एकत्रिकरणातूनच समाजाचा विकास -मा.विवेक कोकरे
समाजाच्या अज्ञानपणामुळे विखुरल्या गेलेल्या धनगर समाजाला एकत्रित करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन यशवंत सेनेचे महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष मा. विवेक कोकरे साहेब यांनी काल मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर तसेच पेन्नूर (मोहोळ) येथे आयोजित केलेल्या बैठकीदरम्याण केले. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मा.विवेक कोकरे साहेबांनी मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला तसे मोहोळ तालुक्यातील धनगर समाजबांधवांशी चर्चा केली होती. कोणतीही व्यक्ती समाजापेक्षा मोठी नाही तर समाज सर्वापेक्षा मोठाच असतो म्हणून समाजाला कोणी वेठीस धरू नये अथवा स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचे कोणी भांडवलीकरण करू नये असेही त्यांनी सांगितले. धनगर समाज पोटजाती मध्ये विभागला आहेच शिवाय अज्ञानपणामुळे विखुरला गेला. या भरकटलेल्या समाजाला जर एकत्रित केले तरच समाजाचा विकास होऊ शकतो आणि त्यासाठी मी अहोरात्र कार्य करायला तयार असल्याचे यशवंत सेना युवक प्रदेशाध्यक्ष मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यामध्ये मा.एडव्होकेट रविकिरण कोळेकर साहेब आणि सहकाऱ्यांनी बैठकीचे अतिशय उत्कृष्टरित्या नियोजन केले होते त्यावेळी ३०-३५ युवक बैठकीसाठी उपस्थित होते तर पंढरपूर येथे मा.नानासाहेब खांडेकर व सांगोला येथे मा.विशाल वाघमोडे, अवधूत वाघमोडे यांनी बैठकीचे नियोजन केले होते. काल दि.२७ रोजी.लग्नसराई चे दिवस असतानादेखिल प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव चर्चेसाठी उपस्थित राहिले होते यारुनच लक्षात येते धनगर समाज प्रगतीच्या दिशेने जायला सज्ज झाला असून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करुन अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या क्रांतीची मशाल देणाऱ्या यशवंत सेना संस्थापक स्व बी.के.कोकरे साहेबांच्या क्रांतीकारी संघटनेच्या माध्यमातून एकत्रित येत असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या नात्याने युवा पिढी यशवंत यशवंत सेनेत सहभागी होत आहेत. यशवंत सेना नेहमीच व्यक्तीपेक्षा समाज मोठा या तत्वाने काम करत राहील असे यशवंत सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष मा.विवेक कोकरे साहेब बोलताना म्हणाले.
मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, मोहोळ येथील दौऱ्यामध्ये मा.विवेक कोकरे साहेबांसोबत मा. विशाल वाघमोडे, मा.विशाल कोकरे, मा.राजाराम वाघमोडे आदी युवक सहभागी झाले होते.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:
Post a Comment