आबासाहेब खेबूडकर ज्यूनिअर काॅलेज आॅफ सायन्स आटपाडी मध्ये शिकत असताना २००८-२००९ या शैक्षणिक वर्षात मी बारावीला होतो त्यावेळी आम्हाला प्रा. श्रीकृष्ण पडळकर सर हे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून लाभले. अतिशय हुशार, प्रचंड आत्मविश्वास आणि विलक्षण बुद्धीसामर्थ्य त्यांच्यात ठासून भरले आहे. त्यांचे हे व्यक्तिमत्व त्यांच्या चेहऱ्यावर पाहिल्याक्षणी लगेच जाणवते. कधीही न थकता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे त्यांचे वेगळेपण अर्थातच वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्यांच्याच तालमीत घडलेला मी त्यांचा चेला आहे असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. बारावीत असताना मराठी विषयामध्ये “माझा आवडतां नेता” या विषयावर तब्बल चार पाने लिहलेला निबंध प्रा.श्रीकृष्ण पडळकर सरांनी तपासला आणि त्या निबंधाला त्यांनी पैकीच्या पैकी गुण दिले. त्यागोदर माझी आणि सरांची साधी समोरासमोर ओळखही नव्हती. दिवाळी नंतर जेव्हा काॅलेज सुरू झाले त्यावेळी सरांनी माझी चौकशी केली आणि माझ्या पाठीवर जी शाबासकीची थाप मारली ती आजही आणि अजूनही तशीच्या तशी कायम आहे. आजचा एक नव लेखक म्हणून माझी “नितीनराजे अनुसे” ही ओळख समाजात आहे त्याचे सर्व श्रेय हे माझे गुरूवर्य प्रा..श्रीकृष्ण पडळकर सर यांनाच जाते. शालेय जीवनात मी कधी वक्तृत्व केलेले मला आठवत नाही पण प्रा पडळकर सर यांनी त्यांच्या गावात म्हणजेच गोमेवाडी येथे मला बोलावून पहिल्यांदाच भाषण करायला लावले होते. बोलताना मी थोडाफार चुकलो होतो गोंधळलो होतो परंतू गुरू आणि मार्गदर्शक या नात्याने त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि आज मला लेखक आणि व्याख्याता बनवलं. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरी माझे गुरूवर्य तसेच मार्गदर्शक असलेल्या प्रा.श्रीकृष्ण पडळकर सरांनी पाठीवरती दिलेली शाबासकीची थाप मला सतत प्रेरणा देत असते. ज्याप्रमाणे महाभारतात कुरूक्षेत्रावर लढताना रणांगणात अर्जूनाच्या रथाचे सारथ्य हा भगवान श्रीकृष्ण करत होता त्याचप्रमाणे आजही माझ्या वैचारिक चळवळीच्या तसेच समाजप्रबोधनाच्या रथाचे सारथ्य देखिल श्रीकृष्ण करतोय त्यामुळे कितीही आव्हानं आली तरी मी यथकिंचीतही खचणार नाही. त्यामुळे माझ्यासारखे असंख्य लेखक आणि वक्ते घडवणारे माझे गुरूवर्य तथा मार्गदर्शक प्रा.श्रीकृष्ण पडळकर सर यांना माझा मानाचा मुजरा.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
Email:- nitsanuse123@gmail.com
No comments:
Post a Comment