Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday, 27 May 2017

अहिल्या शिक्षण मंडळात भोंगळ कारभार

समाजातील विद्यार्थीनींची शिक्षणाबाबतची गैरसोय होऊ नये त्याचप्रमाणे स्पर्धात्मक परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी पुणे येथिल पंढरी असलेली अहिल्या शिक्षण संस्था ज्या हेतूने स्थापण करण्यात आली तो हेतू धनगर समाजातील काही नालायक नेत्यांच्या भ्रष्टपणामुळे लालसीपणामुळे कुठेतरी लोप पावतोय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. पुणे येथील अहिल्या शिक्षण संस्थेत जो काही प्रकार चालू आहे तो धनगर समाजाला लाजवणारा असून ज्यांच्या बापजाद्यांनी सरकारी खात्याच्या जमिनीवर ही अहिल्या शिक्षण संस्था उभी केली त्या स्व.शिवाजीराव शेंडगे यांचे वारसदार सुरेश शेंडगे यांनी त्यावरती मालकी हक्क दाखवून अहिल्या शिक्षण संस्थेची जागा व इमारत बळकावण्याचा घाणेरडा प्रकार केलेला आहे याकडे धनगर समाजातील संघटनांचे दुर्लक्ष झाले आहे हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल. धनगर समाजातील मेंढपाळांची मुले उच्चशिक्षणासाठी पुणे येथे आल्यानंतर त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शासकीय मालकीच्या जागेवर अहिल्या शिक्षण मंडळाची वास्तू उभी राहिली व त्याचा लाभ मेंढपाळांच्या मुला-मुलींना होत होता परंतु स्व.शिवाजीराव शेंडगे यांच्या पाश्चात्य त्यांचे वारसदार सुरेश शेंडगे व सचिव कुंडलिक वळकुंदे यांनी मनमानी कारभार करून धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतिगृह व वसतिगृहाच्या खालील असलेले पार्किंग (वाहनतळ) बंद करून तेथे स्वताच्या नावाने सुरेश शेंडगे अभ्यासिका चालू केलेली आहे.
एवढेच नव्हे तर अहिल्या शिक्षण मंडळ पुणे येथिल वसतिगृहाची काही इमारत ही आयसीआयसीआय बॅंकेस व एका शोरूमसाठी भाड्याने देण्यात आली असून धनगर समाजातील विद्यार्थ्यांवर टांगती तलवार आली आहे. पुर्वी जवळजवळ १००० विद्यार्थी या अहिल्या शिक्षण मंडळ पुणे येथे प्रवेश घेत होते पण आयसीआयसीआय बॅंक व शोरूम साठी जागा भाड्याने दिल्याने आता फक्त ५००-७०० विद्यार्थी येथे वास्तव्यास आहेत. पैशांच्या लालसेपोटी या महाभागांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून १००० रू प्रति महिना शुल्क आकारला आहे. म्हणजेच एका विद्यार्थ्यांपाठीमागे प्रत्येक महिन्याला १००० ₹ तर ५०० विद्यार्थ्यांचे ५ लाख रूपये होतात तसेच आयसीआयसीआय बॅंक व शोरूमचे प्रत्येक महिन्याला अंदाजे ४०-५० हजार रूपये सुरेश शेंडगे यांच्या खिशात जातात याची चौकशी आजपर्यंत कोणीच केली नाही. सुरेश शेंडगे व कुंडलिक वळकुंदे यांच्या या मनमानी कारभाराबद्दल जर कोणी आवाज उठवला तर स्थानिक गुंड पाठवून त्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे घाणेरडे प्रकार केलेले आहेत शिवाय ज्यांनी ज्यांनी या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला त्या त्या विद्यार्थ्यांना १०-१५ हजार रूपये देऊन मॅनेज करणे अथवा आवाज उठवणाऱ्यांना मोफत प्रवेश देऊन प्रकरण थांवण्याचा प्रकार अहिल्या शिक्षण संस्था पुणे येथे घडत असल्याने त्याचा परिणाम नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. शिवाय सुरेश शेंडगे आणि त्यांचे इतर सर्व बंधू हे दलबदलू अाहेत व विविध पक्षाचे लागेबंध असल्याने त्यांच्यावर कोणाचेही बर्डन अर्थातच दबाव नाही त्यामुळेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
सुरक्षेच्या नावाखाली महिलांना संस्थेत घेऊन तर नविनच षड्यंत्र शेंडगे यांनी रचले असून या नेत्यांच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झालेला एखादा नविन विद्यार्थी जर संस्थेतील कमीटीवरती कार्यवाही करण्यासाठी तक्रार देत असेल तर त्या विद्यार्थ्याला विनयभंगाच्या कायद्यात अडकवण्याचेही घाणेरडे राजकारण अहिल्या शिक्षण संस्था पुणेचे सुरेश शेंडगे आणि त्यांचे सहकारी करत आहेत त्यासाठी त्यांनी पवार या महिलेला पुढे करून विद्यार्थ्यांना अडकवण्याचे घाणेरडे प्रकार केलेले आहेत. जर कोणी नविन विद्यार्थी प्रवेश घ्यायला या संस्थेत गेले तर त्यांना पवार नावाची महिला ही *धनगर* ऐवजी एन टी सी च्या जागा संपल्या आहेत असे सांगून दमदाटी करत असते त्या पवार नावाच्या बाईला धनगर म्हणायची खरंतर लाज वाटतेय की काय कोणास ठाऊक?? कारण संस्था ही फक्त धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी असताना एन टी सी चा संबंधच काय? जर कोणी विद्यार्थी वरचडपणा करत असेल तर त्याने विनयभंग केल्याचे स्वःताच सांगते व खालच्या पातळीचे शब्द वापरून विद्यार्थ्यांना त्रास देत असते याची खरोखर त्या महिलेऐवजी विद्यार्थ्यांनाच लाज वाटते. तिथे महिला असल्या कारणाने तेथिल विद्यार्थी काहीच न बोलता हतबल होऊन जातात हे कुठेतरी थांबायला हवे यासाठी सर्व सामाजिक संघटनांनी अशा पैशासाठी हपापलेल्या धनसंपती पिपासू लोकांना धडा शिकवावा व समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. २०१६ मध्ये शनिवार वाडा येथे कार्यक्रमानिमीत्त मा.प्रकाश शेंडगे यांना विद्यार्थ्यांनी गेहराव घालून या प्रकाराबाबतचा जाब विचारला असता स्व.शिवाजीराव शेंडगे यांनी उभा केलेल्या अहिल्या शिक्षण मंडळाशी माझा काहीही संबंध नाही असे सांगून दाखवायचे दात वेगळेच असल्याचा आव आणला पण त्या सर्वांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे मात्र समाजबांधवांनी चांगलेच ओळखले आहे. समाजहिताचा वसा घेऊन आज प्रत्येकजन समाजासाठी संघर्ष करतोय लढतोय झगडतोय पण आपल्यातल्याच औलादी समाजातील विद्यार्थ्यांसोबत असे वागत असतील तर समाजबांधवांनी त्यांना डोक्यावर घेण्याऐवजी पायाखाली घ्यायला पाहिजे. अहिल्या शिक्षण मंडळ पुणे असे या संस्थेला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांचे नाव दिले असताना त्यांचेच वारसदार महिलेचा वापर करून विनयभंगाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करतात याची खरंतर त्या संबंधितांना लाज वाटायला हवी. काही दिवसांपूर्वीच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कार्यवाही करण्यासाठी आवाज उठवला त्यांना अभ्यासिकेतून काढून टाकण्याचे षड्यंत्र रचून नोटीस काढली होती पण कोणत्याही दिवसाची अथवा वेळेची मर्यादा किंवा अंतिम दिनांक दिली गेली नसताना परवा दोन दिवसांपूर्वीच त्या त्या विद्यार्थ्यांच्या खोल्या लाॅक करून त्यांना सील करण्यात आले आहे. तेथिल विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तसेच दैनंदिन जीवनातील वापरात असलेले सर्व सामान हे लाॅक केले असल्याने विद्यार्थ्यांना पुणे सारख्या ठिकाणी उघड्यावर रहावे लागत आहे याची दखल समाजातील नेत्यांनी घ्यायला हवी त्याचबरोबर बापजाद्यांच्या नावावर मालकी हक्क दाखवणारी व्यवस्था बाजूला सारून अहिल्या शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नेमायला हवेत. समाजातील निर्दयी व्यक्तींनी केलेला हा किती भयानक प्रकार पाहायला भेटतोय हे पाहून तळपायाची आग पार मस्तकापर्यंत जाते आहे. सर्व समाजबांधवांनी कृपया अशा घटनेचा व त्या संबंधित व्यक्तींचा निषेध करायला हवा त्याचबरोबर खालील संपर्क क्रमांवरती फोन करून त्या संबंधितांना या प्रकरणाचा जाब विचारावा ही विनंती.
सुरेश शेंडगे - 9867423333
कुंडलिक वळकुंदे - 9822187596

जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment