Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 27 December 2016

हे राष्ट्र पिवळे व्हावे

तलवारीला कळते
              तलवारीचीच भाषा ।।
रक्तातच आहे धनगरांच्या
        स्वाभिमानाची परिभाषा ।।
हे अखंड राष्ट्र पिवळे व्हावे
आता हीच आमची अभिलाषा ।।
      ✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

Monday 26 December 2016

मावळे यशवंतराजे होळकर यांचे


कटू सत्य

आजचा भोंगळ राज्यकारभार करणाऱ्या सत्तापिपासू नेत्यांच्या डोक्यात जर
 "जगातील एकमेव आदर्श राज्यकर्ती आणि प्रशासनकर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रामाता अहिल्याई होळकर"
यांचे विचार पेरले असते तर भारत कधीच महासत्ता देश बनला असता.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
      ✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

मातोश्रींसाठी धावले अहिल्याईंचे मावळे

*मातोश्रींसाठी धावले अहिल्याईंचे मावळे*
दि.२५ डिसेंबर २०१६
काल रात्री दि.२४ डिसेंबर २०१६ रोजी "आम्ही छत्रपती" या व्हाटसप च्या ग्रुपमद्ये चर्चा करत असताना सामाजिक कार्यकर्ते मा.गजानन (भाऊ) ठोंबरे यांनी फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर येथील मेन चौकातच बेवारस अवस्थेत व धूळ पडलेल्या मातोश्रींच्या अर्थातच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या पुतळ्याबद्दल चर्चा केली व समाजाबद्दल खंत व्यक्त केली की ज्या *राष्ट्रमाता अहिल्याईंनी स्वताची संपत्ती खर्ची घालून लोकोपयोगी कामे केली, धरणे बांधली, बंधारे, बारवे, तलाव, विहरी, नदीवरती घाट, वाटसरूंसाठी आश्रमशाळा, उपहारगृह, बारा ज्योतिर्लिंगांचा जिर्नोद्धार, खाजगीतला निधी वापरून जनतेची, गोरगरीबांची विकासकामे केली, शेतकऱ्यांसाठी शेततळे, कणसांनी भरलेली शेती पशू-पक्षासांठी खुली करून त्यांची भूक भागवली एवढेच नव्हे तर पाण्यातील जीवांना देखिल नियमितपणे खाद्य टाकून त्यांची भूक भागवणारी लोकजननी पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्याई होळकर*. जगासमोर एक आदर्श राज्यकर्ती आणि आदर्श प्रशासनकर्ती स्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायमाऊलीचा, लोकजननीचा पुतळा असा धूळ खात आणि पडझड झालेल्या अवस्थेत पडत असेल तर तो माझ्या धनगर समाजाला लागलेला एक कलंक आहे आणि यावरून आपण कसे काय म्हणू शकतो की माझा धनगर समाज जागा झाला आहे ?? त्यापेक्षा मेलेला बरा असे गजानन (भाऊ) ठोंबरे यांच्याप्रमाणेच मलाही वाटते. ग्रुपमद्ये अशी चर्चा झाल्यानंतर त्याच मद्यरात्री मी लगेच पश्चिम महाराष्ट्रातील यशवंत युवा सेनेचे सक्रीय समाजसेवक माळशिरसचे सुपुत्र मा.सचिन शेंडगे साहेब यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली व फोंडशिरस येथील राष्ट्रमाता अहिल्याईंच्या स्मारकाबद्दल त्यांना सांगितले त्यानंतर स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेबांशी मी या सदर घटनेबाबत चर्चा केल्यानंतर *मद्यरात्रीच लातूर वरून यशवंत युवा सेना प्रमुख मा.कोकरे साहेब व सांगली जिल्हा संपर्क प्रमुख मा.राजू वाघमोडे साहेब माळशिरस च्या दिशेने मार्गक्रमण झाले* सामाजिक कार्यकर्ते मा.सचिन शेंडगे साहेब यांनीही लगेच मद्यरात्रीच सर्व यशवंत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी फोनवरती संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली असता आज दि.२५ डिसेंबर २०१६ रोजी दुपारी बारा वाजता यशवंत युवा सेनेचे सर्व पदाधिकारी हे यशवंत युवा सेना प्रमुखांच्या अद्यक्षतेखाली फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापुर येथे एकत्रित आले तेव्हा तेथिल स्थानिक कार्यकर्ते मा.भिसे साहेब, मा.पांडूरंग शेंडगे तसेच मोंडशिरस गावातील समाजबांधव सुद्धा तेथे उपस्थित होते तेव्हा तेथील स्मारकाची पाहणी केल्यानंतर यशवंत युवा सेना प्रमुख मा.कोकरे साहेबांनी खंत व्यक्त केली की ज्या मातेने प्रजेला पोटच्या लेकराप्रमाणे जपून जनहिताची कामे केली त्याच मायमाऊलीच्या पुतळ्याची अशी बिकट अवस्था होत असेल तर आम्हाला अहिल्याईंचे वारसदार म्हणून जगण्याचा कोणताही अधिकार नाही. राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या राज्यकारभाराचा आणि प्रशासन व्यवस्थेचा आदर्श अख्ख्या जगाने घेतला असून त्याआधारावरती इतर देश प्रगतीपथावर पोहचत असताना ज्या मातीत अहिल्याई जन्माला आल्या त्याच भारताच्या परिणामी महाराष्ट्र राज्याच्या मातीत अहिल्याईंचे विचार ज्यांच्या डोक्यात बसत नाहीत तर ती डोकी काय कामाची? असे मला वाटते. त्या मायमाऊलीच्या, राष्ट्रमातेच्या पुतळ्याची ही अवस्था पाहिली तर जिथे असतील तिंथे खुद्द राष्ट्रामाता अहिल्याईंना देखिल लाज वाटत असेल की अरे कोणत्या समाजात जन्म घेतला म्हणून...??
स्व.बी.के.कोकरे साहेबांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मा.सचिन शेंडगे साहेब, माळशिरस तालुका यशवंत युवा सेना प्रमुख मा.आबासाहेब बगाडे, माळशिरस तालुका संपर्क प्रमुख मा.सचिन मोटे, तालुका  विद्यार्थी आघाडी प्रमुख मा.रणजीत शेंडगे तसेच *फोंडशिरस गावचे सामाजिक कार्यकर्ते मा.भिसे साहेब, मा.पांडूरंग शेंडगे तसेच गावातील समाजबांधव या सर्वांनी मिळून तेथिल सुशोभिकरणासाठी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला व राष्ट्रमाता अहिल्याईंच्या स्मारकाच्या कटड्याच्या झालेल्या पडझडीबाबत पुढील दोन दिवसात निर्णय घेऊन त्याचा कायापालट करून सुशोभिकरण करणार* असल्याचे अहिल्याईंच्या स्मारकास हार अर्पण करणाऱ्या मा.भिसे साहेब व मा.पांडूरंग शेंडगे यांनी यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांना  सांगितले. त्यादरम्यान माळशिरस तालुका यशवंत युवा सेनेची बैठक देखिल पार पडली व महाराष्ट्र राज्यातील अशा अनेक बेवारस स्थितीत पडलेल्या पुतळ्यांची माहिती मिळवून तेथील सुशोभिकरणासाठी यशवंत युवा सेना कटीबद्द असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले त्यावरती माळशिरस तालुका यशवंत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी संमती दर्शवली.
*यशवंत युवा सेना मद्ये काम कराणारा प्रत्येक कार्यकर्ता हा कोणत्याही राजकीय नेत्यांची दलाली करून नव्हे तर  स्वताच्या खिशातील पैसा खर्च करून निस्वार्थीपणे समाजासाठी झटत असतो आणि झगडत असतो* समाजाचा सर्वांगीण विकास करून समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणे हेच एकमेव उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवून तो यशवंत सैनिक कार्य करत असतो मग त्यापाठीमागे कोणतेही राजकारण, समाजकारण अथवा अर्थकारण नसते तर असती ती फक्त सामाजिक बांधिलकी व जबाबदारी आणि *यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते हे सामाजिक बांधिलकीसाठी पात्र आहेत कारण ते सर्व गुण यशवंत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमद्ये आहेत* असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. काही उलट्या खोपडीचे भावनेच्या आवेगाने (इतरांनी शिकवल्याने) विचार न करताच लिहून जातात की राजकीय नेत्यांची दलाली करणाऱ्यांनी खोटे समाजप्रेम दाखवू नये कारण ते समाजकारण, राजकारण जास्त काळ टिकत नाही पण यांत दलाली तर कुठेच दिसून येत नाही उलट महाराष्ट्र राज्यात एकमेव "यशवंत युवा सेना" अशी संघटना आहे की ती समाजकारण अथवा राजकारण करत नाही तर ही संघटना स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारधारेवर चालते ती कोणत्याही राजकीय नेत्यांची दलाली करत नाही आणि करणारही नाही तर उलट *आपल्याच धनगर समाजातील नेत्यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी "यशवंत युवा सेना" संघर्ष करते आहे आणि आपल्याच धनगर नेत्यांना आपण मानसन्मान देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करत आहे मग तो नेता कोणत्याही पक्षाचा असो.* तसेच आपल्या धनगर समाजातून अनेक नवनविन नेतृत्व घडविण्यासाठी आणि ते बळकट करून विधानभवनात आणि संसदेत आमदार/खासदार यांचा टक्का कसा वाढवतां येईल यादृष्टीने "यशवंत युवा सेना" कार्य करत आहे. त्याचप्रमाणे आता येऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर जास्तीत जास्त धनगर समाजाचे उमेद्वार निवडून देता येतील यासाठी यशवंत युवा सेना प्रयत्नशील असून त्यातूनच समाजाचे प्रश्न सोडवता येतात आणि *यशवंत युवा सेनेने पिवळा भंडारा उधळून जे सामाजिक कार्य हाती घेतले आहे त्यासाठी अखंड अविरतपणे संघर्ष करून समाजाचे प्रश्न सोडवणार आहे* त्यामुळे उलट्या खोपडीच्यांनी त्यांची उर्जा व्यर्थपणे खर्च न करता यशवंत युवा सेनेच्या माद्यमातून समाजकार्यासाठी हातभार लावावा ही विनंती.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
     *✍️️नितीनराजे अनुसे✍️️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday 15 December 2016

