आज महाराष्ट्र दिन या दिवशी १०५ हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्या शुरवीरांना खरंतर मानाचा जय मल्हार!! जय महाराष्ट्र!! कोटी प्रणाम!! तसेच कामगार दिनाच्या सर्वांना हर्दिक शुभेच्छा!!
आज राज्यभर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांचे संदेश सर्व सोशल मिडीयावरती फिरताहेत चांगली गोष्ट आहे पण याच महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजावरती जर विनाकारण अन्याय व अत्याचार होत असेल तर मग काय म्हणून महाराष्ट्र दिन साजरा करायचा? असा प्रश्न पडतो.
कारण काल परवाच "धनगरांना आरक्षणाचे दरवाजे बंद". अशा आशयाची बातमी वाचायला भेटली तेव्हा तळपायाची आग पार मस्तकापर्यंत गेली. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्यूएल ओराम म्हणतात की गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या जनगनणा महासंचालनालयाने (रजिस्टर्ड जनरल ऑफ इंडिया) अर्थातच RGI ने ही मागणी फेटाळली आहे. पण खरंतर ती मागणी धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत सामाविष्ट करण्याबद्दलची होती आणि ती कोणी ? व कधी? पाठवली याबाबत माहिती उपलब्ध नाही.
सांगायची वस्तूस्थिती अशी की धनगर समाज अगोदरपासूनच अनुसूचित जमातीच्या यादीत आहे मग सामाविष्ट करण्याचा प्रश्नच येतो कुठे?? त्यातच सदरच्या राज्य सरकारने अजूनही धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात असा अनुकूल प्रस्ताव केंद्र सरकारला अर्थातच आरजीआय ला पाठवलाच नाही मग धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत सामाविष्ट करण्याचा प्रस्ताव नेमका कोणी? व कधी ? पाठवला याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, जो प्रस्ताव आरजीआय ने फेटाळला आहे. गेल्या ६६-६७ वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित आहे. दिवसभर उन्हातान्हात, थंडीवाऱ्यात धो धो कोसळणाऱ्या पावसाचा विचार न करता रानावनात, डोगरदऱ्यांत राहून जंगलात भटकंती करणाऱ्या या धनगर समाजाला शेळ्या मेंढ्या राखण्यामुळे आपण अनुसूचित जमातीमध्ये आहोत की नाही आहोत याचाच अभ्यास नव्हता अर्थातच शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या धनगर समाजाचे नेतृत्वच म्हणावे असे मजबूत आणि अभ्यासू नव्हते म्हणूनच आजपर्यंत धनगर समाजाची उपेक्षा झाली, अवहेलना झाली.
भारतीय राज्यघटनेत कलम क्र.३४२ वरती असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वर धनगड, ओरान असा स्पष्ट उल्लेख आहे. पण जेव्हा राज्यघटना लिहली गेली तेव्हा भारतीय समाजव्यवस्थेचे चार भागात विभाजन करून भारतामध्ये सर्वसमानता प्रस्थापित करण्यासाठी.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भविष्याचा वेध घेऊनच देशाच्या स्वातंत्र्यापुर्वी दि. ९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठात सादर केलेल्या अहवालाचा संदर्भ घेऊन भारतीय समाजव्यवस्था तयार केली. कोलंबिया विद्यापीठात सादर केलेल्या "आंबेडकर बाबासाहेब वांङमय" या अहवालात भारतीय जनजाती, संस्कृती यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जातीव्यवस्थेच्या लोकसंख्येचा आणि त्या जातीजमाती कोणत्या भागात आढळतात याचा आढावा दिला होता. त्यामध्ये "धनगड" नावाच्या जमातीचा कोठेही उल्लेख आढळून येत नाही मग स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यघटना लिहली गेली तेव्हा अचानक "धनगड" नावाची जमात कशी काय जन्माला आली ?? याचा अभ्यास करायला हवा.
"धनगर" या शब्दाचा "धनगड" असा शब्दछल झाल्याने धनगर समाज विकासापासून कोसो दूर आहे, जसे Gurgaon चे गुडगाव, Orissa चे ओडिसा, Acer चे एकड त्याचप्रमाणे Dhangar चे धनगड असा स्पेलिंग मिस्टेक झाल्याने धनगर समाजावर फार मोठा अन्याय झालेला आहे. आजही महाराष्ट्र राज्यात आणि परिणामी भारतामध्ये "धनगड" नावाची कोणतीही जमात आस्तीत्वात नाही अथवा धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी जेव्हा जेव्हा आंदोलने झाली तेव्हा "धनगड" नावाच्या जमातीचा एकही व्यक्ती विरोधात पुढे नाही. मग राज्यघटनेत उल्लेख असलेल्या धनगड जमातीचे आरक्षण नक्की कोण लाटतंय? धनगड जमात आस्तित्वातच नाही तर मग ३६ नंबर वर असलेल्या धनगड जमातीचा आदिवासी विकास निधी नेमका कोण लाटतोय याकडे गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात म्हणून सर्वप्रथम १९८९ साली यशवंत सेना संस्थापक स्व.बी.के.कोकरे साहेबांनी जेव्हा लाखो यशवंत सैनिकांना सोबत घेऊन खंबाटकीच्या घाटात आंदोलन केले होते त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी सांगली येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात पंतप्रधान राजीव गांधीच्या उपस्थितीत धनगर समाजाला "अनुसूचित जमाती" ऐवजी जाणूनबुजून "भटक्या जमातीत" घालण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता दाखवून धनगर समाजाला भटक्या जमातीत घातले आणि आजच्या धनगर समाजातील हजारो मुलामुलींचे भविष्य अंधारात ठेवले. धनगर समाजाची हजारो पोरं आय ए एस, आय पी एस बनण्यापासून वंचित राहिली याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे धनगर समाजाचा खरा शत्रू शरद पवार होय.
धनगर समाजावरती झालेल्या अन्यायाला बारामतीचा बोका जेवढा जबाबदार आहे तेवढेच धनगर समाजातील ठराविकजण सोडले तर बाकीचा सुशिक्षित वर्ग / प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत आणि धनगर समाजाचे भांडवलीकरण करुन समाजाचे बाजारीकरण करुन प्रस्तापित नेत्यांचे तळवे चाटणारे धनगर समाजातील पुढारी/नेते तितकेच जबाबदार आहेत. कारण त्या नेत्यांना समाजासाठी राजकारण करायचे नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचा वापर करुन स्वतःची घरं भरायची आहेत त्यामुळे त्यांना समाजाबद्दल काही घेणेदेणे नाही. यासाठी माडीत आणि साडीत गुरफटलेल्या व्यावसायिक बांधवानी सुशिक्षित वर्गाने जर प्रामुख्याने लक्ष घातलं तर धनगर समाजाला न्याय आणि आपले हक्क मिळायला क्षणमात्रही विलंब होणार नाही. आज केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्यूएल ओराम बरळतात की धनगर समाजाला आरक्षणाचे दरवाजे बंद आहेत पण ओरामांना कुठे माहित आहे की इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या यशवंतराव होळकरांचा वारसा लाभलेला क्रांतीकारी हाडाचा अन् सळसळत्या रक्ताचा प्रत्येक धनगर जेव्हा अन्यायाच्या विरोधात खवळून उठेल, पेटून उठेल तेव्हा उभा महाराष्ट्रही पेटलेला दिसेल आणि धनगर समाजाला बंद असलेले आरक्षणाचे दरवाजेे देखील आपोआप उघडलेले असतील. जिथे मराठी=मरहट्टी भाषिकांच्या प्रदेशात जर मरहट्टींना (कर्नाटक शब्द मर=मेंढी,मेंढरू व हट्टीजन-मेंढ्या राखणारे, मेंढ्या पाळणारे धनगर) यांना जर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नसेल तर मग आजचा महाराष्ट्र दिन काय म्हणून साजरा करायचा? पाठीमागे जाटांनी हरियाना पेटवला होता तर केंद्र सरकार त्यांची दखल घ्यायला लागले पण डोळ्यावरती अज्ञानाचे घोंगडे पांघरून घेतलेले धनगराचे वाघ जेव्हा पेटून उठतील तेव्हा उभा महाराष्ट्र पेटलेला दिसेल हे मात्र नक्की.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
Aswsomeee लेख
ReplyDelete