Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Sunday, 19 March 2017

पै.संदीप (बापू) रासकर यांचा वाढदिवस उत्साहात...




      पैलवानकीचा वारसा लाभलेल्या धनगर समाजातील महाराष्ट्र राज्याचे तरूण तडफदार  युवा नेते *मा.पै.संदीप रासकर सर* यांचा वाढदिवस भारती विद्यापीठ पुणे येथे दि.१६ मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील धडाडीच्या कुस्तीपटूंची अर्थातच *पैलवानकीची  परंपरा असलेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यांतील रासकर कुटूंबियांचा* महाराष्ट्र राज्यभर चांगलाच बोलबाला आणि दबदबा आहे. समाजासाठी वाहून घेतलेले आणि जनसेवेत कार्यतत्पर असलेले मा.पै.संदीप रासकर सर हे अतिशय गरीब कुटूंबातून व अतिशय खडतर प्रवासातून आलेल्या माता पुरस्कार विज्येत्या शांताबाई खाशाबा रासकर आणि पै.खाशाबा रासकर यांचे नातू तर पै.आनंदराव खाशाबा रासकर यांचे सुपुत्र होत. काही महिन्यापूर्वी "सुलतान" या हिंदी चित्रपटातून पैलवानांना कोणत्या परिस्थतीस व कसे सामोरे जावे लागते याचे चित्रीकरण केले होते ज्वलंत उदाहरण म्हणजे कडेगाव तालुक्यांतील रासकर कुटूंब होय. गरिबीच्या झळया सोसूनही पै.स्व.खाशाबा रासकर यांनी त्यांच्या पै.आनंदराव रासकर, पै.वसंतराव रासकर, पै.कृष्णा रासकर (सर्वांचे लाडके आप्पा) व पै.धनाजी रासकर या चारही मुलांना पैलवानकीसाठी तालमीत पाठवले. आज पैलवानकी हाच त्यांचा एकमेव खानदानी पेशा म्हणून ओळखला जातो. आज कडेगाव तालुक्यांतील एक उमदे आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून पै.आनंदराव रासकर यांना ओळखले जाते तर पै.वसंतराव रासकर हे गावाकडे शेती सांभाळतात. पै.संदीप रासकर यांचे चुलते भारतीय नौसेना मधून रिटायर झालेले आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू तसेच ज्यांना कुस्त्यांचा जादूगार म्हंटले जाते असे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल आंतरराष्ट्रीय १९ पदकाचे मानकरी अर्थातच विजेते माजी सैनिक पै.कृष्णा रासकर (आमचे लाडके आप्पा) यांची महाराष्ट्र राज्यभर चांगलीच ओळख आहे. तर पै.धनंजय रासकर हे सुद्धा भारतीय नौसेना मध्येच स्पोर्टस विभागातील नावाजलेले पट्टीचे कुस्तिपट्टू आहेत. रासकर कुटूंबातील राजकीय वारसा म्हंटले तर सौ.अलकाताई कृष्णा रासकर यांनी माजी सरपंच पद भुषवले आहे.
        पाठीमागे नुकत्याच पार पडलेल्या "स्व.खाशाबा जाधव दुसऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा" मधून ९६ किलो वजनी गटातील सुवर्णपदक विजेते  पै.वैभव रासकर यांचे सख्खे चुलत भाऊ म्हणजे भारती विद्यापीठ पुणे येथे प्राध्यापक असलेले पै.संदीप रासकर सर आहेत.  पै.संदीप रासकर सर यांचे समाजासाठी फार मोठे योगदान असून समाजातील विद्यार्थ्यांसाठी, कुस्तिपटूंसाठी ते नेहमीच झटत असतात,धडपडत असतात व निस्वार्थीपणाने त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करत असतात त्यामुळे पुणे जिल्ह्यात त्यांची वेगळीच ख्याती आहे तर धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी पुणे हायवेवरती केलेल्या रास्तारोको आंदोलनातून महाराष्ट्र राज्यभर त्यांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या घडाकेबाज नेतृत्वामुळे महाराष्ट्र राज्यातील युवा वर्गाचे चांगलेच वलय निर्माण झाले आहे.
तसे पाहायला गेले तर आदी-अनादीकाळापासूनच माझ्या धनगर समाजाला पैलवानकीचा वारसा लाभला असल्याने तीच धमक तोच दरारा कायम राहणार आणि  सळसळते रक्त हे असेच सळसळत राहणार त्यात काही शंकाच नाही. पैलवानकीचा वारसा जपणाऱ्या व समाजसेवेची आवड असलेल्या *कडेगावच्या रासकर कुटूंबीयांचा आदर्श अख्ख्या महाराष्ट्र राज्याने घ्यावा* असे मला वाटते कारण रासकर परिवारात आज कुटूंबसदस्यांची संख्या ही तब्बल २९ असूनदेखिल आजही चौघे रासकर बंधू एकत्रितच राहतात म्हणजे एकत्रित कुटूंब आणि सुखी कुटूंब आहे हे रासकर कुटूंबाचे खास वैशिष्टय... *आजही चौघे रासकर बंधू एकत्रित असल्याने या कुटूंबियांकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिम्मत होत नाही आणि एखाद्याने केलीच तर त्याची गय देखिल केली जात नाही असा इतिहास रासकर कुटूंबियांचा आहे.* यातूनच एकीचे बळ काय असते याचा प्रत्यय माझ्या  धनगर समाजाला आलाच असेल म्हणूनच समाजाच्या न्याय व हक्कासाठी एकत्रित या आणि एकत्रित लढा उभारूया असे आवाहन आम्हास करावे लागते. असो पै.संदीप रासकर सर हे कुटूंबाचा पैलवानकीचा वारसा पुढे चालवत समाजासाठी झटत असतात झगडत असतात पुढेही त्यांच्या हातून असेच चांगले समाजकार्य घडत राहो व त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच मल्हारीमार्तंड चरणी प्रार्थना करतो.
     भारती विद्यापीठ पुणे येथे झालेल्या वाढदिवस सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेते पै.विजय चौधरी, पै.अर्जूनवीर काका पवार, कुस्तीपट्टू किरण भगत, उप महाराष्ट्र केसरी विकास जाधव, प्रा.कमलाकर चुगले, कडेगावचे माजी सरपंच विजय शिंदे, नगराद्यक्ष अविनाश साहेब तसेच अनेक नगराध्यक्ष, नगरसेवक, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी पै.संदीप रासकर सर यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला व केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
       *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment