👉धनगर असाल तर पेटून⚡उठा..💪👊
देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष होत आली पण देशातील जनता अजूनही पारतंत्र्यातच आहे. १५० वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं आणि देश सोडून गेले पण याच देशातले काळे इंग्रज (पवार पाटील देशमुख ठाकरे फडणवीस) सत्ताधारी सत्तापिपासू मस्तवाल माणसं अजूनही आमच्या गोरगरीब जनतेच्या आणि शेतकर्यांच्या उरावर बसून राज्य करताहेत. गेल्या ६७ वर्षापासून या जनतेवर अन्याय होत आला आहे. विशेषता ज्या धनगर समाजाला राज्यघटनेतील अनुसुचित जमातीच्या यादीमध्ये कलम ३४२ वरती महाराष्ट्र राज्यासाठी असलेल्या नवव्या परिशिष्ठामध्ये ३६ व्या क्रमांकावरती ओरॉन, धनगड असा उल्लेख करून धनगर समाजाला त्याचवेळी डॉ बाबासाहेबांनी अनुसुचित जमातीचे हक्क दिलेले आहेत. राज्यघटनेत टायपिंग करताना "र" ऐवजी "ड" झाल्यामुळे सर्व राडा झाला आणि आमच्या धनगर समाजावर अन्याय होत आला आहे. आमच्या अज्ञानपणामुळे आणि अशिक्षितपणामुळे आम्हाला त्याची जाणीव झाली नव्हती पण हळूहळू आमच्या समाजातील समाजबांधव शिक्षित झाले तेव्हा ही चूक आमच्या लक्षात आली. महाराष्ट्र राज्यात धनगड नावाची कोणतीही जमात नाही अन् कोणी व्यक्तिही नाही मग धनगड या जमातीसाठी येणारा वार्षिक निधी, सामाजिक एवं शैक्षणिक निधी तसेच सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अधिकार आणि आरक्षण याचा उपयोग नक्की कोण करतंय?? आणि या समाजाचा निधी नक्की कोण खातंय?? याचा विचार कधी तुम्ही आम्ही केलात का?? कधी कधी तर या समाजाचा निधी वापरला न गेल्याने तसाच सरकार दरबारी परत गेलेला आहे. मग धनगड समाज महाराष्ट्र राज्यात नसताना त्याचा उल्लेख राज्यघटनेत कसा काय?? धनगड समाजाची एखादी व्यक्ति महाराष्ट्र राज्यात असती तर धनगर समाजाच्या मागणी दरम्याण कोणीच कसे पुढे आले नाही.?? किंवा त्या धनगड जमातीच्या व्यक्तिंनी कोणीच कसा विरोध केला नाही.??
खरंतर "धनगड" आणि "धनगर" या जमाती वेगवेगळ्या असतील तर मग ३६ व्या क्रमांकावर ओरॉन आणि धनगड असा उल्लेख असताना "ओरॉन" या शब्दाचा समानार्थी शब्द "धनगर" असल्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. (वन्यजनजाती अहवाल २००९-२०१० मध्ये ओरॉन, धनगर असाही उल्लेख आहे) तरीही ओरॉन, धनगड आणि धनगर या वेगवेगळ्या जमाती कशा काय?? याशिवाय हिंदी मधील र आणि ड शब्दांचा उच्चार इंग्रजीमध्ये R असाच केला जातो. त्यासंदर्भातील पुरावे सुद्धा आहेत.
मराठी व इंग्रजी शब्दांचा हिंदीमध्ये उच्चार करताना खालीलप्रमाणे करतात.
एकर(Acre) हिंदीमध्ये एकड
गुरगाव(Gurgaon)हिंदीमध्ये गुडगाव
छत्तीसगड (Chattisgarh): हिंदीमध्ये छत्तीसगढ़
त्याचपद्धतीने
धनगर(Dhangar): हिंदीमध्ये धनगड
याशिवाय श्री लक्ष्मणराव अघडते गुरूजी यांनी आदिवासी संशोधन केंद्रास पाठवलेल्या पत्रास प्रतिक्रिया देताना आयुक्तांनी धनगर आणि धनगड वेगळे आहेत असे नमूद केले पण धनगड ही जमात नांदेड व बीड या भागात वास्तव्यास असल्याचे कळवले पण तिथे त्यांनी नांदेड व बीड ऐवजी Nander व Bir असा उल्लेख केला आहे. माझा त्यां आयुक्तांना प्रतिसवाल आहे की महाराष्ट्र राज्यात नांदेर आणि बीर ही ठिकाणं नक्की कोठे आहेत?? ती ठिकाणे आम्हाला दाखवून द्याल का?? जर नांदेर आणि नांदेड व बीर आणि बीड हे वेगवेगळे आहेत असे दाखवून द्याल तर आम्ही आमची अनुसुचित जमातीच्या सवलती लागू करण्याबाबतची मागणी इथेच थांबवतो. पण जर महाराष्ट्रातील "नांदेर आणि नांदेड" व "बीर आणि बीड" ही ठिकाणे एकच असतील तर मग धनगर आणि धनगड ही जमातसुद्धा वेगवेगळी नसून एकच आहे हे मान्य करून आणि त्या अनुषंगाने त्वरित आम्हाला आमच्या अनुसुचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात ज्या गेल्या ६५ वर्षापासून प्रलंबित आहेत.
राहीला प्रश्न धनगर समाज आदिवासी असल्याचे निकष पुर्ण करतो की नाही??
तर उत्तर आहे होय, धनगर समाज आदिवासी असल्याचे निकष पुर्ण करतो.
प्राचीन अर्थातच आदिम काळापासून धनगर जमात वास्तव्यास आहे. आणि धनगर जमातीचा प्राचीन काळापासूनचा इतिहास सुद्धा आहे.
भौगोलिक स्थितीचा अभ्यास केल्यास धनगर जमात ही डोंगरदरी-रानावनात लोकवस्ती करून वास्तव्यास राहणारी जमात आहे.
वन्यजनजाती अहवालामध्ये गायी, म्हैसी, बकरी, शेळ्या, मेंढ्या, बैल, कु्त्रा, गाढव, घोडा खेचर आदी वन्य प्राणी पाळणारी जमात म्हणजे वन्यजनजाती अर्थातच आदिवासी तर मग धनगर समाज प्राचीन काळापासून शेळ्या-मेंढ्या, गायी, म्हैसी, बैल कुत्रा घोडा यांचे पालन करतो. त्याचप्रमाणे धनगर समाज बांधवांकडे शेती नसल्याने व शेती असली तर थोडकीच असते त्यासाठी शेळ्या-मेंढ्याचे पालन-पोषण करण्यासाठी एका गावावरून दुसर्या गावी भटकंती करण्यासाठी धनगर समाजाला वणवण करावी लागते. अर्थातच आदिवासी समाजापेक्षा अत्यंत हालाखीचे जीवन धनगर जमातीचे आहे.
लाजरे-बुजरेपणा: धनगर समाज मुळातच डोंगर-दरी खोर्यात व रानावनात राहत असल्याने लाजरे-बुजरेपणा त्यांच्या अंगी आहे. शिवाय धनगर समाज हा एकोप्याने राहणारा वाडी वस्तीवरती लोकवस्ती करून शहरापासून दूर आढळतो.
मागासलेपण: मुळातच धनगर जमात ही सतत भटकंती करणारी जमात असल्याने स्वतःची व शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी एका गावावरून दुसर्या गावी भटकंती करण्याची परिस्थिति उद्भवली ती आर्थिक मागासलेपण असल्यानेच. जर धनगर ही जमात धन-दौलतीने समृद्ध असती तर भटकंती करण्याची वेळ आलीच नसती. भटकंती आमच्या पाचवीलाच पुजली असल्याने धनगर समाजबांधवांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवरती आला. एखाद्या गावात शिक्षणासाठी मुलामुलींना ठेवायचं म्हणलं तर खर्च परवडत नसल्याने पोरांचं आणि कोकरा-करडांचं लचांड सोबत घेऊन धनगर समाजबांधवांना वणवण करावी लागते. त्याशिवाय हा समाज भटका असल्याने राजकीय क्षेत्रात कधी पुढे आलाच नाही. अर्थातच आमचं नेतृत्व नव्हतं. राजकीय मागासलेपणा येथे दिसून येतो.
अशा पद्धतीने प्राचीन जीवनमान, भौगोलिक स्थिती व राहणीमान, पशूपालन, लाजरे-बुजरेपणा, मागासलेपणा यावरतून व सध्यस्थितीवरतून धनगर समाज आदिवासी असल्याचे निकष पुर्ण करतो. आदिवासी समाजापेक्षा अत्यंत बिकट आणि हालाखीची परिस्थिति धनगर जमातीच्या वाट्याला आली असताना धनगर समाजास अनुसुचित जमातीच्या सवलती देण्यास मागील सरकार ना नू करत होते त्यावेळी धनगर समाजाने त्यांना २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत हिसका दाखवला. सदरचे राज्यातील सरकार सुद्धा आश्वासने विसरून धनगर समाजास अनुसुचित जमातीच्या सवलती देण्यासंदर्भात वेळकाढूपणा करत असलेने धनगर समाजात तीव्र संतापाची लाट आहे. सदरच्या पावसाळी अधिवेशनात जर सरकारने आरक्षणाचा मुद्धा मार्गी लावला नाही तर धनगर समाज रस्त्यावर उतरून महाराष्ट्र पेटवून टाकायला मागे पुढे पाहणार नाही. रस्त्यावर कोणत्याही आमदार/खासदार अथवा मंत्र्यांची गाडी फिरकू देणार नाही अन् फिरकलीच तर चक्काचूर केल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही मग आमच्यावर गोळ्या झेलायची वेळ आली तरी बेहतर पण आमचे हक्क हिसकावून घेतल्याशिवाय कोणालाही सुखात जगू देणार नाही. कारण गेल्या ६५ वर्षापासून आम्ही अन्याय आणि दुख सहन करत आलोय आता आमचा संयम सुटलेला आहे.
सर्व समाजबांधवांनी २१ जुलै रोजी बारामती येथे उपस्थित रहावे. प्रस्थापित नेते आणि प्रस्थापितांचे तळवे चाटणारे धनगर समाजातील निष्क्रिय नालायक आणि निर्लज्ज नेते धनगर समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र रचून त्याचदिवसी म्हणजे २१ जुलै रोजी मुंबई मध्ये मोर्चा आयोजित करून धनगर समाजाची दिशाभुल करताहेत. त्यासाठीच सुज्ञ शिक्षित आणि होतकरू युवकांनी २१ जुलै रोजी जातीवंत धनगर समाज बांधवांना बारामतीमध्येच उपस्थित राहण्यास आवाहन करावे. ज्यांच्या अंगात फक्त धनगर समाजाचं रक्त सळसळतंय त्यांनीच २१ जुलै रोजी बारामती येथे उपस्थित रहावे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

No comments:
Post a Comment