Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday 1 October 2022

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाजाचा आहे अथवा तो कोणत्या कुटूंबातील आहे यावरून मत मतांतर करणे उचित नाही तर त्या नेत्याचे कर्तृत्व काय आहे यावरून त्याची ओळख निर्माण होते आणि तेच नेतृत्व सर्वसमावेशक जनतेच्या हिताचे असते आणि त्याचा राज्याच्या परिणामी राष्ट्राच्या उन्नती साठी, जडणघडणीसाठी मोलाचा अर्थातच अनमोल वाटा असतो. त्यापैकीच एक दमदार व्यक्तिमत्त्व असलेले कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब. माणदेशाच्या दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी तालुक्याच्या कुशीत वसलेल्या पडळकरवाडी या छोट्याशा खेड्यात गोपीचंद पडळकर यांचा जन्म झाला. ते काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नाहीत, तर सर्वसामान्य कुटुंबातून संघर्षाला आवाहने देत इथपर्यंत पोहचलेलं एक उमदं नेतृत्व आहे. इथल्या काही जुलमी राजकीय सत्ता पिपासू प्रस्थापितांनी डोंगराएवढी संकटं उभारून ठिकठिकाणी त्यांना आडवण्याचा, त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला तरीही कधीही न डगमगता, न खचता निधड्या छातीने त्या संकटांना पायदळी तुडवत, प्रस्थापितांच्या छाताडावर थायथाय नाचत त्यांनी त्यांचा संघर्षरथ आजतागायत कधीच थांबू दिला नाही. 'माझा जन्म संघर्षासाठी झाला असून, येथील अठरापगड जातीतील, तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीच माझा जन्म झाला आहे' असे ते छातीठोकपणे सांगतात. या महाराष्ट्र राज्यातील तसेच अन्य राज्यातील युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखले जाणारे गोपीचंद पडळकर आज महाराष्ट्राचे लोकनेते म्हणून ओळखले जातात. कधी काळी एखादं वर्तमानपत्र, टी व्ही न्यूज चॅनल गोपीचंद पडळकर साहेब यांची साधी दखलही घेत नव्हते म्हणून त्यांनी कधी धीर सोडला नाही. ते लढत राहिले, समाजासाठी अहोरात्र झगडत राहिले, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात प्रहार करत राहिले आणि तीच वर्तमानपत्रे आणि टी व्ही न्यूज चॅनल आज त्यांच्या मागेपुढे करतात हे त्यांनी अविरतपणे दिलेल्या झंझावाताचे यश आहे. गोपीचंद पडळकर साहेब यांची कोणतीही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया दखल घेत नव्हती तेव्हा त्यांच्यावरती जिवापाड प्रेम करणारा प्रत्येक हाडामांसाचा कार्यकर्ता स्वखर्चाने सोशल मिडिया द्वारे प्रचार प्रसार करत होता आणि आजही करतोय. तेव्हा काहीजण या कार्यकर्त्यांना Paid कार्यकर्ता म्हणायचे, एवढंच नाही तर माझ्यावर सुद्धा काही बिनडोक लोकांनी कुठल्यातरी फाळकूट माणसांच्या सांगण्यावरून Paid कार्यकर्ता म्हणून बिनबुडाचे आरोप केले होते, आज ते मूग गिळून गप्प बसलेत. असो आज महाराष्ट्र राज्यभर आमदार गोपीचंद पडळकर यांची सोशल मिडिया एक क्रमांकावर आहे. इथल्या काही राजकीय नेत्यांनी त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सोशल मिडियाची कार्यालय उघडली परंतु आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे या महाराष्ट्र राज्यात कुठेही सोशल मिडियाचे ऑफिस नाही तर त्यांच्यावर प्रेम करणारा, माळरानावर मेंढ्या राखणारा, शेतात शेतमजूरी करणारा हा प्रत्येकजण अगदी निःशुल्कपणे पडळकर साहेब यांचा प्रचार प्रसार करतो आणि तेच त्यांचे २४ × ७ खुलं ऑफिस होय. वक्तृत्वाच्या जोरावर अनेक सभा गाजवणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी जशी तमाम युवकांच्या ह्रदयावर छाप पाडली तशीच त्यांनी विधानभवनात प्रत्येक विषयाला हात घालत अखंड महाराष्ट्रवाशीयांच्या मनाला भुरळ घातली आहे हे त्यांच्या विधानभवनातील भाषणातून दिसून येते. आजपर्यंतच्या इतिहासात छोट्या छोट्या जात समुहाचे प्रश्न कोणी सहसा मांडत नव्हते परंतु आमदार गोपीचंद पडळकर हे विधानपरिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी जेव्हा जेव्हा विधानभवनात पाऊल ठेवले तेव्हा तेव्हा गोरगरीब जनतेचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, कलावंतांचे, विधवा स्त्रियांच्या हक्कासाठी प्रश्न उपस्थित करून सरकार दरबारी त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जातीयवादी इतिहासकारांनी जाणूनबुजून दुर्लक्षित केलेल्या महापुरुषांचा इतिहास त्यांच्या स्मारकाच्या रूपाने जगासमोर यावा यासाठी देखील त्यांनी विधानभवनात आवाज उठवला. काही स्मारकांसाठी तर त्यांनी स्वतःच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला. आटपाडी खानापूर मतदारसंघांमध्ये त्यांनी तर विकासाचे जाळे विणले आहे जे आजपर्यंत कोणत्याही आमदार खासदारांना जमले नाही. तसेच इतर मतदारसंघांमध्ये देखील अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची अनेक विकासकामे करून त्यांनी 'बोले तैसा चाले' हे सिद्ध करून दाखवले. त्यामुळेच कर्तृत्वातून सिद्ध झालेलं सक्षम नेतृत्व असेच मी म्हणेन. मी पडळकर साहेबांची बाजू का घेतो? मी त्यांच्याबद्दल सतत का लिहितो? मला काहीजणांनी विचारलेल्या या सर्व प्रश्नांची सर्व उत्तरे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या आजपर्यंतच्या कार्यातून त्यांना नक्कीच मिळाली असतील आणि इथून पुढे देखील मिळतील कारण पडळकर साहेब यांच्या राजकारणातील प्रवेशापासून ते आजपर्यंतच्या संघर्षात्मक प्रवासाचा मी साक्षीदार आहे. आज त्यांच्यामुळे माझ्यासारख्या युवकांना ताठ मानेने जगण्याची उर्जा मिळते, उमेद येते. आटपाडी तालुक्यात एक काळ असा होता की राजकीय नेत्यांच्या विरोधात बोलण्याची कोणी हिंमत करत नव्हते, त्यांच्या विरोधात कोणी आवाज उठवत नव्हते, अन्याय झाला तरी तो निमूटपणे सहन केला जात होता. परंतु गोपीचंद पडळकर साहेब यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे तालुक्यातील युवा वर्ग आज जागृत झाला आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. मग टेंभू चा पाणीप्रश्न असो, राजेवाडी तलावाच्या उजव्या कालव्याचा प्रश्न असो ज्या ज्या वेळी त्यांनी इथल्या जुलमी व्यवस्थेविरुद्ध लढा पुकारला त्या त्या वेळी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या सोबत अंगावर केसेस घ्यायला त्यांचे कार्यकर्ते कधी मागे राहिले नाहीत, आणि म्हणूनच प्रस्थापित नेत्यांच्या बुडाला आग लागत होती. मग हा उधळलेला वारू कसा रोखायचा म्हणून हांडग्यापणाचं राजकारण करून शरद पवार यांच्या चेल्यांनी तेव्हा त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करून त्यांना अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु वायू वेगाने यशाच्या दिशेने धावणाऱ्या या वारूला सहजासहजी अडवण्याची त्यांची लायकी नव्हती हे सिद्ध झाले. पुढे गाडीवर दगडफेक करण्याचे घाणेरडे प्रकार देखील झाले, दगडफेक करणाऱ्यांचे सत्कार करून गुन्हेगारांना आशीर्वाद देणारे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ठेका घेणारे पवार घराणे अख्ख्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले. परंतु हा वाघ काही नमला नाही कारण संकटांना सामोरे जाणारे नव्याने इतिहास घडवतात मग ती संकटे नैसर्गिक असोत अथवा इथल्या सत्तापिपासू वृत्तीने बरबटलेल्या माणसांनी निर्माण केलेली असोत. त्या संकटांना निधड्या छातीने सामोरे जायला देखील काळीज लागतं आणि ती धमक, ती रग आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यात आहे. आज १ ऑक्टोबर रोजी दुष्काळात उमललेल्या संघर्षपुत्राचा जन्मदिवस आहे त्यानुषंगाने त्यांच्या लढ्याला अजून बळ येवो, त्यांच्या हातून सर्वसमावेशक जनतेचे कल्याण होवो तथा पुढील राजकीय वाटचालीत घवघवीत यश मिळो हीच श्री बिरोबा चरणी प्रार्थना. महाराष्ट्र राज्याची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना जन्मदिवसानिमित्त उदंड आयुष्यासाठी प्रचंड शुभेच्छा 💐💐💐 जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥ ✍️नितीनराजे अनुसे अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली nitinrajeanuse123.blogspot.com

No comments:

Post a Comment