एकेकाळी या हिदूस्थानावर ३५० वर्षापेक्षा अधिक काळ राज्य करणारी आमची औलाद म्हणजेच राजा समाज असणारी आमची जमात गतकाळी अज्ञानपणामुळे गुलामगीरीत जगतेय. जगजेत्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावर्तित करणार्या भारताचे आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, अखंड भारत आणि ईशान्येकडील नेपाळ, भूटान आणि अफगानिस्तान आपल्या अधिपत्याखाली आणणर्या राजा सम्राट अशोकाचे आम्ही वारसदार आज आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून लढतोय आणि झगडतोय. धनगरपुत्र राजा सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील "अशोक स्तंभ" हा आज प्रत्येक भारतीयाच्या खिशात असलेल्या प्रत्येक नाण्यावर अभिमानानं दिसतो कारण हे भारताचं बोधचिन्ह म्हणून गौरवण्यात आलं. तद्नंतर भारतामध्ये तसेच देशोविदेशात जो भारतीय झेंडा डौलाने आणि अभिमानाने फडकतो त्यावरील जे निळसर अशोकचक्र आहे ते सुद्धा धनगरपुत्र राजा सम्राट अशोक यांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची आठवण आम्हा भारतीयांना करुन देतं. आणि आज हीच राजा समाज असलेली आमची औलाद आज गुलामगीरीचं जीवन जगतेय याचं दुख मनोमन होतंय. या राजा समाजाला आपले हक्क मागावे लागतात अशी वेळ का आली?? याला नेमकं जबाबदार कोण असेल तर माझ्याच धनगर समाजातील नेते यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आमचं नेतृत्व जर सक्षम असतं तर आमच्यावर भिक मागायची वेळ आलीच नसती.
गेल्या वर्षी १५ जुलै २०१४ रोजी ता पंढरपूर जि सोलापूर येथून आरक्षण दिंडी पदयात्रा निघाली अन् २१ जुलै २०१४ रोजी बारामतीला येवून धडकली होती आणि तिथंच अखंड महाराष्ट्रातील ४ लाखांवरती धनगर समाज ठिय्या मांडून आमरण उपोषणासाठी बसला होता. तत्कालीन सरकारने अन्याय तर केलाच होता पण सदरच्या भाजप सरकारने महाराष्ट्रात सरकार आल्यावर १० दिवसात आरक्षणाची अमलबजावणी करू असं आश्वासन दिलं होतं पण आज भाजपचं सरकार आलं १० दिवस दूरची गोष्ट पण १० महिने नव्हे तर ११ महिने उलटून गेलेे पण अजूनही आमच्या वाट्याला तोच अन्याय आणि पोकळ आश्वासनं एवढंच आले आहे. एक म्हण आहे की "आजा मेला अन् नातू झाला घरात माणसं तेवढीच" पाठीमागचं सरकार त्या लायकीचं होतं आणि आजचं पण त्याच लायकीचं म्हणायची वेळ आली आहे. "धनगर" आणि "धनगड" या दोन्ही जमाती वेग-वेगळ्या नसून ती एकच "धनगर" जमात आहे असे वैज्ञानिक अहवाल सादर केले. शिवाय धनगड नावाची जमातच या महाराष्ट्रात नाही हे सुद्धा सिद्ध केलं तरीही आमच्यावर अन्याय का??
