Where the words for justice runs like swords ... जिथे शब्द देखिल अन्यायाविरोधात तलवारीप्रमाणे चालू लागतात...
Featured post
कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे
कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday, 11 August 2022
आजची भारतीय शिक्षणपद्धती आणि आपण... ✍️लेखन - नितीनराजे अनसे
काल परवा माझ्या एका पत्रकार मित्राची फेसबुक वर पोस्ट वाचली फिनलंडमध्ये मूल 7 वर्षांचे झाल्यावर त्याची शाळा सुरू होते. फिनलंडची शिक्षणपध्दती जगात सर्वोत्तम मानली जाते. शाळेचा तास ६० मिनिटांचा असतो त्यात ४५ मिनिटे शिकवणे व पंधरा मिनिटे छोटी सुट्टी अथवा ब्रेक. शाळा सोमवार ते गुरुवार दिवसाचे ८ तास, शुक्रवार दुपारी १ वाजे पर्यंत आणि शनिवारी सुट्टी.
फिनलंडमध्ये शालेय शिक्षण पूर्णपणे मोफत आहे.
पालक कोणत्याही गोष्टीसाठी एक पैसाही देत नाहीत. हे सर्व शिक्षण सरकारी खर्चाने आहे. प्रत्येक मुलाला सरकार कडून मोफत टॅबलेट मिळतो आणि सर्व पाठ्यपुस्तके टॅबलेटवर लोड केलेली असतात जेणेकरून मुलांची दप्तरापासून सुटका होते. शालेय भोजन मोफत असते. ते वैविध्यपूर्ण आणि स्वच्छ असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हवे तेवढे मिळू शकते.
देशाच्या शिक्षणातील प्रत्येक गुंतवणूक ही त्याच्या भविष्यातील गुंतवणूक असते. ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. सुशिक्षित राष्ट्र हे अर्थव्यवस्था, आरोग्य शिक्षण आणि न्याय या सर्वांचा गाडा ओढते.
भारतात अशी शिक्षण व्यवस्था सुरू व्हायला हवी भारतातील गो गरीब जनेसाठी या शिवाय पर्याय नाही असे त्याचे वैयक्तिक मत होते.
परंतु भारत देशामध्ये याउलट चित्र पाहायला मिळते. भारतातील शिक्षणपद्धती ही शिक्षणसम्राटांनी स्वतःची जहागिरदारी बनवून ठेवली आहे. त्यासाठी जबाबदार आहे ती येथील सर्वसामान्य जनता जी १००-२०० रूपयांसाठी स्वतःला विकले गेले जातात जिथं गाढव १०-२० हजार रूपयांना विकले जाते. कर बुडवणारे, कर चोरी करणारे उद्योगपती आणि त्यावरती पांघरूण घालणारे आयकर विभागातील अधिकारी. भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट अधिकारी. डोळ्यांवर अज्ञानाची पट्टी बांधलेला सुशिक्षित युवा वर्ग जो राजकारणी नेत्यांना आपला बाप मानतो आणि स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करुन घेतो ते फक्त भ्रष्ट नेत्यांसाठी आणि समाजमाध्यमावर नको तो वेळ खर्ची घालतो. विकला गेलेला लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांना आपण पत्रकार, न्यूज चॅनल (इलेक्ट्रॉनिक मिडिया), प्रींट मिडिया म्हणून ओळखतो. अशी कितीतरी उदाहरणे आहेत जी एकमेकांशी जोडली गेली आहेत. ज्या देशाची व्यवस्था (System) डळमळणारी असेल त्या विरोधात आवाज न उठवता अन्य देशांमध्ये तेथील नागरिकांना मिळणाऱ्या सुविंधा सारख्या अपेक्षा करू नयेत कारण आपण स्वतः प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी जबाबदार असतो. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. विशेष म्हणजे काही अपवाद सोडले तर पूर्वी सारखे गुरू-शिष्य आजकाल इथे पाहायला मिळत नाहीत आणि पाल्यांना योग्य मार्गदर्शन करणारे पूर्वी सारखे पालकही पाहायला मिळत नाही हे आजच्या भारत देशाचे फार मोठे दुर्दैव आहे. या सर्व कारणांमुळे इतर देशांच्या तुलनेत भारतीय शिक्षणपद्धती ही बॅकफूटवर जाताना दिसत आहे हे नाकारू शकत नाही. यासाठी प्रत्येकाने आत्मचिंतन करून आपल्या देशाप्रती जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
✍️ नितीनराजे अनसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
8530004123
Subscribe to:
Post Comments (Atom)
शिक्षणाला वाघीणीचं दुध समजणारे आपले राष्ट्र आज मोडकळीस आले आहे या दुर्दैवाची खंत सर्वसामान्य माणसाला वाटायलाच हवी....
ReplyDelete