मस्त झोपलाय हो माझा धनगर समाज शांत झोपूद्या. गाढ निद्रावस्थेत निपचित पडलाय उगाच डवचू नका. कशाला उगंच बोंबाबोंब करताय?? खरंतर एकवेळ झोपलेल्यांना जागे करता येते पण झोपेचं सोंग घेणार्यांना जागं करता येत नाही मा म्हणीचा अर्थ धनगर समाजासाठी सार्थ ठरतो. अहो ज्यांना आपला इतिहासच माहीत नाही ते काय खाक इतिहास घडविणार आहेत का???
उगाच व्हाटसप आणि फेसबुक वरतून वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे??? जिथं स्वाभिमान गहाण टाकून प्रस्थापितांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आणि प्रस्थापितांचे बुट चाटायची सवय लागलेल्या समाजातील दलालांना कीतीही सांगून समजावले तरीही धूतलेल्या गाढवासारखी त्यांची अवस्था होते कारण "गाढव कितीही धूतलं तरी उकिरंड्यातच लोळतं" (ही म्हण मला नाईलाजानं वापरावी लागतेय). मग त्या दलालांना स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचे बाजारीकरण करायचं एवढंच त्यांना माहीत आहे. त्यांना पैशाची तलप लागली आहे मग ते प्रस्थापितांकडुन लाखो नव्हे तर करोडो रुपये घेवून येतात अन शे-दोनशे रूपये देवून सर्वसामान्य जनतेला आणि दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखून पायाच्या नडग्या वाळवलेल्या गोरगरीब धनगर समाजाला भुलवायचं काम करताहेत.
आम्ही मात्र व्हाटसप वरती समाजाला एकत्रित करण्याच्या बढाया मारतोय. काहीजण बोलतात स्वतःच्या प्रसिद्दीसाठी लिहीताय, कोणी कोणी तर आम्हाला विद्वान आहात असे कमेंट करतात तर कोणी "हा एक चिमुरडा आम्हाला ज्ञान शिकवायला लागलाय " म्हणून बोंबा मारताहेत. मग नक्की काय करायचं तेच सुचत नाही. पण माझी गप्प राहून तमाशा बघत बसणार्यांची औलाद नाही तर हे विचार तळागळातील युवा वर्गापर्यंत पोहचवायचे आहेत. जर युवा वर्ग जागृत झाला तर अन्यायाच्या विरोधात पेटून उठेल अन् एकेकांना पेटवून टाकेल. दिवसेंदिवस समाजाला भुलवणारे दलाल मोठे होत चाललेत अन रानमाळावर दगड-धोंड्यातून काटे-कुटे तुडवणारा माझा माय-बाप अजून अज्ञानीच आहे. प्रस्थापित धुर्त नेते जसे सांगतील तसंच धनगर समाजातील नेते करताहेत त्याला काहीजण अपवाद आहेत. माझ्या गोरगरीब आणि दुष्काळाच्या खाईत होरपलेल्या मायबापांना खरं राजकारण काय आहे हेच माहीत नाही. ज्यादिवसी प्रत्येक धनगर बांधवांना खरं राजकारण कळेल त्यादिवशी बारामतीच्या बोक्याच्या व त्याचे बुट चाटणार्या धनगर समाजातील नेत्यांच्या टाळूवरची केसं शिल्लक राहणार नाहीत कारण त्या हरामखोरांच्या स्वागताला पायातलं पायतान हातात घेवूनच धनगर समाज बांधव उभे असतील हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज पडणार नाही. पण शेतामळ्यात राबराब राबणार्या अन् माळरानावर दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखणार्या धनगर समाजाला खरं राजकारण माहीत होत नसेल तर मग व्हाटसप आणि फेसबुक वरतून आम्ही समाजात काय परिवर्तन करू शकतो.? म्हणजे आम्हाला काय काम नाहीत असा त्याचा अर्थ होतो.
जिथं लोकांची मनं बदलली जात नाहीत तिथं आम्ही काय बदल घडविणार??? राजेशाही थाटात जगणार्या आणि एकेकाळी राजा समाज असणार्या आम्ही औलादी असताना देखील आज चमचेगीरी अन् गुलामगीरी प्रवृत्ति समाजात वाढत चाललेय. धनगर समाजाला एकमेकांच्या विरोधात लढायला प्रवृत्त केले जाते तिथं माझ्या धनगर समाजाला कधीच वरती येवू द्यायचं नाही हा प्रस्थापितांचा उद्देश्य आमच्या ध्यानात कधी येणार??? अरे पण प्रस्थापितच नव्हे तर आज धनगर समाजातीलच वरीष्ठ नेते एकमेकांची जिरवण्यासाठी राजकारण करताहेत कीती लज्जास्पद बाब आहे ही.
मला त्यांची नावे घ्यायची नाहीत कारण त्यांना कळालेही असेल मी कोणाबद्दल बोलतोय ते...
आज धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जरी असला तर प्रत्येकाला वाटतंय आरक्षण मिळावं पण त्याचं श्रेय स्वतःच्या पारड्यात पडावं ही कटूनीती धनगर समाजातील नेत्यांची झाली आहे त्यामुळे प्रस्थापितांना दोष देण्यात अर्थ नाही. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ही म्हण माझ्याच धनगर समाजातील नेत्यांना वापरावी लागेल. मग तिथं कोण लहान असेल अथवा मोठा.
धनगर समाजातील नेत्यांना वाटत असेल की धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे तर ज्या पक्षात ज्या संघटनेत आज तुम्ही समाजाची चमचेगीरी करताय त्या त्या पक्षाचा तुम्ही राजीनामा द्या अन पिवळ्या झेंड्याखाली एकत्रित येवून मंत्रालय गाठा तुम्हाला आरक्षण कोण देत नाही तेच मी बघतो.
मग कोणी भाजपचा असेल शिवसेना, माकप, भाकप, शेकाप, राष्ट्रवादी असेल कोंग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असो शिवसंग्राम असो जनसंग्राम असो अथवा जनता दल असो अथवा अलान फलान कोणते असतील तर त्या त्या पक्षातील धनगर समाजातील नेत्यांना माझी विनंती आहे की जर तुम्ही धनगर असाल आणि जर तुमच्या नसात धनगरांचं रक्त सळसळत असेल तर प्रत्येकांनी राजीनामे देवून पिवळ्या झेंड्याखाली एकत्र या नाहीतर आरक्षणाच्या आणि समाजविकासाच्या फालतू आणि पोकळ बडबड करत बसू नका. खरे मल्हारराव होळकरांचे वारसदार असाल तर थोडा कमीपणा घ्यायला शिका कोणीतरी धाकल्या बापाचं व्हायला शिका सतराशे साठ संघटना तयार करून समाजाचे विभाजन करत बसू नका आणि महत्वाचं म्हणजे धनगर समाजातील ५२ पोटजातींना एकत्रित करून राज्य पातळी तसेच राष्ट्र पातळीवरती एकत्रित येवून चर्चा विनीमय करा आणि तुम्हाला एकत्रितपणे येवून चर्चा करायची नसेल तर याचा अर्थ तुम्ही माझ्या धनगर समाजाचं सरळ सरळ विभाजन करताय मग तुमच्या संघटना काय पेटवायला आहेत का??
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
आपलाच समाजबांधव
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

No comments:
Post a Comment