Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 26 September 2017

आरेवाडीत उद्या दसरा मेळावा

गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षी देखिल उद्या बुधवार दि.२७ आॅक्टोबर २०१७ रोजी श्री क्षेत्र बिरोबा बन आरेवाडी येथे भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. विखूरलेला समाज एकत्रित यावा आणि समाजाचे वैचारिक प्रबोधन व्हावे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तसेच युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी केले आहे. त्यासाठी विवीध जिल्ह्यात बैठका पार पडल्या असून लाखोंच्या संख्येने समाजबांधव या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी देखिल ७ आॅक्टोबर २०१७ रोजी दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने समाजबांधव व धनगर समाजातील सर्वच नेते एकत्रित आले होते. परंतू यावर्षी सर्वपक्षिय बहुजन समाजाचा दसरा मेळावा भरवण्याचे धाडस मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी केले आहे. गेल्या वर्षी धनगर मेळावा आणि यावर्षी बहुजन मेळावा का? गेल्यावर्षी आयोजक धनगर समाज आणि यावेळी स्वता संयोजक गोपीचंद पडळकर साहेब असे का?  अशा चर्चांना सर्वत्र उधाण आले आहे. आणि त्यालाच तेल-चटणी-मीठ लावून अर्थाचे अनर्थ काढून राजकीय सूड घ्यायची प्रवृत्ती जरा जास्तच वाढत चाललेली पाहून थोडंसं लिहावसं वाटलं म्हणून केलेला हा लेखप्रपंच....
या दसरा मेळाव्याच्या आडून त्यांना आमदारकी किंवा खासदारकी मिळवायची नाही आणि मिळवायचीच असेल तर ते स्वताच्या हिंमतीवर मिळवतील ते त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येत आहेच. राजकारण आणि समाजकारण हे कितीही वेगळं म्हणत बसलो तरी भारतासारख्या जातीयवादी विचारांच्या देशात त्यांची नाळ एकमेकांशीच जोडलेली आहे. धर्मनिरपेक्ष राज्यकारभार हा फक्त नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात वाचायला भेटतो मात्र वास्तवात धर्मनिरपेक्ष कुठेही आणि कधीच दिसत नाही आणि असेल तर धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे चालू आहे ते दाखवून द्यावे हे माझे खुले आवाहन.... राजकीय नेत्यांचेच काय घेऊन बसलाय जर राजकारण करायचे असेल तर अगदी तुम्ही स्वता सुद्धा नुसतंच समाज समाज करत बसाल तर तुमचे राजकीय भवितव्य हे अंधारातच राहील शिवाय धनगर समाजाचे नेतृत्व पुढं यायला देखिल वेळ लागेल. आज समाजासमोर अनेक आवाहने आहेत परंतू नेतृत्वाचा अभाव असल्याने ही आवाहने पुढच्या पिढीला देखिल त्रासदायक ठरू शकतात अर्थातच पुढच्या पिढीचे देखिल भवितव्य धोक्यात येऊ शकते. धनगर समाजातील सामाजिक संघटना या केवळ समाज समाज करू शकतात, समाजासाठी आंदोलन मोर्चा सर्व काही सामाजिक संघटनांना करता येते. कदाचित सामाजिक बांधिलकी असेल तर राजकीय नेते समाजाच्या मोर्चात सहभागी होऊ शकतातही पण अन्य वेळी इतर समाजाला सुद्धा सोबत घेऊन जावे लागते तेव्हा खरे नेतृत्व समाजासमोर येते..... तर आणि तरच राजकारणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासाला/जडणघडणीला हातभार लावता येतो. मग तिथे धनगर अथवा कोणीही नेता असो त्यासाठी आजपर्यंतच्या आमदार खासदारांचा इतिहास वाचून बघा... म्हणून अखंड बहुजन समाजाचे वैचारिक प्रबोधन करून समाजाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची भीष्मप्रतिज्ञा गोपीचंद पडळकर या तरूण तडफदार युवा नेत्याने केली अाहे. परंतू मागच्या एक आठवड्यापासून पाहतोय की समाजात ज्या प्रकारच्या उलटसुलट चर्चा चालू आहेत त्यातून नेतृत्व खोडून टाकण्याचा सरळसरळ प्रयत्न चालू असल्याचे एक षडयंत्रच दिसून येते आहे. एका दृष्टीने पाहिले तर दिड ते दोन कोटी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ एकच खासदार तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आमदार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आहेत. कणखर दमदार कर्तृत्ववान असे नेतृत्व तयार करायला, नेतृत्व घडायला फार वेळ लागतो परंतू सोशल मिडीयासारख्या माध्यमांतून तेच नेतृत्व खोडायला फार वेळ वागत नाही पण ज्यांच्या रक्तातच कर्तृत्व आणि  नेतृत्व ठासून भरलेले असते ते नेतृत्व सहजासहजी खोडतां येत नाही हे देखिल तितकेच सत्य आहे. म्हणून समाजबांधवांना माझी विनंती आहे की ज्यांना कोणाला दसरा मेळाव्यासाठी जायचे नसेल तर त्यांनी जाऊ नका परंतू एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या नादात चुकीचे मेसेजेस करून समाजात गैरसमज पसरवू नयेत. समाजातील नेतृत्व जेवढे वाढेल तेवढे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर आहे म्हणून समाजातून जास्तीत नेतृत्व तयार करा पण खोडू नका हीच नम्र विनंती.
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या🙏
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

No comments:

Post a Comment