*आमचं आस्तित्व कोणी नाकारू शकत नाही.* ✍️️✍️️✍️️

*आमचं आस्तित्व कोणी नाकारू शकत नाही.* ✍️️✍️️✍️️
मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या टोकावर शत्रुंना नाचवणाऱ्या थोर महापुरूषांच्या जातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी त्यामुळे आमचे आस्तित्व कोणीच नाकारू शकत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. ज्याला भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते असा रणझुंजार लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शुरत्वाची दखल सुरूवातीला पेशव्यांनी घेतली गेली नव्हती, त्यांचे नेतृत्व, रणांगणावरती लढायची मर्दानगी ही  पेशव्यांना व पेशव्यांचे सरदार असलेल्या शिंद्यांच्या डोळ्यात खुपत होती पण जेव्हा धार मधील पवारांच्या समर्थनार्थ महाराजा यशवंतराव होळकर यांनी तलवार गाजवली तेव्हा माळव्यात यशवंतराव होळकर यांचा दबदबा वाढू लागला पुढे पुण्यात आल्यावर शिंद्यांच्या आणि पेशव्यांच्या सैन्याचा धुव्वा उडवल्यानंतर पळपुटा पेशवा कोकणात पळून गेला तद्नंतर सातारच्या छत्रपतींना शुरवीर दुसरे मल्हारराव होळकर यांचा पुत्र राजराजेश्वर खंडेराव होळकर यांच्या नावाने सुभेदारीची वस्त्रं देणे भाग पडले अर्थातच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या योद्ध्याची महाराजा यशवंतराव होळकर यांची दखल पेशव्यांना आणि सातारच्या छत्रपतींना घ्यावी लागली होती हे इतिहास साक्ष आहे.
आजपर्यंत या महाराष्ट्र राज्यातील राजकारणात धनगर समाजाची दखल कोणीच घेत नव्हते मग माजी राज्यमंत्री स्व.शिवाजी(बापू) शेंडगे व माजी राज्यमंत्री मा.आण्णासाहेब डांगे सोडले तर धनगर समाजाला सत्तेत वाटा नव्हताच पण या दोघांनाही राजकारणातून संपवायचे षड्यंत्र प्रस्तापितांनी रचले व त्यांना राजकारणातून थोडक्यात हद्दपारच केले. पण जेव्हा हक्काच्या आरक्षण अंमलबजावणी साठी अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज बारामती मद्ये केवळ पाच ते सहा लाखांच्या संख्येने एकत्रित आला होता तेव्हा धनगर समाजाची काय ताकद आहे याचा प्रत्यय २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत प्रस्तापितांनी उपभोगला. जातीयवादी आघाडी सरकारला घरात बसवून धनगर समाजाने भाजप सत्तेत आणले ते एकगठ्ठा मतदान करूनच यामुळे सरकारला धनगर समाजाची दखल घ्यावी लागली आणि आज धनगर समाजाचे दोन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातही आहेत तर कधी इतिहासांत नव्हे ते एक खासदार राज्यसभेवर घ्यावा लागला त्यामुळे धनगर समाजाचे आस्तित्व कोणी नाकारू शकत नाही हे सर्वांना कळालेच असेल. तशीच परिस्थिती आज पाहायला मिळाली ती म्हणजे केवळ महाराष्ट्र राज्य नव्हे तर अखंड भारतातील एकाही साहित्यसम्मेलनात धनगर समाजातील साहित्यकारांना आणि धनगर समाजाच्या अफाट साहित्याला कधीही मानाचं स्थान मिळाले नाही अर्थातच धनगर समाजाच्या साहित्यकारांना आणि धनगर समाजाच्या अफाट साहित्याच्या बाबतीत दुजाभाव करण्यात आला, पण जेव्हा सोलापुर येथे दि.७ व ८ जानेवारी २०१७ रोजी जगातील पहिल्या आदीवासी धनगर साहित्य सम्मेलनाचे आयोजन केले असल्याचे जाहीर केले आणि त्याची चर्चा राज्यभर व्हायला लागली तेव्हा *डोंबीवली येथे होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसम्मेलनाच्या अध्यक्षपदी  साहित्यिक अक्षयकुमार काळे सर नावाच्या एका धनगर समाजाच्या साहित्यकाराला संधी दिली असल्याचे जाहीर झाले म्हणजेच धनगर समाजाची दखल मराठी साहित्यिकांना घ्यावी लागतेय* याचे हे जिवंत उदाहरण. ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन अद्यक्षपदी निवड झालेबद्दल मा.अक्षयकुमार काळे सर यांचे मी सर्वप्रथमता अभिनंदन करतो.
 भविष्यात महाराष्ट्र राज्याच्या तथा भारताच्या राजकारणात, समाजकारणात, सत्ताकारणात धनगर समाजाला विचारल्याशिवाय काहीच साद्य होणार नाही हे त्रिकासबाधीत सत्य असून आरक्षणाच्या बाबतीत जरी सद्याचे फसणवीस सरकार वेळकाढूपणा करत असेल, खोटी आश्वासने देत असेल अथवा संशोधनाचे निमित्त लावून अंग काढून घ्यायचा प्रयत्न करत असेल तर धनगर समाजाला आपल्या औकातीवर यायला वेळ लागणार नाही आणि मग पेटून उठलेला अखंड धनगर समाज उभा महाराष्ट्र कधी पेटवून टाकेल हे सांगणे अशक्य आहे आणि याची जाणीव प्रस्तापितांना आहेच त्यामुळे लवकरात लवकर धनगर समाजासाठी अनुसुचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करावी लागणारच आहे नाहीतर मग *आमचं आस्तित्व कोणीच नाकारू शकत नाही हे सर्वांना माहित तर आहेच पण ते त्रिकालबाधित सत्य आहे हे विसरून चालणार नाही*
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
      ✍️️*नितीनराजे अनुसे*✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

दुष्काळातही वाहतोय विकासाचा निर्मळ झरा

 
          स्वार्थाने बरबटलेल्या या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अखंड भारतभूमित सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी निस्वार्थीपणाने झटणाऱ्या व झगडणाऱ्यांची संख्या तशी बोटावर मोजण्याइतपतच आहे त्यातीलच एकमेव जिवंत उदाहरण म्हणजे सर्वसामान्याचा नेता, रणझुंजार जिगरबाज लढवय्या, पडळकरवाडी गावचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याची मुलूख मैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे बंधू मा.श्री.ब्रह्मानंद (शेठ) पडळकर. एकच ध्यास, जनतेचा विकास या ध्येयाने पछाडलेलं एक उमदं नेतृत्व म्हणून अख्ख्या महाराष्ट्र राज्याचं लक्ष वेधून घेणारा धडाडीचा तरून, नुसतंच धडाकेबाज वक्तृत्व नव्हे तर सोबतच निडर नेतृत्व अंगिकारलेला एक सर्वसामान्य कुटूंबातील जन्माला आलेला तळपता सुर्य, ज्याप्रमाणे  सुर्याची किरणे सभोवताली पडतात व त्याच्या लख्ख प्रकाशाने सर्व सृष्टी प्रकाशमय होऊन जाते व अंधार नष्ट होतो त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेच्या हीताचे काम करून जनतेच्या मनात स्वताची एक वेगळीच ओळख करणारा हा तरून तडफदार युवक, जनतेच्या मनामनात असलेला आमदार/खासदार/मंत्री म्हणजेच सर्वसामान्यांचा रांगडा नेता मा.गोपीचंद पडळकर साहेब होय.
खरंतर सांगायची वस्तुस्थिती अशी की सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी तालुकास्थित मौजे झरे या गावाला पाण्याची तीव्र टंचाई भासत होती. असे असताना या गावाला टेंभू योजना असलेल्या कृष्णा-कोयना नदीचे (टेंभूचे) पाणी मिळावे म्हणून अल्पसा सरकारी निधी मिळाला होता पण त्या निधीतून पूर्ण काम झाले नव्हते तर ते अर्धवट झाले होते. कोट्यावधी रूपयांचा निधी येऊनदेखिल प्रस्तापित व्यवस्थेने जाणिवपुर्वक लक्ष दिले नसल्याने या गावावरच नव्हे तर अख्ख्या तालुक्यावर संकट ओढवले होते. पुढील उर्वरित कॅनाॅलचे अर्धे काम रखडल्याने या झरे गावाला पाण्यावाचून वणवण करावी लागत होती, रणरणत्या भर उन्हात पायपीट करून झरे गावातील जनतेला पाण्याची व्यवस्था करावी लागत असे तेव्हा झरे गावाजवळील पडळकरवाडी या गावचे सुपुत्र महाराष्ट्र राज्यातील युवकांच्या गळ्यातील ताइत म्हणून ज्यांची महाराष्ट्र राज्यभर ख्याति अाहे अशी महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे बंधू मा.श्री.ब्रह्मानंद(शेठ) पडळकर हे झरे या गावासाठी देवासारखे धावून आले व त्यांनी रखडलेले टेंभूच्या कॅनाॅलचे उर्वरित काम स्वखर्चाने लवकरात लवकर पुर्ण केले तेव्हा टेंभू योजनेचे पाणी झरे गावच्या ओढ्या-ओघळीने वाहायला लागले, तलाव तुडूंब भरून वाहू लागले एवढेच नव्हे तर त्या पाण्यानं फक्त झरे गावाचीच नव्हे तर आसपासच्या गावांची देखिल तहान भागली, हजारो एकर शेतजमिनी ओलिताखाली आल्या, मुकी जणावरं, पशू-पक्षी देखिल पाणी पिऊन तृप्त झाली. म्हणून रविवार दि.११ डिंसेबर २०१६ रोजी झरे ग्रामपंचायत झरे ता.आटपाडी जि.सांगली व दलित महासंघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने जनतेच्या हीतासाठी झटणाऱ्या झगडणाऱ्या दोन्ही पडळकर बंधूंचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळेस झरे ग्रामपंचायत, दलित महासंघ महाराष्ट्र राज्यचे सर्व पदाधिकारी, आटपाडी तालुक्याचे नेते मा.प्रभाकर पुजारी साहेब, सांगली जिल्हा सोशल मिडीया प्रमुख मा.जयवंत सरगर साहेब, मा.प्रा.विजय वाघमारे (राज्य उपाद्यक्ष दलित महासंघ), आटपाडी तालुका मार्केट कमिटीचे डायरेक्टर मा.विष्णूपंत अर्जून साहेब, मा.राजू(भाऊ) अर्जून, मा.उमेशराजे अनुसे, मा.बिनू (भाऊ) वाघमारे तसेच अनेक मान्यवर युवकसम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व मा.श्री.ब्रह्मानंद (शेठ) पडळकर यांच्या भव्य नागरी सत्कारासी उपस्थित होते.
पाठीमागे काही महिन्यापूर्वीच पडळकर साहेबांनी आटपाडी तालुक्याला मुख्यमंत्र्यांकडून एमआयडीसी मंजूर करून आणली त्याचा लाभ माणदेशातील प्रत्येक घटकाला होणार असून मुंबई-पुणे सारख्या शहरांकडे स्थलांतर करून हमाली करणाऱ्या युवकांना युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी नवसंजीवनीच मिळवून दिली. अशाप्रकारे माणुसकी हरवलेल्या या जगात माणुसकी जपणारी माणसं फार दुर्मिळ आहेत आणि ती माणुसकी युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे बंधू मा.श्री.ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी जपली, तहानेने व्याकुळलेल्या नुसत्या झरे या गावाची नव्हे तर आसपासच्या गावाची, शेतजमिनीची, मुकी जणावरं, पशू-पक्षी तसेच पाण्यावाचून कोमेजलेल्या, वाळून चाललेल्या वृक्ष-वल्लींची तहान भागवून आदर्श प्रशासनकर्ती आदर्श राज्यकर्ती म्हणून जिचा गौरव अख्ख्या जगाने केला त्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा जपण्याचे काम कृतीतून करून दाखवले आणि अहिल्याईंचा वारसा जपणाऱ्यांपैकी तरून तडफदार युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व मा.श्री.ब्रह्मानंद (शेठ) पडळकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचे नाव समोर येते त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच... काहीजणांना वाटले असेल की आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूका आल्यामुळे ही सर्व खटाटोप चालली आहे पण तसे काही नाही तर या गावाला टेंभूचे पाणी पुरवण्यामागे या दोन्ही बंधूंचा शुद्ध हेतू होता तो म्हणजे निस्वार्थीपणाने व माणुसकीच्या नात्यानं या तहानेलेल्या गावाची, मुक्या जणावरांची, पशू-पक्षी-वृक्ष-वल्ली यांची तहान भागवणे बस्स एवढंच बाकी काही नाही.
          म्हणून अशा या निस्वार्थीपणाने झटणाऱ्या झगडणाऱ्या विकासाच्या महामेरूंना अर्थातच दुष्काळात वाहणाऱ्या या निर्मळ झऱ्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या व तमाम जनतेच्यावतीने कोटी कोटी सलाम व मानाचा जय मल्हार. राष्ट्रामाता अहिल्याईंनी देखिल सांगितले आहे की लोकांची अंधारात केलेली कामे उजेडात येतात पण आमच्या माणसांनी उजेडात केलेली कामे ही प्रस्तापित व्यवस्थेकडून, विकाऊ आणि जातीयवादाने बरबटलेल्या प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक मिडीयाकडून ती कामे जास्तच अंधारात ढकलली जातात हे वास्तव सत्य आहे म्हणून आमच्या माणसांनी केलेली कामे उजेडात यावी यासाठी केलेला हा लेखप्रपंच आहे.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
      ✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+918530004123
nitinrajeanuse123.blogspot.com

Sunday 11 December 2016

समाजबांधवांनो फक्त लढ म्हणा

मराठी वांङमय साम्राजावर अधिराज गाजवलेले विख्यात कवि वि.वा. शिरवाडकर उर्फ "कुसूमाग्रज" यांच्या "कणा" काव्यातून प्रेरित होऊन प्रस्थापित यंत्रणेकडून समाजावरती झालेल्या अन्यायाची खंत व्यक्त करताना मला सुचलेल्या काही सुंदर ओळी आणि त्यातूनच समाजप्रबोधन व्हावं हीच प्रामाणिकपणे अपेक्षा...
                -नितीनराजे अनुसे.

ओळखलंत का समाजबांधवांनो मी मोठा नाही कोणी,
तुमच्यातीलच मी सर्वसामान्य गातो महापुरूषांची गाणी.

विचार करत बसलो होतो आजची ही दशा पाहून,
समाजास दिशा द्यावी म्हणतोय बघुया प्रयत्न तरी करुन.

एकाच रक्ताच्या औलादींनी एवढे अत्याचार कसे केले??
अहो आशा दाखवून समाजाला अतोनात लुटले गेले.

विचार नासलेत प्रयत्नही फसलेत प्रस्थापितांच्या नादी लागून,
आमचेच हक्क कसे मिळतील हो प्रस्थापितांकडेच भिक मागून.??

प्रस्थापितांच्या दावणीला जावून समाजाची पार बरबादी झाली,
सुचलं थोडसं शहाणपण म्हणून आमची आजची ही पीढी सावरली.

बुद्धिजीवी वर्गासंगे बांधवांनो अन्यायाच्या विरोधात लढतो आहे,
विस्कटलेल्या समाजाला एकत्रित करून माणसं जोडतो आहे.

वैयक्तिक प्रसिद्दीसाठी नव्हे तर हक्कासाठी मी लढतो आहे,
वैचारिकतेची लढाई लढून समाजासाठी झगडतो आहे.

कपाळी भंडारा लेवून आता नव्या जोमाने लढतोय पुनः
पाठीवरती हात ठेवून समाजबांधवांनो फक्त लढ म्हणा.

       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................

आदीवाशी धनगर समाजाची साहित्य पंढरी

आदिवासी धनगर समाजाची साहित्य पंढरी
ज्या धनगर समाजाने सर्वप्रथम ५००० वर्षांपूर्वी अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरे आज धनगर समाजापासून कोसों दूर गेली ती आता पहिल्या आदीवासी धनगर समाज साहित्यसम्मेलनाच्या माध्यमातून सर्वांसमोर येणार त्याबद्दल सर्वप्रथमता मी त्या सर्वांचे अभिंनदन करतो व आभार मानतो ज्यांनी दि.७ व ८ जानेवारी २०१७ रोजी सोलापूर येथे होणाऱ्या धनगर  समाजाच्या पहिल्या साहित्यसम्मेलनाचे आयोजन केले. साहित्यसम्मेलनाचे संस्थापक अध्यक्ष मा.डाॅ.अभिमन्यू टकले, साहित्यकार मा.अमोल पांढरे साहेब,मा.जयसिंगतात्या शेंडगे तसेच आदीवासी धनगर साहित्यसम्मेलनची सर्व टीम ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेऊन या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन केले त्या सर्वांचे समाजातील एक छोटासा व नवखा लेखक या नात्यानं अभिनंदन करून आभार मानतो. आजपर्यंत आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन, ओबीसी साहित्य सम्मेलन, दलित साहित्य सम्मेलन, मुस्लिम साहित्य सम्मेलन आमुक सम्मेलन तमूक सम्मेलन असेच ऐकत आलो होतो पण धनगर समाजाचे कधी साहित्यसम्मेलन झाले का?? समाजाच्या किती साहित्यिकांना सम्मेलनात मानाचं स्थान होतं?? धनगर समाजात असे कितीतरी साहित्यिकार जन्माला आले असताना त्याचे कधीच मोजमाप झाले नाही अर्थातच धनगर समाजाच्या साहित्याला आणि साहित्यकारांना आजपर्यंत दुजाभाव देण्यात आला ही खरंतर दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. धनगर समाजाचे साहित्य अफाट फार अफाट आहे पण ते कलागुणांच्या माद्यमातूनच पाहायला मिळते त्याचे ऐच्छिक असे साहित्य म्हणावे इतका नाही. आजपर्यंत धनगर समाजाच्या इतिहासावरती, धनगर समाजाच्या जीवनमानावरती, भटकंतीवरती अनेकांनी साहित्य निर्माण केले, चित्रपट काढले पण त्या साहित्याचा माझ्या धनगर समाजाला काही फायदा झाला का?? का नुसतंच धनगर समाजावरती साहित्य लिहून समाजाची सहानुभुती मिळवली पण त्या धनगर समाजाच्या अफाट साहित्याचे जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी त्याबाबतीत कोणतीच ठोस पाऊले उचलली गेली नाहीत याचा अर्थ स्पष्ट असा होतो की धनगर समाजाची जी लोकपरंपरा आहे, जी संस्कृती आहे ती कुठेतरी संपुष्टात आणण्याचे कुटील कारस्थान हे जातीयवादी साहित्यकारांकडून आणि प्रस्थापित व्यवस्थेकडून होत असल्याचेच दिसून येते एवढंच काय तर धनगर समाजाचा इतिहास सुद्धा चुकीचा लिहून तो विकृत करण्याचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते आहे. याचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि हे कुठेतरी थांबायला हवे त्यासाठी धनगर समाजाची संस्कृती, परंपरा, समाजाचे परंपरागत आदीवासी जीवनमान, धनगर समाजाची लोककला, भटकंती, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दुरावस्था हे सर्वच साहित्याच्या माद्यमातून जगाच्या समोर यायला हवे आणि त्या सर्वांचे जतन व संवर्धन व्हायला हवे यासाठी आयोजकांनी सोलापूर येथे दि.७ व ८ जानेवारी रोजी पहिले धनगर आदीवासी साहित्य सम्मेलन आयोजित केले असून धनगर समाजातील जेष्ठ साहित्यकारांना तसेच नवख्या साहित्यकारांना मानाचं स्थान आणि स्वतंत्र व्यासपीठ लाभणार असून त्या दोन दिवशीय साहित्य सम्मेलनासाठी धनगर समाजातील विचारवंत, कवी, लेखक, व्याख्याते, इतिहासकार, ओवीकार, धनगर गजी-ढोल नृत्यकार, धनगर समाजाच्या प्रश्नांचे अभ्यासक तसेच धनगर समाजबांधव या सर्वांनी शनिवार व रविवार दि.७ व ८ जानेवारी २०१७ रोजी सोलापुर येथे उपस्थित राहून पहिल्या धनगर साहित्य सम्मेलनाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
आपलाच एक समाजबांधव
      ✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

आपलेच दात आणि आपलेच ओठ

*आपलेच दात आणि आपलेच ओठ*
हजारो वर्षापेक्षाही अधिक काळ फक्त हिंदुस्थानवर नव्हे तर आशिया खंडावर देखिल प्रभुत्व गाजवलेल्या थोर महापुरूषांच्या जातीत जन्माला आलेले आम्ही त्यांचे भाग्यशाली वारसदार... ना फक्त संस्थानासाठी तर अखंड स्वराज्यासाठी तर कधी या राष्ट्रासाठी अक्षरशा छातीची ढाल आणि मनगटाची तलवार करून पाण्यासारखं रक्त रणांगणात सांडून बलिदान देणाऱ्या शुरवीरांच्या जातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी, एकेकाळी राजा समाज म्हणून थाटात जगणारे आम्ही आज कोणते जगणे जगतोय याचा साधा विचार जरी केला तरी स्वताचीच स्वताला लाज वाटू लागते. मग ही वेळ आली कोणामुळे?? कशामुळे?? आणि का?? याला नक्की जबाबदार कोण?? असे एक ना अनेक प्रश्न मनांत थैमान घालून बसतात तेव्हा ओठांतून नकळतच शब्द फुटतात की या सर्व गोष्टींना माझाच धनगर समाज कारणीभूत आहे, जबाबदार आहे. म्हणूनच सदरचा ब्लाॅग लिहताना *आपलेच दात आणि आपलेच ओठ* हा आशय उचित ठरतो असे माझे वैयक्तिक मत आहे.
गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाज ज्या सवलतींपासून वंचित आहे त्या माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसरशी आजपर्यंत कितीतरी एक ना अनेक मोर्चे माझ्या धनगर समाजाच्या वतीने तहसिल कार्यालय, प्रांत/जिल्हाधिकारी कार्यालय, विधानभवन/ संसदभवन अशा ठिकाणी झाले.  पण एवढे सगळे करूनही आम्हा धनगर समाजाच्या वाट्याला काय आलं ?? नोकरदार वर्गातील माझ्या युवकमित्रांनी, समाजबांधवांनी रजा टाकून खाडे करून मोर्चांना हजेरी लावल्या तर दिवसरात्र पायाच्या नडग्या वाळवत शेळ्या-मेंढ्यांची राखण करणाऱ्या माझ्या वडिलधाऱ्यांनी शेळ्या-मेंढ्यांना  कोंढवाड्यात कोंढून मार्चांना हजेरी लावली त्याचे काय फलित झाले?? दिवसभर ती मुकी जणावरं अन्नपाण्याशिवाय राहीली हेच का त्या मोर्चाचे फलित?? का नोकरीवरती खाडे/रजा टाकल्याने महिन्याखीरी मिळालेला कमी पगार हे त्याचे फलित?? या गोष्टींचा विचार मोर्च्याचे आयोजन करणाऱ्या धनगर समाजातील नेत्यांनी कधी केला होता की नाही कोणास ठाऊक म्हनूनच परवाच्या नागपूर येथील मशाल मोर्चात धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा चा प्रत्यय आला. मला कोणाबद्दल वाइट बोलायचे नाही पण झाला प्रकार तो समाजाला काळीमा फासण्यासारखाच होता. त्याचे कारण असे की ज्या धनगर समाजाने लाखोच्या संख्येने बारामतीसारख्या ठिकाणी एकत्रित येऊन अख्ख्या महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवला त्यानंतर उत्तरप्रदेश मद्येही याच धर्तीवर मोर्चे निघाले मग महाराष्ट्र राज्यात अनेक मुक मोर्चे निघाले, क्रांती मोर्चे निघाले, ॲट्राॅसिटी बचाव मोर्चे निघाले ते धनगर समाजाने काढलेल्या मोर्चाचा आदर्श ठेऊनच. कारण धनगर समाजाने पंढरपूर ते बारामती आरक्षण दींडी यात्रा काढून शांततेच्या मार्गाने ते आंदोलन केले होते तेव्हा पाच ते सहा लाख धनगर समाजबांधव  बारामतीत एकत्रित आला होता पण जर त्या आंदोलनाला वेगळे वळण लागले असते तर आज बारामतीची अवस्था काय झाली असती महाराष्ट्र राज्याची अवस्था काय झाली असती याचा विचार तुम्हीच करायला हवा. पण ज्या धनगर समाजाने आपला आदर्श अख्ख्या महाराष्ट्र राज्यासमोर नव्हे तर अखंड भारत देशासमोर ठेवला त्याच धनगर समाजाच्या मोर्चातून नागपूर सारख्या ठिकाणी माझ्याच धनगर समाजाचे असे धिंदोडे निघावेत हे माझ्यासारख्या सर्वसामान्य समाजबांधवांना अपेक्षित नव्हते.
