काल परवा अनेक वर्तमानपत्रातून तसेच टीव्ही चैनेल वरतून बातम्या झळकल्या की वैद्यकीय प्रवेशासाठी ओबीसींना नियमानुसार असलेल्या २७% आरक्षणाऐवजी केवळ २ % एवढेच आरक्षण मिळणार आहे आणि उर्वरित २५% आरक्षण हे खुल्या वर्गाला म्हणजेच ब्राह्मण आणि मराठा समाजाकडे वळविण्यात आले आहे. म्हणजेच डॉक्टर व्हायचे असेल तर जवळ जवळ १०० % ओबीसी विद्यार्थ्यांपैकी केवळ ७.४०% ओबीसी विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश घेऊ शकणार आणि उर्वरित ९२.६०% टक्के विद्यार्थी हे वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहणार हे नरेंद्राचे आणि देवेंद्राचे अजब धोरण आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात २१ महाविद्यालयात तर ओबीसी वर्गाला कसलेही आरक्षण नाही ही महाराष्ट्र राज्यातील ओबीसी साठी म्हणजेच बहुजन समाजासाठी खरी चिंतेची बाब आहे. देशभरात १७७ वैद्यकीय महाविद्यालयात ३७११ जागा असताना त्यातील २७% आरक्षणानूसार १००२ जागा ह्या एकट्या ओबीसींना मिळायला हव्या होत्या परंतु त्यामध्ये कपात करून २% आरक्षणाप्रमाणे केवळ ७४ जागा ओबीसींना उपलब्ध करून देण्यात आल्या आणि त्याखालोखाल अनुचित जाती या वर्गाला ५५५ तर अनुसूचित जमातीला २७७ जागा आहेत. ओबीसींच्या २७% आरक्षणानूसारच्या जागांपैकी २५% जागा खुल्या वर्गाकडे वळविल्याने खुल्या वर्गासाठी तब्बल २८११ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. म्हणजेच ओबीसींच्या वाट्याच्या २४५७ जागा खुल्या वर्गाला देण्यात आल्या आहेत मग बहुजनांच्या वाट्याला काय?
गेल्या काही वर्षांपूर्वी ओबीसी वर्गाच्या शिष्यवृत्त्या बंद केल्यानंतर ओबीसी वर्गाने कुठेतरी आवाज उठवला खरा पण तो आवाज कसा बंद झाला कोणास ठाऊक? त्यानंतरही ओबीसी विद्यार्थ्यांवरती शैक्षणिक क्षेत्रात फार मोठा अन्याय झाला आणि ओबीसी वर्गाने तो निमूटपणे सहन केला . अन्याय करणारे अन्याय करतच राहिले आणि सहन करणारे निमूटपणे सहण करत राहिले. मग अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार ठरतो मुर्ख. ठरतो. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर ओबीसींच्या म्हणजेच बहुजनांच्या वाट्याला जर अन्याय आणि अन्यायच येत असेल तर मग ओबीसी मंत्रालय ओबीसींच्या काय कामाचे? ओबीसी नेते झोपा काढत आहेत आणि सरकार मात्र हिटलरशाहीत वागत आहे त्यासाठी ओबीसी वर्गाने वेळीच जागे व्हायला हवे... बहुजन समाजातील युवक वर्ग शिकला सवरला असून योग्य काय आणि अयोग्य काय याची चाचपणी करून लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. सर्व संघटनांनी एकत्रित येऊन राज्यव्यापी आंदोलन उभा करायला हवे आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायला हवा नाहीतर येणाऱ्या काळात बहूजन समाजातील विद्यार्थ्यांना हातात वाडगा घेऊन भिक मागायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही याचा गांभीर्याने विचार बहुजन समाजाने करायला हवा.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

No comments:
Post a Comment