आज
पहाटे पहाटेची वेळ होती, गाढ साखर झोपेत असताना अचानक कोणीतरी गालावर जोरदार चपराक मारण्याचा भास झाला, कोण?? कोण ?? असं म्हणत गालावर हात फिरवत डोळे चोळत उठून बसतो तोच समोर एक आकृति दिसली. धिप्पाडच्या धिप्पाड शरीरयष्टी, अंगावर जरदारी रेशमी वस्त्रे परिधान केलेली, भरदार दाढी आणि कोरीव मिशा, डोक्यावर शिलेदार हिरेजडित टोप आणि त्यामध्ये खोचलेला तुरा असा वेष धारण केलेल्या व्यक्तिच्या डोळ्यात एकदम तेज निखार होता, कमरेला म्याणात तलवार लटकत होती. मी त्या व्यक्तिला ओळखलं तोच तोंडातून शब्द फुटले की महाराज तुम्ही?? आणि इथं कसं काय???
ती व्यक्ति दुसरी तिसरी कोणी नव्हती तर इंग्रजांविरुद्ध कधीही न हारता एकूण १८ लढाया जिंकणारे आणि वीठोजीराव होळकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी पुण्यात येवून शिंद्यांना-पेशव्यांना ताणून ताणून मारणारे मुत्सद्दी लढवय्ये महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर होते.
मी केलेल्या प्रश्नाचं मला खडसावतच महाराजांनी उत्तर दिलं, "तिकडं माझा धनगर समाज डोळ्यांवरती अज्ञानाचं घोंगडं पांघरुन गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय त्या माझ्या धनगर समाजाला कोण जागं करणार???"
महाराजांना काय उत्तर द्यायचं मलाच सुचत नव्हतं. माझे ओठ पुटपुटत होते तेवढ्यात महाराज पुन्हा गरजले "अरे काय दातखीळी बसली की काय?? मी विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर हवंय...
मी बोललो की महाराज आजचा धनगर समाज अजून गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय ही गोष्ठ खरी आहे याची मला खंत देखिल वाटते आणि त्यांना जागं करायचा मी पुरेपूर प्रयत्न सुद्धा करतोय. पण काहीजण जागे आहेत त्यांनी मात्र झोपेचं सोंग घेतलंय. महाराज एक म्हणसुद्धा आहे की "एकवेळ झोपलेल्यांना जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेणार्यांना जागं करता येत नाही."
तेवढ्यात महाराज ओरडले "अरे झोपेचं सोंग घेणार्यांना लाथा घालून उठवायचं असतं, एवढीपण अक्कल नाही का???. " वेड्याला जोड्याचा मार अन शहाण्याला शब्दांचा मार द्यायचा असतो."
मी पुन्हा बोललो "महाराज हा आपला पुर्वीचा धनगर समाज नाही राहिला की ज्याला अन्यायाची जाण, लढण्याची हिंमत आणि स्वाभिमानाची किंमत होती. आज या महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज प्रस्थापितांच्या दावणीला बांधला गेलाय. महाराज आजचा धनगर समाज स्वाभिमानाची भाषाच विसरून गेलाय. अन्यायाच्या विरोधात कसे पेटून उठायचे तेच आमच्या मावळ्यांना समजत नाही. का आजच्या धनगर समाज बांधवांमध्ये लढण्याची हिंमतच नाही तेच मला समजत नाही. जो धनगर समाज बांधव स्वतःचा स्वाभिमान दुसर्यांच्या बुटाखाली गहाण टाकतोय त्याला मी कसं जागं करू??? ज्या धनगर समाजाला आपला इतिहासच माहीत नाही ते काय इतिहास घडविणार???
पहाटेचे वातावरण एकदम शांत असताना महाराज एकाएकी कडाडले शांतता दुभांगल्यागत झाले आणि आगीचे लोळ जसे बाहेर पडावेत तसे महाराज आग ओकू लागले "अरे आम्ही घडवलेला इतिहास जर तुम्हाला आठवत नसेल तर मग तुम्ही धनगरांचे वारसदार कशासाठी म्हणवून घेता?? हाडाची काडं करून आपले वंशज ते बहाद्दर लढले होते अन आम्हीसुद्धा तलवारीच्या टोकावर दुश्मनांना नाचवलं होतं तेव्हा रक्ताचं पाटच्या पाट पाण्यासारखं वाहत होतं एवढं बलिदान नेमकं कोणासाठी होतं?? छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर लढलेल्या महापुरुषांची अन पुर्वजांनी सांडलेल्या रक्ताचीच जाणीव जर आजच्या धनगर समाजाला नसेल तर या गोष्ठीची आपल्या पुर्वजांना देखिल लाज वाटत असेल की आरे आपण कोणत्या समाजात जन्माला आलो?? आणि याचा देखिल त्यांना खेद वाटत असेल"
महाराजांचे डोळे लालबुंद झाले होते आणि महाराज खरोखरच जाम चिडले होते.
धनगर समाजानं ३५० वर्षापेक्षा अधिक काळ या हिंदुस्थानावर केलेलं राज्य मग आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्या पासून राजा बिंदुसार, राजा सम्राट अशोका ते राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी अहिल्यामाई होळकर, शुरवीर राजे यशवंतराव होळकर तुकोजीराव होळकर विरांगणा भिमाई होळकर यांचा राष्ट्राप्रती बलिदान दिलेला सुवर्णाक्षरात कोरलेला धनगर समाजाचा इतिहास ते माझ्यासमोर मांडत होते. तलवारीच्या जोरावर मिळवलेल्या यशाच्या गाथा गिरवत होते. स्वातंत्र्यासाठी लढणारे आद्यप्रणेते राजे यशवंतराव होळकरच होते, हे आम्हापासून लपवून ठेवलं गेलं आणि चुकीचा इतिहास लिहला गेला कारण इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते.
इंग्रजांनी भारतावर आक्रमण केलं होतं. अनेक संस्थानांच्या राजांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, महाराज प्रत्येक संस्थानाच्या राजांना पत्र लिहून इंग्रजांविरूद्ध एकत्र लढण्याचे आवाहन करत होते. एवढेच नव्हे तर शिख आणि मुस्लिम धर्म स्विकारणार असे महाराजांनी जाहीर केले होते ते फक्त त्या त्या धर्माच्या राजा-महाराजांनी फीरंग्यांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्रित यावे म्हणून पण प्रत्येक संस्थानच्या राजा महाराजांना देशाबद्धल काही सोयरसुतक नव्हतं तर प्रत्येकजण स्वतापुरतं पहात होता. अख्खा हिंदुस्थान इंग्रजांपुढे झुकला गेला होता पण माझा राजा कोणापुढे न झुकता ताठ मानेनं कोरीव मिश्यांना ताव देत स्वाभिमानानं जगत होता, झुंजत होता १८ लढायामध्ये इंग्रजांना पराभूत करत वायूवेगाने इंग्रजांच्या सैन्याना कापत सुटायचा, कधीकधी इंग्रज अधिकारी देखिल यशवंतराव होळकरांपुढे नतमस्तकी व्हायचे तर कधी काही इंग्रज अधिकारी रणांगणातून माघारी पळ काढायचे.
हीच ती धमक होती आणि हाच त्यांचा शूरबाणा आणि मनगटाच्या जोरावर शत्रुंना चारीमुंड्या चीत करणारी त्यांची ती तलवार माझ्या मातीवर अत्याचार करणार्यांना कापत सुटायची.
महाराज बोलत होते मी मात्र सुन्न होऊन त्यांच्या शौर्यगाथा ऐकत होतो, एकाएकी अंगावर रोमांच उठायचे, अंग शहारून निघायचे माझ्याही हाताच्या मुठी आवळल्या जायच्या पुन्हा एकदा हातात तलवार घेऊन रणांगणात उतरावं, जो माझ्या मातीवरती समाजावरती अन्याय करतोय त्याला उभाच चिरून टाकावं अशी अवस्था झाली होती.
माझ्या ओठातून शब्द फुटले "महाराज मला आज्ञा द्या मी नेमकं काय करु??"
महाराज मला खडसावतच बोलले "आज समाजावरती अन्याय करणार्या प्रस्थापितांना जर धाक दावायचा असेल तर धनगर समाजाला जागं करावं लागेल, जे जागे आहेत त्यांना उठवून उभा करावं लागेल, जे उठलेत त्यांना चालतं कर बोलतं कर लेखणीरूपी धारदार शब्दांच्या तलवारी प्रत्येकाच्या हातात दे की जे शब्द एकेकाची काळीजं चिरत जातील.
एखाद्या पिकाची मशागत करायची असेल तर अगोदर शेत नांगरावं लागतं, पिकाला वेळेवर खत पाणी द्यावं लागतं तरच पिक जोमानं वाढतं त्याचप्रमाणे अगोदर माझ्या धनगर समाजाचं डोकं नांगरलं आणि वेळेवर समाजप्रबोधनाचं खतपाणी घातलं तर भविष्यात माझ्या धनगर समाजाला कोणाकडेही गहाण पडायची वेळ येणार नाही."
जो समाज आपला इतिहास विसरतो त्या समाजाची कधीच प्रगती होत नाही. कारण इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाहीत अन् इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत हा एक फार मोठा इतिहास आहे. त्यासाठी आपला इतिहास सर्वांसमोर यायला हवा. आजच्या समाजाला जर जागं करून एकत्रित करायचे असेल तर इतिहासाचीच सांगड घालून द्यावी लागेल अन्यथा या स्वार्थी आणि मतलबी प्रवृत्तीच्या जगात समाजासाठी धडपडणार्यांची संख्या फारच कमी आहे. प्रत्येकजण स्वतापुरतं जगतोय, आपले पुर्वज देखिल जर राष्ट्रासाठी लढण्यापेक्षा स्वतासाठी लढले असते तर आज त्यांचा इतिहास समोर आलाच नसता. आणि इतिहासकारांनी याची दखल घेतली नसती. पण पुरोगामी विचारांच्या आणि पाखंडी पंडितांसारख्यांनी आपल्या पुर्वजांचा आणि राजा महाराजांचा इतिहास आम्हापासून दूर ठेवण्याचे कुटिल कारस्थान केले.
आज समाजावरती अन्याय व अत्याचार होत असताना माझ्याच समाजातील काही लोक हाताची घडी घालून तमाशा बघत बसताहेत तर काहीजण अवर्जून या तमाशाचे आयोजन करतात हे सांगायला देखिल मला खंत वाटते आणि त्या समाजद्रोह्यांची कीव येते. राजा महाराजांच्या जातीत जन्माला आलेल्या औलादी आज समाजावर अन्याय व अत्याचार करत असलेल्या प्रस्थापित नेत्यांच्या दावणीला कसे काय बांधले जातात तेव्हा महाराज म्हणाले... खरा इतिहास जर वेळीच समोर आला असता तर आज ही वेळ आली नसती. इतिहासाचे अज्ञान असल्याने समाजाची अधोगती झाली त्यासाठी आता समाजातील युवकांसमोर आपल्या पुर्वजांचा इतिहास मांडायला हवा. थोर महापुरूषांच्या जयंत्या साजर्या करून समाजाला एकत्रित करून इतिहासाची माहीती द्यावी. नुसतंच डीजे लावून धांगडधिंगा घालून जयंत्या साजर्या करायच्या असतील तर एकवेळ जयंत्या नसलेल्याच बरे. कारण त्या माध्यमातून समाजप्रबोधन होणे फार गरजेचे आहे. महाराजांचे शब्द ना शब्द मी मनात साठवून घेत होतो. महाराज जेवढे राकट स्वभावाचे होते तेवढेच राष्ट्रापती बलिदान देणारे प्रेमळ स्वभावाचे होते. राजे यशवंतराव होळकरांचे नाव ऐकले तर इंग्रज अदिकार्यांना कापरं भरायचं. भांबुर्ड्याच्या लढाईत मल्हारतंत्राचा अवलंब करत लाखो माल्कमच्या सैन्यांना कापूण काढले होते तेव्हा एक इंग्रज अधिकारी त्याच्या सोबत्यांना म्हणाला की "ये यशवंतराव हुलकर आसमान से तो नहीं ना गिरा??" अशा पद्धतीने इंग्रजावरती मल्हारनीतीचा अवलंब करत हल्ले करणारे राजे यशवंतराव यांनी दुश्मनांवरती वचक बसविली होती. महाराज बोलतच होते आणि मी फक्त होतो. मात्र आता ऐकण्याची मनस्थीती नव्हती तर पुन्हा तीच तलवार घेऊन माझ्या समाजावर अन्य्य व अत्याचार करणार्यांची डोकी उडवायची होती पण अगोदर समाजाची डोकी नांगरांयची होती म्हणून महाराजांना सांगितले महाराज मी आज शपथ घेतोय की, "आज धनगर समाजाला जागं करून प्रत्येकाची डोकी नांगरल्याशिवाय मी शांत बसणार नाय. मग तिथं मला कोणीही आडवा तर त्याला तिथंच उभा चिरणार अन जर कोणी हात जोडून आला तर त्याला लोटांगण घालणार.
कारण जर आमच्या वाटेला कोणी आला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतनार नाय हा आमुचा इतिहास आहे."
समाजबांधवांनी इतिहास जाणून घेण्यासाठी
1) झुंज : ना.सि.इनामदार
2) स्वातंत्र्य प्रणेते: संजय सोनवनी सर
3) वीरांगणा भीमाई: होमेश भुजाडे सर
4)धनगरांचा गौरवशाली इतिहास: संजय सोनवनी सर
5) होळकरांची कैफीयत: प्रा.निलेश शेळके सर
6)क्रांतीची मशाल पेटवा: ए.एस.बरींगे सर
7) थोरले सुभेदार मल्हारराव होळकर: संजय सोनवनी सर
8) The Vintage of Indore.
तसेच होळकरशाहीचा इतिहास अन्य पुस्तकांतून, संदर्भातून अभ्यासावा ही विनंती.
आज दि.३ डिसेंबर रोजी महापराक्रमी शुरवीर लढवय्या राज राजेश्वर सिहासनाधिष्ट महाराजाधिराज राजे श्रीमंत यशवंतराव होळकर यांची जयंती त्यानिमीत्त राष्ट्रापती बलिदान देणारे स्वातंत्र्याचे प्रणेते आद्य क्रांतीवीर राजे यशवंतराव होळकर यांना विनम्र जय मल्हार!!!
कोटी कोटी प्रणाम!!!
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

खुप छान...
ReplyDeleteधनगर समाजाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकलात!