Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 5 July 2016

ह्रदयं झालीत दगडाची, संवेदना कोठून येणार??

ह्रदयं झालीत दगडाची, संवेदना कुठून येणार??
       मी फार मोठा विचारवंत नसलो तरी सामाजिक बांधिलकीची जबाबदारी म्हणून एक लेखक या नात्याने या विषयाला हात घालावासा वाटला. कारण आजचे आसपासचे दुषित वातावरण पाहिले की माझ्या मस्तकाची शीर उठते अन् तळपायाची आग पार मस्तकापर्यंत जाते आणि मेंदूवर आघात करायला सुरवात करते. आज आजूबाजूच्या वातावरणात फिरताना/वावरताना समाजात "संवेदना" शिल्लकच राहिली नाही हे दिसून येते आणि ते तितकेच सत्यही आहे. कालपरवा कोल्हापूर मधील बोंद्रेनगर येथील घडलेली घटना ताजी असतानाच रोजच्याच वृत्तपत्रात तशाच आणि चित्रविचित्र घटना घडल्याची कीतीतरी उदाहरणे देता येतील.
       आज सकाळी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासात खचाखच गर्दी असल्याने उभा राहूनच प्रवास करवा लागला तेव्हा बाजूलाच बाकड्यावरती बसलेल्या एका वृद्धाच्या हातात असलेल्या लोकमत वृत्तपत्रातकडे सहज नजर गेली अन् पुन्हा पुन्हा माझे डोळे त्या वृत्तपत्रातील बातमीकडे विस्फारून पाहत होते अशी "बापानेच सहा वर्षाच्या चिमुरड्या मुलीला नदीत फेकले" या आशयाची बातमी वाचली अन् अक्षरशा माझे मन सुन्नच झाले. मुलीचं आणि बापाचं नातं हे अनोख्याप्रकारचे असते कारण बाप मुलीला मुलापेक्षाही जास्त जीवापाड जपत असतो आणि बापाला सांभाळून घेणारी फक्त मुलगीच असते. वडिलांच्या आवाजात जरी बदल झाला तरी मुलगी पटकन ओळखते असे नाते असताना त्या बातमीबद्दल लाखो विचारांनी डोक्यात थैमानच घातले. बाप दगडाच्या ह्रदयाचा कसा काय बनू शकतो?? यांवर माझा विश्वासच बसत नव्हता. आजच्या परिस्थीतीचा आढावा घेतघेतच विचार मनांत येत होते. मुलींच्याच बाबतीत घडणाऱ्या या मानवाच्या वाइट प्रवृत्तीला कसा आळा घालायचा?? यासाठी डोक्यात विचारचक्र सुरू झाले मग ठरवले की ज्याप्रमाणे इतिहासांत तलवारीने शत्रूंची डोकी नांगरली जायची, सपासप कापली जायची त्याचप्रमाणे या एकविसाव्या शतकातील वासनेने हपापलेल्या, गोरगरीब मजबूर असलेल्या तरुणींच्या आब्रुचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांची त्या नराधमांची जर डोकी नांगरायची असतील तर कलमच चालवावं लागेल आणि प्रतिष्ठीतेचा बुरखा पांघरलेल्या नागरिकांना एक चपराक द्यावी म्हणून यासाठी मांडलेला हा लेखप्रपंच.
     स्त्रिभ्रूणहत्या, मुलींची छेडछाड, बलात्कार, विवाहीतेवर अन्याय अत्याचार, हुंडाबळी इत्यांदी सारख्या धटनांची यादी वाढवेल तितकी वाढतच जाईल पण कमी नाही आणि अशा प्रकारच्या घटना रोजच्याच आहेत आणि त्या काही नवीन नाहीत असे एखादा रोजचाच वाचक सहज बोलून जातो मग त्या वाचकाला माझा पुढचा प्रश्न असा असेल की 'आजपर्यंत घडलेल्या घटनांमद्ये अथवा इथून पुढे घडणाऱ्या घटनांमद्ये जर तुमची मुलगी असेल, आई-बहिण असेल आणि तुमच्याच नातेवाईंकापैकी कोणी स्त्री अथवा पत्नी असेल तर तुम्ही काय केले असते??' ती घटना तुमच्यासाठी नविन नसून जूनीच असेल तर या जगात तुमच्यासारख्या संवेदनाशून्य असलेल्या व्यक्तींचा आणि प्रवृत्तीचा मी खरंतर धिक्कार करतो. कारण त्या त्या पिडीत मुलीचा बाप, भाऊ, मुलगा अथवा पती या नात्याला तुम्ही कलंक आहात असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. म्हणूनच की काय आजच्या वर्तमानपत्रातील ती घटना घडली असावी. ज्या चिमुरडीला तिच्या बापाने नदीमद्ये फेकून दिले सुदैवाने ती वाचली दहा तास मृत्यूशी झुंज देत होती. पण त्या घटनेचे कारण असे की वरील परिस्थीती भविष्यात कधीही उद्भवू शकते म्हणूनच...  