Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Wednesday, 20 September 2017

वाघांनो तुम्हाला मानाचा पिवळा जय मल्हार


एकदा मागून पाहिलं दोनदा मागून पाहिलं एवढंच नव्हे तर अनेकदा मागून पाहिले पण सोलापूर विद्यापीठाला लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यायला आडदांड सरकार राजीच होत नाही. नेहमीच आश्वासनांवरती आश्वासने देवून अक्षरशा आश्वासनांचा अगदी महापूर येऊन धडकला तरी निर्दयी सरकार मात्र शांतच बसले आहे तेव्हा धनगरांच्या संयमाचा बंधारा फार काळ टिकणार नव्हता आणि शेवटी तेच झाले धनगर समाजाचा संयम अखेर सुटला... काल परवा अखंड महाराष्ट्र राज्याने याची देही याची डोळा दुरदर्शन, वर्तमानपत्र तसेच सामाजिक माध्यमातून (सोशल मिडीयातून) पाहिले. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणासाठी शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे हे सोलापूर येथे आले असताना मंचावरून भाषण करत होते तेवढ्यात विद्यापीठाच्या नामांतरण संदर्भात घोषणा देत व यळकोट यळकोट जय मल्हार असा जय जयकार करत मल्हार मावळ्यांनी सभागृह दणाणून सोडले. शिक्षणामंत्र्यांच्या निषेधार्थ पत्रके भिरकावली व भंडारा देखिल उधळला. पिवळ्या भंडाऱ्याची ताकद काय असते हे लवकरच समजेल सत्ताधाऱ्यांना पण ज्या यशवंतसैनिकांनी भंडारा उधळला त्या पाच वाघांची अर्थातच स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या वारसदारांची नावे पुढीलप्रमाणे
1. शेखर बांगळे
2. उमेश काळे
3. शरणू हांडे
4. महेश घोडके आणि
5. म्हाळाप्पा नवले
या पाच वाघांना मानाचा पिवळा जय मल्हार व त्यांचे त्रिवार अभिनंदन. खरंतर कौतुक करावे तेवढे कमीच पण  क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचा वारसा असाच जपत रहा ही खरी काळाची गरज आहे. तरच समाजाला न्याय मिळू शकतो, धनगर समाज अन्यायाच्या साखळदंडातून मुक्त होऊ शकतो. जर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर त्यांच्या तोंडात वाजवून न्याय मिळवू या विचाराचे आम्ही आहोत हे एकदा सरकारला दाखवून दिले आणि इथून पुढे देखिल असेच दाखवून देऊ.
अगोदर कितीतरी वेळा सांगितले पण त्यांना समजले नव्हते म्हणून आता सांगतो की, सर्व गोष्टीला अंत होता म्हणूनच धनगर शांत होता पण एक लक्षात ठेवा आता आमची शांतता भंग झाली आहे त्यामुळे आता पेटलेला एकेक धनगर महाराष्ट्र पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

No comments:

Post a Comment