⚡👉पुन्हा एक नवी दिशा...✨
अज्ञानाच्या खाईत लोटलेल्या आणि अंधकाराने ग्रासलेल्या माझ्या धनगर समाजाला खरंच एका नव्या दिशेची गरज आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या धनगर समाजाचं भट-ब्राह्मणांनी पार कंबरडंच मोडून ठेवलंय. भाकित सांगून आणि थापा मारुन भोळ्या भाबड्या धनगर समाजाला देवाधिकाच्या नादी लावायचं अन प्रशासनातील सर्व पदे काबूत ठेवायची हा त्या पाठीमागचा गणिमी कावा आज माझ्या धनगर समाजानं वेळीचं ओळखायला हवा.
५००० वर्षापूर्वी ज्या धनगर समाजानं अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरे आज धनगर समाजापासून शेकडो मैल दूर आहेत असं का?? का ही अक्षरं आमच्यापर्यंत पोहचू शकली नाहीत?? ब्राह्मण शिक्षित झाले पण अक्षरांचा शोध लावणारे अडाणी कसे काय राहिले याचा विचार तमाम धनगर बांधवांनी करायला हवा.
भर उन्हाळ्यात दिवसभर आग ओकणार्या सुर्याची किरणे झेलत, अंगाची काहिली होत असताना तप्त उन्हात दगडधोंडे अन काटेकुटे तुडवत शेळ्या मेंढ्या राखणार्या आई-वडिलांची अवस्था काय होते याचा विचार माझ्या धनगर समाजातील विद्यार्थी बांधवांनी कधी केला का? पावसाळ्यामध्ये कधी कधी अवकाळी पावसाचा फटका तर गारांचा सपाटा सहन करावा लागतो. भर हिवाळ्यातील कडक थंडीमध्ये सुद्धा मेंढ्यांची राखण करावीच लागते. इयत्ता सातवी नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लगातार दोन महिने मी शेळ्या-मेंढ्याकडेच होतो मग आज या गावी तर उद्या त्या गावी असा रोजचा प्रवास मी स्वतः अनुभवलाय. त्यामुळे उन्हाळा असो पावसाळा अथवा हिवाळा असो तिन्ही ऋतु मध्ये भयंकर ऊन, धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस तसेच अंगाचा थरकाप उडवणारी कडक थंडी यांचा विचार न करता मेंढ्यामागे उभे ठाकायचे हे जणू काय धनगर समाजाच्या पाचवीलाच पुजलेलं, शिवाय इतरांसारखी कोणतीही साप्ताहिक अथवा मासिक सुट्टी माझ्या धनगर समाजातील आई-वडिलांना अनुभवता येत नाही त्यामुळेच शाळा असोत अथवा सरकारी कार्यालये यांपासून दूर राहिलेल्या धनगर समाजाला अंधकारातून प्रकाशात यायला तसा खूप उशीर झाला.
आजचे विद्यार्थी अथवा पालक सहज बोलून जातात की शिक्षण घेवून अन् पदव्या हासिल करून काय फायदा?? नोकरीच मिळत नाही. पण त्या सर्वांना माझे एकच सांगणे आहे की बांधवांनो तुम्ही शिक्षण घेताना कधी तुमच्या आई-वडिलांच्या भावनांचा विचार केला होता का??? दिवसभर पायाच्या नडग्या दुखेपर्यंत शेळ्या-मेंढ्यांमागे उभे ठाकलेल्या आणि दुसर्यांच्या शेतात दिवसभर राबराब राबून घाम गाळून ५-५० रु कमविण्यासाठी अपार कष्ट करणार्या आपल्या आई-वडिलांच्या भावना काय असतील याचा विचार कधी केला का?? दिवसभर कष्ट करून थकून भागून घरी परतणार्या आई-वडिलांचा चेहरा अगदी सुकून जातो पण शाळेतून आपला मुलगा/मुलगी घरी आलेत की नाही याचा विचार करत ते झपाझप पावलं टाकत घरी येतात, शाळेतून आल्यानंतर घरासमोर अंगणात खेळत असलेल्या आपल्या मुलाला/मुलीला समोर पाहून त्या सुकलेल्या चेहर्यामध्ये एक विलक्षण आनंद दिसून येतो त्यांच्या ओठांवरती एक हलकसं स्मित हास्य उमटून दिसते, पण त्यांच्या त्या हास्यामध्ये भावना लपलेल्या असतात आणि त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा देखिल असतात याची जाणीव तुमच्या-माझ्या सारख्यांना असायला हवी. जर तुम्ही आम्ही त्यांच्या भावना समजू शकत नसू तर मग आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला अन् आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्या भावना आणि त्यांच्या अपेक्षा ज्यांना पुर्ण करता येत नसतील तर स्वतःला त्याची लाज वाटायला हवी. आपल्या मुला/मुलीनं खूप शिकावं IAS/IPS/Engineer/Advocate/Doctor/BUSINESSMEN तसेच इतर उच्च पदावरती पोहचावं, स्वतःचं तसेच आई-वडिलांचं नाव रोषण करावं या त्यांच्या भावना असतात मग त्या भावना ज्यांना ज्यांना समजतात तेच यशस्वी होतात.
ज्यांना आई वडिलांच्या हाताला बसणार्या चटक्याची जाण असते त्याला समाजावरती होणार्या अन्यायाचं भान असतं हे नाकारता येत नाही.
एकदा आजोळी गेल्यानंतर तेथील शेजारच्या आजीनं मला सांगितलेलं एक वाक्य आयुष्यभर माझ्या लक्षात राहील ते म्हणजे "आयबाप आडाणी हायत म्हणून मेंढरं राखत्याती. पोरांनो तुमी तर शिका खूप मोठं व्हा अन् आय-बा च्या पायातली कुरपं मुजवा नायतर तुमीपण मेंढरं राखत बसचाल" त्या आजीच्या वाक्यामुळं आज माझं जीवन बदलले आहे. माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही तर आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मला झाली होती कारण मी सुद्धा दोन महिने त्यांच्यासोबत गावोगावी फिरुन पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढ्या राखलेत तर कधी कधी मला एकट्यालाही दिवसभर मेंढ्यासोबत राहायचा योग आला होता कधी कोण्या शेतकर्यांच्या शिव्या तर कधी मार सुद्धा खावा लागायचा. मला ते अनुभवलेले दिवस नको होते म्हणून सरळ बोर्डिंग गाठलं होतं. धनगर समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ही उणीव नाही भासली पाहिजे, आई-वडिलांच्या कष्टाची प्रत्येकाला जाण असेल तर उद्या भविष्यात धनगर समाजाची पोरं IAS/IPS/Doctor/Engineer/Advocate/Businessman या क्षेत्रात चमकतील हे सांगायला कोणाची गरज पडणार नाही आणि ही एक दगडावरची रेषा आहे.
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
nitsanuse.blogspot.com
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:
Post a Comment