरंतर जाणूनबुजून अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचं काम प्रस्तापित व्यवस्था आणि परिणामी पाठीमागचे आणि सद्याचे राज्यसरकार करत आहे. धनगर समाज जर निद्रावस्थेतून जागा झाला तर या प्रस्तापितांना त्यांची लायकी दाखवून देईल परंतू झोपेचं सोंग घेणाऱ्या समाजाचं कसं होईल हे राम जाणे??? ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्या समाजाची सत्ताकारणात भागीदारी लोकसंख्येच्या आधारवर तितकीच असणार आहे परंतू धनगर समाज अज्ञानाच्या खाईत होरपळला गेल्याने सत्ताकारणापासून ही जमात थोडी नाही तर खूपच दूर राहीली.
             गेल्या ६५ वर्षापासून या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती अन्याय करण्याचा नंगानाच या महाराष्ट्र राज्यातील प्रस्तापित व्यवस्थेने आणि सदरच्या राज्य सरकारने चालवला आहे. धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोऱ्यात कुठेही पहावयास भेटत नसताना, धनगड नावाची जमातच आस्तित्वात नसताना महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात धनगड जमातीचा उल्लेख करायला डॉ.बाबासाहेब आंबेडकर काय मुर्ख होते का? हा माझा खडा सवाल मुख्यमंत्र्यांना, धनगर समाजाच्या या मागणीचा विरोध करणाऱ्या त्या त्या आदिवाशी मंत्र्यांना आणि मेंदूला वाळवी लागलेल्या त्या वळवीला विचारायचा आहे. त्या वळवीचे म्हणणे आहे की राज्यघटनेत ३४२ च्या अनुछैद वरती ९ व्या परिशिष्टातील ३६ नंबर वरतीची जमात ही धांगड आहे आणि धांगड ही ओरॉनची तत्सम जात आहे. मग त्या वळवीने अभ्यास करावा की धांगड अथवा धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्यात कधीही जन्माला आली नव्हती मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी राज्यघटनेची मसूदा समिती होती त्यांनी काय मुर्ख म्हणून अहवाल सादर केले होते का?
            एखादी जमात आस्तित्वातच नसेल तर मग राज्यघटनेत नमूद केलेल्या त्या जमातीबद्दल प्रतिवाद देखिल करता येतो.  Acre चे एकड होते, Chattisgarh चे छत्तीसगड होते, Gurgaon चे गुडगाव होते त्याचप्रमाणे Dhangar चे धनगड असे झाले आणि म्हणून त्याचाच परिणाम असा की महाराष्ट्र राज्यातील दीड ते दोन कोटी धनगर समाजबांधवांचे भविष्य अंधारातच राहिले. धनगर समाजाची हजारो पोरं आइ ए एस, आइ पी एस, डॉक्टर, इंजिनीयर, एडव्ह़केट होण्यापासून वंचित राहिली याला सर्वस्वी जबाबदार आजपर्यंतचे राज्य सरकार आहे राज्यघटनेचा अवमान करणार्या त्या त्या नेत्यांवरती देशद्रोहाचा देखिल खटला भरायला हवा.
              आज इथे तर उद्या तिथे अशा प्रकारचे जीवन जगणारी धनगर जमात ही भटकी जमात असल्यामुळे १९९१ साली धनगर समाजाला अनुसुचित जमातीची मागणी डावलून महाराष्ट्र राज्यापुरतं भटक्या जमाती क मध्ये टाकण्याचे पाप पवारांनी केलं पण त्या पवारांना उचलू लागायला आमच्याच समाजाचे अज्ञानी महाबहाद्दरच पुढे होते.

राज्यघटनेतील आदिवाशी असल्याचे निकष:
राज्यघटना मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि समितीकडून राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ ला अडॉप्ट केली होती आणि २६ जानेवारी १९५० साली आमलात आणली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर म्हणजे जवळ जवळ ३ वर्षाचाच कालावधी लागला होता भारतीय संविधान लिहायला. राज्यघटना लिहताना त्यावेळी धनगर जमात ही माळोरानी डोंगर दरीतून भटकंती करत शेळ्या-मेंढ्यांची परिणामी स्वताच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत असते याचा अभ्यास करूनच मसूदा समितीने आदिवाशी समाजबांधवांपेक्षा अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या जमातीला राज्यघटनेच्या अनुसुचित जमातीच्या यादीत अगोदरच सामाविष्ट केलेली आहे.

1. धनगर समाज ही आदिम जमात आहे शेळ्या मेंढ्या राखणे गाई-म्हैसी पाळणे हे आदिम जमातीचे व्यवसाय आहेत.

2. आदिम वैशिष्ट्ये/प्राचीन जीवनमान याचा अभ्यास केला तर डोंगरदरी माळरानावर जाऊन बघा शेळ्या-मेंढ्या राखणार्या समाजबांधवांची एकदा विचारपुस करून बघा मग समजतील आदिम वेशिष्ट्ये.

