भारताच्या रक्तरंजित इतिहासातील एकमेव अद्वितीय महायोद्धा ज्याला भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते असा रणझुंजार लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४१ व्या जयंतीनिमीत्त "यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य"च्या वतीने दि.३ डिंसेबर २०१६ रोजी वाफगाव ता.खेड जि.पुणे येथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मभूमीत अर्थातच आमच्या प्रेरणाभूमीत भव्य जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, यशवंत युवा सेना कार्याद्यक्ष मा.विष्णू देशमुख साहेब, सरचिटणीस मा.ॲड.रविकिरण कोळेकर साहेब तसेच अन्य यशवंत मावळे महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी वाफगाव येथे गेल्या दोन महिन्यापूर्वी जाऊन ठिकाणाची पाहणी करून आले होते व त्या अनुषंगाने जयंती महोत्सव साजरा करणार असल्याचे निवेदन सुद्धा देऊन आले होते. दि.१३ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबई येथे धनगर समाजाच्या राज्यस्तरीय केडरकॅंप दरम्याण यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी जाहीरही केले होते की अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज फौजेचा धुव्वा उडवून त्यांची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकर यांची भव्य जयंती "यशवंत युवा सेनेच्या" वतीने महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी वाफगाव ता.खेड जि.पुणे येथे साजरी करणार असून सर्व समाजबांधवांनी तसेच यशवंत मावळ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखिल केले होते.
ज्यांनी सर्वप्रथम इंग्रजांचा धोका ओळखून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले एवढेच नव्हे तर त्या फिरंग्यांना अक्षरशा कापून काढले, कित्येक इंग्रज अधिकाऱ्यांनी ज्यांच्यासमोर गुडघे टेकवले, कधीही न हारता जवळ जवळ १९ लढाया जिंकून इंग्रजांचा पराभव केला असे एकमेवाद्वितीय महाराजा यशवंतराव होळकर इतिहासात आपली तलवार गाजवून गेले पण भारतीय इतिहासकारांच्या लेखणीला जणू गंज लागला होता की काय कोणास ठाऊक म्हणून त्यांनी छत्रपती शिवरायानंतर स्वताचा राज्याभिषेक करवून घेणाऱ्या महाराजाधिराज यशवंतराव होळकरांचा इतिहास जाणूनबुजून लपवून ठेवला होता. आज हळूहळू धनगरांचा गौरवशाली आणि सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला रक्तरंजित इतिहास समाजासमोर येतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. त्या अनुषंगानेच शनिवार दि.३ डिंसेबर रोजी वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर यांचा भव्य जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी तमाम यशवंत मावळ्यांची नस असलेल्या यशवंत युवा सेनेच्या वतीने आयोजन करण्यात आले असून राजकारणाच्या चपला दूर ठेवून सर्व पक्षभेद, मतभेद, मनभेद व संघटना भेद विसरून सर्व नेत्यांनी, समाजबांधवांनी, यशवंत मावळ्यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मभूमीत (वाफगाव) अर्थातच प्रेरणाभूमीत उपस्थित राहून या इतिहासाचे साक्षीदार व्हावे.
ठिकाण:- वाफगाव ता.खेड जि.पुणे
दि.:- ३ डिंसेबर २०१६
वार :- शनिवार
वेळ :-
स.०८:०० वा.शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी
स.१०:०० वा. मुख्य जयंती महोत्सव
आयोजक :-
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य
पिढ्यानपिढ्या जरी गेल्या आमच्या मेंढराच्या पाठी ।।
सळसळत्या रक्ताच्या अजून तरी बनल्या नाहीत गाठी ।।
अन्याय करणाऱ्या औलादींच्या आता नका लागू पाठी ।।
कारण महाराजा यशवंतराव होळकरांचे मर्दमावळे,
पुन्हा आवळतोय आम्ही तळपत्या तलवारीच्या मुठी ।।
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment