Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday, 2 July 2015

आता नाही माघार "आर नाहीतर पार"...


कोणावर कीती विश्वास ठेवायचा याला सुद्धा मर्यादा असतात. पण जर कोणी मर्यादाच ओलांडत असेल तर मग आमच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. मुळातच राजा समाज असणारे आणि या देशावर ३५० वर्षापेक्षा अधिक राज्यकारभार करणार्या महापुरुषांचे आम्ही वारसदार आहोत. बुद्धीच्या आणि मनगटाच्या जोरावर लढून आम्ही आमचे हक्क मिळवायला आज रणांगणात उतरणार अन् कारण हक्कासाठी लढाई करणं हे आमच्या रक्तातच आहे.
आजपर्यंत कोंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने आमच्यावरती अन्याय केला. त्या त्या वेळी आम्ही आंदोलन मोर्चा काढून रास्तारोखो करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी आम्हाला आमचे हक्क दिले नाहीत कारण जर धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी झाली तर या महाराष्ट्र राज्यात धनगर समाजासाठी लोकसभा व विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी राखीव/खुले होतील आणि पवार पाटील देशमुख ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्र राज्यात राजकारण करता येणार नाही. हा विचार डोक्यात ठेवून त्या आघाडी सरकारने आम्हास आमच्या हक्कापासून वंचित ठेवले होते.
गेल्या वर्षी म्हणजेच १५ जुलै २०१४ रोजी धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी व्हावी म्हणून पंढरपूर-बारामती आरक्षण दिंडी निघाली होती आणि २१ जुलै २०१४ रोजी पंढरपूरहून निघालेल्या दिंडीत ४-५ लाख समाजबांधव सामील होऊन बारामती मध्ये दाखल झाले होते. तेथेच चार-पाच लाख धनगर समाजबांधवांनी ठिय्या मांडला होता आणि तेव्हा धनगर समाजातील १६ वाघ आमरण उपोषणासाठी बसले होते ९ दिवस उपाशी-तापाशी राहून समाजाला न्याय मिळावा म्हणून झगडत होते. सदरच्या भाजप सरकारने सत्तेत आल्यास १० दिवसात आरक्षणाची आमलबजावणी करतो असे आश्वासन दिले आणि उपोषण माघारी घ्यायला लावले. त्यानंतर ४ जानेवारी २०१५ रोजी नागपुर येथिल मेळाव्यात मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसात निर्णय घेतो असेही सांगितले होते. त्यानंतर सरकारकडे वेळोवेळी आरक्षणाच्या आमलबजावणीची मागणी केली तर त्या त्या वेळी आम्ही धनगर समाजावर आणि या विषयावर अभ्यास करतोय अशीच उत्तरं मिळाली. मग आम्ही हीच उत्तरं ऐकण्यासाठी भाजपला पाठींबा दिला आहे का???
येथे मला छोटसं उदाहरण द्यावसं वाटतंय, "जर लहान बाळ रडायला लागलं तरच आई त्याला दुध पाजते पण जर बाळ रडतच नसेल तर आई दुसरं काही तरी काम हाती घेते, जोपर्यंत बाळ शांत आहे तोपर्यंतच." धनगर समाजाच्या बाबतीत असंच झालंय धनगर समाज शांत बसलाय म्हणून त्यांच्याकडे लक्ष्य दिले जात नाही. मग तमाम धनगर बांधवांना माझा एकच प्रश्न आहे की, अजून कुठपर्यंत आणि कधीपर्यंत शांत बसायचं??
पण आता आम्ही शांत बसणार नाही आणि माघारही घेणार नाही आर नाहीतर पार हीच आमची भुमिका असेल. एकेकाळी राजा समाज असणारी राजेशाही थाटात वावरणारी आपली जमात आज आपल्याच हक्काची भीख मागू लागली आहे याचा जराही विचार तुमच्या-आमच्या मनात का येत नाही?? राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे कलम ३४२ वरती क्र ३६ वर धनगर [राज्यघटनेत धनगड असा उल्लेख] समाजाला स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसुचित जमातीमध्ये सामाविष्ट केले आहे. पण धनगर चा धनगड झाल्याने गेली ६५ वर्ष आमच्यावर अन्याय होत आला आहे. खरंतर धनगड नावाची जात आणि कोणी धनगड जातीचा व्यक्ति या महाराष्ट्र राज्यात कोठेही नाही.
मग राज्यघटनेमधील "धनगड" या जातीचं आरक्षण नक्की गेलं कुठे?? जर धनगड ही जात आहेच नाही तर मग बाबासाहेबांनी त्या जातीचा उल्लेख केला तरी कसा?? बुद्धिमान आणि थोर विचारवंत असणारे बाबासाहेब चूक करतीलच कसे?? १९५० पासून आजपर्यंत "धनगड" या जातीचे विवीध क्षेत्रातील आरक्षण आणि दरवर्षीचा समाजिक विकास नीधी यांचा वापर नक्की करतंय कोण?? कधी कधी हा निधी वापरला न गेल्याने तो सरकार दरबारी तसाच परत गेला. मग सरकारने त्यावेळीच योग्य निर्णय घेवून धनगर समाजाला न्याय द्यायला हवा होता पण स्वार्थी भावनेपोटी आणि स्वतःच्या खुर्चीसाठी धनगर समाजाला न्याय न देता सतत आमच्यावर अन्यायच केला गेला.
म्हणून आता गप्प बसून चालणार नाही वेळ आली तर आमच्या हक्काचं हिसकावून घ्यायला आम्ही मागे राहणार नाही. हवं तर रस्त्यावर उतरून आम्ही हिसकावून घेवू त्यासाठीच दि ९ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या २८८ आमदारांना व विधानपरिषदेच्या ७८ आमदारांना जे निवेदन द्यायचे आहे त्याचा मसूदा तयार करण्यात आला असून त्यादिवसी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील समाजबांधवांनी त्या त्या आमदारांना निवेदन द्यावे.
त्याचप्रमाणे दि १३ जुलै पासून पावसाळी अधिवेशन चालू होणार असून त्यामध्ये धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळण्याबाबतचा योग्य निर्णय घ्यावा यासाठी दि १५ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी/प्रांताधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्या त्या भागातील सर्व धनगर समाजबांधवांनी प्रत्येक कार्यालयात जावून १५ जुलैला एकाच दिवसी एकच निवेदन द्यायचे आहे असे ठरले आहे.
प्रत्येक मतदारसंघातील तसेच त्या त्या तालुक्यातील सर्व धनगर समाजबांधवांनी वैयक्तिक जबाबदारी घेवून सरकारला आवाहन करावे. त्याच दिवसी म्हणजे १५ जुलै २०१५ रोजी धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य डॉ शशिकांत तरंगे साहेब नागपुर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. जर धनगर समाजाला न्याय मिळाला नाही तर ९ अॉगस्ट २०१५ रोजी क्रांतीदीनाचे औचित्य साधून राज्यातील तमाम धनगर समाजबांधव रस्त्यावर उतरवून क्रांतीची मशाल पेटवणार आहेत. सरकार जर शहाणं असेल तर सरकारने वेळीच योग्य तो निर्णय घेवून धनगर समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा अन्यथा ९ अॉगस्ट २०१५ रोजी होणार्या जिवीत व वित्त हाणीस सरकार जबाबदार राहील. यासाठी दि ९ जुलै रोजी सर्व विधानसभा/विधानपरिषदेच्या आमदारांना तसेच दि १५ जुलै रोजी सर्व तहसीलदार/प्रांताधिकारी/जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहेत.  त्या त्या भागातील समाजबांधवांनी जबाबदारी घेवून प्रा.दत्ताजीराव डांगे सर (+919975924621), मा निवांत कोळेकर सर (+91 75887 97729), मा एम जी बोरकर सर (+919922581976) मा.हरिष कडू सर (+919921400567) अथवा माझे व्हाटसप अकौंट नितीनराजे अनुसे (+917666994123) वरती कळवावे ही नम्र विनंती.
निवेदनासाठी तयार करण्यात आलेला मसुदा वरती उल्लेख केलेल्या सर्व मान्यवरांकडे आहे तसेच सर्व व्हाटसप ग्रुप वरती पाठवण्यात आला आहे याची नोंद घ्यावी आणि हा ST आरक्षण आमलबजावणी बाबतचा लढा तीव्र करावा ही नम्रतेची विनंती.

जय मल्हार!!! जय अहिल्या!!!

         -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

No comments:

Post a Comment