3. संस्कृति: धनगर जमातीची आदिवाशी जमातीसारखीच संस्कृति आहे खंडोबा, बिरोबा, धुळोबा हे धनगरांचे देव तसेच ढोल वाजवणे, धनगरी गजी नृत्य, धनगरी ओव्या यातून धनगर समाजाच्या संस्कृतिचा अभ्यास करता येतो. ओरॉन धनगर जमातीचे देव सुद्धा सारखेच आहेत.

4. भौगोलिक पृथक्करण: आदिवाशी जमात डोंगरदरीमध्ये जंगलामध्ये पाड्यावरती एकाच ठिकाणी स्थायिक राहते पण धनगर जमात ही डोंगर दरीमध्ये रानोमाळी, जंगलामध्ये आज इथे तर उद्या तिथे असे मुक्काम करत, अख्खा संसार घोड्याच्या पाठीवर लादून कोकरा-करडांचं आणि लेकराबाळाचं लटांबण घोड्याच्या पाठीवरील माचोळीवर बांधून तळहातावर पोट भरणारी धनगर जमात अभ्यासून पाहा.

5. लाजरे बुजरेपणा धनगर समाजातील बांधव जास्त लोकवस्तीत येत नाहीत समूहाने राहतात नागरी वस्तीत मिळत नाहीत मिसळत नाहीत कारण दिवसभर मेंढ्यांच्या पाठी पायाच्या नडग्या वाळवण्यातच कितीतरी पिढ्या बरबाद झाल्या त्यामुळे धनगर जमातीत अजूनही लाजरे बुजरे पणा तसाच आहे.
*संघटितपणे लढाई महत्वाची:*
         धनगर समाजाला राज्यघटनेत अधिकार दिले असताना आदिवाशी पेक्षाही अत्यंत बिकट आणि हालाखीचे जीवन जगणारी धनगर जमात ही अनुसुचित जमातीमध्ये मोडत नाही असे ओरडून सांगणाऱ्या अर्धवटांचे मला हसू येते. धनगर जमात ही भटकी जमात आहेच आहे आणि महाराष्ट्र राज्यात फक्त (केंद्रात नव्हे) धनगर जमात ही भटक्या जमाती -क मध्ये आहे. ते पण वक्रतुंडाच्या अवकृपेने १९९१ पासून पण आमच्या धनगर समाजाचं संघटन मजबूत असतं तर आज यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांच्या प्रयत्नातून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती कधीच मिळाल्या असत्या आणि आजच्या प्रस्तापितांचे तळवे चाटणार्या नेत्यांना भिक मागायची वेळ आली नसती.
            आज आदिवाशी समाजातील काही पोरं कोणाच्यातरी सांगण्यावरून लिहू लागतात की धनगर समाजातील लोक र चा ड झाला असे सांगत रडत बसलेत पण त्या वळवी ला माझे सांगणे आहे की आम्ही रडणाऱ्यांपैकी नाहीये. जर मनात आणलं तर क्षणात उध्वस्त करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आजपर्यंत अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकणारे फक्त धनगरच आहेत याचा विसर कोणास पडू नये. धनगर समाजात अज्ञान पसरवण्यास प्रस्तापित व्यवस्थाच जबाबदार असून धनगर समाजाने यास बळी न पडता सर्वानी एकजुटीने/संघटितपणे आपले हक्क हिसकावून घ्यायला हवेत नाहीतर पुढची पीढी आपल्या तोंडात शेण घालेल याचा विचार करा.
खरी चूक कोणाची??
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनगर समाजावरती सतत अन्याय होत आला आहे. आदीवाशीपेक्षाही धनगर समाज आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असताना धनगड नावाची जमात महाराष्ट्रात नसताना राज्यघटनेत धनगड नावाचा उल्लेख करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चुकीचे ठरवायचे की सर्वानुमते २६ जानेवारी १९५० ला आमलात आणलेल्या राज्यघटनेवरती आजचा राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार चुकीचे ठरवायचे? धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात नाही शिवाय धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे संशोधकीय अहवाल असताना देखिल धनगर समाज आदिवाशींचे निकष पुर्ण करतो की नाही यासाठी टाटा इंन्सटीट्यूट अॉफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेला ६५ वर्षानंतर सर्वे करायला सांगणारे फडणवीस सरकार धनगर समाजाचे आरक्षण घशातून काढण्याचा प्रयत्न तरी करत नाही ना.??? अशी शंका कोणाच्याही मनात गोंधळ निर्माण करणारी आहे. यामुळे मागले तसेच म्होरले ही म्हण सार्थ ठरते की काय याचाच विचार सतत मनात घोळत असतो.
          धनगर समाजात नेतृत्वाचा अभाव आहे शिवाय जे जे नेतृत्व करत आहेत ते देखिल समाजाचे भांडवलीकरण करून स्वताचा स्वार्थ साधत आहेत अशीच परिस्थिती आजही पाहायला भेटते आहे. समाजाच्या नावावरती ज्यांना आमदारक्या, मंत्रीपदं मिळाली, खासदारकी मिळाली त्यांना कधी समाजाची आठवण झालीच नाही. पहिल्या कॅबिनेट मध्येच आरक्षणाची तरतुद करू म्हणणाऱ्या फसणवीसांचा ३ वर्षे झाले तरी अजून अभ्यास चालूच आहे त्यात देखिल गरज नसताना TISS चे भूत मानगुटीवर बसवले त्याला धनगर समाजातील संबंधित निष्क्रिय नेते जबाबदार आहेत. आणि तेच नेते चांगभलं बिरोबा म्हणत आरक्षणाचा खेळखंडोबा करत बसलेत. त्यामुळे समाजाचा आक्रोश अजून दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसुचित जमातीच्या सवलती अजून समाजाला न मिळाल्याने समाजाचे वाटोळे झाले आहे मग ते लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी बुद्धीजीवी वर्ग झटत असताना झगडत असताना समाजाची बाजू मांडणारेच लेखक हे विनाकारण बुद्धी पाजळवत आहेत असे मत समाजातील काही नेत्यांची धोतरं सांभाळणाऱ्यांचे आहे ते खरंतर चुकीचे ठरते असे म्हणायला मला वावगं वाटणार नाही. कदाचित माझ्या या वाक्याचा काहीजनांना राग येईल पण मला त्याची पर्वा नाही. कारण समाजापेक्षा कोणतीही व्यक्ति थोर नाही.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             – नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

Friday 20 October 2017

इडा पिडा जाऊ दे अन् बळीचं राज्य येऊ दे...

आज सकाळी दिपावली निमित्त ओवाळून औक्षण करताना माझी ताई म्हणाली की "दिन दिन दिवाळी आणि गाई म्हैसी ओवाळी." म्हणजेच प्राचीन काळापासून पशुपालक असलेली आदिम जमात आजही प्रत्येक सन-उत्सवामध्ये गाई-म्हैस-शेळ्या-मेंढ्या-घोडे-कुत्रा अशा जनावरांची पुजा करतात. म्हणूनच धनगर जमात ही देखिल प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी आदिम जमात आहे अर्थातच धनगर जमात ही अनुसुचित जमातीच्या आरक्षणासाठीचे निष्कर्ष पूर्ण करते.
असो... औक्षण करताना पुढे ताईने कोणते गिफ्ट मागितले नाही तर एक मागणी केली ती तमाम महाराष्ट्र राज्यातील सर्व बहिनींनी आपापल्या भावाकडे हीच मागणी केली ती म्हणजे "इडा पिडा जाऊ दे (टळू दे) आणि बळीचं राज्य येऊदे". माझ्या डोक्यात लगेच क्लिक झाले आणि गोंधळ उडाला की परवा परवाच झी गौरव पुरस्काराचे वितरण करताना एक महाशय म्हणाला की बळी नावाचा  राजा एक आसूर (राक्षस) होता आणि विष्णूने वामनाचा अवतार घेऊन बळीराजाच्या डोक्यावर पाय दिला. हे खरंतर वैदिक (ब्राह्मणी) संस्कृतीचे उदात्तीकरण करायचा धंदा आहे.
पण मला प्रश्न पडतो की जर बळी नावाचा राजा हा आसूर(राक्षस) असेल तर मग आजच्या भगिनी औक्षण करताना "इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊदे" असे का म्हणतात? खूप विचार केल्यानंतर अभ्यास केला आणि इतिहासात डोकावून पाहिलं तेव्हा समजले की प्राचीन कालीन इतिहासामध्ये बळी नावाचा एक कुरूवंशीय (धनगर) राजा होऊन गेला. ज्याच्या राज्यातील प्रजा, पशुपालक, शेतकरी हे धनधान्याने समृद्ध होता. बळी राजाच्या राज्यात पाऊस वेळेवर पडत होता आणि सर्वच गोष्टींचा सुकाळ होता. प्रजा, शेतकरी व पशुपालक हे आनंदी होते. परंतू तत्कालीन वैदिक संस्कृतीला शेतकरी तसेच प्रजा ही समृद्ध आणि आनंदी असलेली बघवत नव्हते म्हणून त्या बळीराजाला फसवून त्याला सत्तेवरून जाणूनबुजून हटवण्यात आले. अर्थातच आजकालची प्रचलित म्हण म्हणजे "बळीचा बकरा झाला." परंतू जेव्हा बळी राजाला राज्यकारभारावरून हटवण्यात आले त्यानंतर बळीच्या राज्यावरती अनेक संकटे उद्भवली. प्रजा ही रोगराईने तडफडून मरू लागली. एकेकाळी धनधान्याने समृद्ध असलेला शेतकरी दुःखांत बुडाला. बळीचं सशक्त आणि समृद्ध असलेले राज्य उध्वस्त झाले. तेव्हापासून आजपर्यंत शेतकरी हा कधीच सधन झाला नाही. हजारो शतकं उलटून गेली पण माझ्या शेतकऱ्यांना अजून न्याय मिळालाच नाही. न्याय मिळत होता तो फक्त कुरूवंशीय (धनगर) असलेल्या बळीच्या राज्यातच मिळत होता म्हणूनच आजच्या शेतकरी कुटूंबातील कुरूवंशीय धनगर असलेल्या प्रत्येक माता-भगिनी आपल्या भावाला ओवाळताना एकच मागणी करते ती म्हणजे बळी राजाचे राज्य उध्वस्त झाल्यापासून माझा शेतकरी कधीच समृद्ध झाला नाही त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांवरती जी संकटे आली आहेत ज्या काही इडा पिडा आहेत त्या टळू दे दूर होऊदे आणि जसे बळीचे समृद्ध राज्य होते तसेच राज्य आजही येऊदे.
परंतू तमाम भगिनींची ही मागणी (इच्छा) केवळ मागणीच राहिली आहे. आजही वैदिक संस्कृतीचे पाइक असलेले सनातनी व्यवस्थेचे पुरस्कर्ते आणि राज्यसरकार देखिल माझ्या शेतकऱ्यांना सुखाने जगू देत नाहीत त्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. त्यामुळे तमाम भगिनींचे भाऊ आपल्या बहिणींची ही मागणी कधी पूर्ण करताहेत ते बघूया...!
इडा पिडा टळू दे अन् बळीचं राज्य येऊ दे।
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Sunday 15 October 2017

आजच Nitinraje Anuse नावाचे फेसबुक पेज लाइक करा

गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वीच माझ्या फेसबुक खात्याची 5000 (पाच हजार) मैत्रीसाठी विनंतीची मर्यादा पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित मित्रत्वासाठी आलेल्या विनंत्या मी स्विकारू शकत नाही. शक्य झाल्यास एखाद्या चुकीचे संदेश पाठवणाऱ्या अथवा गैरवर्तणूक करणाऱ्या फेसबुक खातेदारास यादीमधून काढल्यानंतर नक्कीच विनंती स्विकारून मित्रत्वाच्या यादीत सामाविष्ट केले जाईल.
तुर्तास खालील  दुवा (Link)  वापरून माझे Nitinraje Anuse हे फेसबुक पेज ला लाइक करून अद्यवते (updates) मध्ये रहा.

https://m.facebook.com/nitinrajeanuse123/?ref=bookmarks

-नितीनराजे अनुसे
(7666994123)
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
nitsanuse123@gmail.com

Friday 13 October 2017

सळसळते रक्त अहिल्याईंचे भक्त

दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे वारसदार आम्हीच आहोत फक्त
तारण,
मल्हाररावांचे मावळे आम्ही अहिल्याईंचे फक्त
आमच्या नसानसात सळसळतंय
छत्रपती यशवंतराव होळकरांचे सळसळते !!
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Wednesday 11 October 2017

छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर


गडावरून खाली उतरून
मल्हारी मार्तंड मला जेजुरी दाखव,
हवं तर मी येतो तुझ्याकडे
पण माझ्या
चक्रवर्ती सम्राट
छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांना परत पाठव...
-नितीनराजे अनुसे
७६६६९९४१२३
nitsanuse123@gmail.com

Tuesday 10 October 2017

निवडणुकांच्या खेळात कार्यकर्त्यांचा डाव


 हल्ली ग्रामपंचायतीच्या निवडणूका अगदी तोंडावरच आल्या असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका म्हणजे कार्यकर्त्यांसाठी जणू खेळच आहे असे समजून कार्यकर्ते आपापला डाव (खेळ) मांडत आहेत. जेवढे लोकसभा विधानसभाच्या निवडणूकांमध्ये राजकारण होत नाही तेवढे अटीतटीचे राजकारण हे ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये होत असते आणि याच अटीतटीच्या राजकारणामध्ये गावगावकीत आणि भावभावकीत वैमनस्य पेरले जाते. कोणत्यातरी एखाद्या नेत्यासाठी, कोणत्यातरी नेत्याच्या सांगण्यावरून भाऊ आपल्या भावाच्या डोक्यात काठ्या-कुऱ्हाडी घालायला देखिल कमी करत नाही हे वास्तव गावगाड्यात चालते. "राज"कारण त्या त्या गटाच्या त्या त्या पक्षांच्या नेत्यांचे होते पण त्यांच्या राजकारणात गोरगरिब कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या पोरांचा जीव जातो हे विदारक सत्य आहे. परंतू राजकीय नेत्यांच्या या राजकीय खेळीत आणि भावाभावांच्या हानीमारीत डल्ला लागतो तो म्हणजे त्या त्या राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा...
         एकमेकांवर टिकाटिप्पणी करत पार खालच्या पातळींवर जाऊन टिका करणे हे नेत्यांना जमत नाही असे नसते तर नेते मुद्दामहून तसे करत नाहीत पण कार्यकर्ते मात्र यात माहिरच म्हणायचं की... मग टिका करताना तिथे कोणीही  असो मग आपला किंवा परका हे कोण त्यांना कळतच नाही. हल्ली सोशल मिडीयावर अशा बहाद्दरांनी चांगले थैमानच घातले आहे. कोणत्याही नेत्याने दारू मटण अंडी दिली तर जाऊ नका आणि म्हणनारे सोशल मिडीया बहाद्दर असलेले कार्यकर्ते मात्र कुत्र्यांची-गाढवांची मटणं खायला सर्वात पुढे असतात. कोणत्याही नेत्यांकडून पैसे घेऊन मतदान करू नका म्हणनारे मात्र माझ्यामागे माझी भाऊकी आहे असे सांगून आपल्या
नेत्यांकडे लाखोंचे पॅकेजेस मागत असतात. एवढंच काय भावकीतल्याची किंवा गावकीतल्याची जिरवायची म्हणून एका पक्षाचे स्वाभीमानी कार्यकर्ते म्हणून काम करणारे महाबहाद्दर दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या चपला उचलून त्यांचे तळवे चाटणारे व अंडी-मटणं खाऊन चार-पाच लाख उकळणारे देखिल खूपजन स्वाभीमानी असतात हो... एकाच गावातील एकाच भावकीतील हे महाबहाद्दर गावच्या विकासासाठी व्हाटसप फेसबुकला कधीच एखादी चांगली पोस्ट शेअर करणार नाहीत लिहणार नाहीत. पण माझ्याच नेत्याला असाच का बोलला म्हणून सोशल मिडीयावर देखिल भावकीतल्यांची आई-बहिण काढायला मागेपुढे पाहात नाहीत. फार मोठे संस्कार आहेत... अरे पण एवढा उपद्व्याप कोणासाठी? खरंतर एवढा स्वाभिमान त्यांचा उतू चाललेला असतो की बोलायचे कामच नाही राव... खरंतर तो कोणाची जिरवण्यासाठी म्हणून दुसऱ्यांची अंडी-मटण खातो का त्याला विकासाचे महत्व कळते म्हणून तो करतो हे कोणास ठाऊक? पण त्यांना एवढे का कळत नाही की बाबांनो जिवंत आहे तोपर्यंत नेते नेते करत बसला तरी तुम्हाला कोणी काही आणून देणार नाही पण मेल्यावर मात्र ज्यांना तुम्ही शिव्या हासडता, ज्यांची तुम्ही डोकी फोडता, कुठल्यातरी नेत्यांच्या सांगण्यावरून ज्या भाऊभावकीतील लोकांचे कुऱ्हाडीने हातपाय तोडतां तेच भावकीतले भाऊबंद खांदा द्यायला पुढे येणार आहेत याचे भान राखा आणि गावच्या भकासासाठी नव्हे तर विकासासाठी काय करता येईल ते बघा तरच तुमचा स्वाभिमान दिसून येईल.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Friday 6 October 2017

आरक्षणाची भिक मागत नाही तर हक्क आहे आमुचा...

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली पण या देशांतल्या आयुष्यभर भटकंती करणाऱ्या धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले अधिकार अजूनही मिळाले नाहीत हे भारत देशाचे खरंतर दुर्दैवच म्हणावे लागेल. राज्यघटनेत अनुसुचित जमातीच्या ३४२ व्या कलमातील महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अनु क्रमांक ३६ वरती ओराॅन, धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे परंतू केवळ शब्दच्छल झाल्याने "र" चा "ड" अर्थातच "धनगर" चा "धनगड" झाला आणि महाराष्ट्र राज्यातील संख्येने दोन कोटी असलेल्या धनगर समाजावर अन्यायाची कुऱ्हाड कोसळून पार मानगुटीमध्ये घुसली ती आजपर्यंत धनगर समाजाच्या मानगुटीतून बाहेर आलीच नाही. अहो येईलच कशी? वक्रतुंडाची कृपाच अशी की ती कुऱ्हाड बाहेर काढण्याऐवजी अजून ती खोलवर घुसवण्याचा प्रकार स्वताला जाणते राजे म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनी केला. एकीकडून आम्ही धनगर समाजाला आरक्षण द्यायला तयार आहोत असे म्हणायचे आणि उलट सुलट अहवाल सादर करून धनगर ऐवजी धनगड या शब्दाची खुंटी मारून ठेवायचा प्रकार पवारांनीच केला. म्हणूनच धनगर समाजाने त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकांत घरी बसवले पण आजा मेला अन् नातू झाला, घरात माणसं तेवढीच या म्हणीप्रमाणे भ्रष्टवादी असलेले पवारांचे राष्ट्रद्रोही सरकार सपशेल पडले आणि नपुंसक असलेले भट जात सरकार सत्तेवर आले. पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणनाऱ्यांनी सतरा कॅबिनेट झाल्या तरी तीन वर्षात अजून आरक्षणाबद्दल ब्र देखिल काढला नाही. धनगर समाजाने ज्या ज्या वेळी आरक्षणाचा जाब विचारला त्या त्या वेळी अभ्यास करतोय असेच उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.
अरे पण अभ्यास कधीपर्यंत करायचा असतो? जर पोरगंच नालायक असेल, शाळा न शिकणारे आणि अभ्यास करणारे नसेल तर बाप त्याला शाळेतून काढून टाकतो दोन चार म्हैसी-गाई घेऊन त्याला बरोबर कामाला जुंपतो. फडणवीस सरकारची पण आता तीच वेळ आली आहे तुमचा बाप धनगर समाज आहे तुम्ही अभ्यास करण्याच्या लायकीचे नाहीत त्यामुळे २०१९ च्या विधानसभेमध्ये प्रवेश घेऊ देणार नाही, तुम्हाला घरी बसवून मेंढ्याच वळायला ठेवतो ते बघा...
धनगर समाज काय आरक्षणाची भीक मागत नाही तर 
1. अगोदर दिलेले राज्यघटनेत असलेले अनुसुचित जमातीच्या कलम ३४२ वरील महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टातील अनुक्रमांक ३६ वरील ओराॅन, धनगर हक्काचे आरक्षण मागत आहे.
2. धनगर समाज अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची मागणी अजिबात करत नाही. तर राज्यघटनेतील दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी धनगर समाजाची रास्त मागणी आहे. 
3. धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये आरक्षण द्या अशाप्रकारच्या बातम्या जातीयवादी मिडीयावाले मुद्दामहून दाखवतात. खरंतर हा मिडीयीवाल्यांचा प्रकार म्हणजे धनगर समाजाला मूळ मागणीपासून परावृत्त करण्यासाठी आहे. मिडीयावाल्यांना तसे करण्यासाठी  फिडबॅक देण्याचे काम जातीयवादी असलेले भटजात सरकार करत आहे.
4. एखाद्या जातीचा/जमातीचा सामावेश जर अनुसुचित जाती/जमाती मध्ये करायवयाचा असल्यास त्याबद्दल अहवाल देण्यासाठी समिती नेमली जाते. परंतू धनगर समाज अगोदरपासूनच अनुसुचित जमातीच्या यादीत आहे त्यामुळे TISS या समितीची नेमणूक करून सरकार आणि धनगर समाजातील नेते धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देऊ पाहत आहेत.
5. धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात यासाठी फक्त आणि फक्त राज्य सरकारची शिफारस केंद्र सरकारला पाठवायची असताना TISS चे भूत धनगर समाजाच्या मानगुटीवर बसवून धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण लांबवण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. यासाठी धनगर नेत्यांनी वेळीच जागे व्हायला हवे अन्यथा समाजाचे वाटोळे व्हायला वेळ लागणार नाही.
                जोपर्यंत धनगर समाज पूर्णपणे जागा होत नाही जातीयवादी सरकारचे षडयंत्र हाणून पाडत नाही तोपर्यंत  समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही. माझा भोळा-भाबडा धनगर समाज रानावनातून, डोंगरदऱ्यातून काट्या कुट्याचा विचार न करता भर ऊन पावसात शेळ्या-मेंढ्याची राखण करतो. आयुष्यभर भटकंती करत असल्याने शिक्षणाचे दरवाजे तर माझ्या भावंडासाठी बंदच आहेत. चराऊ कुरणे सरकारच्या घशात आहेत. मग माझ्या भोळ्या-भाबड्या मेंढपाळ बांधवांनी जगायचे का मरायचे? असा प्रश्न डोक्यात सतत घोळत असतो मग जमातींमधील पुढारी एवढे षंढ कसे काय झालेत? खरंच तुम्ही धनगर जमातीत जन्माला आला असाल TISS चे भूत बाजूला करून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला भाग पाडा मग तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा त्या त्या पक्षाच्या वरिष्ठांचे तळवे चाटत बसण्यापेक्षा आयुष्यभर पायाच्या नडग्या वाळेपर्यंत भटकंती करणाऱ्या माझ्या समाजातील मेंढपाळ बांधवांचे प्रश्न सोडवा. नाहीतर मग लक्षात ठेवा,
कभीना कभी हर कुत्ते का समय आता है।
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे जे आरक्षण दिले होते ते राजकीय आणि सामाजिक मागासलेपणाच्या तत्वावर दिले होते. याशिवाय आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात धनगर समाज अजून मागासलेलाच आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे "भारत देश हा संविधानावर (राज्यघटनेवर) चालतो, कोणत्या राजकीय (बाहुल्यांच्या) पुतळ्यांच्या इशाऱ्यावर नव्हे. त्यामुळे धनगर समाजाची आरक्षण अंमलबजावणीची मागणी ही भारतीय संविधानाला अनुसरून आहे. नाहीतर हक्कासाठी संघर्ष करण्याचा कायदा डाॅ.बाबासाहेबांनी दिलेलाच आहे.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Wednesday 4 October 2017

काय चुकले माझे?? : कवी राजू झंजे

             
 प्रस्तावना
 शुक्रवार दि.२९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी मुंबई येथिल  पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन रोड स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृत व्यक्तिंच्या भावना अचूक शब्दात मांडून, खेड्यापाड्यातून टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तिचं स्वप्न आणि त्याच्या वाट्याला आलेले अर्थातच नियतीलादेखिल मान्य नसणारं दु:ख काय असते याची जाणीव करून देणारी काव्यरचना परखड मताचे कवी राजू झंजे यांनी त्यांच्या  "काय चुकले माझे?" या काव्यात केली आहे. खरंतर हे नुसते काव्य (कविता) नसून त्या प्रत्येक मुंबईकरांच्या ह्रदयातील जणू भावना आहेत. हे काव्य वाचल्यावर रसिकमित्रांच्या डोळ्यांत नक्कीच पाणी उभे राहील.
             ✍️नितीनराजे अनुसे
             (लेखक व व्याख्याते)
                  ७६६६९९४१२३

        काय चुकले माझे ???
         
  काय चुकले माझे ?
  घडला काय माझा गुन्हा ?
  कोणी शासनावर ओरडा आता ,
  कोणी रेल्वे प्रशासनाला कुचकामी म्हणा  ;
  पण माझे जीवन  आता नाही पुन्हा !

          टीचभर पोटाची खळगी भरण्या ,
           दूर गावावरून आलो होतो  ;
          धकाधकीच्या जीवनात एकरूप होऊन ,
          पक्का मुंबईकर झालो होतो !

गोरगरिबीतच वाढलो ,
पण स्वप्ने खूप पाहिली होती  ;
जन्मदात्या मात्या - पित्यांना अजून ,
"मुंबई" दाखवायची राहिली होती !

           आता कसली मुंबई ,
            अन कसले काय ;
            हंबरडा फोडून रडत असेल ,
            आता माझी माय !

खूप कष्टाने वाढवले होते तिने ,
स्वतःच्या पोटाला चिमटा काढून  ;
शक्य  असते तर आलो असतो ग आई ,
तुझ्यासाठी हे आस्मान फाडून !
 
             माफ कर आई मला ,
             तुझी स्वप्न पूर्ण करू शकलो  नाही  ;
             राब - राब राबायचो आई या मुंबापुरीत ,
             पण कधीच थकलो नाही !

पण आज मी थकलो आई ,
असंख्य पायदळी तुडवला गेलो  ;
गोऱ्यापान अंगाचा मी
आज काळा - निळा झालो !

            उसंत हि मिळाली नाही ,
            क्षणभर कण्हण्यासाठी  ;
            तोंड हि उघडता येईना मला ,
            शेवटचे " आई" म्हणण्यासाठी !

आता नेमतील समित्या ,
दुर्घटनेतील सत्य  जाणण्यासाठी  ;
पण मुंबईकरांचा जीव नेहमीच मुठीत आहे ,
"काय चुकले माझे?" म्हणण्यासाठी !

                  कवी राजू दादासाहेब झंजे
                          ९५९४८१५५८५

Sunday 1 October 2017

माझा वाढदिवस साजरा करू नका : गोपीचंद पडळकर

महाराष्ट्र राज्याचा बुलंद आवाज गतिमान युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज दि. १ आॅक्टोबर रोजी वाढदिवस त्यानिमीत्ताने या लाडक्या नेत्याला खरंतर वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. परंतू माझा वाढदिवस साजरा करू नका असे आवाहन मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गोरगरीब कष्टकरी व शेतकरी जनतेला केले आहे. त्याचे कारण असे की आटपाडी तालुक्यात एवढा पाऊस पडून देखिल दुष्काळ सदृश परिस्थिती अजूनही जशीच्या तशीच आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका हा खरंतर माणदेशातला एक भाग नेहमीच दुष्काळाच्या छत्रछायेखालचा प्रदेश दगडधोंडे आणि माळरानांनी व्यापलेला हा प्रदेश हिरवळीने नटलेला आम्हीतरी जन्मापासून कधी पाहिलाच नाही. कदाचित पर्जन्यवृष्टीची वक्रदृष्टी या माणदेशावर झाली असावी म्हणूनच माणदेश दुष्काळाच्या झळया सोसत आहे. त्याच माणदेशातला तरूणडफदार युवक राजकारणात येतो व राजसत्ता आणि राजपाथ कधीही मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो असे सांगत कोणताही राजकीय वारसा नसताना सत्ता तसेच कोणतेही पद नसताना सन २००७ पासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी अनेक विकासकामांचा अक्षरशा डोंगर उभा केला. जनतेच्या हितासाठी, गोरगरीबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या विकासासाठीच मी जन्म घेतला आहे असे सांगतानाच ते नेहमीच त्यांच्या सभेतून म्हणतात की जर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय हा मिळालाच पाहिजे.
२००७ पासून आज २०१७ पर्यंत एकूण १० वर्षांच्या कार्यकिर्दीत महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात अनेक संकटांना तोंड देत तसेच प्रस्तापित व्यवस्थेच्या विरोधात (अर्थातच प्रवाहाच्या विरोधातील) सर्वात मोठा संघर्ष कोणी केला असेल तर युवकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचे नाव सर्वात पुढे येते. मग तिथे शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असो, प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून गोरगरिब कष्टकरी जनतेचा अथवा विद्यार्थ्यांची कोणतीही समस्या असेल तर रात्री अपरात्री त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब यांची ओळख आहे. आटपाडीतील जनता पाण्यावाचून तडफडत होती तेव्हा टेंभूच्या कार्यालयाची तोडफोड करून गोपीचंद पडळकर यांनी न्याय मागितला होता, माजी मंत्री जयंत पाटील यांची गाडी अडवून पाण्याचा जाब विचारला, माजी केंद्रीय कृषिमंत्र्यांची गाडी आडवण्याचे आवाहन दिले होते पण शरद पवार घाबरूनच भिवघाटमार्गे तासगावला पळून गेले, एका रात्रीत राजेवाडी तलावाचा डावा कालवा फोडून ते पाणी आटपाडीकडे वळवले अशी एक ना अनेक आंदोलने, मोर्चे, रास्तारोखो करून कोणतेही पद नसताना सत्ता नसताना पडळकर साहेबांनी शेतकऱ्यांसाठी कामे केली तेव्हा गोपीचंद पडळकर साहेब यांच्यामुळे प्रस्तापित व्यवस्थेला जबरदस्त सुरूंग लागला म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्यापर्यंत आर.आर.पाटील सुद्धा ...ला पाय लावून पळत होते हे अख्ख्या महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे. एवढेच नव्हे तर आटपाडी-खानापूरच नव्हे तर सांगली जिल्ह्यांच्या राजकारणातला काटा बाजूला करावा म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून पार जिल्हाहद्दपारीची नोटीस देखिल बजावली होती परंतू या कृत्याबद्दल प्रांताधिकारी यांनी प्रस्तापित व्यवस्थेला चांगलेच खडेबोल सुनावले व जिल्हाहद्दपारीची नोटीस रद्द केली होती. जो जनता के लिए लढतां है जनता उसी का साथ देता है। त्यामुळे गोपीचंद पडळकर साहेब यांचा पाण्यासाठीचा लढा हा स्वताची शेती भिजवण्यासाठी नव्हता तर आटपाडी तालुक्याची तहान भागावी म्हणून होता... आणि अजूनही त्यांचा लढा अविरतपणे चालू आहे.
गोपीचंद पडळकर साहेब यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करून सांगितले आहे की माझा वाढदिवस कुठेही साजरा करू नका, कुठेही डीजीटल फ्लैक्स, फेटे, केक, हार, तुरे (पुष्पगुच्छ) या गोष्टींवर निरर्थक पैसा खर्च करू नका त्याऐवजी एखाद्या गरजूंना मदत करा. तुमच्या शुभेच्छां आणि तुमचे प्रेम सदैव माझ्यासोबत आहे त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी वेळ पैसा खर्च न करता त्याऐवजी गोरगरिब जनतेची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची सुखदुःख जाणून घ्या शक्य तेवढी त्यांना मदत करा. शेतकरी वाचला तरच देश वाचेल म्हणून माझ्या बळीराजाच्या अडीअडचणी समजून घ्या प्रशासन विभाग असो मंत्रालय असो तिथे तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा त्यांचा पाठपुरावा करा. शासकीय योजना सर्व तळागळातील जनतेपर्यंत पोहचवा, सध्या बेरोजगारी वाढत चालली असून रोजगारवाढीसाठी रोहयो सारख्या उपयुक्त असणाऱ्या योजनांची माहिती मिळवून त्या योजना आमलात आणा. औद्योगिकीकरणामुळेच देशाचा विकास होतो म्हणून तरूण-तरुणींनी औद्योगिकीकरणाकडे वळावे. राष्ट्रमाता अहिल्याईंचा आदर्श अख्ख्या जगाने घेतला त्याच राष्ट्रमातेचा आदर्श घेऊन झाडे लावा झाडे जगवा ची योजना कागदोपत्रापुरतीच मर्यादित न ठेवतां आमलात आणा. पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेखाली शेततळे, बांध, बंधारे बांधण्यासाठी सरकार खात्यातून निधी घ्या व शेतात जास्तीत जास्त पाण्याचा साचा. निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. माझ्या वाढदिवसासाठी खर्च करायचाच असेल तर मुलींच्या जन्माचे स्वागत करा, मुलींच्या सुरक्षेसाठी मुलींना तायक्वांदो, कराटे ज्यूडो यांचे मोफत प्रशिक्षण द्या. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तोट्या बसवा, जणावरांसाठी जास्तीत जास्त चारा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पुस्तके पेन वह्या यांचे वाटप करा. तरूणांना नोकरी तसेच उद्योग क्षेत्रांतील माहितीसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करा. सामाजिक प्रबोधन तसेच जागृती करा अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित करा. एकमेकांच्या मदतीला धावून जा असे केले तर प्रत्येक दिवस हा माझा वाढदिवस साजरा केल्यासारखाच आहे असे गोपीचंद पडळकर साहेब म्हणाले.
मनासारखा नेता आणि राजासारखं मन असलेला हा सर्वसामान्यातील एक असामान्य नेता, तरूणतडफदार गतिमान युवा नेतृत्व, महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा.  गोरगरिब जनतेच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या हातून असेच कार्य घडो हीच मल्हारी मार्तंड चरणी प्रार्थना🙏
💐💐💐💐💐💐💐💐
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com