Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday, 20 April 2017

धनगरांनो आतातरी पेटून उठा...

किती दिवस थंड बसणार? किती दिवस षंढ राहणार?? सळसळत्या रक्ताचे वारसदार आपण हातात तलवारी घेऊन कधी बंड करणार?? पिढ्यांनपिढ्या शेळ्या-मेंढ्या राखून, पायाच्या नडग्या वाळवत, ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता पाचविला पुजलेली भटकंती करण्यातच आमचं अख्खं आयुष्य संपून जातं पण आमच्याच जिवावर राजकारण आणि समाजकारण करणाऱ्या औलादी मात्र ऐशोरामात एसी च्या गाडीत आणि एसीच्या माडीत राहतात. कदाचित या जगातील माणुसकीच संपली की काय असाच भास होत आहे. गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे पण प्रस्तापित मस्तवाल नेत्यांनी माझ्या धनगर समाजाचा नुसता वापर करून स्वताची घरं भरली पण आरक्षण देतो म्हणून आश्वासनांवर आश्वासनांचा भडिमार केला तरीही माझ्या धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही उलट त्या डोमकावळ्यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण  मिळू नये म्हणून अनेक पायंडे घातले. त्या प्रस्तापित मस्तवाल नेत्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत धनगर समाजाने त्यांची जागा दाखवून दिली आहे.
आजच्या सरकारची देखिल तिच अवस्था आहे. थोडक्यात सांगायचे म्हंटले तर गावाकडे एक म्हण आहे ती म्हणजे  आजा मेला अन् नातू झाला घरात माणसं तेवढीच.... म्हणजेच पाठीमागच्या पवार पाटील देशमुखांच्या आघाडी सरकारने दिले नाही आणि या फडणवीस सरकारला देखिल धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण द्यायचे नाही असेच दिसतेय. त्याचे कारण असे की फडणवीस सरकारने ज्या TISS चे भूत धनगर समाजाच्या मानगुटीवर बसवले आहे त्याची काही आवश्यकता नव्हती आणि नाही कारण एखाद्या जातीला/जमातीला अनुसुचित जाती/जमाती मध्ये नव्याने सामाविष्ट करायचे असल्यास राज्य सरकार संबंधित संस्थांची अहवाल सादर करण्यासाठी नेमणूक करू शकते पण धनगर जमात ही अगोदरपासूनच राज्यघटनेमध्ये अनुसुचित जमातीच्या ३४२ कलम वरील महाराष्ट्र राज्याच्या नवव्या परिशिष्टात अ.क्र.३६ वरती आहे तेथे असलेला उल्लेख हा ओराॅन, धनगड असून भारत सरकारकडून प्रसिद्ध झालेल्या अनेक गॅझेट्स मध्ये अ.क्र.३६ वरती ओराॅन, धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे त्याशिवाय १९८६ साली राज्यसभेत खा.सुर्यकांता पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सभापती महोदय रामविलास पासवान यांनी महाराष्ट्रातील धनगर व धनगड हे वेगळे नसून एकच आहेत असे सांगितले पुढे ते म्हणाले की राज्य सरकारने त्याबाबतीत केंद्र सरकारकडे शिफारस केली तर केंद्र सरकारकडून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळतील. मग असे असताना देखिल धनगर समाजाला आजपर्यंतही अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या जात नाहीत. माझ्या  धनगर समाजातील कित्येक पिढ्या अशाच बरबाद झाल्या, धनगर समाजातील लाखो मुले-मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहीली हजारो तरूण-तरूणी आय ए एस, आय पी एस बनण्यापासून कोसो दूर राहीली याचे एकमेव कारण म्हणजे आजपर्यंतच्या सत्ताधारी आणि सत्तापिपासू मस्तवाल नेत्यांनी आमच्या हक्कावरती गदा आणली. अनेक आंदोलने झाली, मोर्चे झाले कालच १६ मार्च रोजी दहिवडी ता.माण जि.सातारा येथे मल्हार क्रांती मोर्चा झाला पण सरकार मात्र हातावर हात ठेवूनच शांत बसलंय.
आरक्षणाबरेबरच विद्यार्थांची शिष्यवृत्ती आणि मेंढपाळांसाठीही शेळ्यामेंढ्यांच्या चाऱ्याची मोठी समस्या भेडसावत आहे. आज माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाचा शुल्क धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडणारा नाही त्यामुळे अर्ध्यातूनच शिक्षण सोडून द्यावे लागते त्याशिवाय डाॅक्टर आॅफ फिलाॅसाफि (Ph.D) च्या विद्यार्थ्यांना देखिल भरमसाठ प्रवेश शुल्क देऊन प्रवेश घ्यावा लागतो मग हे कुठे तरी थांबावयला हवे. दुसरीकडे भयानक दुष्काळ सतावत असताना मेंढपाळांना मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी वणवण फिरावे लागते पण मेंढपाळांची चराऊ कुरणे आजतागायत सरकारकडे जमा आहेत वन खाते मेंढपाळांना चराऊ कुरणात चारणीसाठी परवानगी देत नाही. भटकंती शिवाय माझ्या मेंढपाळ बांधवांचा वडिलधाऱ्यांना मार्गच सुचत नाही मग मेंढपाळांनी नक्की करायचे काय? जगायचे तर कसे जगायचे आणि मरायचे तर कसे मरायचे? असा प्रश्न पडला असताना आता जगण्यासाठी अन्यायाच्या विरोधात कुऱ्हाड भिरकवण्याशिवाय धनगरांसमोर पर्याय नाही. एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय गत्यंतर नाही. जेवढे शांत बसाल तेवढे खाली दाबायचा प्रयत्न करणारी पेशवाई पुन्हा उदयाला आली आहे त्यासाठी त्या पेशवाईचा बिमोड करण्यासाठी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांची दुरदृष्टी डोळ्यांसमोर ठेवून लढायला सज्ज व्हा आणि आजपर्यंत झाले ते झाले पण धनगरांनो इथूनपुढे पेटून उठा आणि पेटवून टाका तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना आणि हिसकावून घ्या
आपले हक्क आणि अधिकार.....
घेऊ नका माघार.. आता करूया जागर
   येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
       *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment