ज्या प्रमाणे कडक उन्हाळ्यानंतर वळव्याच्या पावसाचे वातावरण तयार होते अचानक आकाशात ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट सुरू होतो शांतप्रीय वातावरण दुभंगून जाते जिकडे तिकडे आहाकार माजतो आणि हळूच पावसाचे थेंब एकेक करून जमिनीवरती कोसळू लागतात, ऊनाने तापलेली माती पावसाच्या थेंबाच्या स्पर्शाने हवेत सुगंध पसरवते. वातावरण अगदी त्या मातीच्या सुगंधाने दरवळून जाते आणि मनाला सुखद आणि विलक्षण आनंद देऊन जाते.
मग पावसाचे पडलेले थेंब हळू हळू एकत्रित येतात, तिथे मोठा पाण्याचा साठा तयार होतो. जमिनीवरती एकत्रित झालेले पाणी उताराकडच्या दिशेने वाहायला लागते. त्याचा एक छोटासा प्रवाह तयार होतो. असे अनेक छोटे मोठे प्रवाह ओढ्या-वगळीकडच्या दिशेने वाहू लागतात आणि शेवटी नाले, विहरी, तलाव तुडूंब भरून जातात. हा प्रवाह असाच पुढे गेला तर नदी देखिल ओसांडून वाहू लागते तो प्रवाह साधा सुधा नसतो तर कधी कधी त्या नदीच्या पाण्याला अडवण्यासाठी बांधलेले बंदारे देखिल प्रवाहाबरोबर वाहून जातात आणि सरतेशेवटी तो प्रवाह समुद्राला जाऊन मिळतो. तिथेपण त्या प्रवाहाचे पाणी कधी शांत नसते कधी भरती तर कधी ओहोटी. कधी मोठाल्या लाटा धपकण किणार्यावर आदळतात तर कधी कधी कित्येक जहाजे आणि जीव सागरामध्ये गुडुप होऊन जातात.
आज धनगर समाजाला देखिल अशाच तीव्र प्रवाहाची गरज भासतेय. तो प्रवाह दुसरा तिसरा कोणता नसून स्वताच्या संसाराची राखरांगोळी करून स्व बी के कोकरे साहेबांनी स्थापण केलेली आक्रमक संघटना म्हणजेच एक आक्रमक प्रवाह तो म्हणजे यशवंत सेनेचा. यशवंत सेनेच्या सुरवातीला सर्वात अगोदर पावसाच्या थेंबा थेंबा प्रमाणे समाजबांधवांना एकत्रित केले. शेतीच्या मशागतीसारखी समाजबांधवांची डोकी नांगरून त्यामध्ये अन्याय व अत्याचाराच्या विरोधात पेटून उठण्याचे "प्रबोधन"रूपी बियाणे पेरले गेले. निद्रावस्थेत झोपी गेलेला धनगर समाजातील यूवा वर्ग कडाडून जागा झाला. आज एक एक करून सर्व एकत्रित येऊ लागले त्याचा एक प्रवाह तयार झाला. अनेक छोटे मोठे प्रवाह एकत्रित आल्यानंतर त्यातूनच एक भले मोठे संघटन उभे राहीले होते. हळू हळू तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्र पातळीवर हे संघटन आणि संघटनेतील यशवंत सैनिक आक्रमकपणे, निस्वार्थीपणे समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढू लागले.
ज्याप्रमाणे पाणी आडवण्यासाठी बांधलेला बंदारा एखाद्या तीव्र प्रवाहासमोर गुडघे टेकतो त्याला भेगा पडतात त्याचप्रमाणे स्व बी के कोकरे साहेबांच्या विचारधारेवरती चालणारी यशवंत सेना हा एक तीव्र प्रवाह आहे आणि या प्रवाहासमोर प्रस्तापीत यंत्रणा गुडघे टेकायला भाग पडेल पण त्यासाठी आपली आक्रमकता, तीव्रता, जिद्ध व चिकाटी महत्वाची आहे. समाजात एकी होणे गरजेचे आहे. कारण एकीचे बळ ही कथा तुम्हा-आम्हाला माहीतच आहे. स्व बी के कोकरे साहेबांची यशवंत सेना आज मुंबईमधून चालू झाली अनेक जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते तयार झाले अन् कामालाही लागले. यशवंत सरसेनापती मा.माधव (भाऊ) गडदे यांच्या नेतृत्वाखाली आजचा युवा वर्ग एकत्रित येतोय. यासाठी समाजातील समाजबांधवांनी तसेच छोट्या मोठ्या संघटनांनी यशवंत सेनेच्या या तीव्र आणि आक्रमक प्रवाहात सामील झाल्यास समाजचे ध्येय फार दूर नसेल. आज समाजात अनेक छोट्या मोठ्या संघटना आहेत आणि संघटना त्या त्या संस्थापकांच्या मालकीच्या असल्या तरी संघटनांनी एकमेकांसी सहाय्य करून चालल्यास प्रस्तापितांना सळो की पळो करू शकतो. यासाठी एक प्रवाह असणे गरजेचे आहे म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की समाजबांधवांनी सामाजिक बांधीलकी जोपासून मी समाजाचे काहीतरी देणं लागतो, मला समाजासाठी काहीतरी करायचे आहे असा प्रत्येकाने विचार करायला हवा आणि एका तीव्र प्रवाहात सामील व्हायला हवे.
एक व्हा समाजासाठी नेक व्हा.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
NICE ANUSE SIR.MY WHATS APP NO.9545638292
ReplyDelete