अखिर हद कर दी आपने...
धनगर समाजाच्या एकीमध्ये बेकी आणायचे काम धनगर समाजातीलच काही हुजरे नेते करताहेत. खरंतर गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाजाचं वाटोळं कोणी केलं असेल तर धनगर समाजातील काही नालायक नेत्यांची नावं पुढे येताहेत मला त्यांची नावे घ्यायची नाहीत. आजपर्यंत आम्ही विनाकारण प्रस्थापितांना दोष देत होतो आणि आजही देत आहे पण माझ्याच समाजाचं नेतृत्व नालायक, निर्लज्ज आणि निष्क्रिय असेल तर प्रस्थापितांना दोष देण्यात काय अर्थ?
स्वतःची बुद्धि आणि स्वतःचे विचार यांनी कधीच समाजाच्या हक्कासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरले नाहीत थोडक्यात सांगायचं म्हणलं तर धनगर समाजाचे सर्वच नव्हे एक दोन नेते सोडले तर बाकीचे नेते इथपर्यंतचा विचार करण्याच्या लायकीचे वा पात्रतेचे नाहीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. स्वतःचा स्वाभिमान प्रस्तापितांच्या बुटाखाली गहाण टाकणार्या या औलादी धनगर समाजात जन्मालाच कशा येतात?? मग त्या औलादी खरंच धनगर समाजाच्या आहेत की आणखीन कोणाच्या?? असा प्रश्न उपस्थित राहतो.
आजपर्यंत रानोमाळी आणि डोंगरदरी-खोर्यातून पायांच्या नडग्या वाळवत शेळ्या-मेंढ्यांची राखण करणार्या माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला राजकारण काय असतं हेच माहित नव्हतं. धनगर समाजातील नेते कुठल्यातरी प्रस्तापितांची चमचेगीरी आणि हुजरेगीरी करताहेत याचं भानही नव्हतं. माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत या मस्तावलेल्या नेत्यांनी समाजाचं बाजारीकरण करून स्वताची घरं भरली, सात पिढ्या ऐशोआरामात बसून खातील एवढी संपत्ति त्यांनी गोळा केली. पण माझ्या गोरगरीब आणि भोळ्याभाबड्या धनगर समाजाच्या वाट्याला आली ती फक्त पाचवीला पुजलेली भटकंती आणि डोईवरती अन्यायची टांगती तलवार.
गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाजावरती अन्याय होत आला आहे धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू व्हाव्यात यासाठी समाजबांधव संघर्ष करताहेत, पण राजकीय नेत्यांना त्याचं काही भानच नाही. दि ९ जुलै ते १२ जुलै पर्यंत राज्यातील सर्व आमदारांना आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासंदर्भात निवेदने दिली होती. तद्नंतर दि १५ जुलै रोजी राज्यातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली आणि हा उपक्रम सर्व समाजबांधवांनी यशस्वीरीत्या राबविला आणि पार पाडला होता. या उपक्रमातून कोणाला नेतेगीरी अथवा पुढारपण करायचं नव्हतं, कोणीही स्वार्थासाठी झटत आणि झगडत नव्हतं तर समाजावरती होत असलेल्या अन्यायाचं भान ठेवून निस्वार्थीपणे लढा उभा करत व प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून एकमेकांच्या हातात हात देवून आमदारांना, मंत्र्यांना व प्रशासनालादेखिल हातघाईला आणले आहे. या लढ्यानंतर जरी सरकारने आरक्षणासंदर्भात तोडगा काढला नाही तर दि २१ जुलै रोजी बारामती येथे धनगर आरक्षण कृति समितीच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. लाखोच्या संख्येने धनगर समाज बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहे.
समाजातील तमाम बुद्धिजीवी वर्ग आणि तळागळातील सर्व समाजबांधव बारामतीला एकत्रित झाला तर प्रस्तापितांच्या ह्रदयात धडकी भरेल त्यांना कापरं भरतील म्हणून प्रस्तापितांच्या सांगण्यावरूनच म्हणा अथवा धनगर समाजात फाटाफूट करायची आणि धनगर समाजाला कधी एकत्रित येवू द्यायचं नाही म्हणून काही बाजारबुनग्यांनी त्याचदिवसी म्हणजे २१ जुलै रोजीच मुंबई येथील आझाद मैदानात मोर्चा आयोजित करुन विधानभवनावर आंदोलन करण्याच्या वल्गना करुन धनगर समाजाला संपवायचं षडयंत्रच रचलेलं आहे.
काहीही झालं तरी २१ जुलै रोजी धनगर समाज फक्त बारामतीमध्येच लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आणि आम्हीसुद्धा जातीनं तिथं पोहचणार. २१ जुलै रोजी मुंबई मध्ये मोर्चा आयोजित करण्यापाठीमागं काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे ते नाकारता येत नाही. २१ जुलै व्यतिरिक्त कोणत्याही दिवसी मुंबई मध्ये मोर्चा असो अथवा रास्तारोखो किंवा चक्काजाम आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देवून लढू पण २१ जुलै रोजी फक्त आणि फक्त बारामतीमध्येच प्रेरणा दिवस या निमीत्ताने लाखोच्या संख्येने उपस्थित राहू.
धनगर समाजाच्या संबंधित नेत्यांना माझी विनंती आहे की बाबांनो तुम्ही आजपर्यंत आमच्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाला फसवत आला आहात. माझ्या धनगर समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन समाजाला प्रस्थापित लांडग्यांच्या दावणीला बांधायचं पाप तुम्ही केले आहे आणि आजही करताय. तुम्हाला जर विधानभवनावर मोर्चा काढायचा असेल तर बिनदास्तपणे काढा पण २१ जुलै सोडून कधीही काढा आम्ही त्यावेळी तुमच्या सोबत राहू. पण जर २१ जुलै रोजी मुद्दामहून तुम्ही मोर्चा आयोजित करत असाल तर मग २३ मार्चच्या मोर्चासारखी अवस्था करून ठेवेन. मग अब्रुचे खोबरे निघेल आणि तुम्हास कायमचाच राजकीय सन्यास घ्यावा लागेल. म्हणून आरक्षण लढ्यासाठी २१ जुलै रोजी बारामतीला उपस्थित रहा ते फक्त सर्वसामान्य समाजबांधव म्हणूनच...
माझा भोळाभाबडा धनगर समाज पेटून उठला तर एकेकाला पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही मग तिथे प्रस्तापित असोत अथवा प्रस्तापितांचे तळवे चाटणारे समाजातील दलाल असोत. सर्वसामान्य धनगर समाजबांधवांमध्ये फुट पाडायचा प्रयत्न केला तर मग आम्हाला तलवारी हातात घ्याव्या लागतील हे विसरु नका. आता धनगर समाजातील पोरं शिकली व सवरली आणि लिहायला व बोलायला लागली त्यामुळे समाजात जागृति होते आहे. तुमच्याकडे प्रिंट मिडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया असेल पैसे देवून तुम्ही त्यांना विकत घेऊ शकता पण आमच्याकडे सोशल मिडिया & माऊथ पब्लिसिटी आहे त्यामुळे समाजात जागृति जास्त प्रमाणात होते. याचा अंदाज तुम्हाला २३ मार्चच्या मोर्चावेळी आलाच असेल त्यामुळे समाजाचा इतका पुळका असेल तर व्यवस्थित विचार विनीमय करून निर्णय घ्या आणि समाजहितासाठी संघर्ष करा.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

No comments:
Post a Comment