*खरंतर धनगर समाज पेटून उठला तर उभा महाराष्ट्र पेटवायला फार उशीर लागणार नाही.* अन्यायाच्या विरोधात आम्हालाही लढतां येते, आमच्याही भावनांचे बांध फुटतात, आम्हालाही अन्याय सहन होत नाही त्याचे कारण ही तसेच आहे ज्यांचे रक्त आमच्या नसानसातून सळसळ सळसळ सळसळतंय ते महाराजा यशवंतराव होळकर पुण्याला आले असता पेशव्यांच्या व शिंद्यांच्या कटकारस्थानमुळे पुण्याची काय अवस्था झाली होती?? हडपसर पासून वानवडी आणि पर्वतीच्या पायथ्यापर्यंत पुण्याची दशा न पाहण्याजोगी का झाली होती?? व ज्याला आपण पळपुटा बाजीराव म्हणतो ते पेशवे कोकणात का पळून गेले?? याचा जर रक्तरंजित आणि ज्वलंत इतिहास अभ्यासला तर आजचा धनगर समाज आपल्या औकातीवर आल्यावर काय करू शकतो आणि काय नाही याची भविष्यवाणी करायची गरजही पडणार नाही. पण कोणीतरी म्हंटलंय की खरे शत्रू हे परकीयांमद्ये नसतात तर ते आपल्यातच असतात मग एकवेळ शत्रुंशी लढताना काहीच वाटत नाही पण आपल्याच माणसाशी लढताना फार जड जाते उदा.महाभारतातील कौरवांच्या विरोधात लढताना अर्जूनाची जी अवस्था झाली होती तशीच अवस्था माझ्याच धनगर समाजाची झाली आहे. जिकडेतिकजे आपलेच दिसताहेत मग लढायचं कोणाच्या विरोधात? आपल्यातलेच नेते एकमेकांच्या विरोधात लढायला उभे ठाकलेत. कुठल्यातरी पक्षासाठी, पक्षश्रेष्ठींची धोतरं सांभाळण्यासाठी धनगर समाजाचे भांडवलीकरून, समाजाला त्या लांडग्यांच्या दावणीला बांधून समाजाची दलाली उचलेगिरी करून एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांची जिरवाजिरवी करायचे सर्वत्र चालू आहे आणि जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत तरी माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाचा विकास होऊ शकत नाही. धनगर समाजाने ज्या नेत्यांवर विश्वास टाकला आहे त्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाच्या विश्वासाला धनगर समाजाचे नेते पात्र नाहीत अशी समाजबांधवांची भावना झाली आहे त्यामुळे भविष्यात लोकप्रतिनीधी अडचणीत येऊ शकतात. ज्यांना समाजाने जनतेने विधानसभेत पाठवले, ज्यांना विधानपरिषदा मिळाल्या मंत्रीपदं मिळाली ते माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजामुळेच मिळाले आहे कारण या समाजात जन्माला आला ते तुमचे भाग्य समजा. त्यातल्या ठराविकजणांचा विषय सोडला तर बाकीच्यांनी विधानभवनात, विधानपरिषदेत कधी आरक्षण संदर्भात साधा 'ब्र' देखिल काढला नाही. कितीतरी उन्हाळी पावसाळी हिवाळी अधिवेशने झाली पण भाजप सरकार स्थापण झाल्यानंतर सुरवातीचा काळ सोडला तर नंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा थंडच होत गेला. त्यामुळे साहजिकच धनगर समाजाच्या आमदार/खासदार तसेच मंत्री यांच्यावर धनगर समाजाचा रोष असणार पण आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था असल्याने आपल्याच दाताने आपले ओठ चावले तर त्याचा त्रास आपल्यालाच होत असतो आणि होणारही आहे त्यामुळे आता धनगर समाजातील नेत्यांनी देखिल नुसती आश्वासने देत बसू नये कारण *We are not believe in your statement but now we believe only in implementation regarding our reservation.* आम्ही तुमच्या आश्वासनांवर आता विश्वास ठेवणार नाही तर जे राज्यघटनेत आमच्या हक्काचे अनुसुचित जमातीचे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी धनगर समाजातील नेत्यांनी उर्जा खर्च करावी पण एकमेकांची जिरवाजिरवी करण्यासाठी नव्हे. मग ते आजी माजी आमदार/खासदार असोत, मंत्री संत्री असोत अथवा माझ्या भोळ्या-भाबड्या समाजाचे भांडवलीकरण करून प्रस्थापितांची धोतरं सांभाळणारे नेते असोत त्यांना एक विनंती आहे की बाबांनो तुमच्या स्वार्थासाठी माझ्या समाजाचं भांडवलीकरण करून माझ्या समाजाचे वाटोळे करू नका व माझ्या समाजाची इभ्रत वेशीवर टांगायचा प्रकार करू नका.
*जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे*
            *नितीनराजे अनुसे*
*अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली*
          *+९१७६६६९९४१२३*
*nitinrajeanuse.blogspot.com*