Old Post...
आज जनावरांची म्हणजेच कुत्र्या-मांजरांची जनगनना होते पण माझ्या धनगर समाजाची जनगनना होत नाही. का होत नाही? कशासाठी होत नाही?? असा आम्ही कधी विचारच केला नाही. कारण तितका विचार करण्याइतपच आमची बुद्धि पार भ्रष्ट झाली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
आज देशामध्ये गाई-म्हैसी, कुत्री-मांजरे एवढंच नव्हे तर जंगली प्राण्याची देखिल जनगनना होते. कुठे आणि कधी मोजायला जातात ते कोणास ठाऊक? म्हणजे भारत सरकारला जनावरांची जनगनना करायला वेळ, पैसा सर्व काही आहे पण माणसांची म्हणजे माझ्या धनगर समाजाची जनगनना करायला त्यांना सवड नाही.
जनगनना न झाल्याचा परिणाम काय? तर
राज्य घटनेत बाबासाहेबांनी कलम ३४२ मध्ये क्र ३६ वरती धनगड(धनगर) समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये १९५० साली सामावेश केला असून आमच्या अज्ञानपणामुळे आम्हाला ते माहीत नव्हते. आज धनगर समाजाची जनगनना न झाल्याने धनगर समाजाची खरी लोकसंख्या कीती आहे हे अजूनही अंधारातच आहे. "र" आणि "ड" च्या फरकामुळे धनगर आणि धनगड हे एकच आहेत त्यासाठी अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी म्हणून खंबाटकीच्या घाटामध्ये स्व बी के कोकरे साहेबांनी सर्वप्रथम रास्तारोखो केल्यानंतर सांगली मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीच्या उपस्थिति मध्ये धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी करण्याऐवजी धनगर समाजाला भटक्या जमाती-क मध्ये घातलं. आज धनगर समाज हा राज्य पातळीवरती भटक्या जमाती-क (Nomadic Tribes-C) च्या सवलतींचा लाभ घेतोय तर महाराष्ट्राबाहेर हा धनगर समाज इतर मागास वर्ग (Other Backward Class) च्या सवलतींचा लाभ घेतोय. त्यावेळी राज्य पातळीवरती धनगर समाजातील लोकसंख्येचा विचार करून (धनगर समाजातील पोटजातींचा विचार न करता) भटक्या जमाती-क मध्ये ३.५% आरक्षण दिले. पण धनगर समाजाच्या अनेक पोटजाती या महाराष्ट्र राज्यात आहेत त्यां सर्वांची जर जनगनना केली तर फक्त महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये धनगर समाज हा सर्वात जास्त आणि लोकसंख्येने १ क्रमांकाचा समुह असणारी जमात आहे. पण निश्चित लोकसंख्या ही सर्व जनगनना झाल्यानंतरच समजेल. मग सरकार जाणूनबुजून धनगर समाजाची जनगनना का करत नाही?? त्याचं उत्तर असं आहे की महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज हा भटक्या जमाती-क मध्ये आहे आणि पोटजातींचा विचार न करता भ.ज.-क (NT-C) चे ३.५% आरक्षण धनगर समाजाला दिलं गेलं आणि आमच्यातल्या आमच्यातच पोटजातींमध्ये भांडण लावायचं काम प्रस्थापितांनी केलं. याचा अर्थ असा की या राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक १ वरती असणार्या धनगर समाजाला फक्त ३.५% मध्ये गुंतवायचं आणि बाकीचा मलिदा इतरमागास वर्गातील व खुल्या वर्गातील समाजाला द्यायचा ही रणनीति आम्ही कधी अभ्यासणार???
एकुण लोकसंख्येच्या टक्केवारीवरुन त्याच्या निमपट आरक्षण द्यायचं अशी तरतूद असताना ३.५% आरक्षण म्हणजे महाराष्ट्र राज्यात धनगर समाज फक्त ७% एवढाच आहे का?? आज जर जनगनना केली तर धनगर समाज १७% नव्हे तर त्याहूनही अधिक आहे मग आमच्या बांधवांनी फक्त ३.५% मध्येच स्पर्धा करायची का??
धनगर, हटकर, व्हटकर, खुटकर, कुचेकर, सनगर, झेंडे धनगर, बंडी धनगर, खांडा धनगर अजूनही अधिक पोटजाती धनगर समाजात आहेत या सर्वांना महाराष्ट्र राज्यात फक्त ३.५% मध्ये अडकवलंय आणि बाकीचा इमाव मध्ये कमी लोकसंख्या असणारा समाज उरलेलेल्या २३.५%चा मलिदा खातोय त्याचाच परिणाम माळोरानी, रानावनातून भटकणार्या धनगर समाजाला याचा लाभच घेता आला नाही. आमचा धनगर समाज डोंगरदरी आणि दूर माळोरानी वास्तव्य करत आहे. काही ठिकाणी धनगर समाजाच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथे ना विजेची सोय आहे ना पाण्याची सोय नाही शिक्षणाची व्यवस्था. त्यांच्याजवळ मी भारतीय आहे असे दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी साधं रेशन कार्ड सुद्धा नाही. भारतामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही. विजेची सोय नसल्यामुळे टीवी (दुरदर्शन), वृत्तपत्र काय असतं तेच त्यांना माहीत नाही.
मग त्या आमच्या धनगर समाजबांधवांची जनगनना झाली का?? आणि झाली तर जनगनना कधी होणार?? तोपर्यंत आमची पुढची पीढी बरबाद करायचं सरकारचं धोरण आहे का?? कधी जाऊन तर बघा त्या ठिकाणी मग कळेल त्या सावरा-पिचड-मोघे-पुरकेला की हा धनगर समाज आदिवासी पेक्षाही अत्यंत हालाखीचं जीवन जगतोय की नाही ते... नुसत्याच शहरातील चार दोन कुटुंबांचा सर्वे करून हे भुंकु लागलेत.
आज राष्ट्र पातळीवरती आमच्या समाजातील युवकांना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागतेय हे कीती दुर्दैव म्हणावे लागेल. आज राज्यघटनेत बाबासाहेबांनी तरतूद केल्याप्रमाणे जर अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळाले तर धनगर समाजाची पोरं राखीव आरक्षणातून राज्य आणि राष्ट्र पातळीवर नक्कीच पुढे येतील आणि शैक्षणिक राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदावरती पोहचतील. आज दहावी-बारावीचे निकाल झाले सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या तरी सरकार आल्यावर १० दिवसात आणि तद्नंतर १५ दिवसांत निर्णय घेणार असे म्हणनारे मुख्यमंत्री धनगर आरक्षणावरती कसली पीएचडी करताहेत तेच समजत नाही?? आज धनगर समाजातील हजारो विद्यार्थ्यांना ३.५% स्पर्धा करावी लागणार आणि खुल्या वर्गात तर आमच्या पोरांना संधीच देत नाहीयेत मग कुठल्यातरी खाजगी विद्यालयात लाखो रूपये डोनेशन फी भरून प्रवेश घ्यावा लागणार हे मात्र नक्की पण आर्थिक मागासलेपणा असलेला समाज एवढे पैसे आणणार कुठून??? जर आरक्षण दिले तर महाराष्ट्र राज्यात शरद पवाराच्या पै-पाहुण्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना पैसे कोठून भेटणार याचं गणित तुमच्या डोक्यात कसं काय येत नाही??? आम्ही अशा गोष्टींचा विचार करत नसलेमुळे आम्हा स्वतःचे व पर्यायानं धनगर समाजाचे फार मोठं नुकसान झाले आहे. यासाठी आमची जनगनना व्हायला हवी म्हणून सरकारवरती जर दबाव आणला तर आपले हक्क आपल्याला मिळतील व त्याचा लाभ माझ्या धनगर समाजातील गोरगरीब समाजबांधवाला नक्कीच होईल हे सांगायला मला काही वावगं वाटणार नाही. आम्ही आजपर्यंत चुकत आलोय कारण आम्ही अज्ञानी होतो आणि अज्ञानपणामुळं आमच्या मागण्या काय आहेत हे आम्ही सांगू शकलो नाही. पण आता आम्ही शिकलो-सवरलो एवढंच नव्हे तर लिहायला लागलो आणि बोलायला देखिल लागलो. आता येथून पुढे पोटजाती बाजूला ठेवून अखंड धनगर समाजबांधवांनी फक्त "धनगर" म्हणून एकत्रित यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. तरच आम्ही सरकारला गुडघ्यावर टेकायला भाग पाडू आता आम्ही नुसतंच मागत बसणार नाही तर आमच्या हक्काचं हिसकावून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही ही आमची धनगराची औलाद आहे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
8530004123
nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................

No comments:
Post a Comment