Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 31 May 2016

अहिल्याईंच्या प्रशासनाचा अवलंब करा...

माता अहिल्ये तुझी जगभर कीर्ती
तूच होतीस महान प्रशासनकर्ती
माते तुझी घेऊनिया स्फूर्ति
लढण्यासाठी घेऊन तलवार हाती
आम्हीही उतरतो आता रणांगणावरती.....

एक स्त्री असूनदेखिल या देशाच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्ष राज्यकारभार करणारी राज्यकर्ती, १८व्या शतकातील एक आदर्श आणि महान प्रशासक असा उल्लेख अक्षरशा ब्रिटिशांनी करून ठेवला आहे. पण आम्ही अजूनही अंधारातच आहोत. आपल्या राज्यातील प्रजेलाच नव्हे तर अखंड भारतातील प्रजेला पोटच्या लेकरांप्रमाने सांभाळणारी मायमाऊली, एवढेच नव्हे तर जाती-धर्माच्या भींती तोडून स्वताच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवणारी थोर समाजसुधारक, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मंदिरांचा जिर्णोध्दार, मंदिरांचे बांधकाम, मश्चिदींचे बांधकाम, शेतकऱ्यांसाठी शेततळे, तलाव, विहीरी, वाटसरूंसाठी बारवे, धर्मशाला, नदीवरील घाट अशी कीतीतरी विकासकामे प्रजेच्या हीतासाठी करणारी पुण्यश्लोक, वेळप्रसंगी प्रजेच्या रक्षणासाठी हाती तलवार भाले घेऊन दुश्मनांच्या चिंधड्या उडवणारी रणरागीणी, राजमाता, महाराणी, लोककल्याणकारी माता अहिल्याई होळकर यांची आज २९१ वी जयंती त्यानिमीत्त माझ्या राजमातेला मानाचा पिवळा जय मल्हार.
जाती धर्माच्या पलिकडे जाऊन प्रजाहितरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या अहिल्याई होळकर यांची जयंती फक्त धनगर समाजानेच साजरी करणे हा खरंतर अहिल्याईंचा अपमान  आहे पण जातीवादाने बरबटलेल्या या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर अखंड भारत देशामध्ये ही जातावादाची अन् भूरसटलेल्या विचाराची पेरण करून सनातन्यांनी सर्वसामान्यांचे पार कंबरडच मोडलंय. राजमाता अहिल्याई होळकर असो अथवा अन्य कोणी थोर महापुरूष किंवा समाजसुधारक असो यांची जयंती अथवा स्मृतिदीन साजरा करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असताना त्या त्या महापुरूषांचे विचार आत्मसात करून त्या मार्गावर चालणे हे समाजाच्या हीताचे आहे. नुसतंच महापुरूषांच्या जयंत्या साजऱ्या करणं, लोकवर्गणीतून हजारो-लाखो रुपये उधळून डी जे लावून धांगडधींगा घालणे हे समाजजीगृतीचे लक्षण नसून समाजाला त्या महापुरूषांच्या विचारांपासून परावर्तित करण्याचे लक्षण आहे असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
राजमाता महाराणी अहिल्याई होळकर यांची प्रशासन पद्धत पाहून, अहिल्याई होळकर यांचा राज्यकारभार आणि प्रशासन याचा अभ्यास करून युरोप खंडांतील देशांनी विकासाचा पल्ला गाठला, शेती, शिक्षण तसेच औद्योगिकरणातून त्या त्या देशांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली पण त्याच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा भारत देश मात्र अधोगतीच्या मार्गावर आहे यासाठी धर्मनिरपेक्षतेचा उगाच आव आणणाऱ्या भारत देशाची जातीव्यवस्था (धर्मभेद, जातीभेद) ही भारताच्या अधोगतीशी कारणीभूत आहे. आजपर्यंत सनातन्यांनी राष्ट्राप्रति सर्वस्व अर्पन करणाऱ्या महापुरूषांचा इतिहास चुकीचाच लिहला  आणि खरा इतिहास मात्र दडवून ठेवला लपवून ठेवला कारण की चुकीचा इतिहास लिहणारे इतिहासकारच खरंतर चुकीचे जन्माला आले होते.
आज धनगर समाज जागा झाला, समाजाला खरा इतिहास समजू लागला उमजू लागला पण समाजाचे भांडवलीकरण करून, समाजाला प्रस्तापितांच्या दावणीला बांधायचे काम धनगर समाजातील नेत्यांनी केले म्हणजेच आगीतून उठला अन् फुफाट्यात पडला हीच अवस्था धनगर समाजाची झाली आहे. अरे एकेकाळी राजा समाज असणारी ही जमात गुलामगीरीत का वागतेय? हे सांगून सांगून थकलो तरीही धनगर समाज अजून अज्ञानाचं, अंधश्रद्धेचं घोंगडं पांघरून गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय हे समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव आणि याच कारणांमुळे धनगर समाजाचा विकास खुंटलाय असं म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
असो आजचा युवक शिकलाय, सवरलाय, अन्यायाच्या विरोधात लिहायला, वाचायला आणि बोलायला लागलाय त्यामुळे कुठूनतरी आशेचा किरण उगवलेला दिसतोय, कुठूनतरी समाजप्रबोधनास नव अंकुर फुटलेला दिसतोय. आजचा युवक स्वाभिमानाची भाषा बोलायला लागलाय. नक्कीच आजचा यूवक हा उद्याच्या भावी पिढीसाठी एक नवा इतिहास रचून जाईल. एक वेळ अशीही येईल की राजा मल्हारराव होळकर यांचे "मल्हारतंत्र" अवगत करून, रणरागीणी अहिल्याई  होळकर यांचा आदर्श आणि एकमेव अद्वितीय महाराजा यशवंतराव होळकर यांची दूरदृष्टी डोळ्यांसमोर ठेऊन सर्व धनगर समाजबांधव, नेते एकत्रित येऊन क्रांती घडवतील हीच आशा मनी बाळगून समाजप्रबोधनासाठी चालू केलेला हा लेखनप्रपंच....
पुनःश्च एकदा राष्ट्रमाता,राजमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त (३१ मे १७२५) त्यांच्या प्रेरणादायी सक्षम विचारांना व समाज उध्दारक दैदिप्यमान कार्याला विनम्र अभिवादन...! मानाचा पिवळा जय मल्हार!! तसेच सर्व समाजबांधवांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
जय मल्हार! जय अहिल्याई!! जय यशवंत!!!
आपलाच
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ती.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment