समाजामध्ये परिवर्तन पाहिजे की परावर्तन??
यावरती थोडंपार करावे लागेल चिंतन....
आज धनगर समाज खरंच जागा आहे का??
भरकटलेल्या धनगर समाजाला जागं करण्यासाठी काही इतिहासकार, लेखक, विचारवंत तसेच शिक्षित यूवा वर्ग आज जोमाने आणि आक्रमकपणे समाजकार्य करताना दिसून येतोय पण धनगर समाजात लेखकांची आणि अभ्यासकांची संख्या खूप कमी आहे. असे असताना इतर समाजबांधव फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत असंच आजपर्यंत मला जाणवत आले आहे.
समाजासाठी तळमळीने आणि सडेतोडपणे सत्यावरती प्रकाश टाकणारे अनेक लेख लिहून समाजापर्यंत पोहचवण्याचं काम लेखक आणि विचारवंत पोडतिडकीने करत असताना समाजातून त्यांना म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. उलट सत्य समाजासमोर मांडले तर त्यांना धमक्या आणि शिवीगाळ सुद्धा केली जाते. मग असा समाज खरंच जागा होउ शकतो का?? हा प्रश्न माझ्या मनात घोळत आहे.
धनगर समाजाचे काही अभ्यासक ,लेखक, विचारवंत तसेच शिक्षित युवा वर्ग आज आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि समर्थ आहेत, समाज जागृति करुन त्यांना काही स्वार्थ साधायचा नाही तर त्यांचा हेतू एकच आहे की गाढ निद्रावस्थेत झोपलेल्या माझ्या धनगर समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे आपल्या सोबत घेवून चालायचं आणि अंधश्रद्धेतून मुक्त करून सक्षम, समर्थ तसेच शक्तिशाली धनगर समाज बनवून समाजाची ओळख अख्ख्या भारतभुमिला करुन द्यायची. पण अंधकारातून बाहेर न पडणारा आणि अंधश्रद्धेतून मुक्त न होऊ पाहणारा समाज बदल घडवू शकतो असं मला यथकांचीतही वाटत नाही.
धनगर समाजातील अभ्यासक, विचारवंत, लेखक, कवि तसेच शिक्षित युवा वर्ग आपापल्या परीने समाज जागृति करत असताना त्यांस अडथळा आणायचे काम काही विकृत मंडळी करत आहेत, एखादा लेख अथवा कविता जर लिहून पाठवल्या तर ठराविक समाजबांधव प्रतिसाद देतात पण इतर मात्र खूप शहाणा आहेस का?? इतिहासकार आहेस का?? स्वतःला अभ्यासक समजता का?? तुम्ही काय चाणक्य आहात का?? असे कमेंट करत बसतात. मला सुद्धा काहीजण म्हणाले की तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरुन कार्य करत आहात आणि स्वतःची प्रसिद्धि करून घेत आहात. पण त्यांना मी सांगू इच्छितो की बाबांनो आम्हाला समाजाची जाण आहे आमच्यावरती होणार्या अन्यायाचं भान आहे, म्हणून आम्ही पाठीमागे राहिलेल्या समाजाला सोबत घेवून निघालोय...
जर धनगर समाज एकत्रित येवून लढू लागला तरच आपल्याला आपल्या हक्काचं ST चं आरक्षण मिळेल, आरक्षणा व्यतिरीक्त शिष्यवृत्तीची देखिल गंभीर समस्या आज विद्यार्थी बांधवांना सतावतेय. आपल्याला आरक्षण आणि शिष्यवृत्ती या समस्या जर solve झाल्या तर प्रशासनामध्ये धनगर समाजाची पोरं चमकतील. याशिवाय अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहत आहेत. आज आमच्यासारखे लेखक समाजामध्ये जागृति करत असताना आम्हास धमक्या आणि शिवीगाळ यांसारख्या गोष्टीचा त्रास होणं स्वाभाविकच आहे. कारण अमेरिका सारख्या Well developed country मध्ये अब्राहम लिंकन यांनी गुलामगीरी प्रथेला विरोध केला तर तेथील उच्चस्तरीय लोकांनी त्यांची हत्या केली, भारतातील राजाराम मोहन रॉय यांनी विधवेशी लग्न करुन समाजासमोर आदर्श ठेवला तेव्हा काही समाजकंटकांचा त्रास त्यांना सहन करावा लागला होता. संत तुकोबांची देखिल हत्या करण्यात आली होती, मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करणारे आणि अस्पृष्यता हटवणारे राष्ट्रपिता महात्मा फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांनाही उच्चवर्णियांकडून त्रास सहन करावा लागला एवढेच नव्हे तर महात्मा फुलेंना मारेकरी धाडले होते हे सुद्धा तितकंच सत्य आहे, बी के कोकरे साहेबांची देखिल हत्या करण्यात आली. अशी अनेक उदाहरणे देता येतील..
ज्या ज्या लोकांनी सत्य मांडायचा आणि संघर्ष करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना विरोध झाला आणि आजही होत आहे.
आज जे लेखक विचारवंत आणि शिक्षित यूवा वर्ग समाजासाठी झटत असताना त्यांना नातेवाईकांकडेही लक्ष देता येत नाही नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच घरातील सदस्यांना वेळ देता येत नाही, मित्रपरिवारांपासून थोडंसं दूर झाल्यासारखं वाटतय पण डोळ्यासमोर समाजाची झालेली दशा दिसत असताना समाजाला दिशा देणं गरजेचं आहे. आम्ही काय कोणावरती उपकार करत नाही पण एक सामाजिक बांधीलकी जोपासून निस्वार्थपणे समाजासाठी झटतोय आणि झगडतोय तरच आपल्या पुढच्या शंभर पिढ्या कोणाकडेही गहाण न पडता स्वाभिमानांनं जगतील, मग याची जाणीव प्रत्येक समाजबांधवांना का होत नाही???
कोल्ह्या कुत्र्यांचं जीवन जगायचंय की जागृत होऊन पुन्हा राजेशाही थाटात वावरायचंय??? याचा निर्णय जेमतेम आजच्या सुशिक्षित युवा वर्गानं तरी घ्यायला हवा.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:
Post a Comment