२०१४ च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकी दरम्यान भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल भाषणबाजी करून धनगरांची मते खेचून घेतली. मोदींच्या त्या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप सुद्धा आमच्याकडे आहेत. भाषण करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की "या महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाने माझा यथोचित सन्मान केला त्या धनगर समाजाच्या पाठीत (अप्रत्यक्षरीत्या पवारांनी) सुरा खुपसला" असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. शिवाय "कमीत कमी धनगर समाजाची मागणी काय आहे हे तरी ऐकून घ्यायला हवे होते." असेही ते म्हणाले होते. त्यावेळी सभामंचावर बाळासाहेब (तात्या) गावडे, ना.महादेवजी जानकर साहेब तसेच अन्य धनगर नेते देखील उपस्थित होते आणि सर्वजण मोदींच्या या डायलॉग वरती उभे राहून समाजाला हातवारे करत होते.
जेव्हा १५ जुलै २०१४ ला पंढरपूर मधून बारामतीकडे आरक्षण दिंडी निघाली तेव्हा बघता बघता २१ जुलै पर्यंत पाच ते सहा लाख धनगर समाज त्या आरक्षण दिंडीत सामील झाला. बारामतीमध्ये पिवळे वादळ घोंघावत उठले, पवारांच्या घराला सुरक्षा यंत्रणेने छावणीचे स्वरूप दिले होते. धनगर समाजात क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या खंबाटकी घाटातील आरक्षण लढ्यानंतर पहिल्यांदाच कुठेतरी आरक्षणासंदर्भात असंतोषाची लाट उसळली होती. युवा वर्ग पेटून उठला होता परंतु धनगर समाजाची मागणी नक्की काय आहे हे ऐकून घ्यायला कोणताच प्रस्तापित नेता पुढे येत नव्हता. शेवटी धनगर समाजातील युवा वर्ग उपोषणाला बसला, काहीजणांची तब्येत ढासळू लागली शेवटी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आले आणि म्हणाले की आम्हाला तुम्ही सत्तेत बसवा. सत्ता आल्यावर १० दिवसांत आम्ही आरक्षण देणार, पहिल्याच कैबिनेट मध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे सांगून उपोषण सोडायला लावले. मग सुरू झाला आश्वासनांचा खेळ धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालोय असे सांगून १५ दिवसांत निर्णय घेतो, TISS नेमल्यानंतर ९ महिन्यांत निर्णय घेऊ, अजून अभ्यास चालू आहे. असे सांगून सत्तेचा उपभोग घेत सत्तापिपासू भाजप सरकारने समाजावरती अन्याय करण्याचा अगदी नंगानाच चालवला. सोलापूर विद्यापीठ नामांतरण प्रकरणात देखील तीच अवस्था. धनगर समाजातील नेत्यांचा वापर करून चार वर्ष सत्ता भोगली आणि शेवटी धनगर समाजाच्या हाती काय दिले तर धनगर आरक्षण विरोधी असणारा "से".
मग अखंड धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजातील नेत्यांना मला विचारायचे आहे की तुम्ही मोठमोठ्या स्टेजवरून जाहीर भाषणं केली त्यांच्या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप आम्ही सांभाळून ठेवल्या आहेत गरज पडल्यावर त्या सोशल मीडियावरून प्रकाशित करू. समाजबांधवांना आणि त्या त्या नेत्यांच्या समर्थकांनी कृपया गैरसमज करून घेऊ नयेत कारण इथे माझ्या घरचा नव्हे तर अखंड धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि अखंड महाराष्ट्र राज्यातून ज्या प्रतिक्रिया मला येतात त्या सर्वसामान्य धनगर समाजाला जे प्रश्न पडलेले आहेत तेच प्रश्न मी इथे मांडलेत.
● नागपूर येथील सभेत बोलताना ना.महादेवजी जानकर साहेबांनी स्टेजवर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना ठासून सांगितले होते की जर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर फडणवीस साहेब तुमचा आम्ही अजित पवार करू.... मग आता त्यांचा कधी अजित पवार करणार? हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेला पडलाय.
●आरेवाडीच्या दसरा मेळाव्यात ना.राम शिंदे साहेबांनी सांगितले होते की आम्ही आरक्षणासाठी प्रयत्न करतोय आणि भाजप सरकार आरक्षण देण्यासाठी अनुकूल आहे... मग आता सरकारची अनुकूलता कुठे गेली? आता सरकारच्या विरोधात कधी बोलणार की RSS च्या पायाखलचं मांजर बनून राहणार?
●त्याच मेळाव्यात महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणारे मा.गोपीचंद पडळकर साहेब बोलले की जर भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही तर धनगर समाजाच्या सोबत राहून भाजप सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊ... आज "अखेरचा आरक्षण लढ्यासाठी" त्यांच्या ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत पण अजून किती दिवस गप्प राहायचे? कधी आक्रमक पवित्रा घ्यायचा? सरकारला कधी जाब विचारायचा?
● खासदार विकास महात्मे साहेबांनी डिसेंबर २०१५ ला जो मोर्चा आयोजित केला होता त्याचे फलित काय झाले तर TISS चे भूत धनगरांच्या मानगुटीवर बसवले आणि अगोदरच राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या यादीत असलेला धनगर समाज अनुसूचित जमातीचे (आदिवासींचे) निकष पूर्ण करतो की नाही यासाठी त्या संस्थेमार्फत अहवाल मागवले त्याचा परिणाम म्हणजेच धनगर आरक्षण विरोधी "से". मग TISS चांगले आहे आणि भाजप सरकार आरक्षण द्यायला सकारात्मक आहे असे जाहीर सभांमधून सांगणाऱ्या महात्मे साहेबांनी सांगावे की आता काय करायचे?
● गणेश(दादा) हाके हे देखील शनिवारवाड्यावर बोलायचे फक्त भाजप सरकार आरक्षण देईल म्हणून छाती ठोकायचे आता कुठे गेले? आता सांगा कधी देईल भाजप सरकार धनगर समाजाचे हक्काचे आरक्षण?
●असे कितीतरी धनगर नेते आहेत ज्यांची यादी वाढेल तेवढी वाढवता येईल, कितीतरी सामाजिक कार्यकर्ते आहेत जे म्हणत होते की आरक्षण दिले तर फडणवीस सरकारच देईल मग आता काय? कुठे गेले राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण? कुठे गेली पोकळ आश्वासने?
समाज नोकऱ्या सोडून, आपापला छोटा-मोठा धंदा सोडून, मेंढपाळ हे शेळ्या-मेंढ्या वाड्यात कोंढून, शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले-मुली, समाजातील माझ्या माताभगिणी आरक्षणासाठी एकत्रित येतात आणि रस्त्यावर उतरतात. पण ते सर्वजण धनगर नेते कधी एकत्रित आलेत का? सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडवण्यासाठी कधी चर्चा केली का? एकमेकांची जिरवाजिरवी करण्यासाठी जेवढी ताकद पणाला लावली तेवढीच ताकद सर्वांनी मिळून लावली असती तर भाजप सरकारचं काय घेऊन बसलाय? पौराणिक कथेतील ३३ कोटी देव जरी आडवे आले असते तरी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात 'से' दाखल करायची हिम्मत कोणाची झाली नसती. समाजामुळेच धनगर समाजातील नेते आहेत, नेत्यांमुळे समाज नाही हे धनगर नेते आतातरी लक्षात घेतील का? आणि विशेष म्हणजे 'इगो' सारखा महाभयानक राक्षस बाजूला ठेवून धनगर नेते ज्या भाजप सरकार बद्दल गोडगोड बोलत होते त्या भाजप सरकारला याचा जाब विचारतील का? नाहीतर पुन्हा कोणाचेतरी दलाल होऊन समाजाला कोण्या लांडग्यांच्या दावणीला बांधतील? आतातरी धनगर नेते एक होतील नेक होतील, सत्ताकारणापासून डावलेल्या विषम समाज घटकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करतील आणि समाजाला न्याय मिळवून देतील. जोपर्यंत हाताची पाच बोटं सोबत असतात तोपर्यंत त्या हाताची मूठ बळकट/मजबूत राहते. आणि मूठ बळकट/मजबूत असेल तरच अन्याय करणाऱ्यांचे थोबाड वाकडे करता येते. नाहीतर विस्कटून राहिलात तर तुमची दखल कोणी घेणार नाही आणि तुमचं आस्तित्व देखील कोणी शिल्लक राहू देणार नाही यावरती जरा आत्मचिंतन करुन इतर जाती-जमातींना धनगर नेते एकत्रित येऊन खरोखर सत्या स्थापन करतील.... असा आशावाद माझ्यासारख्या सर्वसामान्य समाजमनात घुमतोय...
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१८५३०००४१२३
nitinrajeanuse123@gmail.com

No comments:
Post a Comment