प्राचीन काळापासून धनगर जमातीचा व्यवसाय हा मुख्यत्वेकरून शेळी-मेंढी पालन हाच आहे हे आजच्या शेंबड्या पोराला सुद्धा माहीत आहे. मग बोकड निर्यातबंदीचा निर्णय घेणारे अधिकारी आणि सरकार कुठे शेण खात बसलंय कोणास ठाऊक? जैन धर्म अथवा धनगर ही आदिम जमात आजकाल नव्यानेच जन्माला आली नसून त्यांना हजारो वर्षाचा इतिहास आहे. आदिम काळापासून पशुपालक हे पशूंचा वापर दुध, मांस, शेती, व्यापार तथा दळणवळण इ.चे साधन म्हणून करत होते. हे इतिहासातच नव्हे तर भूगोलात देखील सर्वांनी अभ्यासले आहे. आजही गवळी-धनगर समाज हा गाई-बैल, म्हैस, घोडा यांचा दुधासाठी, व्यापारासाठी, शेतीच्या कामासाठी तसेच दळणवळण करण्यासाठी वापर करतो तर शेळ्या-मेंढ्यांचा विशेषतः दुध, मांस तथा व्यापारासाठी वापर करतो. हजारो वर्षाची ही परंपरा प्राणपणाने जपत आजही बहुतांश धनगर समाज शेळी-मेंढीपालन या व्यवसायावरती अवलंबून आहे.
काही वर्षांपूर्वी जातीयवादी सरकारने कुरघोड्या करून गवळी-धनगर यांच्या वहिवाटीच्या जमिनी, गाईराने, चराऊ कुरणे घशात घातली तर काही माजलेल्या प्रस्तापित नेत्यांनी दादागिरी, गुंडगिरी करून शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुंड्या मुरगळून त्या जमिनी घशात घातल्या तर सत्तेचा गैरवापर करून गाईराने, चराऊ कुरणे ही देखील स्वताच्या तसेच पाहुण्या-राऊळ्यांच्या घशात घातली आणि पशुपालन करणाऱ्या समाजावर भटकंती करण्याची वेळ आली. त्यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांचा शिव्याशाप खात तर कधीकधी वेळप्रसंगी प्रसाद (मार) खात गपगुमानं शेळ्या-मेंढ्यांची राखण करून पायाच्या नडग्या वाळेपर्यंत गावंच्या गावं पालथी घालून शेळ्या-मेंढ्यांसोबत स्वताच्या देखील पोटाची खळगी भरण्यासाठी माझा धनगर समाज बांधव वणवण फिरून व्यवसाय करू लागला, वाडवडिलांची बापजाद्यांची परंपरा तशीच पुढं चालवू लागला, दुष्काळाशी दोन हात करून आस्मानी संकटांना आवाहन करत टीचभर पोटाची कशीबशी खळगी भरून लेकरा-बाळांना शिकवू लागला. मागच्या एक-दोन महिन्यापूर्वी यूपीएससी चे निकाल लागले त्यामध्ये मेंढपाळांची चार पोरं परिस्थितीशी झगडून झगडून आय ए एस झाली, मागच्याच आठवड्यात एमपीएससी चे निकाल लागले त्यात आरक्षण नसताना देखील मेंढपाळांची २७ पोरं आणि एक मेंढपाळाचीच मुलगी असे एकूण २८ जण राज्यसेवेच्या परिक्षेत यशस्वी झाले. म्हणजे धनगर समाजाच्या विकासाचा आराखडा दिवसेंदिवस जसजसा वाढत जाईल तसतसा प्रस्तापितांच्या, मनुवाद्यांच्या पोटात भितीचा गोळा येऊ लागला, त्यांच्या पोटात मळमळू लागले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर जेव्हा मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्या विमानातून आखाती देशांमध्ये जाऊ लागल्या तेव्हा धर्माचे पुजारी जागे झाले आणि धनगर समाजाची जी उत्तरोत्तर प्रगती होत चालली आहे ती कुठेतरी थांबायला हवी या कपटी भावनेने जैन धर्मातील काही मंडळींनी बोकड निर्यातीवर बंदी आणावी म्हणून आंदोलने केली निवेदने दिली त्यावरती आकलेचे तारे तोडणाऱ्या बेअक्कल अधिकाऱ्यांनी इतिहास/भूगोलात अभ्यासले असताना देखील धनगर समाजाचा मेंढपाळ व्यवसाय बंद पाडण्यासाठी जी काही पाऊले उचलली त्याबद्दल त्या त्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या पात्रतेची मला कीवच येते. शिवाय उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजप सरकारने देखील त्या बोकड निर्यातीवर तात्काळ बंदी आणली आणि धनगर समाजाला अधोगतिच्या दिशेने घेऊन निघाले. धनगर समाजाबद्दलची सरकारची अशी आत्मियता पाहून अक्षरशः हसू की रडू असेच झाले आहे.
★ मग त्या जैन धर्मातील मानवतेच्या पुजाऱ्यांना माझे काही प्रश्न आहेत...
१) तुम्ही शाकाहारी आहात तर शाकाहारीच रहा तुमच्यामुळे आम्ही का शाकाहारी व्हावे? राज्यघटनेत खाण्या-पिण्याच्या बाबतीत देखील स्वातंत्र्य दिले आहे. मग ही उठाठेव कशासाठी?
२) तुमच्यामुळे आम्ही शाकाहारी व्हायला हवे असे निर्बंध तुम्ही आणत असाल तर मग आमच्यामुळे तुम्ही देखील मांसाहारी व्हावे यासाठी आम्ही तुमच्यावर निर्बंध आणावा का?
३) जिवीत हानी होण्याचे भाकीत तुम्ही आज करता आहात मग जेव्हा मानवाची उत्पत्ती झाली तेव्हापासून म्हणजे हजारो वर्षांपासून माणूस मांसाहार करतोय. मग नेमकी आजच (बोकड निर्यातीवेळी) तुम्हाला कशी काय जाग आली?
४) जीव हानी (प्राणी हत्या) होतेय असे तुम्हाला वाटत असेल तर मग वनस्पती हे सुद्धा जीव आहेत. कारण जीव शास्त्रात (Biology) प्राणी शास्त्र (Zoology) आणि वनस्पती शास्त्र (Botany) हे विभाग येतात.) मग शेतातील पिकवलेला भाजीपाला, धान्य, कडधान्य यांची हत्या करून तुम्ही सुद्धा धर्म भ्रष्ट करत आहातच ना?
५) एवढेच नव्हे तर तुम्ही जे दही एवढ्या आवडीने चवीने खाता त्या दह्यामध्ये सुक्ष्मदर्शीतून पाहिल्यावर लाखो Bacteria दिसतात त्या सुद्धा एक प्रकारच्या जीव आहेत. (हे Biology जीवशास्त्र सांगते एकदा अभ्यास करा) मग तुम्ही पण प्राण्यांची (जीवाची) हत्या केलीच ना?
६) आज तुम्ही बोकडांची निर्यातबंदी करून आनंदी झाला असाल? तुमच्या आनंदाला पारावर उरलाच नसेल... पण ज्या धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय शेळी-मेंढीपालन असताना त्यांच्या व्यवसायांवर गदा आणून तुमचा जैन धर्म खरोखरच पवित्र झाला का? म्हणजेच धनगर समाजाची अधोगती करण्यासाठी तुमचा जैन धर्म तुम्हाला शिकवतो का?
७) तुमच्या निवेदनाद्वारे बोकड निर्यातीवर बंदी आणली खरी पण जीव हत्या होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर मेंढपाळांनी या बोकडांचे करायचे काय? का सोडायची .......?
★ सत्ताधारी नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की, निर्यातबंदीवर तात्काळ निर्णय घेऊन तुम्ही कृतिशील असल्याचे दाखवून दिले खरे पण मेंढपाळांनी शेळी-मेंढीपालन करायचे सोडून मग आता करायचे तरी काय? का तुमच्या घरी आणून सोडू द्या? इतर छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांसाठी प्रत्येक मेंढपाळ बांधवांना करोडो रूपये देण्याची तरतूद तुम्ही करून ठेवली आहे का? नसेल तर मग नको तिथे मुर्खपणा करायला तुम्हाला कोण सांगते? एवढीच चपळता एवढीच निर्णय क्षमता तुमच्यात आहे तर मग धनगर आरक्षणाचे घोडे कुठे पेंड खात बसलंय? तिथे का चपळता कशी काय दिसून येत नाही.
जिकडे तिकडे धनगर समाजालाच विरोध होताना दिसतोय. राजकीय क्षेत्रांत देखील धनगर समाजाला दोन मंत्री पदे मिळाली की काही प्रस्तापित नेत्यांना ते बघवले नाही, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हायला लागली की लगेच शिष्यवृत्त्या बंद करणे, वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षण रद्द करणे, राज्य सेवा परिक्षांमध्ये आरक्षण न देणे असे प्रकार घडत गेले आणि धनगर समाज एवढ्या मोठ्या संख्येने असूनही अन्याय सहन करत राहिला. काहीजरी केले तरी धनगर समाज सर्व सहन करू शकतोय असे धर्माचा डंका पिटणाऱ्या (अचानक जागे झालेल्या) मानवतेच्या पुजाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना, प्रस्तापित मस्तवाल नेत्यांना वाटू लागल्याने धनगर समाजाची होत उत्तरोत्तर प्रगती त्यांच्या डोळ्यात सलू लागली मग करायचे काय तर धर्माच्या नावाखाली, मानवतेच्या नावाखाली, प्राणी हत्या(जीव हत्या)च्या नावाखाली आखाती देशांमध्ये भारतातून होणारी बोकड निर्यात बंद करून धनगर समाजाला पोट भरण्यासाठीचे सर्व दरवाजे बंद करायचे ही कटूनिती येथील ब्राह्मणी व्यवस्थेबरोबरच जैन धर्माचे पाईक म्हणवून घेणारे करत आलेत आणि धनगर समाज, धनगर नेते, आमदार, खासदार, मंत्री मात्र आळी मिळी गूप चिळी अन् पार्टी करू संध्याकाळी असे म्हणत धनगर समाजाला अधोगतीसाठीच्या दिशेने घेऊन चाललेत यासाठी समाजाच्या नावाखाली ज्या संघटना काम करत आहेत त्या सामाजिक संघटनांनी जबाबदारी घ्यायला हवी, निर्यातबंदी उठवण्यासाठी आक्रमक पाऊले उचलायला हवीत नाहीतर उद्या कोणीही ऐरेगैरे उठून समाजाच्या डोक्यावर बसून लघूशंका करतील ते देखील सहन करणार आहात का? असेच जर चालत राहिले तर समाजाची होत चाललेली उत्तरोत्तर प्रगती थांबून अधोगति व्हायला वेळ लागणार नाही मग ये रे माझ्या मागल्या म्हणायची आवश्यकता सुद्धा पडणार नाही.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.com

No comments:
Post a Comment