हुंडाबळी "प्रथा ही समाजाची-व्यथाही समाजाचीच"
(दि.२२ जुलै २०१६ रोजी प्रकाशित केलेला ब्लाॅग)
(हुंडा ही प्रथा समाजाची-हुंडाबळी व्यथाही समाजाचीच)
समाजामद्ये फिरताना वावरताना आसपासचे वातावरण हे सडलेल्या अंड्याप्रमाणे इतके उग्र (दुषित) झालेले पाहून अक्षरशा सामाजिक व्यवस्थेचा किळस वाटतो. दैनंदिन जीवनामध्ये रोजच काही ना काही घडतच असते पण यामद्ये सर्रास महिलांचेच का बळी जातात?? तेच समजत नाही. सरकार दरबारी महिला सबलिकरणाच्या गोष्टी मात्र हवेतच विरून जातात पण वास्तवात काहीच नसतं. रोजच वर्तमानपत्रातून स्त्रिभ्रूणहत्या, बलात्कार यांसारख्या मानवी जीवनाला काळीमा फासणाऱ्या बातम्या वाचताना डोळ्यांत पाणी येते त्यांव्यतिरिक्त हुंड्यासाठी होणारा विवाहितेचा छळ अर्थातच 'हुंडाबळी' हे सुद्धा समाजासमोरील एक मोठे आवाहनच आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी, कल्याणासाठी कायदे बनवले जातात पण कधी ते आमलातच येत नाहीत आणि जर आमलात आणले तर आरोपीला दंड आकारुन काही कालावधीची शिक्षा दिली जाते व कालांतराने ती शिक्षा माफही होते याचाच अर्थ पुन्हा गुन्हा करण्यासाठी त्या आरोपीला रान मोकळेच... मग सुड घेण्यासाठी पुन्हा कोणत्या ना कोणत्या महिला त्या लांडग्यांच्या शिकार होणार हे मात्र नक्की.
असो आपली न्यायव्यवस्था आंधळी आहे, जोपर्यंत डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे तोपर्यंत असंच चालत राहणार बाकी काय??? हुंडा न दिल्याने विवाहीतेवर छळ करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांपाठोपाठ लग्नागोदरच हुंड्याची भरमसाठ मागणी करून गोरगरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्या कुमारिकेचा बळी घेणेयाचेही प्रकार आज समाजात वाढत चाललेत. पाठीमागे काही महिन्यांपूर्वी एका मुलीने आत्महत्या केली होती त्यामागचं कारण जर अभ्यासले तर आजच्या या सामाजिक व्यवस्थेचा मला धिक्कार करावासा वाटतो. सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेली ती मुलगी जेमतेम चांगली शाळा शिकलेली. आर्थिक परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हतेच सोबत लहान बहिणीच्यापण शिक्षणासाठी तरतूद करावी लागणार होती. आई-वडिलांना तिच्या लग्नाची घाई झालेली नसतानादेखिल परिस्थीती त्यांना मजबूर करत होती. शिवाय धाकल्या मुलीला शिकवावी आणि लागलीच तिचंही हात पिवळे करावेत असा त्यांचा उद्देश होता. तिच्यासाठी पाहुणे यायचे मुलगी सर्वांना पसंत पडायची पण हुंड्याचा विषय निघाला की ते लग्न मोडायचं असे कितीतरी वेळा झाले. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने हुंडा देणे शक्य नव्हते. थोडाफार हुंडा ठिक असतो पण हुंड्याचा भरमसाठ आकडा ऐकला की त्या बिचाऱ्याला, गोरगरीब शेतकऱ्याला डोक्याला हात लावावा लागायचा. अहो एवढी रक्कम तो आणणार तरी कोठून?? एकतर महाराष्ट्र राज्यांत पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण आत्महत्या हा एकमेव पर्याय नव्हे म्हणून कसंबसं आर्धीकोर भाकरी खाऊन जीवन जगायचं ठरवलं तर दुसरे संकट आ वासून उभा राहायचं.मग नक्की करायचं काय ?? मग तो गोरगरीब शेतकरी असो अथवा गोरगरीब मजूर असो त्यांच्यापुढं आत्महत्येशिवाय पर्यायच उरत नाही. मुलीला एकामागून एक पाहुणे यायचे आणि हुंड्यापायी लग्न मोडून जायचे याचा परिणाम मुलीच्या त्या कोवळ्या मनावरती होणार नाही तर काय होणार?? एकतर हुंड्यामुळे लग्न ठरत नसल्याने समाजामद्ये विविध गोष्टींवर उलट-सुलट चर्चा चालतात, पारावर बसणाऱ्या समाजातील रिकामटेकड्या लोकांना याबद्दल काहीच माहित नसताना ते मुलींलाच दोषी ठरवतात. मग खचून गेलेली मुलगी स्वताला आई-वडिलांवरचं ओझं समजून आत्महत्येचा पर्याय निवडते आणि जीवन संपवून टाकते.
मग त्या मुलीच्या आत्महत्येला कोण जबाबदार असेल?? लग्न ठरत नसल्याने समाजात चाललेल्या उलट-सुलट चर्चेला कंटाळून आत्महत्या केलेली मुलगी जबाबदार असेल?? का हुंडा न देणारा दुष्काळामुळे खचलेला गोरगरीब शेतकरी बाप?? का ज्या प्रथा समाजानं पाडल्या तो समाज?? का ज्या समाजानं पारावर बसून चौकाचौकात त्या मुलीची बदनामी करून त्या हतबल असलेल्या पित्याची इज्जत काढली तो समाज?? कोण जबाबदार आहे याचा जरा अभ्यास कराल का हो??
हुंडा कोणाला द्यावा?? अन् कोणाला देवू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे इट्स डजन्ट मॅटर ॲंड नो आॅब्जेक्शन, पण सोन्यासारख्या पोरींचे कन्यादान करूनही तिचा सांभाळ करावा म्हणून हुंडा द्यावा लागत असेल तर तो मुलगा काय निष्क्रिय आहे का सुस्त? जर तो मुलगा काही कमवूच शकत नसेल तर वडिलधाऱ्यांनो तुमच्या सोन्यासारख्या पोरीचं वाटोळं कशाला करताय?? माझ्या मते एखाद्या अंध-पंगूसाठी हुंडा दिला तर ती गोष्ट वेगळी आहे कारण तो कमवू शकत नाही पण ज्याला दोन हात दोन पाय आहेत व्यवस्थित धडधाकट असूनही दोन-चार रुपये कमवता येत असूनही त्याला हुंडा देत असाल तर मग त्यांच्यात आणि अंध-पंगूमद्ये काय फरक राहिला?? आय एम साॅरी पण मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत कारण आठराव्या शतकात राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी "हुंडाबंदी" केली होती. म्हणजेच एकविसाव्या तंत्रज्ञानविकसित शतकात आजच्या सरकारला जे सुचतं ते आठराव्या शतकात माझ्या राजमाता अहिल्याईंना सुचत होते आणि प्रशासकीय व्यवस्थेमधून त्यांनी हे आमलात देखील आणले होते. पुढे अहिल्यामाईंचाच आदर्श डोळयासमोर ठेवून सतीप्रथेला, हुंडा प्रथेला थोर समाजसुधारक राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी देखील विरोध केला होता, या प्रथेच्या विरोधात ब्रिटिश सरकारने कायदे बनवले होते 'हुंडाबंदी' केली होती पण या कायद्यांना 'हुंडाबंदीला' विरोध करायचं काम बाळ गंगाधर टिळकांनी केले, बाय दि वे... "आमुक-आमक्याने मुलींकडून एवढा हुंडा घेतला तर आम्ही पण तेवढा घेणार दोन रुपये जास्तच पण कमी नाही"अरे ही काय रस्सीखेच चाललीय का??? तुमच्या या रस्सीखेचमुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरातील निष्पाप मुलींचे बळी जातायेत याचा विचार करा. आज समाजातील हुंडा घेणाऱ्या बांधवांना मला सांगायचे आहे की "स्वताचा घाम गाळून, दिवसरात्र राबराब राबून शेतीतून धान्य पिकवायचं, एकाऐवजी आर्धीकोर भाकरी खाऊन पोरालेकरांना एकवेळ उपाशी ठेवून शेतात पिकवलेलं बाजारात बाराच्या भावात विकायचं, तिथं शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे व्यापारी अधाश्यासारखं शेतकऱ्यांना लुटत असतात मग त्यातूनही आलेल्या दीडदमडीत घरसंसार चालवायचा, मुला-मुलींची शिक्षणं, मुलीचे लग्न अशा कितीतरी समस्या त्या गोरगरीब शेतकऱ्यांसमोर उभा राहतात". मग अशा दुष्काळाने खचलेल्या जगाच्या पोशिंद्याकडून जर त्याच्या मुलीसाठी लग्नात हुंड्याची मागणी करत असाल तर तुमच्यासारखा हांडगा माणूस या जगात कोणी शोधून सापडणार नाही. कदाचित माझ्या या बोलण्याचा राग येत असेल पण हुंड्यापायी लग्न मोडलेल्या त्या आत्महत्या केलेल्या मुलीचा एकवेळ भाऊ होऊन बघा तुम्हीसुद्धा माझ्यासारखीच कडवट भाषा बोलाल अथवा हुंडा न दिल्यामुळे सासरकडील लोकांनी जाळून मारलेल्या विवाहितेचा भाऊ नाहीतर एकवेळ बाप होऊन बघा तुमचे डोळे रक्तासारखे लाल होतील आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखीच डोळ्यात अंजन घालणारी भाषा बोलाल आणि शेवटी सर्व काही करूनही जर तुम्ही हतबल असाल तेव्हा तुमच्यावरसुद्धा आत्महत्या करायची वेळ येईल. म्हणूनच म्हणतो अरे कमवायचे असेल ना तर स्वताच्या हिंमतीवर स्वताच्या ताकदीवर कमवा पण मागतकऱ्यांसारखा हुंडा मागत बसू नका आणि कृपया हुंड्यापायी गोरगरीब घराण्यातील निष्पाप मुलींचे बळी घेऊ नका ही नम्र विनंती.
"हुंडाबंदीसाठी एकमेकांच्या हातात हात देऊन निष्पाप मुलींचे जीवन वाचवा एवढंच सांगायचा माझा उद्देश आहे." धन्यवाद
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:
Post a Comment