मुख्यमंत्री महोदय मा देवेंद्र फडणवीस म्हणतात की धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी यावरती अभ्यास चालू आहे. अहो फडणवीस साहेब यावरती पीएचडी केली असती एखाद्यानं अन् तुम्ही अभ्यासच कसे काय करताय अजून? आज दहावी-बारावीचे निकाल झाले त्यांची प्रवेश प्रक्रिया सुद्धा संपत आली मग आमच्या धनगर समाजातील मुला-मुलींना अगोदरच राज्यघटनेत असलेल्या डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या सवलती कधी देणार?? आजपर्यंत आमच्यावर अन्याय होत आला आहे आणि अजूनही असंच रहाट गाडगं चालू राहिलं तर आमची पोरं आइ ए एस , आइ पी एस कधी होणार?? जर आम्हाला अनुसुचित जमातीच्या सवलती द्यायला तुम्हाला एवढा अभ्यास करावा लागत असेल तर मग तुम्ही बाबासाहेबांना चुकीचं समजता का?? त्यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये राज्यघटनेच्या कलम ३४२ मध्ये क्र ३६ वर सामाविष्ट केले आहे. फक्त शब्दविवेचन करताना त्याचे टायपिंग करताना र ऐवजी ड झाला आणि या र ड मुळे माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा सगळा राडा च झाला. आज (Chattisgarh)छत्तीसगर ला हिंदीमध्ये छत्तीसगढ़ म्हणतात, (Gurgaon)गुरगाव ला गुढगाव म्हणतात, (Ekar)एकर ला एकर त्याचप्रमाणे (Dhangar)धनगर चा धनगड(Dhangad) झाला आणि आज ६५ वर्षे आमच्यावरती अन्यायच अन्याय झाला मग हा अन्याय आमच्यावरती बाबासाहेबांनीच केला का??
राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करण्याचा अधिकार जर सर्वोच्च न्यायालयाला असेल तर मग न्यायदेवतेनं डोळ्यावरची पट्टी काढून आंधळेपणा बंद करावं, महाराष्ट्र राज्यात एकही धनगड समाजाची व्यक्ति नसताना आमच्या हक्काचं अनुसुचित जमातीचं आरक्षण आम्हास देऊन आम्हाला न्याय द्यावा. त्यासाठी राज्य सरकारने जी शिफारस करावयाची आहे ती शिफारस लवकरात लवकर करावी यासाठी धनगर समाजातील पक्षविरहीत समाजबांधवांनी १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन केले आहे.
धनगर समाजातील लाखो समाजबांधव दि १५ जुलैला आरक्षणाची ज्योत पेटती ठेवण्यासाठी पंढरपूर येथे उपस्थित राहणार आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने घेतलेला हा निर्णय आहे आणि सर्व बुद्धिजीवी वर्गाने या आंदोलनाचे आयोजन केले आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अथवा राजकीय दृष्टीकोणातून आयोजित केलेले हे आंदोलन नाही. आजपर्यंत निमूटपणे आपण अन्याय सहन करत आलो आहोत हे कुठेतरी थांबायला पाहिजे, आपल्या इतिहासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून आपली ओळख काय आहे आणि आपण काय करतोय याचा गांभिर्यानं विचार करुन उद्याच्या पीढीवर अन्याय सहन करायची वेळ येवू देवू नका यासाठी जातीवंत धनगर सभाजबांधवांनी पुनःशा संघटित होऊन आपल्या हक्कासाठी एकत्रित पणे लढाई लढावी. ज्या सरकारला धनगर समाजानं एक गठ्ठा मतदान केलं आणि सत्तेत आणलं ते सरकार आज चांगलंच झोपलंय आणि या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी दि १५ जुलै रोजी अखंड महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती...
ना माझ्यासाठी ना माझ्या स्वार्थासाठी, नाही कोण्या व्यक्तिसाठी...
ही लढाई आहे फक्त आणि फक्त माझ्या धनगर समाजासाठी...
उठ धनगरा हो जागा अन् लढ तुझ्या हक्कासाठी..
उचल तलवार आणि उगार मुठ नाहीतर घे हाती काठी...
कर येळकोट येळकोटचा गजर अन् लाग प्रस्थापितांच्या पाठी...
अन्यायावरती उगार आसूड उद्याच्या भावी पीढीसाठी...
तुम्हावर अन्याय होत असेल तर अखंड समाज असेल तुमच्या पाठी...
हिम्मत हारू नकोस प्रयत्न सोडू नकोस जर
कितीही आणि कोणीही आले तुला आडवण्यासाठी,
फक्त एकदाच "जय मल्हार" बोल अन् लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी. फक्त लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी.
म्हणून आरक्षणाच्या या लढाई साठी दि १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर ता पंढरपूर जि सोलापूर येथे सामाजिक बांधीलकी लक्षात घेवून प्रत्येक समाजबांधवांनी सहभागी व्हावं...ही नम्र विनंती
जय मल्हार!! जय अहिल्या!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
8530004123
nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................
No comments:
Post a Comment