देवाची पंढरी, विठ्ठलाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीतील नेपतगाव येथे राष्ट्रमाता रणरागिणी अहिल्याई होळकर यांच्या २९२ व्या जयंतीनिमीत्त यशवंत युवा सेना शाखा नेपतगाव च्या वतीने भव्य यशवंत युवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. न्यायालयीन लढाई संदर्भात बोलताना मा.निवांत कोळेकर सर यांनी समाजाला योगदान देण्यास प्रवृत्त केले. ७५० वर्षापेक्षाही जास्त राज्यकारभार या भारत देशावर आणि आशिया खंडावर केला असताना देखिल आज धनगर समाज प्रस्तापितांच्या राजकीय आणि सामाजिक दबावाखाली पिचत पडला असून धनगर समाजाला इथून पुढे सक्षम आणि सशक्त करण्यासाठी सर्वप्रथम समाजातील मुले-मुली सुशिक्षीत व्हायला हवीत, समाजाचा आर्थिक समतोल मजबूत असायला हवा त्यासाठी विशेषता युवा वर्गालाच जबाबदारीने काम करावे लागणार असल्याचे टिंग्या फेम व बब्या चित्रपटाचे युवा दिग्दर्शक शरद गोयेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर समाजाच्या न्याय व हक्कासाठी सर्वोतपरी जी काही मदत लागेल त्यास हातभार लावणार असल्याचे देखिल दिग्दर्शक शरद गोयेकर यांनी सांगितले.
समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपले नेतृत्व सक्षम असायला हवे कारण ज्या घराचा कर्ता हा लायक असेल सक्षम असेल मजबूत असेल तर त्या घरावरती भिक मागायची वेळ कधी येणार नाही आणि त्या धराचा कर्ता जर बलशाली असेल तर त्या घराकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत कोणाची होणार नाही असे प्रतिपादन यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाद्यक्ष मा.प्रा.सचिन होनमाने सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी फसणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला तर गेल्या वर्षी ३१ मे २०१६ ला आश्वासनाच्या माध्यमातून सोलापूर विद्यापीठाचे नामकरण राष्ट्रमाता अहिल्याई होळकर विद्यापीठ करणार असल्याचे सांगितले होते पण तसे जाहीर केले नाही पण जर या ३१ मे २०१७ रोजी अशी घोषणा झाली नाही तर पुढील १० दिवसाच्या आत सोलापूर विद्यापीठावर हजारोंच्या लाखोंच्या संख्येने जाऊन यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने आंदोलन करणार असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले. त्यासाठी समाजबांधवांनी त्या सरकारला बरं वाटल असे काही करू नये तर त्या सरकारच्या नाकात दम ठोकायची धमक फक्त मल्हारबांच्या मावळ्यात असल्याची जाणीव त्या सरकारला करून द्यावी. शिवाय राजा महाराजांच्या धनगर जमातीत जन्माला आलो असताना गुलामाचे जगणे सोडून द्यावे असे प्रतिपादन यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी केले.
यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा राजकीय पक्षांशी काहीएक संबंध नसून राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी व ती मजबूत करण्यासाठी यशवंत युवा सेना ही क्रांतीकारी संघटना कार्य करतेय असे स्व.बी.के.कोकरे साहेबांतचे वारसदार मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत युवा सेना प्रमुख कोकरे साहेब होते तर यशवंत युवा सेना नेपतगाव या शाखेचे उद्घाटन टिंग्या फेम शरद गोयेकर, प्रा.सचिन होनमाने सर,निवांत कोळेकर सर, मा.तानाजी खरात साहेब तसेच अन्य प्रमुख पाहुणे व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:
Post a Comment