![]() |
पंढरपूर येथील धनगर समाज आयोजित सत्ता संपादन निर्धार महामेळाव्यास उपस्थित जनसमुदाय |
गेल्या ७० वर्षांपासून कॉंग्रेस राष्ट्रवादी यांनी मिळून धनगर समाजेत्तर इतर बहुजन समाजाचा वापर करून त्यांना सत्तेपासून राजकारणापासून उपेक्षितच ठेवले आहे त्यातच पंढरपूर-बारामतीच्या आरक्षण दींडी मुळे बारामती मध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून धनगर समाजाची जी आक्रमता व्यक्त केली त्याची सहानुभूती दाखवून भाजप सरकारने धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवून सत्ता हस्तगत केली मात्र धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून आघाडी सरकार प्रमाणेच वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या....
माझा भोळा धनगर समाज हा धनगर समाजातील नेत्यांच्या भूलथापांना बळी पडला, गेल्या ७० वर्षांपासून प्रस्तापित मस्तवाल नेत्यांच्या अन्यायाखाली पिचत पडलेला समाज हा कवडस्यातून पडलेल्या आशेच्या किरणाप्रमाणे समाजाचा कुठेतरी विकास होईल म्हणून देवेंद्र फसणवीस यांच्या गुळमुळीत भाषणाला भुलून आगीतून उठला खरा पण पुन्हा फुफाट्यातच पडला. आघाडी सरकार प्रमाणेच केंद्र सरकारला धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीची साधी शिफारस न पाठवणारे हे भाजप-शिवसेना सरकार देखील नपुंसक ठरले. मग धनगर समाजाने बघायचे कोणाकडे? त्यात धनगर समाजाचे नेते देखील त्याच लायकीचे एखादे आमदारकीचे, खासदारकीचे, मंत्रीपदाचे हाडूक चाटायला भेटले तर विधानसभेत, राज्यसभेत आरक्षण प्रश्नावर साधा ब्र देखील काढायचा नाही आणि निवडणुकीत मात्र ह्यांना धनगर समाज हवा असतो तो फक्त मतदानापुरताच... पाठीमागे काहीजण विचारत होते की धनगर समाजाला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार नको, भाजप-शिवसेना युती नको तर पर्याय तरी कळवा... तर मग हा घ्या तिसऱ्या आघाडीचा पर्याय डॉ बाळासाहेब आंबेडकर यांचा भारिप आणि धनगर समाज मिळून सत्ता हस्तगत करा... काहीजण म्हंटले डॉ बाळासाहेब आंबेडकर नको. तर का नको? तुम्हाला धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणारे नेते चालतात ज्यांनी धनगर आणि धनगड चा घोळ घालून केंद्र सरकारला उलट-सुलट रिपोर्ट पाठवले... तुम्हाला ते नेते चालतात जिथे गरज नसताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कडून अहवाल मागविले जातात आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवायचे षडयंत्र रचतात मग भारिप का नको? चाखू द्या ना त्यांना सत्तेची फळं... बाकीच्यांनी सत्तेची फळं चाखली तर ती तुम्हाला चालतात मात्र इथेच का तुमच्या जातीयवादाचे घोडे पेंड खात बसले आहे. ज्यांनी मानवतेला लाजवणारी मनुस्मृती जाळून देशाचे संविधान लिहिले आणि माणसासारखे जगायला शिकवले त्यांच्या वारसदारांनी फळे चाखली तर मनुवाद्यांच्या आणि त्यांची विचारसरणी जोपासणाऱ्यांच्या पोटात माथेसुळ उठणारच यात काही शंकाच नाही.
आघाडी सरकार आणि युती सरकार यांना त्रासलेल्या धनगर समाजाचा असंतोष शिगेला पोहोचण्याचे कारण म्हणजे आजपर्यंत धनगर समाजाची झालेली फसवणूक त्यामुळे तिसरी आघाडी धनगर समाजाला सत्तेत घ्यायला तयार आहे पण धनगर समाजातील किती नेतृत्व यासाठी पणाला लागणार आहे याचा देखील करणे गरजेचं आहे. आजपर्यंत धनगर समाजातील सामाजिक संघटनांनी आणि बोटावर मोजण्याइतपत धनगर नेत्यांनी धनगर समाजातून लोकसंख्येच्या तुलनेने पाहिजे असे सक्षम नेतृत्वच घडवले नाही उलट एखादे तयार होत असेल तर माझ्यापेक्षा तो मोठा होईल या भितीने हातातोंडाशी आलेले नेतृत्व बाद करण्याचेच राजकारण केले त्यामुळे धनगर समाजाचा विधानसभेतील आणि लोकसभेतील टक्का वाढलाच नाही. एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या आणि एकमेकांच्या उरावर बसण्याच्या स्पर्धेत धनगर नेत्यांनी धनगर समाजाचे फार मोठे वाटोळे केले आहे.
काल पंढरपूर येथील धनगर समाज आयोजित सत्ता संपादन निर्धार महामेळाव्यात प्रचंड संख्येने धनगर समाजेत्तर बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता तेव्हा आंबेडकर म्हणाले की धनगर समाजाने आता सावज न होता शिकारी बनायला हवं. मग आता धनगर समाजातील संघटनांनी धनगर समाजातील नेत्यांनी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायला हवे की जर धनगर समाजाला शिकारी व्हायचेच असेल कोण-कोणत्या आणि किती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातून तुम्ही शिकार करणार? कोण आणि कशी करणार? कारण निवडणूका तर जवळ आल्यात... आणि एवढ्या अल्पावधीतच समाजातून किती नेतृत्व घडणार या प्रश्नांनी डोक्यात नुसता धुमाकूळ घातलाय.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com