या एकविसाव्या शतकात मराठी फिल्मइंडस्ट्रीच नव्हे तर बाॅलीवूड अथवा हाॅलीवूड असो यांसख्या चित्रपटातून भावना चाळवतील अशी लुभावणारी दृश्य दाखवल्याने तरूण पिढीच्या मनावरती विपरीत परिणाम झाला आणि होतही आहे. चित्रपटातील तोकडी आणि तंग कपडे पाहून भारतीय संस्कृत्ती विसरून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत अंगप्रदर्शन करणाऱ्यांमुळे आज समाजातील तरूणांच्या लैंगिक वासना भडकवल्या जातात मग मस्तावलेली टपोरी पोरं वाटेल तसे जीवन जगू लागतात. रस्त्यावरून एकटी चाललेली तरूणी म्हणजेच त्यांच्या बापाचा माल असे समजून तुटून पडतात, मग त्या घरच्यांचे संस्कार नसलेल्या त्या टपोऱ्या पोरांच्या हव्यासापोटीच कमजोर आणि मजबूर मुली त्या वासनाधीन लांडग्यांच्या शिकार बनतात. जर एखाद्या मुलीसोबत अशी घटना घडत असेल, कोणी तिची छेडछाड करत असेल, कोणी त्रास देत असेल तर ती मुलगी कधीही आणि कोणाकडेही तक्रार करत नाही याकडे त्या दुर्लक्ष करतात आणि जर पालकांकडे तक्रार केलीच तर बदनामी होईल म्हणून पालकच त्या मुलीची मुस्कटदाबी करून तिला शांत राहण्यास प्रवृत्त करतात मग सततच्या या त्रासाला कंटाळून पल्लवी बोडेकर सारख्या आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुली ऐन तारूण्यातच आत्महत्या करून जीवनयात्रा संपवितात.
     राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्याई होळकर, क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या लेकी असा अन्याय अत्याचार करणाऱ्या टपोऱ्यांना त्यांच्या मुस्काडात वाजवून प्रतिकार करत नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस जास्तच वाढत चाललेत. मग अशा घटना सर्रास घडत असतानाच मुलीची बदनामी होऊ नये म्हणून इज्जतीसाठी मूग गिळून बसण्याशिवाय पर्याय नसतो मग पुढे मुलीच्या लग्नासाठी देखील खिशात आणा नसताना समाजातील हुंडापद्धतीलाही सामोरे जायचे असते, भविष्यातील मुलीच्या भल्यासाठी झटत असताना आजूबाच्या वासनेने बरबटलेल्या कुत्र्यांशी दोन हात करण्यापेक्षा दगडासारखं ह्रदय बनवून तिला गर्भात मारणे अथवा मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीचा जीव घेणं हे बापालाही मान्य नसतं पण आजूबाजूचे दुषित झालेले वातावरण त्या बापाला दगडासारखं ह्रदय बनवण्यास मजबूर करते. पण पोलिसयंत्रणा, कायदा आणि सुव्यवस्था मात्र हातावर हात बांधून शांत बसते आणि मग ज्या बापाच्या हातून हे अपराध घडतात ते बापच गुन्हेगार ठरतात, त्यांना लगेच शिक्षा होते पण मुलींची छेडछाड काढणारी, इज्जत लुटणारी, समाजातील हुंडाबळी घेणारी कुत्री मात्र मोकाटच बोंबलत फिरतात त्यांना आवर घातला पाहिजे.
      खरंतर ही जबाबदारी आता सामाजिक संघटनांवरती येऊन ठेपली असली तरी आज काही सामाजिक संघटना (सर्वच नव्हे) अशा घटनांचा (स्वार्थासाठी) निषेध करतात, पिडीतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करून त्यांची जबाबदारी स्विकारतात खरं पण स्वताच्या प्रसिद्धीसाठी त्याचा एवढा अवडंब करतात /टेंभा मिरवतात की त्यांच्याशिवाय एवढे चांगले काम कोणीच करू शकत नाहीत या अहंकारात गडी नाचत असतात बोंबलत असतात पण ज्याप्रमाणे "दिव्याखाली अंधार" असतो त्याप्रमाणे मुलींची छेडछाड, बलात्कार, स्त्रिभ्रूणहत्या, हुंडाबळी यांसारख्या घटनांना कारणीभूत असलेल्या कलंकित पोरांना सोबत घेवून अशा संघटना काम करत असतील तर तुमच्या त्या कार्याला काय अर्थ?? त्या कलंकित वृत्तीच्या आणि संकुचित बुद्धीच्या वासनेने भुकेलेल्या गिधडांना स्वताच्या आई-बहीणींदेखील दिसत नाही एवढे त्यात बुडालेले असतात मग त्या संबंधित संघटनेतला प्रत्येक कार्यकर्ता बदनामीस पात्र ठरतो. त्या कलंकितांची ह्रदयं ही दगडाची असल्याने त्यांना सोबत घेऊन काम करणाऱ्यांची ह्रदयं सुद्धा दगडाचीच आहेत असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही, मग "संवेदना" कुठे शिल्लक राहतेय तेच मला समजत नाही.???

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment